तुला काय ठाऊक सजणी
तुझ्यावर कोण कोण मरतंय
आख्खं गाव तुझ्यासाठी
रात्रंदिवस झुरतंय
माळावरचा दगडू पैलवान
भल्या-भल्यांना भरवतो हीव
तुझ्यासाठी त्याचा सजणी
टांगणीला गं लागलाय जीव
सुताराचा चकणा म्हादू
तुझ्यावर लईच मरतो
तुला बघत पटाशीचं काम
कानशीनं की करतो
डोईवर घेऊन शेण-बुट्टी
ठुमकत गं तू निघते
दीवाण्यांची टोळी तुझ्या
मागं मागं फिरते
प्रत्येकाला तुझाच राणी
गुलाम बनून रहायचंय
तुला मात्र माधुरी बनायला
म्हमईला जायचंय .
आमची पेर्णा:
अवांतरः "डिसेंबर २०१२, क्लिफ्टन पार्क, NY" अशी नोंद असलेला, ही कविता लिहीलेला कागद आज अचानक सापडला, आता २०२२ मधे प्रकाशित करतोय.
अवांतरः "डिसेंबर २०१२, क्लिफ्टन पार्क, NY" अशी नोंद असलेला, ही कविता लिहीलेला कागद आज अचानक सापडला, आता २०२२ मधे प्रकाशित करतोय.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9490
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा
अरे वा... मस्त...
ऑबजेक्षण यूवर हॉनर
सहमत हू,सत्तर कोई उम्र है
In reply to ऑबजेक्षण यूवर हॉनर by चित्रगुप्त
वा
In reply to सहमत हू,सत्तर कोई उम्र है by कर्नलतपस्वी
@कर्नल तपस्वी: दोन्ही रचना खुमासदार.
In reply to सहमत हू,सत्तर कोई उम्र है by कर्नलतपस्वी
तुझ्या डाळींबी हसण्यावर
जांभूळलेलं डोळं तुझं... गाभाळलेली काया... मस्त मस्त.
In reply to तुझ्या डाळींबी हसण्यावर by गणेशा
चित्रगुप्त आणि गणेशा,
छान
@ चामुंडरायः कविता छान वाटली,
गणेशा भारीच लिहिले आहेस
पैजारबुवा,लईच भारी प्रतिसाद.
In reply to गणेशा भारीच लिहिले आहेस by ज्ञानोबाचे पैजार
हायला...
कृ.ह.घे.
ह्या ह्या ह्या...
In reply to कृ.ह.घे. by अनन्त्_यात्री
गजगामिनीची रेखाटती चोळी...
In reply to कृ.ह.घे. by अनन्त्_यात्री
हीच ती गगजगामिनीची चोळी
In reply to गजगामिनीची रेखाटती चोळी... by चित्रगुप्त
वाह वाह ...
वाहवा !!
अंतरा(त्मा)ला साद घालणे वगैरे...
In reply to वाहवा !! by बबन ताम्बे
अंतरा(त्मा)ला साद घालणे वगैरे...
In reply to वाहवा !! by बबन ताम्बे
काय एकेका काकांची प्रतिभा बहरलीये...
कवितेच्या वाटेस जात नाही कधी पण तांबे गुरुजींच्या वाचतो.