Skip to main content

ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग ४)

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 19/07/2022 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात आणि नवा कोणता मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. शिवसेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटले आणि तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. एक गोष्ट समजत नाही. शिवसेनेचे महाराष्ट्रातून निवडून गेलेले १८ आणि पोटनिवडणुकीत दादरा नगरहवेलीतून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेलेल्या कलाबेन डेलकर असे एकूण १९ खासदार आहेत. १२ ही संख्या १९ च्या दोन-तृतीयांश पेक्षा कमी आहे. तेव्हा १२ खासदार फुटले तरी ते कसे चालणार आहे समजत नाही. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह महाराष्ट्रात दिले आहे पण महाराष्ट्राबाहेर सगळीकडे धनुष्यबाण हेच चिन्ह शिवसेनेला मिळेल असे नाही. त्याप्रमाणे दादरा नगरहवेली पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना धनुष्यबाण हे चिन्ह न मिळता दुसरे कोणते तरी चिन्ह मिळाले होते. तेव्हा त्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेल्या असल्या तरी वेगळ्या चिन्हावर निवडून गेल्या असल्याने त्यांना या पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे शिवसेनेच्या १८ सदस्यांच्या गटामध्ये गणले जात नाही अशी काही तांत्रिकता आहे का समजत नाही.

वाचने 19102
प्रतिक्रिया 203

प्रतिक्रिया

In reply to by क्लिंटन

हुश्श्! शिवसेना शिल्लक रहावी फक्त त्यात उठा आठा संरा वगैरे नसावेत हीच इच्छा होती. तशीच पावले पडत असतील तर छानच. आता राज ठाकरे यांची एन्ट्री राहीली. तोपर्यंत विश्रांती. :)

In reply to by क्लिंटन

उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह आहेत, अशीच शिवसेनेच्या पक्षीय घटनेत तरतुद आहे. त्यांचा दावा स्ट्रांग आहे. पण सध्या मोदी सरकार यांच्या भाजपपीड़ित व्यवस्थेमुळे सध्या या व्यवस्था नावालाच उरल्या आहेत, फार फार तर चिन्ह कोणालाच न मिळता चिन्ह गोठवतील. अर्थात भाजपाच्या तोड़फोड़ीचं यातच यश आहे. आज फुटीर आमदार अपात्र ठरावेत. एवढीच इच्छा आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत. भाजपचा कोन्फिडंस पाहता कायदा त्यांच्याच ताब्यात दिसतोय. त्यामुळे हवं ते भाजप करू शकतो. फडणवीसना मामू न केल्यामुळे शिंदेंचा काटा काढण्यासाठी नकाही ऊलटं होतं का ते पहावं लागेल. आमदार अपात्र ठरले ना शिवसेनेला चिन्ह मिळाले (जरी कायद्या प्रमाणे हेच योग्य आहे) तरी सरप्राईज असेल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आताच कोर्टात कुणी काय युक्तीवाद केले ते वाचले. "पुढच्या सुनावणीपर्यंत कारवाई नको" - ठाकरेंचे वकील सिब्बल. म्हणजे त्यांनाही अंदाज आला आहे की काय निकाल लागेल. शिंदे गटाचा युक्तिवाद फारच गंभीर आणि रोखठोक आहे. पण उद्धव ठाकरेंना आमदारकीचा राजीनामा द्यायचा सल्ला कुणी दिला? तिथेच केस दुबळी होत आहे असं वाटतं. कायद्यातील एक म्हण आहे - Possession is the nine points of the Law. जागा ताब्यात असलेल्याच्या बाजूने दहापैकी नऊ मुद्दे असतात.

In reply to by निनाद

१. तपशिलात चूक आहे - १६ मे २०२२ रोजी श्री कपिल सिब्बल ह्यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला आहे, त्यानंतर समाजवादी पक्षाच्या मदतीने ते राज्यसभेवर गेलेत. २. तुमचा राजकारणात इंटरेस्ट असेल तर असो बापडा, कपिल सिब्बल राजकारणात कसे(ही) असू देत पण लीगल करीयर मध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी वकील होते, सहसा वकिलाच्या सुरुवातीला असलेली ऑब्जेक्टीव्हीटी उतारवयात ओसरते कारण तोवर धारणा पक्क्या झालेल्या असतात सिब्बलांच्या बाबतीत तर राजकीय विचारच पक्के झालेत, पण त्यामुळे त्यांचे लीगल करीयर पडेल असेल असे मानण्याचे कारण अन प्रयोजन सापडत नाही. बाकी आपापली सदिच्छा आणि व्यक्तिस्वातंत्र्य, मी फक्त तपशील मांडले.

In reply to by जेम्स वांड

बाबरी मशीद-श्रीरामजन्मभूमी खटला, मराठा राखीव जागा खटला, हार्दिक पटेल खटला, राहुल गांधी राफेल माफीनामा खटला असे अनेक खटले मागील काही वर्षात सिब्बल हरले आहेत. हे खटले चटकन आठवले. अजून बरेच आहेत.

In reply to by कंजूस

दहाव्या परिशिष्ट आणि पक्षांतर कायदा पाहता फुटीर गटाला अन्य पक्षातच गेले पाहिजे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार ते दोषी ठरले, तर त्यांची मंत्रीपदं जातील, ते अपात्र ठरतील. असं पक्षास वेठीस धरुन खेळ करता येत नाही असा कायदा आहे. ( सविस्तर नंतर लिहीन) अर्थात आता सर्वोच्च न्यायालयात कायदे कसे वाकवले जातात ते पाहणे रोचक आहे. स्वतंत्र खंडपिठाकडे सर्व प्रकरण पाठवावे असे म्हटले जात आहे, हा त्यातल्या खेळीचा एक भाग वाटतो. आज दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर कोर्टात दोघांनाही २७ जुलै पर्यन्त प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं. १ ऑगष्टला पुढील सुनावणी आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज फुटीर आमदार अपात्र ठरावेत. एवढीच इच्छा आहे. -- यासाठी तुम्हाला एक ऑगस्टपर्यंत वाट पहावी लागेल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"आज फुटीर आमदार अपात्र ठरावेत. एवढीच इच्छा आहे." या खासदारांना ( आणि ४० आमदारांना) गद्दार, फुटीर, म्हणणे हा तुमच्या राजकीय एककलि पणा चा भाग झाला ! "जे झालाय ते फक्त घोडा बाजार" हा कांगावा आहे तुमच्या सारख्यांचा .. मूळ सेनेचे निवडून आलेले प्रतिनिधी मोठयासंख्येने गेली २.५ वर्षे या "अनैसर्गिक" आघाडीत "अस्वस्थ" होते , हि आघाडी अनैसर्गिक आहे हे जनतेला देखील आवडले नवहते या सर्वांकडे कडे कानाडोळा करीत आहात असो पण एका बाबतीत सहमत ! संसदीय पक्ष जरी ताब्यात असला तरी आपोआप राजकीय पक्ष ताब्यात घेता येईलच असे नाही ..हे पटले सेनेचं घटनेवर ते अवलंबून आहे आणि तळागळाईतील सेनेचं पदाधिकारांच्या मतावर अवलंबून आहे तशी काही तरतूद आहे का? अगदी कागदोपत्री जरी घटनेत त्यांना पाहिजे तो पक्ष प्रमुख निवडण्याचे स्वातंत्र्य असले तरी तिथे घरानेशाही आणि घराणेपुजा आहे आहे त्यामुळे "ठाकऱ्यांच्या" कुलदीपकापेक्षा कोणाला दुसरे निवडून येणे अशक्य वाटते . इंन्ग्लंड मधील कँसरवटिव्ह पार्टी चे सध्या चालू असलेले राजकारण पहा .. तिथे स्वतःच्या संसदीय प्रमुखाला ( बोरिस बाबा ) ला अंतर्गत नाराजी मुले पद सोडावे लागले , अम्मादार ? खासदारांना मोकळं मार्ग होता , त्यास्तही "गद्दार" विदागार व्हावे लागले नाही ... आणि त्यांन्च्य्या पक्षाच्या घटनेप्रमाणे आता अंतर्गत निवडणूक होईल ... पक्ष तोच ना न्यायालय ना मुंबई ते मुंबई , सुरत गोहाटी मार्गे असले उद्योग हेच ऑस्ट्रेल्यात २ वेळा तीनही पक्षात घडले आहे दावे मजूर आणि उजवे लिबरल आणि उजवे नॅशनल पार्टी या सर्व पक्षात संसदीय प्रमुखाला स्वतःचं पक्षानेच दूर केले आहे .... ( फरक एवढाच कि इंग्लड मध्ये ती प्रणाली जरा लाभलेले आणि जाहीर दिसते, येथे ती पडद्यामागे असते हि प्रगल्भता भारतीय पक्षात यावी अशी मनोमन ची इच्छा सध्या तरी ती केवळ बहुतेक कम्युनिस्ट आणि भाजप या पक्षातच असावी बाकी सगळी कडे घराणे = पक्ष .. उदय शारदा पवार जर निवृतांत झाले तर जयंत पाटील सर्वेसर्वा बनण्याची सुतराम शक्यता नाही ... असल्यास सांगा ...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शाब्दिक कोट्या करीत बसा भारतीय पक्षात असे म्हणले आहे .. म्हणजे सगळ्या पक्षपात खास करून घराणे= पक्ष असले जे उद्योग आहेत त्यात .. तुम्हाला कळले नसेलच

फुटीर आमदार अपात्र ठरावेत. एवढीच इच्छा आहे.
कोणत्या आधारावर? पुर्वीची अशी काही उदाहरणे आहेत का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

याची उदाहरणे माहिती नाहीत. पण अपात्र ठरण्याचे/ ठरवण्याचे जे नियम आहेत त्याप्रमाणे आदेश वेळच्या वेळी काढले नाहीत हे दुर्दैवाने म्हणावे लागते. दुसरी चूक म्हणजे अध्यक्ष/ speaker ची जागा रिकामी ठेवायला नको होती. याबाबत शहाजी बापू पाटिल यांनी मुलाखतीत सांगितले आहेच. ठाकरेंचा व्हिपही केव्हा आला? तर शिंदेगटाने काढलेल्या व्हिपनंतर. तोही योग्य ठिकाणी नाही. मागच्या वेळी कोर्टाने फ्लोर टेस्ट मान्य केल्यावर जे काही झाले ते एवढे फटाफट झाले की आता काही उपाय नाही असे दिसते. शिवाय जैसे थे स्टे ओर्डर आली तर फायदा शिंदे गटाचा. मग निवडणुका येऊन मतदारच निकाल लावतील.

हे ( मविआ ) सरकार का पडंत नाही अशी पृच्छा अनेकदा केली होती. ते आता पडलं आहे. यापुढे उद्धव ठाकऱ्यांनी पवारांसोबत जाऊ नये इतकीच माझी इच्छा आहे. बाकी, आमदार पात्र ठरले तरी चालतील. पुढेमागे त्यांन स्वगृही आणता येईल. फक्त उद्धव ठाकरे भक्कम हवेत. ते पवारांसोबत कधीच बळकटपणे उभे राहू शकणार नाहीत. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ठाकरेंना मविआतून बाहेर पडू नये. शिवसेना, कोंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र निवडणूका लढून जिंकल्या तर पुन्हा भाजप नी शिंदे गटाचा धुव्वा ऊडेल. सेनेचे कमीत कमी ४० आमदार तरी निवडूण येतील. पाजर्याला पावट्याचं निमीत्त ह्या प्रमाणे आमदारांना जायचंचं होतं ईडीचा भितीने. त्यामुळे संजय राऊत, राष्ट्रवादीशी युती हा भंपकपणा आहे. खरं कारण ईडीची भिती नी ५० खोके. शरद पवार पुन्हा शिवसेना ऊभी करायला मदत करतील. फक्त नंतर पुन्हा भाजपशी युती करायचा मुर्खपणा ऊध्दव ठाकरेंनी करू नये भलेही मातोश्रीवर पाया पडायला कुणाही येऊदे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शरद पवार पुन्हा शिवसेना ऊभी करायला मदत करतील
ह्यांना मुंबईत , विदर्भात स्वतःच्या पक्षाचे धड दोन आकडी आमदार निवडून आणता येत नाहीत. आणि हे शिवसेना ऊभी करायला मदत करम्हणजे हे म्हणजे घरचे झाले थोडे असा प्रकार आहे.

सुप्रीम कोर्टात सुरू असलेले उद्धव ठाकरे गट (अभिषेक मनू सिंघवी आणि कपिल सिब्बल) विरुद्ध एकनाथ शिंदे गट (हरीश साळवे) ह्या केसचे प्लीडिंग फॉलो करत नाहीये का ? तुफान अर्ग्युमेंट्स आहेत दोन्ही पक्षांकडून. १. उद्धव गटाने अँटी डिफेक्शन अन संबंधित पोटकलमे उद्धृत करून जोवर डिफेक्ट झालेले गट भाजपमध्ये मर्ज होत नाहीत तोवर डीसक्वालिफाय ठरतील म्हणले आहे तर २. एकनाथ शिंदे गटाने डिफेक्शन झालेच नाहीये, मूलतः जर एकनाथ शिंदे गटाने आम्ही पक्षांतर केले नसून पक्षातच आहोत अन आमचे नेते उद्धव ठाकरे आहेत हे स्टँड घेतले आहेत तर मग एकनाथ शिंदे गटावर पक्षांतर अन तदानुषंगिक डीसक्वालिफिकेशन कसे लागणार ? असा सवाल केला आहे, त्याशिवाय वाढीव चिमटा घेताना हरीश साळवे म्हणतात की हा एका लोकशाहीत काम करणाऱ्या राजकीय पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचा प्रश्न आहे, जर बहुसंख्य आमदार अन खासदारांना नेत्यांचे निर्णय आवडत नसेल तर त्यांनी ते बोलून दाखवल्यास बिघडते कुठे ! ;) लीगल ब्लॉकबस्टर सुरू आहे लेको ! नीट बघा !

In reply to by जेम्स वांड

@ जेम्स वांड सुप्रीम कोर्टात सुरू असलेले युक्तिवाद पाहिले. आताची सुनावणी नक्की कोणत्या याचिकेवर आहे हे कळले पाहिजे. शिवाय घटना कोणत्या क्रमाने घडल्या त्याचा कोर्ट विचार करणार. १)एक वेळ असं धरू की ते १६ आमदार पक्षातून हकालपट्टी झालेत. २)अध्यक्ष निवडणुकीत सर्वच आमदारांवर मतदानाचा व्हिप बजावला गेला नव्हता ही चूक झाली. ३) व्हिप नाही, ते १६ वगळूनही शिंदे गटाचं बहुमत आहे. ४) व्हिप डावलून मतदान केल्यास आमदार आपोआपच अपात्र ठरणार होते. म्हणजे शिवसेनेचे आमदार राहिले नसते. तरीसुद्धा ते आमदार म्हणून काही बाद होत नाहीत. आणि अध्यक्ष निवडून येणारच . मग पुढचे काय डोंगरच कोसळले.

In reply to by जेम्स वांड

एक गोष्ट कळत नाहीये. पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे अशा अपात्रतेचा निर्णय सभागृहाच्या अध्यक्षांनी घ्यायचा असतो. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद त्यावेळी रिक्त असल्याने तो अधिकार उपाध्यक्षांकडे गेला हे समजू शकतो. त्याप्रमाणे उपाध्यक्षांनी सुनील प्रभूंच्या अर्जावर १६ आमदारांना नोटीस बजावली आणि लगेच दोन दिवसात त्या आमदारांकडून खुलासा मागितला. दोनच दिवस मुदत देणे हे महाराष्ट्र विधानसभेच्या नियमांचे उल्लंघन आहे असा दावा करत हे आमदार कोर्टात गेले आणि ११ जुलैपर्यंत त्या आमदारांना नोटिशीवर खुलासा द्यायला वेळ कोर्टाने दिला. इथपर्यंत ठीक. मधल्या काळात राहुल नार्वेकर विधानसभेच्या अध्यक्षपदावर निवडले गेले. त्यामुळे या प्रकरणात काहीही निर्णय घ्यायचा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा अधिकार संपला असे म्हणायला हरकत नसावी. जर विधानसभा अध्यक्षांनी सुनील प्रभूंच्या अर्जावर काही निर्णय दिला तर त्याविरोधात दुसरी बाजू कोर्टात जाऊ शकेल हे समजू शकतो. पण असा कोणताही निर्णय राहुल नार्वेकरांनी दिला आहे का? माझ्या तरी वाचनात असे काही आलेले नाही. तसे असेल तर आधीच या प्रकरणाची सुनावणी करायचे जुरिसडिक्शन सर्वोच्च न्यायालयाला आहे का? अन्यथा भविष्यात अशा प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी निकाल द्यायच्या आतच काही पक्ष थेट सर्वोच्च न्यायालयात जातील हा घातक पायंडा पडेल.

In reply to by क्लिंटन

कोर्ट काय म्हणाले? "दोन्ही न्यायव्यवस्था स्वतंत्र आणि कार्यक्षम आहेत. ढवळाढवळ करत येत नाही. पण Court {of law} review of any decision is not barred." म्हणजे नियमानुसार काम झाले का हे तपासण्याचा कोर्टाचा अधिकार डावलता येत नाही.

In reply to by कंजूस

Court {of law} review of any decision is not barred."
बरोबर आहे. पण हे डिसीजन झाल्यावर लागू पडेल. डिसीजन झालेलाच नसेल तर काय?

In reply to by क्लिंटन

जर निर्णय झालाच नसेल तर कोर्ट प्रि एम्प्टीव निर्णय घेउ शक्त नाहि. ते फक्त निवाडा देउ शकते. बहुधा म्हणूनच निर्णय झाला नसावा.

In reply to by क्लिंटन

>>>>एक गोष्ट कळत नाहीये. पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे अशा अपात्रतेचा निर्णय सभागृहाच्या अध्यक्षांनी घ्यायचा असतो. तो निर्णय उपाध्याक्षांंनी घेतला आहे. -दिलीप बिरुटे

राजकीय पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचा प्रश्न आहे,
होय. पण योग्य वेळी योग्य पावले उचलली गेली नाहीत आणि विरोधकांचे फावले.

जर पक्ष अंतर्गत लोकशाही असती तर संसदीय पक्ष अंतर्गत निवडणूक घेऊन हा प्रशन तात्काळ सोडवू शकतो मग त्याला बाहेरील राजकीय पक्षाचा / त्यानच्या सर्वाधिक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असो कि नसो ( बहुतेकदा संसदीय सभासद आपल्या राजकीय पदाधिकाऱ्यां बरोबर सल्लामसलत करीत असतील आणि पाठिंबा नसला तरी जर हि निवडणूक पुकारली तर पुढे राजकीय पक्ष आणि जनता नाराज होऊ शकते हा धोका असतो हे मान्य हा धोका शिंदे गटाने पत्करला आहे पुढे दिसेल काय होईल ते ! हे सत्य सगळॆ कडे दिसतंय मग भारत असो / ऑस्ट्रेलिया असो कि युनायटेड किंग्डम पण अनके लोक हेच लक्षात घेत नाहीत ... उगाचच न्यायालय वैगरे गोंधळ का होतो !

ठाकरे हा ब्रँड आहे. शिवसेनेबरोबर तो पाहिजेच. उद्धव किंवा राज कोणितरी पाहिजेच आणि कोणितरी एक असणारच आहे. जोपर्यंत राज आपले पत्ते उघडे करणार नाहीत तोपर्यंत उद्धव आमचे नेते हे पालूपद चालूच ठेवायला लागणार असे दिसते. "जैसे थे" हीच स्थिती ब-याच काळ चालू राहणार असे दिसते आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या पुढील हालचाली आता सुरू होतील. उद्धव गटांच्या सर्व हालचाली या कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने त्यांच्या हालचालींना चांगलीच खीळ बसणार असे दिसतंय. आता पक्ष पातळीवर शिंदे गट जोरात हालचाली सुरू करतील तर राज साहेब मनसेच्या नावाखाली जोरदार भेटीगाठी सुरू करतील असं दिसतंय. मग कधीतरी मोठा धमाका उडू शकेल. शिवसेना संपली तर ९० लाख मते भाजपाकडे एक गठ्ठा येण्याची शक्यता अजिबात नाही. तसेच शिवसेना म्हणजे आगीसारखी आहे. भाजपाला ती सांभाळणे जड जाईल. त्यापेक्षा शिवसेना टिकवून त्यांच्याशी युती ठेऊन ९० लाख मते आपल्या विरोधात जाणार नाही असे बघणे भाजपाच्या हिताचे आहे असे वाटते. आता थोडी गंमत म्हणून लिहीतो आहे. फडणवीसांनी शिवसेना जिवंत ठेवावी असे वाटते. तरच ते भाजापातील फडणवीस द्वेष्टे काबूत ठेऊ शकतील. पवार साहेब असे पर्यंत महाराष्ट्रात फडणवीस असायलाच पाहिजेत असं मोदी-शहा यांना वाटत असल्यास तेही शिवसेना शिल्लक रहावी याच मताचे असणार. :)

In reply to by शाम भागवत

शिवसेना टिकवून त्यांच्याशी युती ठेऊन ९० लाख मते आपल्या विरोधात जाणार नाही असे बघणे भाजपाच्या हिताचे आहे असे वाटते. हो तसेच .. सेनेचे मुळ समर्थक एकदम सम्पने शक्य नाहि ..

In reply to by शाम भागवत

शिवसेना संपली तर ९० लाख मते भाजपाकडे एक गठ्ठा येण्याची शक्यता अजिबात नाही. तसेच शिवसेना म्हणजे आगीसारखी आहे. भाजपाला ती सांभाळणे जड जाईल. त्यापेक्षा शिवसेना टिकवून त्यांच्याशी युती ठेऊन ९० लाख मते आपल्या विरोधात जाणार नाही असे बघणे भाजपाच्या हिताचे आहे असे वाटते. आता थोडी गंमत म्हणून लिहीतो आहे. फडणवीसांनी शिवसेना जिवंत ठेवावी असे वाटते. तरच ते भाजापातील फडणवीस द्वेष्टे काबूत ठेऊ शकतील. पवार साहेब असे पर्यंत महाराष्ट्रात फडणवीस असायलाच पाहिजेत असं मोदी-शहा यांना वाटत असल्यास तेही शिवसेना शिल्लक रहावी याच मताचे असणार. :)
+१. जसे जहर को जहर काटता है किंवा लोहे लो लोहा काटता है किंवा मराठीत काट्याने काटा काढणे..ह्यातील काहीही एक वाक्र्पचार घ्या व तो सेनेसाठी लागु पडतो. कॉंग्रेस त्यातल्या त्यात काकांची काँग्रेस ला शह देण्यासाठी शिवसेनाच हवी. पण गेल्या दोन वर्षातल्या राजकारण पाहता सेना काकांच्या पूर्ण कह्यात गेली होती आणि त्यामुळे शिवसेनेच्या सध्याच्या बंड केलेल्या नेत्यात अस्वस्थता पसरणे साहजिकच होते. बीजेपीशीच संघर्ष करायचा तर अगोदर दोन पारंपारिक पक्ष आहेत जे स्वतःची व्होटबँक सांभाळून आहेत त्यात तिथे शिवसेनेने शिरायचे ठरवले असे म्हटले तरी आपल्या ताटातील हिस्स्सा हे पक्ष वेळ येताच थोडेच देणार आहेत. ही गोष्ट मा. उध्द्ववजींना का समजली नाही हे कोडेच आहे. शिवसेना व भाजप एकमेकांना पूरक पक्ष आहेत.कितीही मतभेद असतील तर दोन्हीही एकत्र लढण्यातच दोघांचे हित होते. शिवसेनेला आपल्या खुंट्याला बांधण्याचा प्रयत्न काकाही करतच होते कि.

In reply to by शाम भागवत

शिवसेना संपली तर ९० लाख मते भाजपाकडे एक गठ्ठा येण्याची शक्यता अजिबात नाही. मुळात सेनेकडे ९० लाख मते कधीही नव्हती. यातील बरीचशी मते भाजप समर्थकांची आहेत. तसेच शिवसेना म्हणजे आगीसारखी आहे. भाजपाला ती सांभाळणे जड जाईल. मुर्खासारखे बरळणारे बढाईखोर म्हणजे आग नाही. त्यापेक्षा शिवसेना टिकवून त्यांच्याशी युती ठेऊन ९० लाख मते आपल्या विरोधात जाणार नाही असे बघणे भाजपाच्या हिताचे आहे असे वाटते. हीच गंभीर घोडचूक भाजपने पुन्हा केली तर महाराष्ट्रातून भाजप कायमस्वरूपी संपेल. फडणवीसांनी शिवसेना जिवंत ठेवावी असे वाटते. तरच ते भाजापातील फडणवीस द्वेष्टे काबूत ठेऊ शकतील. सेनेला अखेरची घरघर लागली आहे. आता फडणवीस तर सोडाच मोदी शहा सुद्धा सेनेला वाचवू शकणार नाहीत.

सद्यपरिस्थितीत शिंदे गटाच्या १६ आमदारांची बाजू काहिशी दुर्बल वाटते. आम्ही पक्ष सोडला नसून अजून मूळ पक्षातच आहोत हा दावा अजूनही असेल तर मग या आमदारांनी पक्षप्रमुख ठाकरेंचे आदेश का पाळले नाहीत, त्यांनी बोलविलेल्या बैठकीस का उपस्थित राहिले नाहीत, गटनेता निवडणे हा पक्षप्रमुखाचा घटनादत्त अधिकार असूनही ठाकरेंनी बदललेल्या गटनेत्याचे आदेश न पाळता व स्वत:कडे अधिकार नसतानाही स्वत:हून वेगळा गटनेता कसा निवडला या मुद्द्यांवर या आमदारांची बाजू दुबळी आहे. १ ऑगस्ट किंवा त्यानंतर जेव्हा निकाल लागेल तेव्हा न्यायालय या १६ जणांना (ज्यात शिंदे सुद्धा आहेत) अपात्र जाहीर करण्याची जास्त शक्यता आहे. अर्थात तसे झाले तर शिंद्यांना राजीनामा द्यावाच लागेल, उर्वरीत आमदारांची चलबिचल होऊन त्यातील काही जण मूळ सेनेत परत जाऊ शकतात. ते टाळण्यासाठी मंत्रीमंढळात स्थान देऊन त्यांना लालूच दाखविली जाऊ शकते जेणेकरून शिंद्यांनतर नवीन मंत्रीमंढळ स्थापन झाले तर त्यात आपण असू असा त्यांना विश्वास वाटेल. जर नवीन मुख्यमंत्री येणे अवघड असेल तर राज्यपाल राष्ट्रपती राजवट आणतील. बाकी नवीन मुख्यमंत्री निवडणे, बहुमतासाठी अधिवेशन बोलविणे, नवीन सभापतींची निवडणूक घेणे हे निर्णय नक्कीच घटनेला धरून आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

अपात्रतेचा अधिकार कोर्टाला नाही. तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. सुप्रीम कोर्ट एवढाच निर्णय देईल की विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. अध्यक्षांनी निर्णय घेतल्यावरच मग त्याच्या वैधतेबाबतचा निर्णय कोर्टाकडे मागता येईल. उपध्यक्षांनी फक्त नोटीस बजावलेली आहे. त्यांनी कोणालाही अपात्र ठरवलेले नाही. यास्तव नोटीसीवरची कार्यवाही करण्यास कोर्ट मंजूरी देईल असे वाटते. अर्थातच आता विधानसभा अध्यक्ष अस्तित्वात असल्याने उपाध्यक्षांना निर्णयप्रक्रियेत कोणतेच स्थान नसेल. थोडक्यात छापा पडला तरी शिंदेगट जि़कणार. काटा पडला तर उद्धव गट हरणार अशी स्थिती आहे. पण विधानसभेने पात्र अपात्र यासंबंधात कोणताच निर्णय घेतलेला नसताना कोर्ट स्वतःहूनच हा अधिकार आपल्याकडे घेईल असे कोणाला वाटत असल्यास मात्र गुरूजी म्हणतात त्याप्रमाणे घडायला काही हरकत नसावी.

In reply to by शाम भागवत

सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर नोंदवलेलं निरीक्षण महत्वाचं आहे. हरिश साळवे यांनी वेळ वाढून मागितल्यानंतर न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत वेळ दिली आहे. महत्वाचं म्हणजे, अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाच निर्णय घेणार आहे. न्यायालयाने विधानसभेतील कामकाजातील सर्व कागदपत्रं सुरक्षित ठेवण्याचा आदेश दिला असून पुढील सुनावणीत सादर करावे लागणार आहे. सध्याची परिस्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे. म्हणजे - (१) अपात्रतेसंबंधी फक्त सर्वोच्च न्यायालयच निर्णय घेणार. नवीन सभापतींना याविषयी निर्णय घेता येणार नाही. (२) आहे ती परिस्थिती कायम ठेवायची असल्याने सभापतींना अपात्रतेसंबंधी कोणताही निर्णय घेता येणार नाही. कदाचित मंत्रीमंंडळ विस्तार सुद्धा करता येणार नाही. (३) सर्वोच्च न्यायालय स्वतः निर्णय न घेता हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवेल असे वाटते. तसे झाले तर निकाल खूप लांबणीवर पडेल व त्यामुळे राष्ट्रपती राजवट येऊ शकते.

In reply to by शाम भागवत

अपात्रतेचा अधिकार कोर्टाला नाही. तो अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. आणि अध्यक्षसाची निवडणूक उद्धव गट जिंकू शकले नाहीत हे सत्य आहे असो मूळची अनैसर्गिक युती होती + राष्ट्रवादीने सगळं कारभार चालवला ... म्हणून हे सगळे झाले .. नुसते पैसे घेऊन एवढेआमदार असा निर्णय घेतील एवढा धोका घेतील अ से वाटत नाही "गद्दार" आमदारांर्नी आता अनेक मुलाखती दिलैया आहेत त्यात त्यांनी बरीच नाराजी कशी होती त्या बद्दल भाष्य केले आहे ते जरूर ऐकावे अर्थात ते होनार नाही त्याउलट - गद्दार/ गौहाती ला गेलेले ते मुडदे / या आणि कामाठी पुर्यात बसा (गौहाती ला गेले ल्यात ४ महिला होत्या हे माहिती असून सुद्धा )/ विधानभवनाची वाट वारली वरून जाते असली पातळी दाखवणारी विधाने सर्रास केली गेली ...

In reply to by श्रीगुरुजी

गटनेता म्हणून कोणाला मान्यता द्यावयाची हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. तो निर्णय शिंदे गटाच्या बाजूने घेतल्यावर मग त्याविरूध्द कोर्टात जाता येईल. मला वाटते अशा प्रकारे कोर्टकचे-या चालू राहतील. सर्व दाव्यांचे कोर्टाचे निकाल येईपर्यंत विधानसभेची मुदत संपून नव्याने निवडणुका होऊन नवीन विधान सभा अस्तित्वातही आलेली असेल. :)) बोम्मई केसमधे तर दोन विधानसभा निवडणुका होऊन गेल्या होत्या. :)))

In reply to by श्रीगुरुजी

गटनेता बदलणे हे पक्श प्रमुखाच्या मनमानीवर अवलंबून आहे का? २/३ मेजॉरिटी लागत नाही का

अपात्रता किंवा इतर काही विषयात अंतिम अधिकार सभापतींना असले तरी हे अधिकार absolute किंवा सार्वभौम नाहीत हे न्यायालयाने पूर्वी काही प्रकरणात दाखवून देऊन सभापतींचे निर्णय रद्द केले आहेत. १९८० च्या दशकात आंध्र विधानसभेच्या सभापतींनी इनाडू दैनिकाचे संपादक रामोजी राव यांना एका हक्कभंग प्रकरणात शिक्षा देण्यासाठी विधानसभेत उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. त्याविरुद्ध रामोजी रावांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापतींनी सांगितले की सभापतींच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार न्यायालयास नाही व पुन्हा एकदा रामोजी रावांना विधानसभेत उपस्थित राहण्याचा आदेश दिला. रामोजी रावांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती आणली. शेवटी सभापतींना माघार घ्यावी लागली होती. अगदी अलिकडचे प्रकरण म्हणजे मागील वर्षी पीठासीन अधिकारी भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यातच रद्द करून सभापतीपेक्षा आपलाच अधिकार सर्वोच्च आहे हे दाखवून दिले.

In reply to by श्रीगुरुजी

कर्नाटकच्या राज्यपालांनी बहुमत नसताना येदीयुरप्पांना शपथ दिली होती. न्यायालयाने दणका देऊन ती रद्द करून बहुमत घ्यायला लावले होते व भाजपेयी/राज्यपाल तोंडावर आपटले होते. मग घोडेबाजार, फोडाफोडी करून कर्नाटकात सत्ता आणावी लागली. महाराष्ट्राच्याही कोश्यारीनी बहुमत नसताना फडणवीस व अजितदादा ह्याना शपथ दिली होती. मग शिवसेना कोर्टात गेली व कोर्टाने आवाजी मतदानानाने बहुमत सिध्द करायला लावले. लगेचच फडणवीसांनी राजीनामा दिला, कोश्यारी व फडणवीस दोन्हीही तोंडावर आपटले. कोश्यारींचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं, जळफळाटामुळे शपथ घेताना मंत्र्यांना त्रास देत होते. काज्यापाल कसा नसावा ह्याचं ऊत्तम ऊदाहरन म्हणजे कोश्यारी.

In reply to by श्रीगुरुजी

१९८० च्या दशकात आंध्र विधानसभेच्या सभापतींनी इनाडू दैनिकाचे संपादक रामोजी राव रामोजी राव हे संसदेचे सभासद होते का? तसे नसेल तर संसद अशी सक्ती वेस्टमिनिस्टर पद्धती मध्ये करू शकत नाही मुळात

In reply to by चौकस२१२

ते कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते. आंंध्र विधानसभेत एकदा प्रचंड गोंधळ, मारामाऱ्या, फेकाफेकी झाल्यानंतर त्यांनी आपल्या वृत्तपत्रात "जेष्ठांचा गोंधळ" या शीर्षकाचा अत्यंत कठोर टीका करणारा खरमरीत अग्रलेख लिहिला होता. त्यामुळे सर्व विधीमंडळ सदस्य अत्यंत संतापले होते व रामोजी रावांना विधीमंडळात आणून त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी सभापतींकडे केली होती. हेच ते प्रकरण - https://www.indiatoday.in/magazine/society-the-arts/media/story/1984043…

पक्षांतरबंदी कायदा महाकडक हवा. देशात लोकशाही नी पक्षात हुकूमशाही ही हवीच. पक्ष वाढवायला बाळासाहेबांसारख्या माणसाने कष्ट घ्यायचे. अंगावर केसेस घ्यायच्या. रिक्षावाला, भाजीवाले, पानटपरीवाले ह्याना मोठं करायचं नी नंतर ह्यांनीच ऊलटून पक्षावर दावा ठोकायचा. ज्या फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून शिंदे बसलेत त्यांचे वडील आमदार नी काकू मंत्री होत्या, ते घराणेशाहीतून आलेत, शिंदेंचं काय होतं? कुणी मोठं केले? सेनेनेच ना? आज त्याच सेनेवर ऊलटताना त्याना थोडं काहीतरी वाटायल हवं होतं. असे अनेक शिंदे सेना भविष्यात निर्माण करेल ही प्रक्रीया निरंतर चालू राहील. भाजपात तुम्ही श्रीमंत किंवा घराणेशीहीतील राजकीय पार्श्वभूमीचे नसाल तर तुम्हाला काहीही मिळनार नाही.

हे संपूर्ण प्रकरण भाजपवर बुमरॅंग होण्याची शक्यता आहे हे मी पूर्वीच लिहिले होते व आता तसे होण्याची शक्यता जास्त वाटत आहे. तसे झाले तर भाजपचे पुन्हा एकदा नाक कापले जाईल. या प्रकरणाचा काहीही निकाल लागला तरी शिवसेना तर संपल्यातच जमा आहे. एवढी गुंतागुंत करण्याऐवजी भाजपने निवडणुकीसाठी जास्तीत जास्त सव्वादोन वर्षे वाट पहायला हवी होती.

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेना मविआतच राहीली नी मुंबई बागातील जास्त जागा पदरात पाडून घेतल्या तर ४०+ आमदार जिंकतीलच. कोल्हापूर, औरंगाबाद अश्या भागातील अनेक ामदार फक्त सेनेनूळेच आहेत. तिथे स्थानीक नेत्याला कुणीही विचारत नाही, असे लोक पुन्हा सठाकरेंची माफी मागून सेनेत शिरतील. ऊदा. दादा भूसे, भूमरे, संजय शिरसाठ. नाही आले तर ते पडतीलच. सोना निवडूण आणू शकली नाही तरी ह्या लोकांना पाडायची ताकद राखून आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अबा
सोना निवडूण आणू शकली नाही तरी ह्या लोकांना पाडायची ताकद राखून आहे.
ही सोना कोण म्हणायची ? अशी काय ताकद आहे हिच्याकडे ??

प्रचारात दिलेली आश्वासने न पाळणे, निवडणूकपूर्व केलेली युती तोडणे, निकालानंतर विरोधात लढलेल्यांशी हातमिळवणी करणे, निकालानंतर एक किंवा सर्वच्या सर्व सदस्यांनी पक्ष बदलणे याविषयात अत्यंत कडक कायदे आणण्याची नितांत गरज आहे. असे करणाऱ्यांना जन्मभर निवडणूक लढण्यास बंदी व फौजदारी शिक्षा हवी.

In reply to by श्रीगुरुजी

एखाद्या नेत्याने सभागृहात बहुमत सिद्ध केल्यानंतरच तिला/त्याला मुख्यमंत्री/पंतप्रधान पदाची शपथ देण्यात यावी, जेणेकरून शपथ घेतल्यापासून बहुमत सिद्ध करेपर्यंतच्या काळात कोणताही निर्णय घेता येणार नाही. निवडणुकीत पराभव झालेल्यांना पुन्हा निवडून येईपर्यंत मंत्रीपद देता येणार नाही. आमदार/खासदार नसलेल्यांना मंत्री करून ६ महिन्यात निवडून आणण्याच्या अटीऐवजी निवडून आल्यानंतरच मंत्री करावे.

जर निर्णयच घेतला नसेल तर तो योग्य किन्वा अयोग्य हे कसे ठरवतात? सभापती ने कोणता निर्णय कधी घ्यायचा हे कोर्ट कसे ठरवेल? आणि गट्नेता बद्लला हे निर्णय ठाकरेनी राज्यपालांना कळवणे आवश्यक नव्हते का?

In reply to by अप्पा जोगळेकर

अपात्रतेसंबंधी खटल्याच्या निकालापूर्वीच सभापती निर्णय घेऊ शकतील हे लक्षात आल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचे अधिकार स्वत:कडे घेतले आहेत. गटनेत्याचा निर्णय फक्त सभापतीला कळविणे बंधनकारक आहे व त्यावर मान्यतेची अधिकृत मोहर सभापती उठवितो. अर्थात तो हा निर्णय अमान्य करूच शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अपात्रतेसंबंधी खटल्याच्या निकालापूर्वीच सभापती निर्णय घेऊ शकतील हे लक्षात आल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचे अधिकार स्वत:कडे घेतले आहेत. नाही सर्वोच्च न्यायालयाला असा अधिकार नाही. उद्या कुणाला प्रतोद नेमायचे किंवा गटनेता नेमायचे याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे नाहीत सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला आहे याचा अर्थ स्टेट्स को ( status quo) म्हणजे वादी प्रतिवादी न्यायालयात येण्याअगोदरची स्थिती जशी होती तशीच ठेवणे. १ऑगस्ट ला काहीही होणार नाही. हे प्रकरण ५ न्यायाधीशांच्या घटना पीठाकडे दिले जाईल. ज्यात अनेक मूलभूत गोष्टींचा उहापोह केला जाईल. उदा. घटनेत लिहिलेले आहे कि २/३ आमदारांना वेगळे व्हायचे असेल तर त्यानं कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल. उद्या समजा भाजप च्या २०२ खासदारांना मोदींविरुद्ध जायचे असेल तर त्यांना केवळ एक खासदार असलेल्या Viduthalai Chiruthaigal Katchi सारख्या पक्षात( ज्याचे नावही आपल्यापैकी कुणी ऐकलेले नसेल) विलीन व्हावे लागेल. हे हास्यास्पद( absurd) आहे. कारण हे नैसर्गिक न्यायाच्या मूलतत्वाच्या विरोधात जाईल.( principles of natural justice) असे घटनाकाराना नक्कीच अध्याहृत नव्हते. प्रत्येक गोष्ट घटनेत लिहिलेली नसते त्यामुळे घटनाकारांनी घटनादुरुस्तीचा पर्याय ठेवला आहे. तसेच न्यायालयाला घटनेचा अर्थ लावण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु सदनाच्या पटलावर होणाऱ्या गोष्टींवर न्यायालयाचे नियंत्रण ठेवलेले नाही. लोकशाहीच्या चार स्तंभाना बऱ्यापैकी स्वातंत्र्य दिलेले आहे आणि एकमेकांवर कुरघोडी करू नये असेही लिहिलेले आहे. यामुळेच उद्या श्री शिंदे यांच्या गटाला संपूर्ण अपात्र ठरवणे न्यायालयाला खूप कठीण जाणार आहे. यास्तवच हे प्रकरण ५ किंवा ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाईल आणि दोन तीन वर्षे याबाबत सर्व चर्चा संदर्भ तपासले जातील आणि पक्षांतर बंदी कायद्याचा संपूर्ण अर्थ लावला जाईल असे मला वाटते. एस आर बोम्मई निवाड्यात असेच झाले होते.

In reply to by सुबोध खरे

अपात्रतेसंबंधी नवीन सभापतींना केव्हाही निर्णय घ्यायचा घटनादत्त अधिकार आहे व ते घाईघाईने तो अधिकार वापरून त्या १६ आमदारांना पात्र ठरवून या खटल्यात एक नवीन उपकथानक निर्माण करून एक प्रकारची कुंठितावस्था निर्माण करू शकतील हे न्यायाधीशांच्या लक्षात आले असावे. त्यामुळेच त्यांनी सभापतींना या विषयावर निर्णय घेण्यापासून रोखले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मुळात विधानसभेच्या नियमाप्रमाणे अपात्र ठरवण्यासाठी कारणे दाखवा नोटिशीमध्ये सात दिवसांचा वेळ द्यावा लागतो. येथे श्री झिरवळ यांनी केवळ ४८ तास वेळ दिला होता. यात १६ आमदारांना अपात्र ठरवून बाकीच्यांना व्हीप लावून अपात्र ठरवण्याचा डाव होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्टे देऊन श्री झिरवळ यांची पंचाईत केली. यानंतर अविश्वास ठराव मांडण्यासाठी राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच विधानसभेचे अधिवेशन बोलवायला हवे असा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडला गेला होता पंरंतु महाधिवक्ता यांनी न्यायालयात आपली बाजू मांडताना हे स्पष्ट केले कि अल्पमतात आलेले सरकार/ मंत्रिमंडळ कधीच असे अधिवेशन बोलावण्याचा सल्ला राज्यपालांना देणार नाही. शिवाय राज्यपाल याना घटनेच्या अधीन राहून स्वतःचे निर्णय घेता येतात. त्यामुले सरकार अल्पमतात आले आहे अशी खात्री झाल्यास राज्यपाल बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलावू शकतात आणि यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक नाही. यामुळे न्यायालयात असे अधिवेशन घेण्याचा निर्णय घटनाबाह्य आहे हा मुद्दा सुद्धा निकालात निघाला. याशिवाय श्री झिरवळ यांच्या विरुद्ध अविश्वासाची नोटीस पाठवलेली असताना त्यांना अपात्रतेची निर्णय घेता येणार नाही असाही मुद्दा मांडला गेला परंतु श्री झिरवळ यांनी हि नोटीस कोणत्याही आमदारांच्या अधिकृत इ मेल वरून आलेली नसल्याने त्यावर कार्यवाही करता येणार नाही असा पवित्रा घेतला. परंतु हि इ मेल एका आमदारांच्या वकिलाच्या अधिकृत इ मेल यावरून आलेली आहे त्यामुळे ती अधिकृत ठरेल कि नाही हे प्रकरण पण न्यायालयाच्या विचाराधीन आहे. राहिली गोष्ट-- राज्यपाल आणि स्पीकर (प्रतोद) हा नि:पक्षपाती असावा हा संकेत आहे. परंतु तसे बऱ्याच वेळेस असत नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर न्यायालयाचे किती निर्बंध असतील हाही एक महत्त्वाचा मुद्दा या खटल्यात विचाराधीन असेल. परंतु एस आर बोम्मई वि भारतीय गणराज्य या केस मध्ये ९ न्यायाधीशांच्या पूर्णपीठाने बहुमत किंवा अल्पमत हे केवळ सदनातच ठरवले जाईल आणि त्यावर न्यायालयाचा अधिक्षेप असू शकत नाही असे स्पष्ट लिहिलेले आहे. गटनेता, प्रतोद आणि राज्य पाल यांच्या कार्यकक्षे बद्दल या खटल्यात संपूर्ण विचार होण्याची अपेक्षा आहे. शिवाय अशी स्थिती येऊ शकेल कि एखाद्या माणसाला त्याच्या जन्मावरून किंवा वयामुळे पक्षाध्यक्ष पद दिलेले आहे परंतु सर्वच्या सर्व लोकनियुक्त प्रतिनिधी त्यांच्या विरुद्ध असतील तरी त्यांच्याच तालावर लोकनियुक्त प्रतिनिधीना नाचावे लागते आहे. असे असेल तर हि लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. याचाही संपूर्ण विचार या खटल्यात करावा लागणार आहे. त्यामुळे असे दोन तृतीयांश किंवा अधिक सांसद जर वेगळे होऊ इच्छित असतील तर त्यांचा वेगळा गट होईल कि त्यांना मूळ पक्ष म्हणून मान्यता देता येईल हाही एक मुद्दा विचाराधीन राहील. हे सगळे मुद्दे घटनापीठाकडून तपासून त्यावर चर्चा आणि कायद्यातील तरतुदी पाहून निकाल येईपर्यंत दोन तीन वर्षे तर नक्कीच पण कदाचित अजून पाच वर्षे सुद्धा जातील त्यामुळे शिंदे सरकार बहुधा आपला अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असे मला वाटते. अर्थात श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला असल्याने आता खटला त्यांच्या बाजूने गेला तरी मविआ चे सरकार परत येणे शक्य नाही. एकतर हे सरकार पुढची अडीच वर्षे काम पाहिल अन्यथा फेरनिवडणूका घेतल्या जातील. यामुळे म वि आ चे नुकसान झाले ते झालेच आहे. शिवसेना दुभंगली आहे. याचा बराचसा फायदा भाजप आणि थोडा फार राष्टवादीला होऊ शकेल. परंतु केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून परत सत्तेत येण्याची शक्यता फारच कमी आहे. आणि "उरलेल्या" शिवसेनेने परत काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करण्याचा मूर्खपणा केला तर श्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत सोडून त्यांच्याबरोबर कोणीही राहणार नाही. त्यामुळे केवळ स्वतःला मुख्यमंत्री बनवण्यासाठी श्री उद्धव ठाकरे यांनी हि असंगत महा विकास आघाडी केल्यामुळे शिवसेनेचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे असे मला वाटते.

In reply to by सुबोध खरे

अशी स्थिती येऊ शकेल कि एखाद्या माणसाला त्याच्या जन्मावरून किंवा वयामुळे पक्षाध्यक्ष पद दिलेले आहे परंतु सर्वच्या सर्व लोकनियुक्त प्रतिनिधी त्यांच्या विरुद्ध असतील तरी त्यांच्याच तालावर लोकनियुक्त प्रतिनिधीना नाचावे लागते आहे. असे असेल तर हि लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. याचाही संपूर्ण विचार या खटल्यात करावा लागणार आहे. ते कसे ब्वा? ठाकरे पक्षातील घटनेप्रमाणे निवडूण आले आहेत. फक्त आमदार मिहणजे पक्ष नसतो. ज्यांना पटत नसेल त्यानी सोडून पळून जावे. ह्यात लोकशाहाची थट्टा वगैरे शब्द वापरणे हास्यास्पद आहे. बाकी ऊध्दव ठाकरेंनी आता मविआतच राहण्याचा शहाणपणा दाखवावा, भाजपेयी ईडी, राज्यपाल, सीबीआय अश्या सर्व पाळलेल्या संस्था ऊध्दव ठाकरेंवर सोडतील पण ठाकरेंना ठाम राहून आघाडी बरोबरच थांबावे, सत्ता मविआचीच येईल नग नंतर बदलाही घेता येईल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाकी ऊध्दव ठाकरेंनी आता मविआतच राहण्याचा शहाणपणा दाखवावा
असंच व्हावं अशी इच्छा आहे. देव करो व त्यांना अशीच बुध्दी देव देवो. _/\_

In reply to by शाम भागवत

देव करो व त्यांना अशीच बुध्दी देव देवो. म्हणजे मग श्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत एवढेच त्यांच्याबरोबर राहतील

In reply to by सुबोध खरे

संपादित. व्यक्तिगत टिपणी टाळावी. व्यक्तिगत रोखाचे प्रतिसाद आढळल्यास कारवाई केली जाईल.

In reply to by सुबोध खरे

सेनेला २०१९ मध्ये भाजपने १२४ इतक्या प्रचंड जागा देऊन स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला होता. आता सेना फुटली नसती तरी पुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसने सेनेला जास्तीत जास्त १०० जागा दिल्या असत्या. आता पुढील निवडणुकीत पुन्हा एकदा मविआ एकत्र लढली तरी सेनेला फार तर ६० जागा लढवायला मिळतील. उर्वरीत २२८ जागा राष्ट्रवादी व कॉंग्रेस स्वत:ला घेतील. अश्या परिस्थितीत सेना ६० पैकी २०-२५ जागा जिंंकू शकेल. जर सेना हट्ट करून स्वबळावर लढली तर सेनेला फार तर १० जागा मिळतील. मविआबरोबर किंवा स्वबळावर असो, सेना आत महाराष्ट्रात अदखलनीय झाली आहे व हेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे. सेनेचा प्रवास शेकाप, जनता दल, डावे पक्ष, लाल निशाण गट अश्या पक्षांच्या पायवाटेने सुरू झाला आहे व हा एकेरी मार्ग आहे.

In reply to by श्रीगुरुजी

शिंदे + राज ठाकरे यांची नवीन शिवसेना अस्तित्वात येईल. उद्धव यांची शिवसेना संपून जाईल. :))))))))

In reply to by शाम भागवत

शिंदे + राज ठाकरे म्हणजे शिंदे + शून्य. शिंदे राजसारख्या अत्यंत चंचल, अस्तित्वहीन व अविश्वासू व्यक्तीशी हातमिळवणी करण्याची शक्यता शून्य. पण फडणवीस राजशी हातमिळवणी करण्याची योजना करू शकतात कारण त्यांना ठाकरे आडनावाच्या व्यक्तीसमोर वाकण्याचे प्रचंड ऑब्सेशन आहे.

In reply to by शाम भागवत

राज ठाकरे आरंभशूर आहेत. दोन्ही ठाकरे बंधु हस्तिदंती मनोर्यात बसुन काही घोषणा देणे म्हणजे नेतृत्व करणे असे समजतात. मनसे ला सुरवातीला जितका प्रतिसाद मिळाला होता तो राज ठाकरेंनी आपल्या कर्माने घालवला. तेच तिकडे दिल्लीत अरविंद केजरीवाल सारख्या चतुर नेत्याने आपला अजुन लोकप्रिय केले. दोन्ही बंधुंना भाकरी फिरवण्याची इच्छाच नाही. शिवसेनेने संजय राऊत सारख्याला त्यासाठी नेमले आहे आणि त्याने फक्त धूर करुन टाकलाय. शिंदे जरी राज ठाकरेंसोबत गेले तरी काही दिवसांनंतर मनसेची जी अवस्था आहे तशीच त्यांचीही अवस्था होऊन जाईल.