Skip to main content

ब्रम्हास्त्र किंवा फुसकीअस्त्र ?

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 08/09/2022 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
उध्या ब्रम्हास्त्र रिलीज होणार आहे. हिंदूस्थानी लोक खरंच या चित्रपटाचा बहिष्कार करतील का ? बॉयकॉट मोहिम चालवणार्‍यांचा प्रयत्न सफल होईल का ? सर्वात महत्वाचे म्हणजे कॉपीवुड चा जो कोट्यावधीचा पीआर आहे त्यांच्या ताकदीला अपयश येईल का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे उध्या पासुन मिळण्यास सुरुवात होईल. हा धागा या चित्रपटा विषयी येणार्‍या माहितीचा, ट्रेंडचा, ट्वीट्सचा आणि बातम्यांसाठीच उघडला आहे. ज्यांना यात भर घालण्याची इच्छा होईल त्यांचे स्वागत आहे. :)

मदनबाण.....


वाचने 18679
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “The unleashed power of the atom has changed everything except our thinking. Thus, we are drifting toward catastrophe beyond conception. We shall require a substantially new manner of thinking if mankind is to survive.” :- Albert Einstein

Brahmastra Memes: ‘पैसे वाया गेले’, ब्रम्हास्त्र पाहून प्रेक्षक भडकले, रणबीरकडे मागतायेत रिफंड https://maharashtratimes.com/viral/viral-news/audience-want-refund-brah…

In reply to by मुक्त विहारि

ज्याची त्याची आवड काका, टीव्ही वर मॅच दिसते पण लोक जाऊन बघताच तसेच आहे. काही लोकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट बघायला आवडतात. तो अनुभव घ्यायला आवडतो.

In reply to by कपिलमुनी

हिंदी चित्रपट बघण्यासाठी खर्च केलेला पैसा वेगळा ... जाऊ द्या.... ज्याची त्याची विचारसरणी....

मदनबाण, तुम्हाला काय कळत नाही ! खर तर हा सिनेमा तुफान चाललेला आहे. लोक सिनेमागृहाच्या बाहेर रांगा लावुन तिकीट विकत घेत आहेत. तिकीट मिळाली नाहीतर ब्लॅक मध्ये ३ - ४ पट पैसे देऊन तिकीट विकत घेत आहेत.

In reply to by डँबिस००७

बहिष्कार यशस्वी झाला ..

ब्रम्हास्त्र ने भारतात फक्त १०० कोटी आणि ओव्हरॉल २०० कोटी कमावले.

शेतकरी, व्यापारी, उद्योजक, एवढेच काय डॉक्टर देखील पिढ्यान पिढ्या व्यवसाय करतात. तिथे कोणी नेपोटीजमचा मुद्दा उपस्थित करीत नाही? आणि स्टार किड्सच्या तुलनेत किती नवोदीत पुढे आलेत, येत आहेत आणि यश मिळवतायत ते नाही बघितले?

ब्रम्हास्रने ४ दिनमे कमाए ६ ट्रिलीयन डालर्स , UN ने कहा करण जोहर बना सकते है अलग देश !! https://youtu.be/EicFWqRnafc

सिनेमा लोक कुणाच्या सांगण्याने बघायला जात नाही. 1975 नंतर मल्टी स्टारर सिनेमांचा जमाना आला होता. 1985 नंतर ते पडू लागले. तेच-तेच कथानक लोक जास्त काळ पहात नाही. तोच-तोच अभिनेता पाहून ही लोक कंटाळतात. सिनेमा पडण्याचे मुख्य कारण हेच. बदल ही काळाची गरज आहे. बाकी काळा पैसा, गैर मार्गाने कमविलेला पैसा पांढरा करण्यासाठी ओसाड सिनेमा थिएटर भरलेले दाखविल्या जाऊ शकतात.