ब्रम्हास्त्र किंवा फुसकीअस्त्र ?

Primary tabs

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
8 Sep 2022 - 6:47 pm
गाभा: 

उध्या ब्रम्हास्त्र रिलीज होणार आहे. हिंदूस्थानी लोक खरंच या चित्रपटाचा बहिष्कार करतील का ?
बॉयकॉट मोहिम चालवणार्‍यांचा प्रयत्न सफल होईल का ?
सर्वात महत्वाचे म्हणजे कॉपीवुड चा जो कोट्यावधीचा पीआर आहे त्यांच्या ताकदीला अपयश येईल का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे उध्या पासुन मिळण्यास सुरुवात होईल.
हा धागा या चित्रपटा विषयी येणार्‍या माहितीचा, ट्रेंडचा, ट्वीट्सचा आणि बातम्यांसाठीच उघडला आहे. ज्यांना यात भर घालण्याची इच्छा होईल त्यांचे स्वागत आहे. :)

मदनबाण.....

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Sep 2022 - 7:43 pm | मुक्त विहारि

हिंदी चित्रपट बघणे कधीच सोडून दिले आहे...

कपिलमुनी's picture

8 Sep 2022 - 7:50 pm | कपिलमुनी

ब्रम्हास्त्र वीकेंडला बघणार आहे.

एक गांजाड्याने सुसायड केले आणि त्याचे राजकीय भांडवल करून
बॉलीवूड इंडस्ट्री आणि महाराष्ट्र याविरुद्ध गरळ ओकन्यात आली..
ही इंडस्ट्री महाराष्ट्रातून घालवायची आहे.. एवढेच टार्गेट आहे..

असे बॅन ट्रेण्ड चालवून फक्त destruction चा कंड शकतो..
क्रिएटीव्ह काही नाही

मदनबाण's picture

8 Sep 2022 - 7:53 pm | मदनबाण

क्रिएटीव्ह काही नाही
कॉपीवुड क्रिएटिव्ह केव्हा पासुन झाले ? :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einstein

मार्कस ऑरेलियस's picture

14 Sep 2022 - 11:37 am | मार्कस ऑरेलियस

एक गांजाड्याने

बाय द वे , तो गांजाडी तुमच्याच कंपुतील होता =))))

त्याचे दोन चित्रपट पाहण्यात आले , एक तो काय पो छे आणि दुसरा केदारनाथ. दोन्ही मध्ये शांततेच्या धर्माची माणासे कशी चान चान असतात अन हिंदु धार्मिक लोकं कसे क्रुर , निष्ठुर , आणि हिंसक असतात असेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे . गांजाड्याने असले रोल स्विकारले त्यावरुनच कळुन येते की त्याची अन तुमची चांगलीच गट्टी जमली असती. =))))

बाकी तुमच्या लाडक्या बॉलीवुड मध्ये मराठी माणुस म्हणजे घरगडी अन भांडीवाली बाईच हो , चांगली क्रियेटीव्हिटी आहे ही . चालु दे =))))

कॉमी's picture

14 Sep 2022 - 8:09 pm | कॉमी

सुशांत "आमच्यातला" होता असे म्हणून तुम्ही कोणाला तरी फार मानसिक त्रास देत आहात बघा... सर्वगुणसंपन्न सुशांत दुष्ट फुरोगाम्यांपैकी एक म्हणल्यावर वाईट वाटणे साहजिक आहे.

मार्कस ऑरेलियस's picture

14 Sep 2022 - 9:04 pm | मार्कस ऑरेलियस

हा हा हा .

तेच म्हणत होतो. त्यांनी सेल्फ गोल केलाय नकळत =))))

बाकी केदारनाथ आणि काय पो छे मध्ये अगदी जाणीवपुर्वक कथा तशी लिहिलेली आहे हे दिसुन येते. जाणीवपुर्वक हिंउ कसे वाईट अन शांतेतेच्या धर्माचे चे पाईक कसे भारी हे एकदम सटलपणे दाखवले होते.
अवांतर : बाकी कसेही असो फुरोगामी असो कि गांजाडी, कथेतील मते मानणारा असो की न मानणारा , एक अ‍ॅक्टर म्हणुन खुप चांगली अ‍ॅकटिंग केली होती ह्यात शंका नाही. माझे काही जवळचे मित्र त्याचे एकदम फॅन होते , त्यांना सुशांत साठी डोळ्यात आसवं काढताना पाहिलं आहे. :(

मलाही नाही आवडला हा बॉयकॉट ट्रेण्ड. दिसायला फक्त हिरो, निर्माते, दिग्दर्शक दिसतात पण लाखो लोकांचा संसार चालतोय बॉलिवूड वर. चित्रपट चांगला असेल तर चालेल वाईट असेल तर पडेल. काही लोक आहेतच नालायक पण म्हणून त्यांच्यामुळे पूर्ण इंडस्ट्री ला का बदनाम करायचं.

ब़जरबट्टू's picture

8 Sep 2022 - 8:10 pm | ब़जरबट्टू

१०० % सहमत !
मुर्खासारखे फक्त विरोध करण्यात काय अर्थ आहे ? फक्त निर्माते, नट-नट्या यान्चे नुकसान होते काय ? पडद्यामागे बरेच पोटावर हात घेउन फिरणारे आहेत. कमीतकमी महाराष्ट्राला तरी हा ट्रेण्ड परवडणारा नाही ... टक्सरुपी पैसा सुटेल...

ब़जरबट्टू's picture

8 Sep 2022 - 8:10 pm | ब़जरबट्टू

हातावर पोट म्हणायचे होते , पण दुसरी बाजु पण आहेच ...

कानडाऊ योगेशु's picture

10 Sep 2022 - 11:11 pm | कानडाऊ योगेशु

तसेच जर असेल तर चित्रपटातीलच कलाकार जेव्हा तोंड वर करुन प्रेक्षकांना उद्देशुन तुम्हाला पाहायला कोणी जबरदस्ती नाही केली. आम्ही आवडत नसाल तर नका पाहु चित्रपट असे उघडपणे म्हणत असेल तर तेव्हा त्या कलाकारांना आपल्यामुळे चित्रपट बनवण्यामागे कार्यरत असलेया हा सामन्य घटकांचा विसर कसा पडतो बरे?
आणि हस्तिदंती मनोर्यात राहण्यार्या ह्या अश्या उध्दट कलाकारांना सामान्य जनतेने फक्त लोकशाही मार्गाने त्यांचेही पाय मातीचेच आहेत ह्याची जाणीव करुन दिली तर ह्या मार्गाला मूर्खासारखा असे कसे म्हणता येईल.
मुळात सोशल मिडीयामुळे पूर्वीच्या काळी ह्या कलाकारांना जे काही चंदेरी वलय लावले जायचे ते नाहीसे झाले आहे. तुमच्या माझ्यासारखेच काम करुन कमावणारी ही साधारण माणसे आहेत फक्त त्यांचे काम सतत पब्लिकसमोर येत असल्याने त्यांना स्पेशल स्टेटस द्यायची काही गरज नसावी असेच जनतेला वाटु लागले असावे.
व तिसरे महत्वाचे कारण म्हणजे आधी चित्रपट गृहाचे दर बाल्कनी ५०-६० अगदी फार झाले तर १०० असायचे. पण मल्टीप्लेक्स जमान्यात तेच दर ५०० ते १००० पर्यंत झालेले आहे त्यामुळे आधी जसे फक्त टाईम्पास करावा म्हणुन जसा चित्रपट अगदी थियेटर मधेय जाऊन पाहिला जायचा तसे तरी सध्या होणे कठीण आहे. लोक ही चोखंदळ झाले आहेत. एवीतेवी ओटीटी वर रिलिज होईलच तेव्हा घरच्या लार्ज स्क्रीन टीवीवर पाहु असा विचार करत असावेत. किंबहुन तसा विचार मी तर केला. बाहुबली/आरार वगैरे चित्रपट घरीच पाहिले.

ब़जरबट्टू's picture

12 Sep 2022 - 7:13 pm | ब़जरबट्टू

तुम्ही वर उल्लेखलेले कोणतेही विधान या चित्रपटातील अभिनेत्याने/नेतीने केलेले नाहिये. काहितरी विधाने शोधुन काढायचे व त्यावर बायकाट आणायचा याला मुर्खपणा म्हटले आहे मी.
ओटीटी वर रिलीज झाला म्हणजे "बरी जिरली" हे हास्यास्पद आहे .. आज हा प्रकार प्रायोगिक तत्वावर सुरु आहे.. उद्या हाच उपाय आहे म्हटल्यावर ओटीपीचे पण दर वाढणार आहे .. दर वाढवायच्या पहिले तिथे पण जाहिराती घुसवल्या जातील (सगळे हाय डेफिनेशन चनल पहिले जाहिराती देणार नाही या तत्वावर आकर्षित करत होते, आज काय परिस्थिती आहे ?) आणि प्रेक्षक पुन्हा यापेक्षा चित्रपट्ग्रुहात बरे म्हणतील ..
मल्टीप्लेक्स जमान्यात जनता फक्त चित्रपट पहायला जाते हा आणखी एक गैरसमज.. पैसा उडणार हे माहित असते व ती तय्यारी असणारी जनता असते सहसा येथे ...

कानडाऊ योगेशु's picture

14 Sep 2022 - 10:07 am | कानडाऊ योगेशु

तुम्ही वर उल्लेखलेले कोणतेही विधान या चित्रपटातील अभिनेत्याने/नेतीने केलेले नाहिये.

गुगलुन पहा एवढेच म्हणतो. बाकी ह्या कलाकारांची बाजु घ्यायची वा त्यांना विरोध करण्यामागचे स्पष्टीकरण द्यायचे इतकी पात्रता ह्या कलाकारांची नाही म्हणुन आता गप्प बसतो.

कॉमी's picture

14 Sep 2022 - 10:17 am | कॉमी

तुम्हाला पाहायला कोणी जबरदस्ती नाही केली. आम्ही आवडत नसाल तर नका पाहु चित्रपट असे उघडपणे म्हणत असेल

ह्यात काय चुकीचे आहे ? असे विधान कलाकाराने करायच्या आधी काय लोक जबाबदारी म्हणून सिनेमाला जायचे काय ? जबरदस्ती होती काय ? आवडत नसला तरी सिनेमा पहिला जायचा काय ?

बघायचा तर बघा नाहीतर बघू नका हे म्हणण्यात चूक काय आहे ?

कानडाऊ योगेशु's picture

15 Sep 2022 - 7:14 pm | कानडाऊ योगेशु

ह्यात काय चुकीचे आहे ?....

तुम्हाला खरेच ह्यात काही चुकीचे वाटत नाही.?
हातावर पोट असलेले तमासगीर कलावंत तसेच रंगमंच कलावंत कला सादर करण्यापूर्वी वा त्यानंतर मायबाप प्रेक्षकहो,जोहार मायबाप असे आवाहन करतात.ह्यात प्रेक्षकांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हेतु असतो. तेव्हा हे असे विधान ह्या कलाकारांना असलेला उर्मटपणा आणि माज दाखवतो.
एक उदाहरण देतो.समजा तुम्ही तुमच्या घराजवळच्या एखाद्या स्टोअर मधुन काही माल विकत घेत आहात अथवा एखाद्या घरावरुन जाणार्या हातगाडीवरुन काही फळभाजी विकत घेत आहात आणि असे करताना तुम्ही चोखंदळपणा दाखवत आहात.तेव्हा दुकानदाराने/फळभाजी वाल्याने घ्यायचे तर घ्या नाहीतर नका घेऊ असे उर्मटपणे म्हटले तर तुम्ही पुन्हा दुसर्यांदा त्याच्याकडुन काही खरेदी कराल का?

नाही बुवा. माल घेऊन मी काय हातगाडी वाल्यावर उपकार करत नाहीये. तेव्हा, सतत "बघा हा , आता तुमच्या कडून माल घेणार नाही" असे मी त्या हातगाडीवाल्याला म्हणलो तर मला खात्री आहे हातगाडीवाला सुद्धा मला "घ्यायचं तर घे नाहीतर निघ" असेच म्हणेल. शिवाय दोन सुरेख विशेषणे सुद्धा लावेल ह्यात शंका नाही.

त्यामुळे, मी हातगाडीवाल्याला "आता तुझ्याकडून माल घेणार नाही" अश्या धमक्या देत नाही. मालाची क्वालिटी आणि किंमत हे दोनच निकष माझ्यादृष्टीने महत्वाचे आहेत. मी काय एका हातगाडीवाल्यासोबत लॉयल नाही. दुसऱ्या हातगाडीवल्याने स्वस्त किंवा चांगला माल आणला तर त्याच्याकडूनच घेतो.

(मुद्दा काय- सिनेमा बघायचा आहे म्हणूनच लोक बघतात. कोणीही कसलीही जबरदस्ती केली नसताना. हे त्रिकालाबाधित सत्य सिने कलाकाराने बोलून दाखवले तर त्यात चूक काही नाही.)

हातावर पोट असलेले तमासगीर कलावंत तसेच रंगमंच कलावंत कला सादर करण्यापूर्वी वा त्यानंतर मायबाप प्रेक्षकहो,जोहार मायबाप असे आवाहन करतात.ह्यात प्रेक्षकांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हेतु असतो.

Proves my point. अश्या मिंत्या करून सुद्धा तमाशा आज मृतावस्थेत जाण्याच्या मार्गावर आहे. तमासगिरांनी प्रेक्षकांना देव समजून तमाशा जगला नाही, कि तमासगिरांनी मिजास दाखवली असती म्हणून तमाशा मेला असता. लोकांना तमाशा बघण्यात रस वाटत नाही आणि त्यांना मनोरंजनाची अजून चांगली साधने मिळाली म्हणून तमाशा मेला.

कपिलमुनी's picture

16 Sep 2022 - 10:11 am | कपिलमुनी

घ्यायचे तर घ्या नाहीतर नका घेऊ

पुण्यात असताना हे ऐकायला मिळाले तर आश्चर्य वाटून घेउ नये

Nitin Palkar's picture

11 Sep 2022 - 7:49 pm | Nitin Palkar

काही लोक आहेतच नालायक...... त्यांना धडा शिकवण्यासाठीच हा बॉयकॉट ट्रेण्ड. आणि हे तर महात्मा गांधींनी शिकवलेलं शस्त्र आहे....

कपिलमुनी's picture

8 Sep 2022 - 8:27 pm | कपिलमुनी

जगात एक इंडस्ट्री दाखवा ज्यात कॉपी होत नाही ??
आख्खी सॉफ्टवेअर इंडस्ट्री नेट वरून कोड कॉपी पेस्ट करते...

जगात प्रत्येक फिल्म जगतात दुसरीकडून कॉपी केलेले आहेच..
बाहुबली चे कित्येक सीन कॉपी आहेत. खुद्द स्टोरी लाईन लायन किंग वरून ढापलेली आहे.
इंग्रजी चित्रपट गाणी सुद्धा इन्स्पायर असतात..फक्त तुम्हाला ते.माहिती नसते

एक चांगला विचारवंत म्हणाला होता,
I don't hate in the plural.

जगात एक इंडस्ट्री दाखवा ज्यात कॉपी होत नाही ??
अहो मुनी... ओरिजनलला जास्त व्हॅल्यू असते ना ? शिवाय ही क्रिएटिव्ह इंडस्ट्री आहे ना ? कोट्यावधी रुपयाचे बजेट देखील आहे, मग द्या की ओरिजिनल कंटेंट !
बरं कॉपी करुन त्यात काय दाखवणार तर अतिरेकी बिझनेसमन होतो ! हे तुम्हाला मान्य आहे का ?

शिवाय हे नेपो स्टार्स / फॅमेलीज यांच्यातील किती जणांनी गांजा मारला नाही ते जरा सांगा ना प्लीज ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einstein

ब़जरबट्टू's picture

16 Sep 2022 - 7:15 pm | ब़जरबट्टू

बरं कॉपी करुन त्यात काय दाखवणार तर अतिरेकी बिझनेसमन होतो
मग सध्या दाउद कोण आहे म्हणता ? फुलनदेवीला राजकारणात आणले होते आपणच

मदनबाण's picture

8 Sep 2022 - 8:48 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einstein

ब्रम्हास्त्र मी पण पाहणारे, विन्ट्रेस्टिंग वाटतोय. आयान मुखर्जीचा किमान एकतरी सिनेमा खूप आवडलेला आहे, त्यामुळे हा पाहण्यास हरकत नाही असे वाटते. एकूण सीजीआय वैगेरे सुद्धा बरे असेल तर चांगला सिनेमॅटिक अनुभव असू शकतो.

मला वाटतं चांगले आहेत. ह्याचा प्रोजेक्ट माझ्या एका नातेवाईकाकडे होता. 1-2 क्लिप्स बघितल्या आहेत मी. एकेका फ्रेम वर खूप मेहनत घेतात हे आर्टिस्ट.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Life is like riding a bicycle. To keep your balance, you must keep moving.” :- Albert Einstein

माहित नाही. घोडामैदान जवळच आहे. बघूया.
कालच एक रोचक बातमी वाचली पण तिचा दुवा आता सापडत नाहिये. त्यात एका ज्योतिषाने हा चित्रपट किती धंदा करील याचे गणित मांडले होते. त्याच्या भाकीताप्रमाणे हा चित्रपट साधारण १८० ते २०० कोटीचा धंदा करेल. चित्रपट बनविण्यास अंदाजे ३०० कोटी खर्च आला असे कोठेतरी वाचले.

अवांतर : लाल सिंह चढ्ढा चे ट्रेलर पाहूनच तो चित्रपट मला आवडेल असे वाटले नव्हते त्यामुळे त्यावर पैसे खर्च करणे टाळले. मात्र दोबारा चे ट्रेलर औत्सुक्यपुर्ण वाटल्यामुळे तो चित्रपट पाहायचे ठरवले होते. शुक्रवार, शनिवार रविवार हे तीन दिवस टाळून चित्रपट बघीतल्यास चित्रपटाचा उत्तम आनंद घेता येतो असा माझा अनुभव आहे. चित्रपटाचा विषय नाविन्यपुर्ण तर होताच आणि सादरीकरण देखील उत्तम होते. तापसी पन्नूचे सुरुवातीचे काही चित्रपट मला आवडले तरी नंतर तिच्या व्यक्तीरेखांत तोच तो टॉमबॉय पणा येत गेल्यामुळे मला ती आवडेनासी झाली होती. या चित्रपटात दिग्दर्शकाने या बाबतीत तिच्या नाकात वेसण घातली आहे असे म्हणण्यास वाव आहे. शिवाय चित्रपटगृहात केवळ ६ दर्शक असल्यामुळे मोबाईल फोनचे बोलणे, इतर दर्शकांची हा हा ही ही न ऐकता शांतपणे चित्रपट बघता आला.

चित्रपट बघताना ब्रम्हास्त्र चा ट्रेलर पाहिला. मला अजिबात आवडला नाही. चड्डी बनियान ते किराणा सामान सगळ्या प्रकारच्या जाहिराती पाहून अमिताभ चे आता अजीर्ण झाले आहे. अमिताभ जी आता महानायक ना रहे नोट छापने का मशीन बन गये है असे वाटते. किंबहूना पडद्यावर कोणतीही व्यक्तीरेखा साकारताना ती व्यक्तीरेखा न वाटता तो कलाकार अमिताभ च आहे असेच सतत वाटत राहते. मला तर हा चित्रपट फार कमाई करेल असे वाटत नाही पण लोकांना कधी काय आवडेल सांगणे अवघड आहे.

अवांतर : चित्रपटगृहातील खाद्यपदार्थांचे दर अव्वाच्या सव्वा झालेत. ५० ग्रॅम पॉपकॉर्न २०० ते २५० रुपये. शीतपेये २००-३०० रुपये, चहा १५० रुपये, भेळ १८० रुपये ? अगदी ५०० रुपयांपासून ९०० रुपयांपर्यंतचे कॉंबो उपलब्ध होते. चित्रपटगृहे ओस पडण्याचे हे देखील एक कारण नसेल ना ?
त्यापेक्षा चित्रपट पाहायला जायच्या अगोदर बाहेर पोटभर नाश्ता / जेवण करुन गेल्यास भरल्या पोटी आणि मोकळ्या मनाने सिनेमाचा आस्वाद घेता येतो.

अतिअवांतर : १६ सप्टेंबरास प्रकाश झा मुख्य भुमिकेत असलेला "मट्टो की साईकिल" हा चित्रपट येत आहे. प्रकाश झा एक सफल दिग्दर्शक तर आहेतच आणि अपहरण, राजनीती, गंगाजल मधे त्यांनी छोट्या भुमिका देखील साकारल्या आहेत. ट्रेलर तर आवडला मला.

तर्कवादी's picture

9 Sep 2022 - 2:59 pm | तर्कवादी

boycott मुळे चित्रपट फ्लाॅप होतात हा गैरसमज आहे .... प्रचंड वाढलेल्या बजेट मूळे मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांचा एक साचेबध्द फाॅर्म्युला बनू लागलाय.. तो चित्रपटांना मारक ठरतोय..

  • दर पाच मिनिटांनी टाळ्या घेणारे कृत्रीम चटपटीत संवाद
  • सतत मोठ्याने वाजणारे पार्श्वसंगीत
  • साहस दृष्याचे वेळी वाजणार्‍या काव्यपंक्ती (बरेचदा संस्कृत)
  • काही गरज नसताना उगाच स्लो मोशन..
  • पार्श्वसंगीताच्या भडीमारात काही वेळा संवाद नीट ऐकू न येणे (संवाद महत्त्वाचे की पार्श्वसंगीत हे पण या महान दिग्दर्शकांना कळू नये ? )

हे सगळे घटक जणू हटकून टाकायलाच हवेत असं दिग्दर्शकाःचं झालंय.. त्यामुळे चित्रपटांच्या सादरीकरणात साचेबध्दता आलीये..
दिग्दर्शकांनी आशयघन कथा घेवून स्वतंत्र शैलीने चित्रपट बनवला तर नक्कीच चालेल.. बाकी जून्या मोठ्या स्टार्सनी (आमिर , शाहरूख, सलमान, अक्षय कुमार , अजय देवगण ई) त्यांच्या वयाला साजेशा भूमिका करायला हव्यात... आणि स्वतःची स्टाईल नाही तर भूमिकेची गरज समजून नैसर्गिक अभिनय करायला हवा.. तसेही आता त्यांचे यूग संपले आहे .. आता वरूण धवन, आयुष्मान खुराणा, आर्यन कार्तिक , राजकुमार राव , विकी कौशल वगैरे नव्या दमाच्या अभिनेत्यांच्या काळ आलाय.

बॉयकॉट प्रकाराला माझे अजिबात समर्थन नाही पण ब्रह्मास्त्र बघेन असे अजिबात वाटत नाही.
मी तरी Article 15 सारख्या दर्जेदार चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे. मराठीत "वाय" सारखे आशयघन चित्रपट बनत आहेत , त्यांचा मी आनंद घेतो.

चित्रपटगृहे ओस पडण्याचे हे देखील एक कारण नसेल ना ?

बहुधा नसावे कारण आता चित्रपटगृहात बाहेरचे पदार्थ न्यायला परवानगी आहे. न्यायालयाचा हा निर्णय आल्यानंतर तर काही चित्रपटगृहांत बॅग्ज तपासणेही बंद केले (म्हणजे आधी तपासत होते ते सुरक्षेसाठी नव्हतेच तर फक्त यांचा खाद्यपदार्थांचा धंदा व्हावा म्हणून)

धर्मराजमुटके's picture

9 Sep 2022 - 3:43 pm | धर्मराजमुटके

चित्रपटगृहात बाहेरचे पदार्थ न्यायला परवानगी आहे.

किमान ठाण्यातली चित्रपटगृहे तरी अजून बाहेरचे पदार्थ आणायला परवानगी देत नाहियेत.

चौथा कोनाडा's picture

13 Sep 2022 - 5:10 pm | चौथा कोनाडा

चड्डी बनियान ते किराणा सामान सगळ्या प्रकारच्या जाहिराती पाहून अमिताभ चे आता अजीर्ण झाले आहे. अमिताभ जी आता महानायक ना रहे नोट छापने का मशीन बन गये है असे वाटते. किंबहूना पडद्यावर कोणतीही व्यक्तीरेखा साकारताना ती व्यक्तीरेखा न वाटता तो कलाकार अमिताभ च आहे असेच सतत वाटत राहते.

सही .. सारखं सारखं बघुन या महानायकाचा खुप कंटाळा यायला लागला आहे.

असंच अ-ति-दर्शन सुरु राहिलं तर ....

#BuycottBigB

अशी हॅशटॅग मोहिम राबवली गेली तर आश्चर्य वाटायला नको !

यश राज's picture

13 Sep 2022 - 6:06 pm | यश राज

सही .. सारखं सारखं बघुन या महानायकाचा खुप कंटाळा यायला लागला आहे.

असंच अ-ति-दर्शन सुरु राहिलं तर ....

#BuycottBigB

तिव्र समर्थन

जळी स्थळी सर्वत्र हा महानायक.. अरे आवरा यांना .

उगा काहितरीच's picture

13 Sep 2022 - 6:38 pm | उगा काहितरीच

खरं आहे. सगळ्यात जास्त डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे ना, त्यांनी केलेली गुटख्याची / पान मसाल्याची जाहिरात ! अरे यांच्या घरातल्या नोकराला ही गुटखा खाण्याची परमिशन नसेल आणि हे स्क्रीनवर गुटखा खाताना दाखवणार. (ते ही अतिशय खराब animation नी)

कपिलमुनी's picture

9 Sep 2022 - 12:21 am | कपिलमुनी

पिक्चर तसाही महिन्या भरात ओ टी टी वर येतो आहे.. त्यासाठी ऑलरेडी पैसे भरलेत तर पुन्हा टॉकीज मध्ये का घालावा ??

हा मुद्दा आहे.

काही रिव्हू माझा पाहण्यात आले आहेत जे पॉझिटिव्ह आहेत, पण हा चित्रपट त्यांनी नक्की कसा आणि कुठे पुर्ण पाहिला आहे ते कळले नाही. व्हीएफएक्स इफेक्ट्स चांगले आहेत असे या पाहण्यात आलेल्या रिव्हू मधुन कळले आहे.काहींनी हा चित्रपट कमी आणि लेझर शो असल्याचे म्हंटले आहे.स्क्रिप्टवर अनेकांनी टिका केली आहे.काही व्हिडियो पाहिल्या नंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ज्या लोकांनी पॉझिटिव्ह रिव्हू दिले आहेत तीच लोक अनेक वेगवेगळ्या व्हिडियोज मध्ये बोलताना दिसतात. [ हा पीआर जॉब असु शकतो. ]
आता एका दर्शकाचा आणि एक लल्लनटॉपचा रिव्हू व्हिडियो देऊन जातो. [ लल्लनटॉपवाल्यांकडुन मला फार उत्तम आणि पॉझिटिव्ह रिव्हू येईल असे वाटले होते पण तसे दिसत नाही, मी आत्ता तो फक्त अर्धा पाहिला आहे, नंतर वेळ मिळताच पूर्ण पाहिन. ]

जालावर लोकांना या चित्रपटापेक्षा केआरकेच्या रिव्हूची जास्त उत्सुकता आहे असे कळुन येत आहे, पाहुया त्याचा रिव्हू येतो का ?
एक वेगळा दृष्टीकोन :-


जाता जाता :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- Confucius

मदनबाण's picture

9 Sep 2022 - 12:39 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "Life is really simple, but men insist on making it complicated." :- Confucius

सामान्यनागरिक's picture

9 Sep 2022 - 5:15 pm | सामान्यनागरिक

बहिष्कार जरुरी आहे. या कॉपीवुड वाल्यांना त्यांची जागा दाखवुन देणं आवश्यक आहे.

गेली कित्येक दशकं सिनेमा हा उर्दु आणि तत्सम लोकांच्या प्रभावाखाली आहे. अनेक चित्रपटांत हे जाणवतं. आणि हिंदु संस्कृतीचा विपर्यास दाखवणं आणि खिल्ली उडवणं हे तर चाललंच आहे. या विषयावर एक वेगळी अनेक तासांची चर्चा होऊ शकते.

बहिष्कार टाकला म्हणून अनेकांच पोट मारलं जातं ही ओरड चुकीची आहे. जेंव्हा झोपडपट्टी उठवली जाते तेंव्हा सुद्धा अनेक गरीब बेघर होतात म्हणून काय झोपड्य़ा बांधायला प्रोत्साहन द्यायचे ? की गप्प बसून रहायचे ?

कोरोना मधे पण लॉक्डाउन मधे अनेकांची परवड झाली पण लॉकडाउन मुळेच कोरोना आटोक्यात आला हे सत्य आहे. जर मुंबैच्या लोकल मधे गर्दीत कोरोना फ़ैलावला असता तर काय अवस्था झाली असती याची कल्पना करुन बघा.

एनीवे, बहिष्कार करायलाच हवा ! जे लोक बहिष्काराला विरोध करतात त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाका. त्यांच्याशी रोटीे-बेटी, चहापाणी आणि ईतर कुठलेही व्यवहार करु नका.

तर्कवादी's picture

9 Sep 2022 - 5:40 pm | तर्कवादी

बहिष्कार करायलाच हवा ! जे लोक बहिष्काराला विरोध करतात त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाका. त्यांच्याशी रोटीे-बेटी, चहापाणी आणि ईतर कुठलेही व्यवहार करु नका.

म्हणजे बहिष्कृत चित्रपट रिलीज झाला की दुकानदाराला रोज विचारायला हवे का रे तु पाहिलास का आणि त्याने पाहिला असेल तर त्याच्या दुकानातून खरेदी करणे बंद.. मग प्रत्येक दुकानात जावून विचारावे लागेल.
काही दिवसांनी बहिष्कार समर्थक दुकानदार आपल्या दुकानापुढे पाटी लावतील की " या दुकानाचे मालक व कर्मचारी बहिष्कारात सामील आहे आणि त्यांनी खाली दिलेल्या यादीतील कोणताही चित्रपट पाहिलेला नाही". मग या दुकानांतून बिनदिक्कतपणे खरेदी करता येईल. पण एक शंका आहे अशी घोषणा करणारे खरंच बोलत असतील कशावरुन ? कारण बहिष्कारात सामील न होणारे लोक तर वाईट प्रवृत्तीचे, देशद्रोही वगैरे.. मग ते तर खोटंही बोलू शकतात नाही का ? असो.

पण ब्रम्हास्त्रवर बहिष्कार का म्हणे ? रणबीर वा अलिया यांनी काही देशविरोधी कृत्य वा विधान केले का ?

डाम्बिस बोका's picture

9 Sep 2022 - 11:17 pm | डाम्बिस बोका

सामान्यनागरिक चा अतिरेकी आवेश

गेली कित्येक दशकं सिनेमा हा उर्दु आणि तत्सम लोकांच्या प्रभावाखाली आहे. अनेक चित्रपटांत हे जाणवतं. आणि हिंदु संस्कृतीचा विपर्यास दाखवणं आणि खिल्ली उडवणं हे तर चाललंच आहे. या विषयावर एक वेगळी अनेक तासांची चर्चा होऊ शकते.

-- हा सिनेमा हिंदू अस्त्र शस्त्र बद्दल आहे असे trailer वरून वाटते. सिनेमा ना बगताच कसे काय मत बनवता?

बहिष्कार टाकला म्हणून अनेकांच पोट मारलं जातं ही ओरड चुकीची आहे. जेंव्हा झोपडपट्टी उठवली जाते तेंव्हा सुद्धा अनेक गरीब बेघर होतात म्हणून काय झोपड्य़ा बांधायला प्रोत्साहन द्यायचे ? की गप्प बसून रहायचे ?

-- तुम्हाला बहुदा मुद्दे कळतच नाहीत. राजकीय हेतूसाठी बहिष्कार टाकावे का? आपल्याशी सहमत नाही म्हणजे बहिष्कार हे weapon म्हणून वापरायचे का ? हे मुद्दे आहेत.

कोरोना मधे पण लॉक्डाउन मधे अनेकांची परवड झाली पण लॉकडाउन मुळेच कोरोना आटोक्यात आला हे सत्य आहे. जर मुंबैच्या लोकल मधे गर्दीत कोरोना फ़ैलावला असता तर काय अवस्था झाली असती याची कल्पना करुन बघा.

-- पुन्हा एकदा तुम्हाला issue काळात नाही. आततायी Lockdown करायला हवा होता का? lockdown planning and execution फसले आहे का?
माझे तेच खरे आणि मी म्हणतो तेच योग्य होते हे करणारे राजकारणी आणि त्यांचे आंधळे (खरंच पूर्ण अंध भक्त ) followers ह्याची चर्चा चालू आहे. लोकल गर्दी मुळे कोरोना फ़ैलावला ह्यात दुमत नाही

एनीवे, बहिष्कार करायलाच हवा ! जे लोक बहिष्काराला विरोध करतात त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाका. त्यांच्याशी रोटीे-बेटी, चहापाणी आणि ईतर कुठलेही व्यवहार करु नका.

-- अतिरंजित बाष्कळपणा. सद्या आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकतो

धर्मराजमुटके's picture

9 Sep 2022 - 5:30 pm | धर्मराजमुटके

बहिष्कार करायलाच हवा ! जे लोक बहिष्काराला विरोध करतात त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाका. त्यांच्याशी रोटीे-बेटी, चहापाणी आणि ईतर कुठलेही व्यवहार करु नका.

एवढी स्ट्रीक्ट अ‍ॅक्शन घ्यायची म्हणता ??

कपिलमुनी's picture

9 Sep 2022 - 9:43 pm | कपिलमुनी

मी उद्या चित्रपट बघतोय,
माझ्यावर कसा बहिष्कार टाकणार ??

सुरिया's picture

10 Sep 2022 - 6:09 pm | सुरिया

पिक्चर बघणार्‍याचे सगळे युपीआय आयडी ब्लॉक करण्याची आयडीया कशी वाटते? मेल आयडी, सोशल मिडीया अकाउंटस, आधार कार्ड, व्होटर कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स ही ब्लॉक करावे जमल्यास. बघू कशे व्यवहार करतो. कोरोनात सोसायटीवर कशे क्वारंटाइन बोर्ड लागत तसे घरावर, गाडीवर, कपड्यावर लावायचे बोर्ड पण करता येतील.
मी काय म्हणतो, एक बहिष्कार कमिटी स्थापन करावी. त्यांचे आदेश येतील त्यांच्यावर त्यांच्या आदेशानुसार तीव्रतेचा बहिष्कार टाकता येतील. ते सौदी बिवदी मध्ये मुतव्वे केंवा मॉरल पोलीस असतात ना तसे नेमावेत. अंमलबजावणी पथके नेमावीत. तेवढाच रिकाम्या हातांना रोजगार.

चौथा कोनाडा's picture

10 Sep 2022 - 8:20 pm | चौथा कोनाडा

जबरी ......

होऊन जाऊ दे !

चौथा कोनाडा's picture

10 Sep 2022 - 8:22 am | चौथा कोनाडा

तरण आदर्श, चित्रपट समीक्षक यांचे ब्रह्मास्त्र परीक्षण :

Well-known film critic Taran Adarsh took to Twitter Friday to review the movie. He completely wrote off the movie and called it a ‘king-sized disappointment’. Giving the Ayan Mukherjee directorial movie a two out of five-star rating, Adarsh said that the film was ‘low on content’. He opined that the movie was an ‘all gloss, no soul’.

जाता जाता :- मुनी विरुद्ध मुनी
मुनी १ :- एक गांजाड्याने सुसायड केले [ हे कोणा बद्धल आणि कोणत्या भावनेने लिहले हे इथल्या सगळ्या लोकांना समजले. ]
मुनी २:- एक चांगला विचारवंत म्हणाला होता,
I don't hate in the plural.

मुनी १ :- पिक्चर तसाही महिन्या भरात ओ टी टी वर येतो आहे.. त्यासाठी ऑलरेडी पैसे भरलेत तर पुन्हा टॉकीज मध्ये का घालावा ??
हा मुद्दा आहे.

मुनी २ :- मी उद्या चित्रपट बघतोय,
माझ्यावर कसा बहिष्कार टाकणार ??

विशेष कव्हरेज :-

सगळ्यात मोठी न्यूज :- आता केवळ ७५ रुपयांत पाहायला मिळणार रणबीर आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’
कोणाचे लागेबांधे कुठे असतात ते असं कळतं म्हणे !
१६ सप्टेंबर हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी यानिमित्ताने मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील अनेक चित्रपटगृहांनी १६ सप्टेंबर रोजी भारतात ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिवसाचे अवचित्य साधून तिकिट शुल्कात मोठी सवलत देण्याचा ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने निर्णय घेतला आहे.
मी बेक्कार हसलो हे वाचुन ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong."LeBron James

कपिलमुनी's picture

10 Sep 2022 - 12:11 pm | कपिलमुनी

स्टेटमेंट चे काँटेक्सट कळले नसेल तर सोडून द्यावे..
कशाला ताण द्यायचा

स्टेटमेंट चे काँटेक्सट कळले नसेल तर सोडून द्यावे..
मुनी जरा चील मारा...आपल्यालाच सगळचं कळतं असा भ्रम तुम्हाला झालेला दिसतोय, त्याचा त्याग करा.
तुम्हाला सुशांतचा त्रास, बहिष्कार का चाललात ते कळतं नसल्याने त्याचा त्रास, जिहादी लोक हिंदूंचे गळे कापतात, त्यांच्या बायका पळवुन नेतात त्यांच्यावर बलात्कार करतात त्या वर्गा बद्धल तुम्हाला विशेष सहानभूती असल्याने तुम्ही कुठलाच ताण घेऊ नका ! :) तुमची दुसरी कामे करा आणि प्रतिसाद बडवणे हे सर्वस्व नसल्याचे तुम्हाला कळले असल्याने ते कष्ट परत परत घेऊ नका ! [ याला संदर्भ तुमचाचा खाली दिलेला प्रतिसाद आहे बरं का ! ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong."LeBron James

भागो's picture

10 Sep 2022 - 9:14 am | भागो

ब्रम्हास्त्र,
आधी शुद्ध लिहायला शिका मग बहिष्कार टाका. नंतर नेट वरून कचरा आणून इकडे ओता.

मदनबाण's picture

10 Sep 2022 - 9:20 am | मदनबाण

चूक निर्दशानास आणुन दिल्या बद्धल धन्यवाद. _/\_

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong."LeBron James

रात्रीचे चांदणे's picture

10 Sep 2022 - 9:37 am | रात्रीचे चांदणे

म्हणजे ज्याला शुद्ध लिहिता येत नाही त्याने लिहिलेच नाही पाहिजे का?

अस नाय. खूप लिवा. मिपा आपनाच है. लेकीन ज्यांनी संस्क्रु्तीच ओझ खांद्यावर घेतले आहे. त्यांनी तरी....

सुजाण भारतीय प्रेक्षकांचे अभिनंदन . बहिष्कार वाल्यांची छान मारून ठेवली.
सुपर डुपर बॉक्स ऑफिस .
फुसका लेख आणि फुसका बाण.
बाकी चालुद्या.

रंगीला रतन's picture

10 Sep 2022 - 1:55 pm | रंगीला रतन

सुपर डुपर बॉक्स ऑफिस .
एका दिवसात??? लैच घाई भौ तुम्हाला :=)

कपिलमुनी's picture

10 Sep 2022 - 9:49 am | कपिलमुनी

आज सकाळी ९ चा शो हाऊसफुल्ल आहे . पिक्चर बघितला की रिव्ह्यू टाकेन

परत प्रतिसाद दिला नाही म्हणजे चित्रपट बघून निराश झालेले दिसताय

कपिलमुनी's picture

10 Sep 2022 - 6:29 pm | कपिलमुनी

सुशांत सिंग, बहिष्कार आणि मुस्लिम द्वेष या व्यतरिक्त आयुष्य आहे. प्रतिसाद बडवणे हे सर्वस्व नाही .
त्यामुळे निष्कर्ष काढायची घाई नको

आपला विचार सिद्ध करण्यासाठी यु ट्यूब आणि ट्विटर कायप्पाचा दाखला देणार्यांवर बहिष्कार. उद्या आईनस्टाईन कसा चूक होता त्यासाठी श्रावणातल्या कहाण्यांचा संदर्भ द्याल.

मदनबाण तसे करत नाहीत ...

मदनबाण यथोचित माहिती घेऊन मगच लिहीतात...

मदनबाण's picture

10 Sep 2022 - 8:00 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong."LeBron James

पण ब्रह्मास्त्र बहिष्कार का म्हणे ? रणबीर वा अलिया यांनी काही देशविरोधी कृत्य वा विधान केले का ?

बहिष्कार वाल्यांनी अजून यावर प्रतिसादच दिला नाही... दुसरीकडे कुठे लिहिले असेल (मराठीत) तर दुवा दिला तरी चालेल.

कोणाला बिग बी दिसले आहे का ? या चित्रपटा बद्धल बोलताना दिसले का ? बहुतेक ते पातालास्त्र घेऊन भूमिगत झाले असावेत ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong."LeBron James

मुक्त विहारि's picture

10 Sep 2022 - 8:12 pm | मुक्त विहारि

दाम करी काम ... हे त्यांना बरोबर समजते .. सध्या ते एकटेच कमावते आहेत ... अभिषेकला कुणी विचारत नाही...

उदा, गंगा की सौंगध, हा तद्दन फालतू सिनेमा जरूर बघा ...

त्या काळांत, केवळ अभिताभ बच्चन आहे, म्हणून ह्या सिनेमाने, उत्तम धंदा केला होता ....

'या' शेअर्समध्ये तुमची गुंतवणूक ! brahmastra सिनेमाच्या अपयशानंतर 'या' दोन कंपन्यांच्या शेअर्सचं कोट्यवधींचं नुकसान..

https://zeenews.india.com/marathi/entertainment/boycott-brahmastra-inoxp...

अतिशय उत्तम ..... हिंदी चित्रपट सृष्टी, बुडायलाच हवी...

धर्मराजमुटके's picture

10 Sep 2022 - 8:55 pm | धर्मराजमुटके

ब्रह्मास्त्र युट्यूबवर इतक्या लवकर कसा आला ? केजरीवालांचे ऐकले की काय ? युट्यूब पर डाल दो, सब देख लेंगे ??
दुवा

कपिलमुनी's picture

10 Sep 2022 - 9:13 pm | कपिलमुनी

कॉपीराईट भंग होणारे दुवे साईट वर पोस्ट करू नयेत

धर्मराजमुटके's picture

10 Sep 2022 - 9:15 pm | धर्मराजमुटके

ओह ! हे माहित नव्हते. जे कोणी संपादक हजर असतील त्यांनी जर असे काही होत असेल तर दुवा उडवायला हरकत नाही.

वरी डोंट! मझ्या माहीतीप्रमाणे लिंक शेअर करण्यातुन कॉपीराईटचा भंग होत नाही.
फक्त तुम्ही असे व्हिडिओज कुठे अपलोड करु नका म्हणजे झालं 😂

फक्त तुम्ही असे व्हिडिओज कुठे अपलोड करु नका म्हणजे झालं

अहो, इथे १३ वर्ष राहून फोटो अपलोड करताना तारांबळ उडते, चित्रफीती कोठून करणार ? असो. माहितीबद्द्ल धन्यवाद !

हे राम! इतका भंगार चित्रपट थेटरमध्ये जाउन बघणाऱ्यांना कुठलातरी मानाचा पुरस्कार द्यायलाच हवा 😀
ह्याच्यापेक्षा तर 'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट. बघितलेला नक्कीच परवडला 😂 😂 😂

मुक्त विहारि's picture

10 Sep 2022 - 11:08 pm | मुक्त विहारि

ते तर, "गंगा की सौंगध" सारखा चित्रपट देखील कमावता करतात.

व्यक्तीपूजा, हा शाप आहे ....

ते तर आहेच, आणि काही चांगले चित्रपट खड्ड्यात घालवतात 😀
तरी पण 'ब्रह्मास्त्र' इतका भिकार असेल असे नव्ह्ते वाटले! असो...

मुक्त विहारि's picture

10 Sep 2022 - 11:28 pm | मुक्त विहारि

कालच, Thor, Love and Thunder बघीतला ...

तो पण टाईमपास आहे.... Infinity war ची तुलना करता, एकदम फालतू...

पण, निदान एक समाधान हे की, खानावळीत जेवलो नाही....

मदनबाण's picture

11 Sep 2022 - 7:22 pm | मदनबाण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “The unleashed power of the atom has changed everything except our thinking. Thus, we are drifting toward catastrophe beyond conception. We shall require a substantially new manner of thinking if mankind is to survive.” :- Albert Einstein

मुक्त विहारि's picture

11 Sep 2022 - 8:03 pm | मुक्त विहारि

Brahmastra Memes: ‘पैसे वाया गेले’, ब्रम्हास्त्र पाहून प्रेक्षक भडकले, रणबीरकडे मागतायेत रिफंड

https://maharashtratimes.com/viral/viral-news/audience-want-refund-brahm...

मुक्त विहारि's picture

12 Sep 2022 - 7:41 am | मुक्त विहारि

https://www.aajtak.in/amp/entertainment/bollywood-news/story/brahmastra-...

कशाला चित्रपट गृहात जाऊन बघायचा?

कपिलमुनी's picture

12 Sep 2022 - 7:48 am | कपिलमुनी

ज्याची त्याची आवड काका, टीव्ही वर मॅच दिसते पण लोक जाऊन बघताच तसेच आहे.

काही लोकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट बघायला आवडतात.
तो अनुभव घ्यायला आवडतो.

मुक्त विहारि's picture

12 Sep 2022 - 8:01 am | मुक्त विहारि

हिंदी चित्रपट बघण्यासाठी खर्च केलेला पैसा वेगळा ...

जाऊ द्या....

ज्याची त्याची विचारसरणी....

डँबिस००७'s picture

12 Sep 2022 - 2:41 pm | डँबिस००७

मदनबाण,

तुम्हाला काय कळत नाही ! खर तर हा सिनेमा तुफान चाललेला आहे. लोक सिनेमागृहाच्या बाहेर रांगा लावुन तिकीट विकत घेत आहेत.
तिकीट मिळाली नाहीतर ब्लॅक मध्ये ३ - ४ पट पैसे देऊन तिकीट विकत घेत आहेत.

कपिलमुनी's picture

12 Sep 2022 - 4:21 pm | कपिलमुनी

बहिष्कार यशस्वी झाला ..

ब्रम्हास्त्र ने भारतात फक्त १०० कोटी आणि ओव्हरॉल २०० कोटी कमावले.

शेतकरी, व्यापारी, उद्योजक, एवढेच काय डॉक्टर देखील पिढ्यान पिढ्या व्यवसाय करतात. तिथे कोणी नेपोटीजमचा मुद्दा उपस्थित करीत नाही? आणि स्टार किड्सच्या तुलनेत किती नवोदीत पुढे आलेत, येत आहेत आणि यश मिळवतायत ते नाही बघितले?

डँबिस००७'s picture

15 Sep 2022 - 8:30 am | डँबिस००७

ब्रम्हास्रने ४ दिनमे कमाए ६ ट्रिलीयन डालर्स , UN ने कहा करण जोहर बना सकते है अलग देश !!

https://youtu.be/EicFWqRnafc

विवेकपटाईत's picture

16 Sep 2022 - 10:22 am | विवेकपटाईत

सिनेमा लोक कुणाच्या सांगण्याने बघायला जात नाही. 1975 नंतर मल्टी स्टारर सिनेमांचा जमाना आला होता. 1985 नंतर ते पडू लागले. तेच-तेच कथानक लोक जास्त काळ पहात नाही. तोच-तोच अभिनेता पाहून ही लोक कंटाळतात. सिनेमा पडण्याचे मुख्य कारण हेच. बदल ही काळाची गरज आहे. बाकी काळा पैसा, गैर मार्गाने कमविलेला पैसा पांढरा करण्यासाठी ओसाड सिनेमा थिएटर भरलेले दाखविल्या जाऊ शकतात.

ब्रम्हास्त्र म्हणजे स्पिडरमॅन, क्स-मन, फास्ट अँड furious, गमे ऑफ थ्रोवन याची शिळी खिचडी