आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात आणि नवा कोणता मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
शिवसेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटले आणि तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. एक गोष्ट समजत नाही. शिवसेनेचे महाराष्ट्रातून निवडून गेलेले १८ आणि पोटनिवडणुकीत दादरा नगरहवेलीतून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेलेल्या कलाबेन डेलकर असे एकूण १९ खासदार आहेत. १२ ही संख्या १९ च्या दोन-तृतीयांश पेक्षा कमी आहे. तेव्हा १२ खासदार फुटले तरी ते कसे चालणार आहे समजत नाही. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह महाराष्ट्रात दिले आहे पण महाराष्ट्राबाहेर सगळीकडे धनुष्यबाण हेच चिन्ह शिवसेनेला मिळेल असे नाही. त्याप्रमाणे दादरा नगरहवेली पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना धनुष्यबाण हे चिन्ह न मिळता दुसरे कोणते तरी चिन्ह मिळाले होते. तेव्हा त्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेल्या असल्या तरी वेगळ्या चिन्हावर निवडून गेल्या असल्याने त्यांना या पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे शिवसेनेच्या १८ सदस्यांच्या गटामध्ये गणले जात नाही अशी काही तांत्रिकता आहे का समजत नाही.
प्रतिक्रिया
21 Jul 2022 - 9:59 pm | कानडाऊ योगेशु
ह्यात केजरीवालांना धक्का बसण्यासारखे काय आहे.? आधीपासुनच ते तारस्वरात ओरडत आहे कि देखो जी मुझे जाने नही दे रहे है. आता त्यांचा संधीसाधुपण पाहता बेंबीच्या देठापासुन मोदींविरुध्द अजुन बोंबा ठोकतील.
21 Jul 2022 - 8:30 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/desh-videsh/draupadi-murmu-won-presidential-ele...
अभिनंदन
21 Jul 2022 - 8:38 pm | अमरेंद्र बाहुबली
सरकार बनून बरेच दिवस होऊनही अनेक आमदारांना ईडी ने क्लिनचीट दिलेली नाहीये. त्यामुळे त्यांच्याच चलबिचल सुरू झाल्याचं दिसतंय. फक्त बच्चू कडू ह्यांची रस्ते घोटाळा आणी संजय राठोड ह्यांना बलात्कार प्रकरणातून क्लिनचीट मिळालीय.