किती काळ झुलवायचे

किरण कुमार's picture
किरण कुमार in जे न देखे रवी...
27 May 2022 - 2:11 pm

खरे सांग आता तुझ्या बंद ओठी कितीदा नाव माझे उमटायचे
किती यायच्या सरी या उरी अन किती अश्रू पाण्यात सिमटायचे

तुझी नक्षत्रे बिलगली घराला पुढे चांदण्यांना कसे रेटायचे
मळभ ढगांचे पुन्हा पांघरोनी माझ्या नभाने किती दाटायचे

उरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती पिसारे फूलवायचे
भेटीतही तू भेटसी मुक्याने उत्तराला किती काळ झुलवायचे

गज-यात अजूनी गंध मोग-याला राहिले तुला तरी हसवायचे
कितीदा करावे रफू मी मनाला कितीदा पुन्हा तूच उसवायचे

आता उसासे मी आठवांचे घ्यावे मोर पिसाचे पान उलटायचे
पुन्हा खा तू शपथा माझ्याच आणि पुन्हा वेळ येताच पलटायचे

जत्रा आसवांची भरताच मनाला रित्या पालखीत बसवायचे
मंदिरात कधी मदिरेत कधी उगा देहास भूजंग हे डसवायचे

कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 May 2022 - 3:53 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली,
फारच सुरेख
पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

27 May 2022 - 5:38 pm | चौथा कोनाडा

सुरेख रचना, आवडली.

उरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती पिसारे फूलवायचे
भेटीतही तू भेटसी मुक्याने उत्तराला किती काळ झुलवायचे

गज-यात अजूनी गंध मोग-याला राहिले तुला तरी हसवायचे
कितीदा करावे रफू मी मनाला कितीदा पुन्हा तूच उसवायचे

व्वा, छानच !

कर्नलतपस्वी's picture

27 May 2022 - 7:01 pm | कर्नलतपस्वी

दुनिया झुकती है
झुकाने वाली चहिये

ऐशा किती कहाण्या
आणी किती विराण्या
जगास काय त्याचे
मग अर्थ काय झुरण्या....

Bhakti's picture

27 May 2022 - 9:18 pm | Bhakti

सुंदरच!
पहिले दोन आणि शेवटचे शेर विशेष आवडले.

कितीदा करावे रफू मी मनाला कितीदा पुन्हा तूच उसवायचे

वाह! सुंदर. :-)

श्रीगणेशा's picture

27 May 2022 - 10:48 pm | श्रीगणेशा

कितीदा करावे रफू मी मनाला
कितीदा पुन्हा तूच उसवायचे

खूप छान!

कुमार१'s picture

17 Jun 2022 - 10:26 am | कुमार१

आवडलीच
फारच सुरेख.