✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

किती काळ झुलवायचे

क — किरण कुमार, Fri, 05/27/2022 - 14:11
खरे सांग आता तुझ्या बंद ओठी कितीदा नाव माझे उमटायचे किती यायच्या सरी या उरी अन किती अश्रू पाण्यात सिमटायचे तुझी नक्षत्रे बिलगली घराला पुढे चांदण्यांना कसे रेटायचे मळभ ढगांचे पुन्हा पांघरोनी माझ्या नभाने किती दाटायचे उरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती पिसारे फूलवायचे भेटीतही तू भेटसी मुक्याने उत्तराला किती काळ झुलवायचे गज-यात अजूनी गंध मोग-याला राहिले तुला तरी हसवायचे कितीदा करावे रफू मी मनाला कितीदा पुन्हा तूच उसवायचे आता उसासे मी आठवांचे घ्यावे मोर पिसाचे पान उलटायचे पुन्हा खा तू शपथा माझ्याच आणि पुन्हा वेळ येताच पलटायचे जत्रा आसवांची भरताच मनाला रित्या पालखीत बसवायचे मंदिरात कधी मदिरेत कधी उगा देहास भूजंग हे डसवायचे

प्रतिक्रिया द्या
3409 वाचन

💬 प्रतिसाद (7)

सुंदर

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 05/27/2022 - 15:53 नवीन
आवडली, फारच सुरेख पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

सुरेख रचना, आवडली.

चौथा कोनाडा
Fri, 05/27/2022 - 17:38 नवीन
सुरेख रचना, आवडली.
उरे प्राक्तनाचे असे काय देणे तुजभोवती पिसारे फूलवायचे भेटीतही तू भेटसी मुक्याने उत्तराला किती काळ झुलवायचे गज-यात अजूनी गंध मोग-याला राहिले तुला तरी हसवायचे कितीदा करावे रफू मी मनाला कितीदा पुन्हा तूच उसवायचे
व्वा, छानच !
  • Log in or register to post comments

आवडली

कर्नलतपस्वी
Fri, 05/27/2022 - 19:01 नवीन
दुनिया झुकती है झुकाने वाली चहिये ऐशा किती कहाण्या आणी किती विराण्या जगास काय त्याचे मग अर्थ काय झुरण्या....
  • Log in or register to post comments

सुंदरच!

Bhakti
Fri, 05/27/2022 - 21:18 नवीन
सुंदरच! पहिले दोन आणि शेवटचे शेर विशेष आवडले.
  • Log in or register to post comments

कितीदा करावे रफू मी मनाला

राघव
Fri, 05/27/2022 - 22:09 नवीन
कितीदा करावे रफू मी मनाला कितीदा पुन्हा तूच उसवायचे
वाह! सुंदर. :-)
  • Log in or register to post comments

कितीदा करावे रफू मी मनाला

श्रीगणेशा
Fri, 05/27/2022 - 22:48 नवीन
कितीदा करावे रफू मी मनाला कितीदा पुन्हा तूच उसवायचे
खूप छान!
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Fri, 06/17/2022 - 10:26 नवीन
आवडलीच फारच सुरेख.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा