तुला काय ठाऊक सजणी, तुझ्यावर कोण कोण मरतंय ...

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
27 Jul 2022 - 11:24 pm

तुला काय ठाऊक सजणी
तुझ्यावर कोण कोण मरतंय
आख्खं गाव तुझ्यासाठी
रात्रंदिवस झुरतंय

माळावरचा दगडू पैलवान
भल्या-भल्यांना भरवतो हीव
तुझ्यासाठी त्याचा सजणी
टांगणीला गं लागलाय जीव

सुताराचा चकणा म्हादू
तुझ्यावर लईच मरतो
तुला बघत पटाशीचं काम
कानशीनं की करतो

डोईवर घेऊन शेण-बुट्टी
ठुमकत गं तू निघते
दीवाण्यांची टोळी तुझ्या
मागं मागं फिरते

प्रत्येकाला तुझाच राणी
गुलाम बनून रहायचंय
तुला मात्र माधुरी बनायला
म्हमईला जायचंय .

आमची पेर्णा:
.

अवांतरः "डिसेंबर २०१२, क्लिफ्टन पार्क, NY" अशी नोंद असलेला, ही कविता लिहीलेला कागद आज अचानक सापडला, आता २०२२ मधे प्रकाशित करतोय.

कैच्याकैकवितासंस्कृतीनृत्यकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

28 Jul 2022 - 7:21 am | कर्नलतपस्वी

लई भारी,

जवानीचा हाय मामला
जरा हळुहळू बोंबला
आमचा बी जीव
हिच्या करताच की हो टांगला

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Jul 2022 - 8:41 am | ज्ञानोबाचे पैजार

खालची तळटिप वाचल्यावर उलगडा झाला. ज्वानीच्याभरात मस्त उतरेली होती कविता...

असे दिसतय की फार फार वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा भलतेच रसिक होता.

असो... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...माधुरी जेव्हा नेने झाली तेव्हापासून आम्ही अशा कविता करणे बंद केले

पैजारबुवा,

चित्रगुप्त's picture

28 Jul 2022 - 9:28 am | चित्रगुप्त

फार फार वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा भलतेच रसिक होता.

ऑबजेक्षण यूवर हॉनर .... आता सत्तरीतही आम्ही तरूणपणाएवढेच, किंबहुना त्यापेक्षा कांकणभर अधिकच - रसिक आहोत. २०१२ साली ही कविता सुचली तेंव्हाही साठीत होतो.
एवढे बोलून खाली बसतो.
रसिकांना कविता आवडते आहे, हे बघून आनंदित आहे.

कर्नलतपस्वी's picture

28 Jul 2022 - 2:10 pm | कर्नलतपस्वी

अब भी दो पटियाले लगते है।
कभी कभार काजू कबाब सजते है।
कुछ भी ना मिले तो
जले हुये पापड भी चलते है।

गणेशा's picture

28 Jul 2022 - 11:21 pm | गणेशा

वा

कर्नल साहेब, तुमच्या दोन्ही रचना खुमासदार आहेत. एकाच धाग्यात वेगवेगळ्या कवींच्या प्रतिभेला धुमारे फुटत आहेत, हे खूपच छान.

तुझ्या डाळींबी हसण्यावर
पाटील बी फिदा हाय
रानात म्हणं आता तो
डाळींब लावणार हाय

तेल्याचा राजा दुकानात फकस्त
फेअर अँड लवलीच ठिवतोय
तूच एक गिऱ्हाईक त्याचं
असं गावात बोन्बलतोय

"जांभूळलेलं डोळं तुझं
अन गाभाळलेली काया"
असलं कायबाय तुझ्यावर
गणा मास्तर बी लिव्हतोय

तुला काय ठाऊक सजणी
तुझ्यावर कोण कोण मरतंय
आख्खं गाव तुझ्यासाठी
रात्रंदिवस झुरतंय

जांभूळलेलं डोळं तुझं... गाभाळलेली काया"

वा वा गणेशा. मस्त आहे तुमचे जोडकाव्य. रसिकांना आपापल्या रचना रचण्यात रस येतोय, खूपच समाधानाची बाब आहे.

श्रीगणेशा's picture

29 Jul 2022 - 12:04 am | श्रीगणेशा

चित्रगुप्त आणि गणेशा,
तुम्हां दोघांच्याही कविता आवडल्या!

चामुंडराय's picture

29 Jul 2022 - 3:34 am | चामुंडराय

छान

रामदास फुटण्यांची वात्रटिका आठवली.

आम्ही आयुष्यभर मारुतीला तेल वात केली
ती मात्र नेन्यांच्या श्रीराम मंदिरात गेली ...

चित्रगुप्त's picture

29 Jul 2022 - 4:48 am | चित्रगुप्त

@ चामुंडरायः कविता छान वाटली, चांगले वाटले.
रा.फुं.ची वात्रटिका मजेशीर.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jul 2022 - 8:53 am | ज्ञानोबाचे पैजार

माधुरीचे नाव निघताच
मंडळी सगळी चेकाळली
प्रत्येकाची प्रतिभा कशी
थुई थूई नाचू लागली

पाटिल लावतोय डाळिंब
अन तेली विकतोय लव्हली
पैलवान, सुतार मंडळीही
काम करायला लागली

कोणी म्हणे मी ताठ उभा
पतियाळा पेग रिचवूनही
हे सगळे कडाकडा बोटे मोडती
नेन्यांच्या नावाने अजूनही

धकधक गर्लचे गारुड
अजूनही काही उतरत नाही
तिचे जादुई हास्य बघताना
जगाचे भान उरत नाही

पैजारबुवा,

चित्रगुप्त's picture

29 Jul 2022 - 11:20 am | चित्रगुप्त

पैजारबुवा, थुई थुई नाचणारी प्रतिभा, धकधक गर्लचे गारूड .... लईच भारी प्रतिसाद.

कर्नलतपस्वी's picture

29 Jul 2022 - 9:15 am | कर्नलतपस्वी

माधुरीच्या घरी पत्रीका पाठवली
होकार येणार होता
पण मंगळ आडवा आला
श्रीरामाचा जन्म झाला
म्हणून नेन्यांच्या घरी
दिवाळीचा पाडवा झाला
धीर नाही सोडला हिम्मत नाही हरलो
पुन्हा एकदा माधुरीच्या घरी पत्रीका धाडलो
पुन्हा एकदा शनी मंगळाची झटापट झाली
दिक्षीतांची नाही पण देशपांड्यांची आली

आमची बी माधुरीच.......

अनन्त्_यात्री's picture

29 Jul 2022 - 12:52 pm | अनन्त्_यात्री

मिपावरी सांप्रतकाळी
m f हुसेनांची मांदियाळी
घालुनी आपापली कवळी
गजगामिनीस शोधिती

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jul 2022 - 1:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

कवळी घालुनी टवळी शोधणे
येर्‍यागबाळ्याचे काम नव्हे
अनन्त यात्रेच्या पथिकाने तर
या वाटेवर फिरकू नये

पैजारबुवा,

चित्रगुप्त's picture

29 Jul 2022 - 2:39 pm | चित्रगुप्त

@अनन्त यात्री:

मिपावरी सांप्रतकाळी
m f हुसेनांची मांदियाळी....
.... यानंतर .......
लावुनी आपापली कवळी
गजगामिनीची रेखाटती चोळी...
...असे जास्त रसिकपणाचे होईल.

चित्रगुप्त's picture

29 Jul 2022 - 2:44 pm | चित्रगुप्त

...

नि३सोलपुरकर's picture

29 Jul 2022 - 1:35 pm | नि३सोलपुरकर

वाह वाह ... अनन्त्_यात्री आणी पैजारबुवा ... १ नंबर

बाकी चित्रगुप्त काकांची कविता आणी गणेशा ह्यांचे जोडकाव्य मस्तच .

बबन ताम्बे's picture

29 Jul 2022 - 4:06 pm | बबन ताम्बे

चित्रगुप्त काकांचे माधुरी काव्य आणि पुढची जोड काव्ये लाजवाब.
असं झुरत बसू नका . अंतरा (त्म्या)ला साद घाला :-)

चित्रगुप्त's picture

29 Jul 2022 - 8:49 pm | चित्रगुप्त

ती अंतरा काय ती दोनचार पिच्चरं करून जी गायबली ती आजतागायत.
पुढे कधीतरी त्या धकधकवाल्या काकूची सासू (म्हणजे मराठीत ऑन्टीची मदरिन्लॉ ) वगैरेच्या एकाद्या रोलात येईलही कदाचित, कुणास ठाऊक.

चित्रगुप्त's picture

29 Jul 2022 - 8:50 pm | चित्रगुप्त

ती अंतरा काय ती दोनचार पिच्चरं करून जी गायबली ती आजतागायत.
पुढे कधीतरी त्या धकधकवाल्या काकूची सासू (म्हणजे मराठीत ऑन्टीची मदरिन्लॉ ) वगैरेच्या एकाद्या रोलात येईलही कदाचित, कुणास ठाऊक.

आम्हा मिलेनियल्सनी कुणा अप्सरेवर कवने करावित ब्रे?

चित्रकार काय टाक फिरवतात म्हणून पाहिलो तर खजिनाच आणि दारांवर नागांचा पहारा नाही.

तरुण असताना वगैरे बोचरी टीका सोडा आणि नवीन रतीब घाला.

-------
जाताजाता दोन चार नवीन कवीही भेटले. वा.