मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

राहुल's picture
राहुल in जनातलं, मनातलं
27 Sep 2022 - 7:54 am

सरोगेट पार्टनर आणि बॉडी वर्क थेरपी

'सरोगेट पार्टनर' म्हणजे असे पुरुष अथवा स्त्री की जे कामजीवनाविषयी प्रशिक्षण घेतलेले असतात व कामशास्त्रज्ञाकडे आलेल्या स्त्री-पुरुषांना कामजीवनाविषयी काहीवेळा प्रत्यक्ष कृती करून शिकवत असतात. स्त्री-पुरुष दोन्ही 'सरोगेट पार्टनर्स' असतात. स्त्री पेशंटसाठी पुरुष व पुरुष पेशंटसाठी स्त्री सरोगेट पार्टनर तयार असतो.LGBT साठी देखील असे सरोगेट ट्रेन केले असतात. प्रत्येकवेळी सेक्स केला जातोच असे नाही. नपुंसकत्व, शीघ्रवीर्यपतन यावर उपचार करताना स्त्री सरोगेट पार्टनर त्या पुरुषाशी *काहीवेळा* लैंगिक संबंध ठेवतात, कामजीवनावरील काही पद्धती पुरुषाला शिकवतात. अर्थात ही पद्धत आज बहुतेक ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. परंतु काही प्रगत देशात अशा संस्था अजून कार्यरत असल्याचे समजते. या सरोगेट पार्टनर्सचा शोध लागल्यावर हा 'वेगळ्या प्रकारचा वेश्या व्यवसाय आहे' अशी टीका देखील झाली. त्या डॉक्टर्सना या गोष्टी बंद करण्यासाठी दडपण आणले गेले. काही कामशास्त्रज्ञांच्या मते अवघड लैंगिक समस्यांमध्ये सरोगेट पार्टनर्सचा चांगला उपयोग होतो असे आढळून आले आहे.सरोगेट पार्टनर्सकडून स्त्री-पुरुष पेशंटवर लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता असते असे काहींचे म्हणणे आहे.

'सरोगेट पार्टनर्स' सारखेच 'बॉडी वर्क थेरपी' यामध्ये खुद्द कामशास्त्रज्ञ आलेल्या स्त्री-पुरुष पेशंटशी शारीरिक संभोग करून कामजीवनावरील पद्धती शिकवतो. ही पद्धत आज सर्वत्र बंद आहे. या दोन्ही उपचारपद्धतीचा वापर करून त्यावर काही इंग्रजी चित्रपट व कादंबऱ्याही निघाल्या आहेत.

स्त्री सेक्सला नाही म्हणत असेल तरी पुरूष का दबाब करत असतो?

दोघांची लैंगिक भूक ही वेगळी असते. स्त्रीच्या नकारामधेही होकार असतो, असा पुरुषाला गैरसमज असतो. त्यामुळे तो सेक्स करताना स्त्रीच्या इच्छेचा विचार करत नाही. कामजीवनातील आवड-निवडीविषयी खुली चर्चा दोघांमधे होत नाही, म्हणून ही अडचण येते. स्त्री विरोध करत नाही, गप्प तयार होते असे लक्षात आले, की तिचा नकार हा होकारच आहे, असे गृहीत धरले जाते. अशा सेक्समधे स्त्रीला योनिमार्गात ओलावा येत नाही, कामपूर्ती मिळत नाही, वेदना होतात, असे प्रकार भरपूर जोडप्यांमधे पहायला मिळतात. दोघांनी खुलेपणाने एकमेकांना आवड निवड सांगणे आणि तसे वागणे हा योग्य पर्याय आहे. योग्य Sexologist ची मदत घ्या. नीट समजुन घ्या.

हस्तमैथुन आणि सेक्स यापैकी कशाने जास्त सुख मिळते आणि वीर्यनाश कशाने जास्त होतो ?

वीर्यनाश तर कोणत्याच क्रियेने होत नाही. वीर्यनाश होतो हा निव्वळ गैरसमज आहे. त्याने कोणती ताकद कमी होत नसते. वयात आल्यावर वाढलेली वासना शमवण्यासाठी सेक्स आणि हस्तमैथुन हे दोन पर्याय आहेत. वीर्य पडल्यावर वासना शमल्याने आनंद मिळतो. सेक्स केल्याने पण आनंद मिळतो. हस्तमैथुनच्या तुलनेत सेक्स केल्याने जास्त सुख मिळते. कारण दुसरे शरीर, स्पर्शसुख जास्त असते. ज्यांना जास्त सेक्ससुख उपलब्ध असते त्यांच्यात हस्तमैथुन प्रमाण कमी होते. सुरक्षित सेक्स करता येत नसेल तर हस्तमैथुन योग्य. निदान कोणता गुप्तरोग होण्याची भिती नसते.

लैंगिक समस्येवरील औषधांचा खप वाढला आहे याचा अर्थ पुरुषांच्या समस्या वाढल्या असा होतो का?

औषध खप वाढला म्हणजे त्याची गरज त्या पुरुषांना असतेच असे नाही. बऱ्याचदा फार कमी गोळ्या उपचारासाठी पुरेशा असतात, पण काही डिग्री असलेले डॉक्टर पैसे मिळवण्यासाठी भरपूर औषधे पेशंटच्या गळ्यात मारतात. काही लैंगिक समस्यांमधे गोळ्या जास्त दिवस आणि काही कालावधीसाठी घ्याव्या लागतात. सेक्स समस्यांना धरून भीती, लज्जा आणि अज्ञान असल्याने लोक उल्लू बनतात. नॉर्मल असताना बॉयफ्रेंड स्वतःच्या लैंगिक क्षमतेविषयी भीती बाळगतो आणि गोळी घेत राहतो. त्यामुळे हा खप वाढताना दिसतोय. समस्या व्यसनाधीनता, लठ्ठपणा, मधुमेह यामुळे वाढले हे खरे आहे, पण त्याचबरोबर वरील गोष्टींमुळे खप वाढलेला दिसतो, हे पडद्याआडचे सत्य आहे.

लिंग मजबूत करण्यासाठी काही उपाय आहे ?

निसर्गतः स्त्री-पुरुषाला जे अवयव आहेत ते नॉर्मल माणसात व्यवस्थित असतात. लिंग हे सेक्स आणि मूत्रविसर्जन करण्यासाठी वापरले जाते. त्यासाठी जे लिंग आहे ते पुरेसे ताकदीचं आहे. सेक्स करायचा म्हणजे काहीतरी मोठे काम आहे, त्याला खूपच ताकद लागते अशा गैरसमजापोटी लोक चुकीच्या अपेक्षा करतात. त्यातून त्याची ताकद, मजबूती वाढवण्यासाठी विचार मनात घट्ट घर करून बसतात. माझ्या माहितीप्रमाणे पुरूष लिंगाने बादली,बॅग्स उचलायचे गरज नाही.आणि पळत जाण्याला देखील त्याचा उपयोग नाही.त्यामुळे लिंग ताठरता येते एवढे पुरेसे असते .ताठरता येत नसेल तर त्यावर उपचार असतो पण मजबूत करण्याचा काही संबंध नाही. लिंग विषयी शास्त्रीय माहिती नसेल तर किती गैरसमज होतात हे या अपेक्षेवरून समजते.

पेपरमधील वा इंटरनेटवरील जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका.


दररोज सेक्स करणे चांगले की वाईट
?

दोघांचीही इच्छा असेल तर उत्तम. सेक्सने त्वचा, हृदय, संप्रेरके, मेंदू, मन, शुक्राणू यांना फायदा असतो. पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे. अर्थातच २१ वेळा वीर्यपतन हस्तमैथुन किंवा सेक्स यातून होऊ शकते. फक्त सेक्समधूनच व्हावे असे नाही. इथे महत्वाचे आहे ते पार्टनरची इच्छा असणे. कारण अशा माहितीमधून पुरुष अर्धी माहिती मान्य करतो. पार्टनरचा विचार करत नाही. हल्लीची मुलं-मुली सेक्स लवकर अनुभवतात. पण सेक्स माहिती अर्धवट आहे. फक्त कोण्डोम वापरायचा असतो एवढेच माहिती आहे. त्यामुळे विवाहापूर्वी बॉयफ्रेंड बरोबर सेक्स करताना चुकीची अपेक्षा करून वाद जास्त होऊ लागलेत. तसेच विवाहित तरुणी त्यांच्या पार्टनरकडून अतिअपेक्षा करून त्या पूर्ण झाल्या नाहीत, की घटस्फोटचा निर्णय जलद घेतात. यात लैंगिक जीवनाबद्दल अर्ध्या माहितीवर हा सगळा घोळ होत आहे. म्हणजे विवाहित वा अविवाहित असताना कधीही सेक्स करा पण त्याचं ज्ञान दोघांना असणे आवश्यक आहे.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)

आरोग्यशिक्षणलेखसल्लाप्रश्नोत्तरेआरोग्य

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

27 Sep 2022 - 8:32 am | मुक्त विहारि

धन्यवाद

प्रसाद गोडबोले's picture

27 Sep 2022 - 11:54 am | प्रसाद गोडबोले

हे लेख म्हणजे अक्षरशः वंध्यामैथुन अर्थात वांझेशी रतिक्रिडा आहेत . एकदम अनुत्पादक , व्यर्थ , निष्फळ , श्रम ; निष्फळ व्यापार .

काहीकाही सल्ले तर सरळ सरळ चुकीचे वाटताहेत .

विवाहित वा अविवाहित असताना कधीही सेक्स करा

भारतातील सर्वच्या सर्व कायदे स्त्रीयांना बायसड आहेत. त्यामुळे अविवाहित असताना सेक्स करणे हा एक मोठ्ठा जुगार आहे पुरुषांच्यासाठी. अगदी स्त्रीची संपुर्ण संमती असली तरी पुढे मागे पीरीयड्स मध्ये मूड फ्लक्चुएशन्स झाल्यावर तीचे विचार बदलणार नाहीत कशावरुन ? आणि समजा तिने मारली पलटी की पुरुष बिचारा बसेल तुरुंगाची हवा खात . बलात्काराचा खोटा आरोप केला म्हणुन स्त्री तुरुंगात बसली आहे अशी एकही बातमी पाहण्यात आलेली नाहीये.
तस्मात अविवाहित असताना सेक्स हा पुरुषांच्यासाठी आगीशी खेळ आहे , ज्याला व्यवस्थित जमत असेल त्यानेच करावा नाहीतर उगाच भाजुन घ्याल हे निश्चित.

दररोज सेक्स करणे चांगले की वाईट ? दोघांचीही इच्छा असेल तर उत्तम.

दररोज ? महिन्यातुन २१ वेळा ? आर यु किडींग मी ? अगदी जवानीच्या ऐन जोशातही महिन्यातुन २१ वेळा सेक्स करावा असे वाटणारी एकही मुलगी पाहण्यात आलेली नाहीये आमच्या . तुम्ही डॉक्टर असल्याने कदाचित तुम्हाला असले ऑऊट्लायर्स भेटले असतील पण ते अफवाद झाले .
"अभ्यासु" "जाणकार" मिपाकरांच्या अनुभवात असे कोणी पाहण्यात आलेले असेल तर त्याविषयी जाणुन घेण्याबाबत उत्सुक आहे ;)

पेपरमधील वा इंटरनेटवरील जाहिरातींवर विश्वास ठेऊ नका.

>>> मिसळपाव वरील लेखांच्याबाबत काय ?

राहुल's picture

27 Sep 2022 - 12:25 pm | राहुल

अभ्यासुनी प्रकटावे

प्रसाद गोडबोले's picture

27 Sep 2022 - 2:18 pm | प्रसाद गोडबोले

अभ्यास ? ह्याला तुम्ही अभ्यास म्हणता ? =))))

बाकी कामजीवनाच्या धाग्यावर समर्थांच्या दासबोधातील सुवचन ! उत्तम विरोधाभास आहे हा =))))

कॉमी's picture

27 Sep 2022 - 1:40 pm | कॉमी

२१ हा शब्द वाचून उरलेले शब्द वाचून, समजून घेण्याची तसदी न घेता बोट उचलले आणि ताड ताड टाईप केले असे दिसते आहे :)

बाकी ते

अगदी स्त्रीची संपुर्ण संमती असली तरी पुढे मागे पीरीयड्स मध्ये मूड फ्लक्चुएशन्स झाल्यावर तीचे विचार बदलणार नाहीत कशावरुन ?

वाचून भरपूर हसलो.

प्रसाद गोडबोले's picture

27 Sep 2022 - 2:15 pm | प्रसाद गोडबोले

कॉमी , तुअमचे प्रतिसाद असे कायम भरकटलेले का असतात की हेही तुमच्या क्लासिकल कम्युनिझम चे किंव्वा निओमॉडर्निझम व्यवच्छेदक लक्षण आहे ?

२१ हा शब्द वाचून उरलेले शब्द वाचून, समजून घेण्याची तसदी न घेता बोट उचलले आणि ताड ताड टाईप केले असे दिसते आहे

तुम्ही महिन्यातील २१ दिवस कामोपभोग घेतला आहे का कधी ? बरं घेतला असेल तर कितीदा ? एक महिना , दोन महिने की नित्यनेमाने दर महिन्यात २१ वेळा तुम्ही वीर्यपतन करवता ? किमान माझ्या पाहण्यात तरी असे कोणीही नाही .

वाचून भरपूर हसलो.

हां , विनोद हा नेहमीच अज्ञानमुलक असतो. प्रॉपर म्युच्युअल कन्सेंट ने सेक्स केले अन नंतर विचार पालटले म्हणुन बलात्काराचा आरोप दाखल केला अश्या कित्येक केसेस दाखवता येतील. ह्या नादात धनुभाऊंचे अख्खं करीयर उध्वस्त होता होता राहिले. राठोड साहेबांचे मंत्रिपद गेले.
ह्याच्या विरुध्द काही केस - म्हणजे पुरुषाने स्त्रीवर बलात्कार अन फसवणुकीचा आरोप केल्याचे एक जरी उदाहरण तुमच्या पाहण्यात असेल तर जरुर सांगा !

तस्मात रोमॅन्टिक एन्डेव्हर्स हा आगीशी खेळ आहे, आहेच , ज्याला जमतो त्यानेच करावा असे आमचे ठाम मत आहे . सगळ्यांच शशी थुरुर होता येत नसतं !

हैला, मधनच क्लासिकल कम्युनिझम आणि काय मोडर्निझ्म आणायचे आणि भरकटलेले प्रतिसाद कोणाचे तर माझे ! मज्जा आहे ब्वा.

महिन्यातून २१ वेळा वीर्यपतन सहज शक्य आहे- महिनोन महिने आणि वर्षानुवर्षे शक्य आहे- सेक्स किंवा हस्तमैथुनातून. ह्यापलीकडे कोणत्याही व्यक्तिगत पातळीवर उत्तर देण्याची माझी इच्छा नाही. मी सेक्शुअली काय आणि कितीवेळा करतो हे काय इथे कन्फर्म करण्याची माझी इच्छा नाही.

बाकी मी हसलो ते काय बलात्काराचे खोटे आरोप होतात या कल्पनेमुळे नाही, तर प्रिरियड मध्ये मड चेंज झाला म्हणून बलात्काराचा आरोप या भंकस संकल्पनेवर मला हसू आले.

आणि तुमचे तर्क कितो गंडके हे बघा. जर पिरियडमध्ये मूड चेंज होऊन स्त्री पोलीस केस करत असेल तर ती लग्नानंतर सुद्धा करू शकते. लग्नांनातर सेक्स करणे सुद्धा तुमच्या दृष्टीने धोक्याचे असायला हवे.

प्रसाद गोडबोले's picture

27 Sep 2022 - 3:15 pm | प्रसाद गोडबोले

लग्नांनातर सेक्स करणे सुद्धा तुमच्या दृष्टीने धोक्याचे असायला हवे.

होय , तेही धोक्याचे आहेच , मॅरीटल रेप विषयी सुप्रीम कोर्टात आणि विदेशात चाललेला वादविवाद फॉल्लॉ करत नाही का तुम्ही ?

तुमचे नाव कॉमी आहे आणि तुमच्या विचारातुन निऑ मॉडर्निस्ट विचार झळकतात हे अगदी उघड आहे !

बाकी वर्षानुवर्षे, दर महिन्याला, न चुकता २१ तोफांची सलामी देणार्‍यांना कोपरापासुन ________________/\______________
मी इतकेच म्हणाअलो की किमान माझ्या पाहण्यात ऐकण्यात वाचण्यात तरी असे कोणी नाही.
a 2017 study that appeared in the Archives of Sexual Behavior found that the average adult currently enjoys sex 54 times a year, which equates to about once a week.
https://link.springer.com/article/10.1007/s10508-017-0953-1

तर्कवादी's picture

27 Sep 2022 - 4:06 pm | तर्कवादी

भारतातील सर्वच्या सर्व कायदे स्त्रीयांना बायसड आहेत. त्यामुळे अविवाहित असताना सेक्स करणे हा एक मोठ्ठा जुगार आहे पुरुषांच्यासाठी.

मला वाटतं डॉक्टर फक्त वैद्यकीय दृष्टीकोनातून लिहीत आहे. कायदेशीर गोष्टी , समाजात घडणारे गैरप्रकार या अनुषंगाने ते लिहित नाही.

तसंही पुर्ण वाक्य होतं की "म्हणजे विवाहित वा अविवाहित असताना कधीही सेक्स करा पण त्याचं ज्ञान दोघांना असणे आवश्यक आहे."
याचा अर्थ " अविवाहित असताना सेक्स करा" असा सल्ला दिला आहे असं नसून "विवाहित वा अविवाहित असताना कधीही सेक्स करत असाल तर त्याचं ज्ञान दोघांना असणे आवश्यक आहे " अशा प्रकारे त्याचा अर्थ ध्वनित होतो.

तसंही विवाहपुर्व वा विवाहबाह्य संबंध यातून स्त्रीने बलात्काराचा आरोप केला तर पुरुषाकरिता अशा प्रकारचे संबंध ठेवण्यात कायदेशीर दृष्टीने धोका आहे असे जरी असले तरी त्याला मोठ्ठा जुगार म्हणता येणार नाही. जुगार ही अशी गोष्ट आहे ज्यात अनुकुल परिणामापेक्षा (पक्षी : जुगारात जिंकणे) प्रतिकूल परिणामांची (पक्षी: जुगारात हरणे) शक्यता जास्त किंबहूना खूप जास्त असते - आणि व्य्वहारातल्या अशाच गोष्टीला साधारणतः जुगाराची उपमा दिली जाते. विवाहपुर्व वा विवाहबाह्य संबंध यातून स्त्रीने बलात्काराचा आरोप करण्याची आणि त्यामुळे पुरुषाला तुरुंगात जावू लागण्याची शक्यता ही असे काही न घडण्याच्या शक्यतेपेक्षा बरीच कमी असते. नाहीतर आसपासच्या /माहितीतल्या तरुण ,अविवाहीत मुलांपैकी महिन्याला एखादा तरी तुरुंगात गेल्याच्या बातम्या कानी आल्या असत्या.
रस्त्यावरुन दुचाकीने जाताना अपघात होवून मृत्यू ओढावतो तेव्हा रस्त्याने दुचाकीने फिरणे हा मोठ्ठा जुगार आहे म्हणणार का ?

बाकी लेख / लेखमाला यातील उद्देश, विषय, आशय इत्यादींबद्दल सध्यातरी काही टिप्पणी नाही.

आग्या१९९०'s picture

27 Sep 2022 - 3:00 pm | आग्या१९९०

पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे.

हो, तीन दिवसांपूर्वी नेटवर ही बातमी वाचली. कठीण असले तरी अशक्य नाही अर्थात ह्यात सातत्य टिकविण्यासाठी फँटासी उपयोगी पडू शकते.
छान माहिती मिळत आहे. मालिका चालू ठेवा.

तर्कवादी's picture

27 Sep 2022 - 4:08 pm | तर्कवादी

पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे.

हे कोणत्या वयोगटातील पुरुषांसाठी लागू आहे ?

आग्या१९९०'s picture

27 Sep 2022 - 4:18 pm | आग्या१९९०

५०+

तर्कवादी's picture

27 Sep 2022 - 4:19 pm | तर्कवादी

५०+ वयोगटासाठी २१ वेळा , मग विशीतल्या पुरुषांसाठी किती वेळा ?

सुरिया's picture

27 Sep 2022 - 5:18 pm | सुरिया

ते कंटाळा आला की करायचा विनोद आठवला. ;)

आग्या१९९०'s picture

27 Sep 2022 - 5:28 pm | आग्या१९९०

प्रोस्टेटच्या आरोग्यासाठी, पन्नाशीनंतर प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याची शक्यता जास्त असल्याने हा उपाय.
https://www.webmd.com/prostate-cancer/ejaculation-prostate-cancer-risk

तुर्रमखान's picture

27 Sep 2022 - 10:59 pm | तुर्रमखान

५०+ वयोगटासाठी २१ वेळा , मग विशीतल्या पुरुषांसाठी किती वेळा ?

महिन्यातून २१वेळा मैथून केल्यावर विशीतच पन्नाशी येइल त्यामुळे त्यांची काळजी नको. :D

कपिलमुनी's picture

28 Sep 2022 - 4:33 am | कपिलमुनी

पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे

ये कूच ज्यादा ही है !

सनईचौघडा's picture

28 Sep 2022 - 6:27 am | सनईचौघडा

कसं ज्यादा?
त्या औरंग्याच्या जनान्यात ५ हजार स्त्रियां होत्या म्हणजे २१ काय त्यापेक्षा जास्त वेळा रोजचं तो उपभोग घेत असणार.
मोजा आता.

वापरले किंवा नाही तरी त्यांच्या ठरलेल्या कालाप्रमाणे ऱ्हास पावतात.

सुबोध खरे's picture

28 Sep 2022 - 10:51 am | सुबोध खरे

पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या स्वास्थ्यासाठी महिन्यातून कमीत कमी २१ वेळा वीर्यपतन व्हावे असे निदर्शनास आले आहे.

हे विधान दिशाभूल करणारे आणि सरसकट आहे.

जितक्या जास्त वेळेस वीर्यस्खलन केले जाते तितकी प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाची शक्यता कमी होते. कर्करोग हे एकच मानक आहे का स्वास्थ्यासाठी? प्रोस्टॅट ग्रंथीचा दाह, वयाप्रमाणे होणारी ग्रंथीची वाढ (बिनाईन हायपर ट्रॉफी) हे प्रश्न/ रोग कर्करोगापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आहेत.

आग्या यांनी दिलेल्या दुव्यात खालील गोष्टी पण दिलेल्या आहेत

Basically, the more men ejaculated in a month, the less likely they were to get prostate cancer.

Ejaculation doesn’t seem to protect against the most deadly or advanced types of prostate cancer.

Not all studies have found a benefit. The 2016 study got attention because of its size (almost 32,000 men) and length (18 years). A few even found that some men, specifically younger men, who masturbated more had slightly higher chances of prostate cancer

कमीत कमी २१ वेळा वीर्यस्खलन करण्यासाठी पत्नीची तयारी पाहिजे. म्हणजे ४-५ दिवस पाळीचे सोडले तर महिन्यात जवळ जवळ रोजच

अशा किती पत्नी तयार होतील ते सुद्धा कधी तरी पुढच्या ३० वर्षांनी होणाऱ्या कर्करोगाची शक्यता २० % नि कमी करण्यासाठी?

ते शक्य नाही म्हणून माणसांनी हस्तमैथुन करायचे?

यामुळे पत्नीला आपण कमी पडतो किंवा आपण नवऱ्याला आवडत नाही असा न्यूनगंड येण्याची मोठी शक्यता आहे.

यामुळे १००० जोडप्यापैकी ५०० जोडप्यात बेबनाव निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.

असे सरसकट विधान करणे टाळावे अशी माझी लेखकास विनंती आहे.

चौकस२१२'s picture

28 Sep 2022 - 11:31 am | चौकस२१२

डॉक्टर , आपले बाकीचे पटले पण , "लग्न झालेले असताना हस्तमैथुन करणे आणि त्यातून नवरा बायकोत गैरसमजूत होयीलच" हे कसे?
जर नीट संवाद असेल दोघांच्यात तर टाळता येईल !
आपण त्याला "सेमी सेमी ओपन रेलशनशिप म्हणूयात हवे तर "
असो या सगळ्या संवादात मीपरवरील एक तरी स्त्री सभासद भाष्य करति झलि तर अर्थ ... किंवा कोणी डॉक्टर, स्त्री रोगी काय म्हणतात यावर प्रकाश टाकू शकले तर चर्चा सार्थकी लागेल!

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2022 - 12:17 pm | चौथा कोनाडा

तथाकथित एक्सपर्ट मसाला साईट वरून कॉपी करुन भाषांतर ( हो भाषांतरच्, अनुवाद नाही) करून इथे चिटकवला आहे असं वाटतंय !
उदा.

स्त्री सेक्सला नाही म्हणत असेल तरी पुरूष का दबाब करत असतो?

.. एकंदरीत स्वत: धागाकर्त्याने स्वतःचे विचार मांडलेत असं जाणवत नाही

सनईचौघडा's picture

28 Sep 2022 - 1:01 pm | सनईचौघडा

यामुळे पत्नीला आपण कमी पडतो किंवा आपण नवऱ्याला आवडत नाही असा न्यूनगंड येण्याची मोठी शक्यता आहे.
यामुळे १००० जोडप्यापैकी ५०० जोडप्यात बेबनाव निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे.>>>

आणि

जर नीट संवाद असेल दोघांच्यात तर टाळता येईल !>>>>

काय ति निरागसता? कशाला पाहिजे संवाद?

अहो कोणता नवरा पत्नीला सांगतो की अगं आज किनई मी ह. मै. केलंय बर.