Skip to main content

ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग ४)

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 19/07/2022 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात आणि नवा कोणता मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. शिवसेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटले आणि तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. एक गोष्ट समजत नाही. शिवसेनेचे महाराष्ट्रातून निवडून गेलेले १८ आणि पोटनिवडणुकीत दादरा नगरहवेलीतून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेलेल्या कलाबेन डेलकर असे एकूण १९ खासदार आहेत. १२ ही संख्या १९ च्या दोन-तृतीयांश पेक्षा कमी आहे. तेव्हा १२ खासदार फुटले तरी ते कसे चालणार आहे समजत नाही. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह महाराष्ट्रात दिले आहे पण महाराष्ट्राबाहेर सगळीकडे धनुष्यबाण हेच चिन्ह शिवसेनेला मिळेल असे नाही. त्याप्रमाणे दादरा नगरहवेली पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना धनुष्यबाण हे चिन्ह न मिळता दुसरे कोणते तरी चिन्ह मिळाले होते. तेव्हा त्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेल्या असल्या तरी वेगळ्या चिन्हावर निवडून गेल्या असल्याने त्यांना या पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे शिवसेनेच्या १८ सदस्यांच्या गटामध्ये गणले जात नाही अशी काही तांत्रिकता आहे का समजत नाही.

वाचने 19102
प्रतिक्रिया 203

प्रतिक्रिया

In reply to by कानडाऊ योगेशु

काहीही. राज ठाकरे आता प्रगल्भ झालेत, त्यांनी जे मुद्दे पुढे आणलेत त्याला देशात प्रचंड पाठिंबा मिळतोय, ते अगदी अचूक पावले टाकताहेत, ते पुढील निवडणुकीत चमत्कार करून दाखविणार (२०१९ च्या निवडणुकीआधीच हे भाकीत केले होते) असे भाऊ तोरसेकरांसारखे राजकीय विश्लेषक अनेक वर्षांपासून सांगताहेत. येथील काही विश्लेषक अगदी हेच सांगताहेत. एकदा राज ठाकरे मैदानात उतरू देत. मग पहा बाकी पक्ष कसे अस्तित्वहीन होतात ते.

In reply to by सुबोध खरे

त्यातही १६ आमदारांना अपात्र ठरवायची मागणी पक्षांतरबंदी कायद्यात बसते का? हे १६ आमदार उध्दव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर होते त्यानंतर त्यांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवा ही मागणी केली गेली. आमदारांनी पक्षादेश (व्हिप) चे उल्लंघन केले तर त्यांच्या विरोधात पक्षांतरबंदी कायदा लागेल हे समजू शकतो पण विधानसभेच्या सभागृहात कोणतेच मतदान होणार नव्हते/ व्हायचे नव्हते अशावेळी व्हिप यायचा काही संबंधच नाही. पक्षांतरबंदी कायदा हा सभागृहाबाहेर काय चालते त्याला लागू पडतो का? एक टोकाचे उदाहरण म्हणजे समजा उध्दव ठाकरेंनी असा आदेश काढला असता की मातोश्रीवर येऊन माझे पाय चेपलेच पाहिजेत तर त्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा येऊ शकला असता का? म्हणजे सभागृहाबाहेर आमदारांनी काय करावे याविषयी पक्षाध्यक्षांचा आदेश पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे अ‍ॅबसोल्यूट असतो का? सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाप्रमाणे पक्षविरोधी कारवाया केल्या तरी त्याला पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा येऊ शकतो. आता पक्षाध्यक्षाने बोलावलेल्या बैठकीला न जाणे ही त्या व्याख्येप्रमाणे पक्षविरोधी कारवाई ठरते का? याविषयी एक फेसबुक पोस्ट बघितली. उध्दव ठाकरेंनी राजीनामा देऊन बहुमूल्य संधी व्यर्थ दवडली. ३० जूनला त्यांनी विधानसभेला सामोरे जायला हवे होते आणि विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यायला हवे होते. त्यावेळेस सगळ्या शिवसेनेच्या आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान करावे हा व्हिप त्यांच्या बाजूला काढता आला असता आणि मग एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांची गोची झाली असती कारण एकीकडे आपण शिवसेनेतच आहोत आणि उध्दव ठाकरे हेच आमचे नेते आहेत याचा घोषा शिंदे गटाचे आमदार करत होते. कारण त्यांच्यावर टीका करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ती पक्षविरोधी कारवाई ठरायची भिती होती. तसे व्हायला नको म्हणून कुठेही ठाकरेंवर टीका होणार नाही याची काळजी सगळे आमदार घेत होते. पण विधानसभेत मतदानाची वेळ आली असती तर त्यांना व्हिपचे उल्लंघन करता आले नसते. किंवा त्यांनी ते उल्लंघन केल्यास सभागृहाचे सदस्यत्व जायची भिती होती. पण स्वतः ठाकरेंनी राजीनामा देऊन टाकला आणि ती वेळच येऊ दिली नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या म्हणण्याचा उद्देशही तोच होता असे दिसते.

In reply to by क्लिंटन

उध्दव ठाकरेंनी राजीनामा देऊन बहुमूल्य संधी व्यर्थ दवडली.
अश्या राजकिय खाचाखोचा मा.उध्द्वजींना माहीत असण्याची शक्यता फार कमी वाटते. आतापर्यंत तर काकांच्या सल्ल्यानेच सरकार चालले होते आणि काकांनी वेळ येताच बहुदा नरो वा कुंजरोवा असा पवित्रा घेतला असावा.

In reply to by कानडाऊ योगेशु

अश्या राजकिय खाचाखोचा मा.उध्द्वजींना माहीत असण्याची शक्यता फार कमी वाटते. कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्या सारखे नानावलेले वकील त्यांच्या बाजूने उभे आहेत. तेंव्हा काकांच्या य: कश्चित सल्ल्याची त्यांना गरज नाही. मुळात उद्धव ठाकरे हे अल्पमतात आलेले आहेत हे शेम्बड्या पोरालाही समजते आहे. केवळ पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करून लफडी कुलंगडी करत आपले सरकार टिकवण्याचा आणि आता आपला पक्ष टिकवण्याचा हा प्रयत्न आहे हे स्पष्ट आहे. अध्यादेश ( व्हीप) नसेल आणि गुप्त मतदान असते तर म वि आ अजून मोठ्या फरकाने पडली असती हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. Can it be argued that someone who doesn't even have 15-20 MLAs supporting him should be brought back? Saying that a CM has lost the majority in the House isn't voluntarily giving up membership. Raising your voice within your party without supporting some other party isn't defection. Membership in a party isn't an oath of silence,” Salve argued adding that the Supreme Court can't assume the role of a tribunal to decide disqualification petitions. “The larger-than-life arguments on democracy in peril etc doesn't square up when a CM has been overthrown by his own party members,” Salve said. CJI NV Ramana said some issues including removal of Schedule 3 on split and whether a minority within a legislature party can disqualify the majority are some of the issues that will require a decision. तेंव्हा हि लोकशाहीची पायमल्ली आहे आणि घटनेचे उल्लंघन आहे सारखी मोठी मोठी विधाने येथे गैरलागू आहेत.

In reply to by सुबोध खरे

कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्या सारखे नानावलेले वकील त्यांच्या बाजूने उभे आहेत.
मी क्लिंटनसाहेबांनी वर लिहिलेल्या राजीनामा दिला नसता तर ह्या शक्यतेबाबत बोलत होतो. इतका पुढचा विचार करण्याची शिवसेनेची सधयची कुवत दिसत नाही.काकांसोबत होते तो पर्यंत त्यांच्या कलाने चालले पण काकांनी वार्यावर सोडुन दिल्यावर खिशातल्या वाघनखांचे कोथळ्याचे करायचे काय हेच समजेनासे झाले आणि परिणामे स्वतःचाच अंगरखा व अंतर्वस्त्र फाडुन बसलेत.

In reply to by कानडाऊ योगेशु

ऊध्दव ठाकरेंनी टावी वर राजिनामा देऊन जी सहानूभूती मिळवली ती विधानसभेत मिळाली नसती. त्या सहानुभूतीच्या लाटेचा परिणाम म्हणून आज तथाकथात अति अभ्यासू नेतृत्व ऊपमामू बनलंय.

In reply to by क्लिंटन

त्यावेळेस सगळ्या शिवसेनेच्या आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान करावे हा व्हिप त्यांच्या बाजूला काढता आला असता हे दुधारी शस्त्र होते. कारण शिंदे गटाने आपला श्री गोगावले हा वेगळा प्रतोद नेमला होता आणि त्यांनी जर सर्व शिवसेना आमदारानी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करा असा अध्यादेश काढला असता ( आणि निकाल शिंदे गटाच्या बाजूने गेला असता) तर बाकी आमदारांनाच अपात्र ठरवले गेले असते आणि त्यामुळे फार मोठी नामुष्की झाली असती. मुळात अविश्वास ठराव पास झालाच असता. त्यामुळे हाकलले गेलेले मुख्यमंत्री असा त्यांचा लौकिक झाला असता. ( अजून तरी महाराष्ट्रात मुख्यमंत्री सन्मानाने पायउतार झालेले आहेत) नोकरीचा राजीनामा कडेने आणि नोकरीतून बडतर्फ करणे यातील फरकासारखे आहे बोम्मई केसच्या निकाल प्रमाणे सदनाच्या आत होणाऱ्या गोष्टींवर न्यायालयाचे नियंत्रण अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे तेल हि गेले आणि तूप हि गेले अशी स्थिती झाली असती. विधानसभेचे अधिवेशन बोलावू नका असा आदेश देण्याचा किंवा अविश्वासाच्या ठरावाला स्टे देण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकारच नाही. केवळ कायदेशीर प्रक्रिया पार पडली आहे का आणि झालेला निर्णय घटनाबाह्य नाही एवढेच पर्यवेक्षण करण्याचा न्यायालयाला अधिकार आहे असे असंख्य वेळेस अधोरेखित झालेले आहे.

शिंदे साहेबांचे भाषण एकदम छान बोलतात. ऐकत राहवसं वाटतं. मनमोकळं, दिलखुलास, मनापासून केलेलं कोणाला टोमणे नाहीत. प्रतित्युर नाहीत. आरडाओरडही नाही. आपण काय करणार याची दिशाही मिळते. आपण जे काही केले त्यामागचे हेतू पण स्पष्ट करतात. _/\_

In reply to by शाम भागवत

हा माणूस शिवसैनिकांची मानसिकता पूर्णता बदलून टाकेल एवढा प्रभावी आहे. एकदम सकारात्मक मानसिकतेचे शिवसैनिक भविष्यात दिसायला लागले तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही. महाराष्ट्रातील लोकांचं प्रेम या माणसाला नक्की मिळणार. _/\_ देवेंद्र आता केंद्रात जायला मोकळा. :)

In reply to by शाम भागवत

मग मी पुन्हा येईनचं काय? बागवे जे नेते राज्यात बिनकामाचे होतात त्यांना केंद्रात पिटाळतात हे खरंय का?

In reply to by शाम भागवत

केंद्रातच जायचं होतं तर मागील अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी इतके कासावीस व वखवखलेले का होते? का आता द्राक्षे आंबट वाटायला लागली? ऑक्टोबर २०१९ मध्येच सेनेला मुख्यमंत्रीपद देऊन शिंदेंना मुख्यमंत्री करून केंद्रात जाऊन दिवे लावता आले असते की. ते करण्याऐवजी प्रत्येक मार्ग वापरून ठाकरेंची अडवणूक, फोडाफोडी, विरोधकांवर धाडी, राज्यपालांकडून अडवणूक करून शेवटी हातात धुपाटणेच आल्याने आता केंद्रात निघाले का?

In reply to by श्रीगुरुजी

ते २०१९ मध्ये पदासाठी वखवखले होते असे असेल कदाचित पण नंतर २.५ वर्षे बदला घेण्यासाठी जास्त उत्सुक होते असे वाटते. महापालिका एलेक्शन झाले की ठाकरे आणि कंपनी पुर्ण मातीत जातील. त्याशिवाय ते केन्द्रात जातील असे वाट्त नाही. बदला अजुन शिल्लक असावा असे वाटते.

In reply to by अप्पा जोगळेकर

अमीत शहा त्यांना काही दिवसांनी घरा बसवतील. केंद्रात घ्यायला अनेक चांगले नेते आहेत फडणवींसांसारखा नेता केंद्रात ते घेनार नाहीत. पाच वर्षात महाराष्ट्राचा लावलेली वाट पाहून त्यांना मुख्यमंत्रा बनवायला शहांनी नकार दिला.

In reply to by श्रीगुरुजी

केंद्रातच जायचं होतं तर....
शिंदेंसारखा चांगला उत्तराधिकारी मिळालाय. शिंदेंनी केसरकरांसारखा चांगला प्रवक्ता नेमलाय. आणि मुख्य म्हणजे फडणवीस द्वेष्टे आता कधीच या राज्यात शिरजोर होणार नाहीत याचीही व्यवस्था झालीय. त्यामुळ२०२४ मधे केंद्रात जायला मोकळे. आता मात्र मनपा निवडणुकी येईपर्यंत मिपासंन्यास. :)

In reply to by शाम भागवत

शिंदेंसारखा चांगला उत्तराधिकारी मिळालाय. तो ऑक्टोबर २०१९ मध्ये सुद्धा मिळत होता. परंतु यांचा अप्पलपोटेपणा नडला. मुख्य म्हणजे फडणवीस द्वेष्टे आता कधीच या राज्यात शिरजोर होणार नाहीत याचीही व्यवस्था झालीय. भ्रम आहे. 'वाघ्याचा पाग्या झाला' हा वाक्प्रचार माहिती आहे का? त्यामुळ२०२४ मधे केंद्रात जायला मोकळे. कोठेही जा, केव्हाही जा आणि काय पाहिजे ते करा. पण महाराष्ट्रात परत येऊ नका. जाताना आपलं शेपूटही बरोबर न्या. महाराष्ट्रावर निदान इतके तरी उपकार करा. केंद्रात गेल्यावर तर चोवीस तास हिंदीत बोलण्याची उबळ भागविता येईल, मराठीत बोलण्यात वेळ वाया जाणार नाही, हा अजून एक लाभ मिळेल.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे. त्याविषयी इंपिरिकल डेटा न्यायालयात सादर करायचा होता ते प्रकरण महाविकास आघाडी सरकारने ज्याप्रकारे हाताळले तो त्या सरकारच्या अकार्यक्षमतेचा अजून एक नमुना होता. महाविकास आघाडी सरकारने त्याविषयी काहीही केले नाही आणि डेटा केंद्र सरकारने द्यावा अशी मागणी केली. प्रत्येक गोष्टीत केंद्राकडे बोट दाखविणे आणि सतत १०५-१०६ ना घरी बसविलेचा कंटाळवाणा जप करणे या दोन गोष्टी महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात अगदी नियमितपणे केल्या होत्या. त्यात अडचण अशी होती की केंद्राकडील डेटा जुना असल्याने तो न्यायालयात अमान्य व्हायची शक्यता असल्याने केंद्राने तो डेटा राज्याला दिला नाही. अशावेळी राज्य सरकारने तो डेटा गोळा करणे अपेक्षित होते. मध्य प्रदेशातही अगदी अशीच स्थिती होती पण मध्य प्रदेश सरकारने तो डेटा गोळा करून न्यायालयात सादरही केला आणि त्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण वाचवले होते. पण महाराष्ट्रात मात्र सगळ्याच गोष्टींचा आनंदी आनंद होता. तो डेटा अगदी महिन्याभरात गोळा करता येऊ शकेल असे त्या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे होते. तरीही महाविकास आघाडी सरकारने त्याविषयी काहीही पावले उचलली नाहीत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मात्र चक्रे हलली आणि हे आरक्षण बहाल झाले आहे.

In reply to by क्लिंटन

म वि सा तो डेटा गेले अडिच वर्ष गोळाच करत होते, फक्त डेटा कश्यासाठी, कोणाकडुन व काय डेटा गोळा करायचा ईतकच माहिती नव्हत. त्या ऐवजी डांस बार , हॉटेलातुन दरमहा न चुकता क्ष्क्ष्क्ष्क्ष गोळा करत होते.

In reply to by क्लिंटन

इतर मागासवर्गीयांना राखीव जागा तश्याही होत्याच. फक्त त्यावर काही काळ बंदी आली होती इतकंच. त्यामुळे त्या परत देण्याच्या या निर्णयाचा माझ्यासारख्यांवर कणभरही परीणाम होणार नाही. त्यामुळे या निर्णयाबद्दल मी निर्विकार आहे.

In reply to by क्लिंटन

सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, ओबीसी राजकीय आरक्षण कोणामुळे मिळाले. महाविकास आघाडीने जयंत कुमार बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी राजकीय आरक्षणासाठी समर्पित आयोग स्थापन केला. या आयोगानेचे बुथलेवलवर जाऊन डेटा जमा करुन तो डेटा मा.न्यायालयात सादर केला. समर्पित आयोग स्थापनेचा निर्णय महाविकास आघाडीचा होता, त्या आयोगानेच महाराष्ट्रभर दौरे करुन विविध संघटनांकडून माहिती हरकती निवेदने घेतली. आणि या आयोगामुळेच ओबीसी राजकीय आरक्षण मिळाले, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

मंत्रीपद देण्याच्या नावाखाली १०० कोटींची मागणी ; गुन्हे शाखेकडून चौघांना अटक https://www.loksatta.com/mumbai/four-arrested-for-trying-to-dupe-bjp-ml… आजकाल 100 कोटीला भलतीच मागणी आहे ...

ओबीसी आरक्षणाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे – भागवत कराड https://www.loksatta.com/maharashtra/supreme-court-hearing-on-obc-reser… मविआला हे का जमले नाही?

अमरेंद्र बाहुबली, पक्षांतरविरोधी कायदा कडक हवा हे तुमचं म्हणणं एकदम मान्य. पण हे काही पटलं नाही :
रिक्षावाला, भाजीवाले, पानटपरीवाले ह्याना मोठं करायचं नी नंतर ह्यांनीच ऊलटून पक्षावर दावा ठोकायचा.
पटलं नाही अशासाठी की हाच न्याय उद्धव ठाकऱ्यांनाही लागू पडतो. बाळासाहेबांनी शिवसेना खपून मोठी करायची आणि उद्धवांनी तिला पवारांच्या चरणी रुजू करायची. पटलं नाय बुवा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पवारांच्या चरणी रुजू करायची कैच्याकै गामाजी. ईतर भक्तांचं समजू शकतो पण तुम्ही असं वाक्य लिहीताय ह्याचं आश्चर्य वाटतंय, भाजपने मेहबूबाशी युती केली म्हणज भाजप मेहबूबाच्या चरणी रूजू केली का? बिहारात नितीशच्या चरणी रूजू केली का? कर्नाटकात जनता दलाच्या चरनी रूजू केली का? ईतके दिवस सेना भाजप युती होती मग ठाकरेंनी सेना भाजपच्या चरनी रूजू केली का? कैच्याकै. मागे काही लोक बाळासाहेबांचं एक वाक्य फेकायचे ही** झूकतात सोनीया समोर मग मा त्यांना मोदींचा फोटो पाठवायचो सोनिंयांसमोर झूकलेला. :)

In reply to by श्रीगुरुजी

बरोबर. शिवसेना मोठी करन्यासाठीच अटलबिहारी ते अमीत शहा मातोश्रीवर युती करा म्हणून विनाव्यण्या करायचे. :)

शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त https://www.loksatta.com/desh-videsh/ncp-sharad-pawar-dissolved-nationa… No Comments...

In reply to by मुक्त विहारि

ते बहुतेक राकॉ , उद्धव गटात मर्ज करत असावेत.( खिक्क......)

In reply to by मुक्त विहारि

राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त
फक्त राष्ट्रीय पातळीवरील विभाग आणि सेल बरखास्त केले? म्हणजे यु.एन च्या सुरक्षा परीषदेतील काकांच्या प्रतिनिधीचे पद अजून तरी कायम आहे असे म्हणायचे?

अमेरिकन डॉक्टरांवर विश्वास नाही! २६ तासांची फ्लाईट, १ कोटी खर्चून मुलांनी आईला भारतात आणलं https://maharashtratimes.com/india-news/26-hours-flight-1-crore-spent-w… अभिमानास्पद बातमी .....

डीएसपी को डंपर से कुचलने वाला मुख्य आरोपी राजस्थान से गिरफ्तार, अब तक हुई 2 गिफ्तारियां https://www.livehindustan.com/haryana/story-dsp-surendra-singh-crushed-… वरवंटा फिरायला लागला ....

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हात पाय तोडण्याची धमकी! 17 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल https://www.tv9marathi.com/politics/case-has-been-registered-in-the-khe… काय बोलावं ते सुचेना......

आदित्य ठाकरेंनी उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात गेला वाहून, त्र्यंबकच्या शेंद्रीपाड्यात उभारला होता पूल https://marathi.abplive.com/news/nashik/maharashtra-news-nashik-news-ir… तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनाच्या माध्यमातून तास नदी काठावर लोखंडी पूल बसविण्यात आला होता. 30 फुटाहून अधिक उंचीवर पूल बसविण्यात आला होता. मात्र पावसाळ्यात पूल पाण्याखाली जाईल, पुलाचा उपयोग होणार नाही अशी माहिती स्थानिकांनी त्याचवेळी प्रशासनाला आणि युवासेना पदाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि आता पावसाळयात हा पूल चक्क वाहून गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या नशिबी जीवघेणी कसरत करणे आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांनी आज पक्षाचे सगळे सेल्स, समित्या व युनिट्स विसर्जित केली आहेत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल पटेल ह्यांनी तशी घोषणा ट्विटर वर केली त्याशिवाय तसे पत्रही पोस्ट केले आहे .

In reply to by जेम्स वांड

सगळ्या समित्या, सेल्स वगैरे विसर्जित करण्याऐवजी हा जिल्हा पातळीवरील संपूर्ण पक्ष विसर्जित केला असता तरी शून्य फरक पडला असता.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जिल्हा पातळीवरील नेत्याच्या पुतण्यासोबत फडणवीस शपथ का घेतात? असे वाचावे. तसेच पवार माझ्या वडीलांसारखे असं जिल्हा पातळीवरील नेत्याबद्दल फडणवीस का बोलतात?? :) ऊत्तरे अर्थातच मिळनार नाहीयेत :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मी इमोशनवर खेळत नाही, शिस्तीत खेळतो, हे मी तुला अन तू विरोध करतो त्यांनाही अतिशय सन्मानाने अन आदरपूर्वक सांगतोय आज इथे, अन हेच कारण आहे की राजकीय चर्चातून मी जास्त व्यक्त होत नाही, तुमचं तुम्ही काय ते गुरुजींना त्यांच्या धाग्यावर, प्रतिसादावर, व्यनित, खरडवहीत नक्कीच विचारा तो तुमचा हक्क असेल, मी फक्त मला बोलायचे तितकेच बोलेन :)

In reply to by श्रीगुरुजी

तुमची आमची मतं किंवा आवडीनिवडी काहीही असू दे गुरुजी, आपण त्या एकमेकांच्या मतांचा आदर ठेवला तरी आपल्या दोघांना मिळून कायद्याचा मान ठेवणे अपरिहार्य असेल ह्यावर मला वाटते आपणही सार्थ सहमती दर्शवालच. तरीही जिला आपण (आपल्या वैयक्तिक मताबरहुकूम) जिल्हापातळीवरील पक्ष म्हणता आहात तो भारतात मान्यताप्राप्त ८ राष्ट्रीय पक्षांपैकी एक आहे, ह्या पार्टी कश्या ठरतात त्यावर कायद्याचे म्हणणे खालीलप्रमाणे :- . तर अश्या ह्या कायदेशीररित्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षाचे लोकसभा, राज्यसभा, विविध विधानसभा अन विधान परिषदा ह्यांच्यावर असलेले बलाबल खालील प्रमाणे . त्यामुळे वरील डेटा पाहता हे समित्या वगैरे विसर्जित करणे ही नक्कीच किमान नोंद घेण्यालायक राजकीय घटना आहे, बाकी आपापल्या आवडीनिवडी हेवेदावे पक्षीय संलग्नता वगैरे काही असल्याच तर त्यांचा फक्त आदरच असेल माझ्याकडून तरी.

In reply to by जेम्स वांड

गुरूजी ज्याला जिल्हा पातळीवरील पक्ष म्हणताहेत त्याचे केरळात दोन आमदार आहेत. तथाकथीत विश्वगुरूच्या पक्षाचा एकहा आमदार नाही. :)

In reply to by जेम्स वांड

तुमची आमची मतं किंवा आवडीनिवडी काहीही असू दे गुरुजी, आपण त्या एकमेकांच्या मतांचा आदर ठेवला तरी आपल्या दोघांना मिळून कायद्याचा मान ठेवणे अपरिहार्य असेल ह्यावर मला वाटते आपणही सार्थ सहमती दर्शवालच. आपण दिलेल्या बातमीतील पक्षावर उपरोधिक लिहिल्याने आपल्या मताचा अनादर झाला का? आपण फक्त बातमी दिलीये, त्यावर आपले मत दिलंय का? मग माझ्या उपरोधिक प्रतिसादान आपल्या न दिलेल्या मताचा अनादर कसा? त्यामुळे वरील डेटा पाहता हे समित्या वगैरे विसर्जित करणे ही नक्कीच किमान नोंद घेण्यालायक राजकीय घटना आहे, महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात इतरत्र किंवा राज्याबाहेर ज्या पक्षाला फारसे अस्तित्वच नाही, ही आपल्यासाठी नोंद घेण्यालायक घटना असू शकेल. पण माझ्यासाठी ही घटना अदखलनीय आहे आणि आपल्याप्रमाणे मलाही माझे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, जरी माझे मत इतर कोणालाही आवडले नाही तरीही. तसं पाहिलं तर १ खासदार व १-२ आमदार असलेला भाकप, ३ खासदार व १५-२० आमदार असलेला माकप हा सुद्धा राष्ट्रीय पक्ष आहे व हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा लहान आहेत. अश्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणणे म्हणजे खेड्यात जत्रेत एखादा कुस्ती जिंकलेल्याला हिंदकेसरी म्हणण्यासारखे आहे. या तथाकथित राष्ट्रीय पक्षांपेक्षा तृणमूल, सप, बसप हे खूप मोठे असून बहुराज्यीय आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

आपण अनादर वगैरे केलाय असे काही मला वाटत नाही, फक्त आपण कायदा जे म्हणतोय त्याचा मिळून सहमतीने आदर ठेवू इतके मात्र मी म्हणतोय, तुम्हाला राष्ट्रवादीस काय म्हणायचे आहे ते म्हणा, मला फरक पडत नाही, किंवा तुमच्या अभिव्यक्तीच्या आड येण्याचा मानस नाही, फक्त माझं मत मांडून कायदा काय म्हणतो इतकं मात्र मी बोललोय.

In reply to by जेम्स वांड

कायदा आणि वस्तुस्थिती कायमच हातात हात घालून चालतात असे नाही. तसेच कायदा आणि वस्तुस्थिती यातील विसंगतीवर भाष्य करणे म्हणजे कायद्याचा अनादर होत नाही. १९९० च्या दशकात राजकुमार या अभिनेत्याचा पुरू राजकुमार या परदेशात स्थायिक झालेल्या मुलाने मुंबईत गाडी चालविताना पदपथावरील ५ जणांना चिरडले होते. त्यातील ३ जागीच गेले तर इतर दोन जखमी झाले ज्यात एकाचा पाय तुटला होता. पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी प्रकरण न्यायालयात गेलेच. पुरूने नुकसानभरपाई टाळण्यासाठी तगडा वकील दिला होता तर पदपथावरील गरीबांसाठी एक समाजसेवी वकील फुकट लढत होता. ही पूर्ण विषम लढाई होती. शेवटी न्यायालयाने नुकसानभरपाईचा आदेश दिला. त्यानुसार मृतांना प्रत्येकी ३०,००० व जखमींना प्रत्येकी ५०० रूपये मिळून पुरू फक्त ९१,००० रूपयात सुटला. त्यावेळच्या कायद्यानुसार जखमींना फक्त ५०० रूपये मिळायचे. पाय तुटलेल्या माणसाचा रोजगार गेला व तो शेवटी उत्तर प्रदेशात परत जाऊन भीक मागून गुजराण करू लागला. अश्या अत्यंत हास्यास्पद कायद्यावर टीका करणे म्हणजे कायद्याचा अनादर होतो का? अगदी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस किंवा माकप किंवा भाकप अश्या चिल्लर पक्षांना राष्ट्रीय पक्ष वगैरे म्हटल्यावर त्यावर उपरोधिक लिहिणे म्हणजे घटनेचा किंवा कायद्याचा अनादर नसतो.

“शरद पवारांनी शिवसेना फोडली ते प्लास्टिकबंदीचं श्रेय लाटलं,” रामदास कदमांनी ठाकरे कुटुंबावर केलेले २० मोठे आरोप https://www.loksatta.com/photos/news/3030322/ramdas-kadam-20-serious-al… बाळासाहेब ठाकरे यांनी, संजय दत्तला माफी दिली आणि मी शिवसेना सोडून दिली.....

मोठी बातमी! आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का! https://www.loksatta.com/mumbai/mumbai-metro-aarey-carshed-cm-eknath-sh… अतिशय उत्तम निर्णय....

गणेशोत्सव-दहीहंडी निर्बंधमुक्त, मंडळांना सवलती, गणेशमूर्तींच्या उंचीवरही शिंदेंचा मोठा निर्णय https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/cm-eknath-shinde-a… ----- अतिशय चुकीचा निर्णय... ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी हे भोगावे लागणार ....

केजरीवालांना धक्का! सिंगापूरला जाऊ शकणार नाही; एलजीने नाकारली परवानगी https://www.esakal.com/desh/arvind-kejriwal-delhi-singapore-permission-… No Comments

In reply to by मुक्त विहारि

केजरीवालांना धक्का!
ह्यात केजरीवालांना धक्का बसण्यासारखे काय आहे.? आधीपासुनच ते तारस्वरात ओरडत आहे कि देखो जी मुझे जाने नही दे रहे है. आता त्यांचा संधीसाधुपण पाहता बेंबीच्या देठापासुन मोदींविरुध्द अजुन बोंबा ठोकतील.

सरकार बनून बरेच दिवस होऊनही अनेक आमदारांना ईडी ने क्लिनचीट दिलेली नाहीये. त्यामुळे त्यांच्याच चलबिचल सुरू झाल्याचं दिसतंय. फक्त बच्चू कडू ह्यांची रस्ते घोटाळा आणी संजय राठोड ह्यांना बलात्कार प्रकरणातून क्लिनचीट मिळालीय.