ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले होते.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.
नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.
चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .
15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात
१. ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.
२. ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.
हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.
1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Nifty थंड असेल तर स्प्रेड लवकर व जास्त प्रॉफिटमध्ये येतो. समय हा स्प्रेडचा मित्र आहे तर मोमेंटम हा स्प्रेडचा शत्रू आहे , पण मोमेंटम रोज येत नाही , मार्केटचे 20 दिवस पकडले तर रोज 200 पॉईंट वरच किंवा खालीच जात मार्केट एकदम 2000 पॉईंट वर किंवा खालीच उलथले , असे होत नाही, अगदी क्वचित होते.
=====================================================================
इतर लोकप्रिय व्हेरिएशन्स
ह्यात अजुन काहि लोकप्रिय व्हेरिएशन्स आहेत.
१. विकली कॅलेंडर स्प्रेड : वरच्याप्रमाणेच पण वीकलिमध्ये करणे
2. विकली शॉर्ट स्ट्रॅडल करून त्याच आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे
3. पुढच्या आठवड्याचे कॉल पुट विकून ( शॉर्ट करुन) ह्या आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे
हे तिन्ही पर्याय सेमच प्रॉफिट लॉस पोटेन्शल देतात , मार्जिनदेखील सेम लागते , सुमारे 50000.
52 आठवड्यात प्रॉफिटवाले आठवडे किती आणि लॉसवाले किती असतील ?
इतरही काही ऑप्शन्स स्ट्रटेजी असतील तर त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
विशेष सूचना : हे ट्रेड्स आपापल्या जबाबदारीवर करावेत
प्रतिक्रिया
19 Sep 2021 - 7:30 pm | hrkorde
हा धागा गुंतवणूक सदरात हलवण्यात यावा
19 Sep 2021 - 7:51 pm | भागो
इथे साहित्य संगीत कला कथा ह्यांची मैफिल चालू आहे त्यात ही "पैशाची भाषा" कशाला?
19 Sep 2021 - 7:53 pm | hrkorde
लेख लिहिताना तसा ऑप्शन दिसला नाही.
19 Sep 2021 - 8:06 pm | भागो
hrkorde
माफ करा. मी आपले असेच गंमत म्हणून लिहिले. हलकेच घ्या.
19 Sep 2021 - 7:31 pm | hrkorde
निफ्टी ५०
ब्यान्क निफ्टी २५
19 Sep 2021 - 7:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतोय.
-दिलीप बिरुटे
19 Sep 2021 - 9:38 pm | चंद्रसूर्यकुमार
हे गृहितक धोकादायक वाटते. ट्रेडिंगसाठी तसेही फंडामेंटल ज्ञान लागत नाही. ते केवळ इन्व्हेस्टिंगसाठी लागते. टेक्निकल ज्ञान मात्र दोन्हींसाठी हवे.
व्यवस्थित चार्ट न बघता असा नुसता आकड्यांचा खेळ केला तर त्यात मोठ्या प्रमाणावर हात पोळू शकतात. माणसाला झटपट श्रीमंत आणि त्याच्या चौपट वेगाने गरीब बनविणारा ऑप्शनसारखा दुसरा प्रकार नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्यात डोळे झाकून हा प्रकार करणे धोकादायक ठरू शकेल.
जे काही करायचे ते प्रत्येकाने आपली मनी मॅनेटमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट बघून. विकताना या महिन्यातले ऑप्शन विकले जात आहेत आणि विकत घेताना पुढील महिन्यातले. म्हणजे आपण या स्ट्रॅटेजीसाठी आपल्या खिशातून पैसे भरणार आहोत आणि ही डेबिट स्ट्रॅटेजी झाली. हरकत नाही. पण हे करताना पुढील गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात असे वाटते.
१. नुसता कॉल साईडचा ट्रेड असेल म्हणजे आताच्या महिन्यातील कॉल विकले असतील आणि पुढच्या महिन्यातील विकत घेतले असतील तर आताच्या एक्सपायरीपर्यंत किंमत जोरदार वर जाणार नाही हे बघायला लागेल. म्हणजे आर.एस.आय ६० च्या वर असेल तर याचा अर्थ सध्या बुलिश मोमेंटम चालू आहे. अशावेळी कॉल विकले तर 'आ बैल मुझे मार'. तेव्हा कॉल साईडला ट्रेड घेण्यापूर्वी आर.एस.आय ६० च्या वर नाही आणि किंमत बॉलिंजरच्या वरच्या बॅन्डला चॅलेन्ज करत नाहीये हे बघायला हवे.
२. नुसता पुट साईडचा ट्रेड असेल म्हणजे आताच्या महिन्यातील पुट विकले असतील आणि पुढच्या महिन्यातील विकत घेतले असतील तर आताच्या एक्सपायरीपर्यंत किंमत जोरदार खाली जाणार नाही हे बघायला लागेल. म्हणजे आर.एस.आय ४० च्या खाली असेल तर याचा अर्थ सध्या बेअरीश मोमेंटम चालू आहे. अशावेळी पुट विकले तर 'आ बैल मुझे मार'. तेव्हा पुट साईडला ट्रेड घेण्यापूर्वी आर.एस.आय ४० च्या खाली नाही आणि किंमत बॉलिंजरच्या खालच्या बॅन्डला चॅलेन्ज करत नाहीये हे बघायला हवे.
३. दोन्ही कॉल आणि पुट साईडचे ट्रेड घ्यायचे असतील तर किंमत साईडवेज असेल असा व्ह्यू झाला. अशावेळी आर.एस.आय ४० आणि ६० च्या मध्ये हवा आणि बॉलिंजर फ्लॅट हवेत. नाहीतर एका बाजूला कत्तल होईल. हे लिहायचे कारण म्हणजे किंमत जोरदार वरखाली गेली तर आताच्या महिन्यातील ऑप्शनपेक्षा पुढच्या महिन्यातील ऑप्शन तितक्या प्रमाणावर बदलत नाहीत. त्यामुळे आपल्या शॉर्ट पोझिशनवर झालेला तोटा पुढील महिन्यातील लाँग पोझिशनवर झालेल्या फायद्यापेक्षा जास्त असेल.
४. हा प्रकार निफ्टी किंवा बँकनिफ्टीमध्ये केला जात असेल तसाच स्टॉक ऑप्शनमध्येही करायचा असेल तर लिक्विडिटी जरूर बघून घ्यावी. स्टॉक ऑप्शनमध्ये लिक्विडिटी नसेल तर बीड-आस्क स्प्रेड जास्त असतो. त्यातून आपल्याला किंमत दिसत आहे त्यापेक्षा एक रूपयाने जास्त किंमतीला ऑप्शन विकत घेतला गेला आणि एक रूपयाने कमी किंमतीला ऑप्शन विकला गेला तर दोन बाजूंना २ रूपयांचे नुकसान होईल. हाच प्रकार पोझिशन स्क्वेअर ऑफ करतानाही होईल. म्हणजे असे साडेतीन-चार रूपयांचे नुकसान झाले आणि लॉट साईझ ५०० चा असेल तर २००० पर्यंत नुकसान काही कारण नसताना होऊ शकेल. गेल्या काही दिवसात फ्रिक ट्रेड झाले आहेत. ते पाहता स्क्वेअर ऑफ करताना मार्केट ऑर्डर नको. नाहीतर अशा फ्रिक ट्रेडमुळे जोरदार फटका बसू शकेल.
तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करताना फिजिकल सेटलमेंटची भानगड बघून घ्यावी. ऑप्शन इन द मनी असेल (म्हणजे या महिन्यातील आपली पोझिशन तोट्यात असेल) तर ती एक्सपायरीपर्यंत जाऊच देऊ नये. नाहीतर मोठा भुर्दंड बसू शकेल.
19 Sep 2021 - 10:24 pm | आग्या१९९०
फ्रिक ट्रेडिंग सध्या जोरात असल्याने ऑप्शन ट्रेडिंग करताना मी मार्केट आर्डर बंदच केली आहे.
19 Sep 2021 - 10:27 pm | hrkorde
चार्ट बघून इतके correct समजत असेल तर मग नेकेड कॉल पुटच घ्यावे की
मग हेजिंग कशाला हवे ?
19 Sep 2021 - 10:35 pm | आग्या१९९०
Pivot, privious day high,low , resistance support आणि resistance लावून दिवसभरात बक्कळ कमाई करता येते. मी ह्या स्ट्रॅटेजी लावणे बंद केले आहे वेळेचा अपव्यय आहे. वेळ मिळेल तेव्हा मनसोक्त इंट्रा डे करतो.
19 Sep 2021 - 10:36 pm | आग्या१९९०
स्टॉप लॉस मस्ट.
19 Sep 2021 - 11:21 pm | hrkorde
इन्ट्राडेवर नवीन डिटेलवार लेख लिहा प्लिज
26 Sep 2021 - 11:26 am | आग्या१९९०
इंट्राडे बद्दल लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष ट्रेडिंग कसे करतो हे मार्केट चालू असताना दाखवायचा प्रयत्न करीन,तेही माबोवर. मिपावर प्रतिसाद वरखाली आणि उजवीकडे जाण्याची शक्यता असल्याने गोंधळ उडू शकतो आणि माबोवर स्वसंपदानाची सोय असल्याने चुकीची दुरुस्ती करता येते. लिमिट ऑर्डर प्राइजकडे जास्त लक्ष देत असल्याने माझ्याकडून बऱ्याचदा लॉट साइज मध्ये चुका झाल्या आहेत.
19 Sep 2021 - 10:52 pm | चंद्रसूर्यकुमार
नेकेड कॉल पुट घेताना किंमत मोमेन्टममध्ये आहे याची खात्री करून मगच घ्यावे. नाहीतर टाईम व्हॅल्यू खाल्ली जाऊन फायदा होणार नाही. प्रत्येक वेळेस पाहिजे तसा सेट-अप मिळेलच असे नसते. आणि ऑप्शन हा प्राणी भयंकर व्होलाटाईल असतो. अनेकदा एका दिवसात १००% फायदा करून देऊ शकतो. पण योग्य वेळेत एक्झिट करणेही महत्वाचे असते. नाहीतर झालेला फायदा पूर्ण संपून तोटा व्हायचीही शक्यता असते. त्यामुळे पूर्ण वेळ चार्ट बघता येणार असेल तरच नेकेड ऑप्शन घ्यावेत. अन्यथा नाही.
दुसरे म्हणजे हेजिंग करून आपल्या पोझिशनसाठी लागणारी रक्कम कमी करता येऊ शकते आणि संभाव्य तोटाही कमी करता येऊ शकतो. १०० रूपये भरून कॉल घेतला आणि वरचा कॉल ४० रूपये देऊन विकला तर १०० ऐवजी ६० रूपयेच द्यावे लागतील. दुसरे म्हणजे आपण बुलिश म्हणून कॉल घेतला पण किंमत साईडवेज गेली किंवा खाली गेली आणि कॉल आऊट ऑफ द मनी एक्सपायर झाला त्यावर १०० रूपये तोटा होईल. पण वर विकलेल्या कॉलचे ४० रूपये आधीच मिळालेले असतील ते आपल्याकडेच राहतील. म्हणजे जास्तीत जास्त तोटा १०० ऐवजी ६० होईल. हेजिंग केल्यास तोटा जसा मर्यादित असतो त्याप्रमाणेच किंमत आपल्या दिशेने गेल्यास होणारा फायदा पण मर्यादितच असेल. जर आपला व्ह्यू चांगला बुलिश असेल तर मग अशा स्थितीत रेशो स्प्रेड करावेत- म्हणजे २ ऑप्शन विकत घेऊन १ विकावा. म्हणजे १०० + १०० - ४० = १६० रूपयात दोन ऑप्शन म्हणजे प्रत्येक ऑप्शनला ८० रूपये द्यावे लागतील. ही रक्कम १०० पेक्षा कमी असेल. त्यामुळे किंमत जोरदार वर गेल्यास दोनपैकी एक कॉल ऑप्शन वरच्या बाजूला अमर्याद फायदा करू शकेल.
20 Sep 2021 - 6:14 am | चौकस२१२
नेकेड कॉल पुटच घ्यावे?
ह्याला नेकेड का म्हणताय ? तुम्हाला सरळ पूत विकत घयावे असे म्हणायचे आहे का ? साधारण पाने अमर्याद तोटा असण्याची शक्यता असते त्याला नेकेड म्हणतात
- नेकेड कॉल विकणे
20 Sep 2021 - 6:24 am | चौकस२१२
तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करताना फिजिकल सेटलमेंटची भानगड बघून घ्यावी.
भारतीय ऑप्शन बझार संबंधी या संधार्बत एक दोन प्रश्न
- स्टोक वर बेतलेले ऑप्शन हे कसे सेटल होतात? प्रत्यक्ष फुचर मध्ये कि स्टोक डिलिव्हरी मध्ये ?
- १ ऑप्शन म्हणजे किती शेअर? ते शेअर प्रमाणे बदलते कि अमेरिके सारखे १०० शेअर सगळीकडे
- ते अमेरिकन पद्धतीचे कि युरोप पद्धतीचे
- इंडेक्स वर बेतलेले ऑप्शन हे "इंडेक्स वर बेतलेले असतात कि इंडेक्स चाय फुचार वर?
अमरेइकेतील उद्धरण
एस आणि पी= हि झाली इंडेक्स SP
ए मिनी आणि ए मिक्रो हे झाले इंडेक्स वरील फुचर ES AND MES
एस पी वाय हा झालं एक्सचेंज ट्रेडेड फंड ( ए टी एफ = SPY)
आता या सर्वांवर ऑप्शन उपलब्ध आहेत ! SPX , ES / EMS/ SPY
तसे निफ्टी चे नक्की काय ?
ऑप्शन स्प्रेड :
एका क्लिक द्वारे करता येतात कि लेग इन कर्वे लागते
मार्जिन ऑफसेट मिळते का ?
20 Sep 2021 - 7:36 am | hrkorde
लॉट प्रत्येकाचे भिन्न आहेत
निफ्टी 50
ब्या नि 25
रिलायन्स 250
त्याची यादी उपलब्ध आहे
https://stockezee.com/nse-fno-lot-size
20 Sep 2021 - 7:47 am | चौकस२१२
निफ्टी ऑप्शन ची रुपये किंमत ( एक्सपोजर १ कॉन्ट्रॅक्ट) काढायचे तर असे का
५० X ७५ X निफ्टी चा भाव
20 Sep 2021 - 8:53 am | hrkorde
ऑप्शनचा भाव गुणिले लॉट साईझ
20 Sep 2021 - 9:16 am | आग्या१९९०
निफ्टी ऑप्शन सेलसाठी निफ्टी फ्युचर इतके मार्जिन लागते.
20 Sep 2021 - 9:35 am | चौकस२१२
माझा प्रश्न थोडा चुकला ...
१ फुचर ची काँट्रॅकट किंमत किती रुपयात असे विचारायचे होते ? ऑप्शन चे नाही
20 Sep 2021 - 9:17 am | चंद्रसूर्यकुमार
भारतात स्टॉक ऑप्शन्स स्टॉक डिलीव्हरीमध्येच सेटल होतात. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील कमोडिटी ऑप्शन्स त्या कमोडिटीवरील फ्युचर्समध्ये सेटल होतात. त्यामुळे एम.सी.एक्सवर ऑप्शन पोझिशन असेल तर ती वेळेत क्लोज करावी. कारण ज्याप्रमाणे एक्सपायरी जवळ येते त्याप्रमाणे मार्जिन खूपच वाढते. क्रूड-नॅचरल गॅस वगैरेंच्या एक लॉटला सव्वा ते दीड लाख मार्जिन लागते. जर त्या फ्युचर्समध्ये पोझिशन सेटल झाली तर आपल्याकडे तेवढे मार्जिन हवे.
प्रत्येक स्टॉकचा लॉट साईझ वेगळा असतो.
भारतात युरोपिअन ऑप्शन्सच ट्रेड होतात. पूर्वी अमेरिकन ऑप्शन्स असायचे पण १० वर्षांपूर्वी सेबी-एन.एस.ई ने ते बंद केले.
इंडेक्सवरच बेतलेले असतात.
निफ्टीचा ५० चाच लॉट आहे. निफ्टीवर मिनी लॉट वगैरे नाहीत. एम.ची.एक्सवर सोने, चांदी यावर मिनी लॉट्स उपलब्ध आहेत. एन.एस.ई वर नाही.
मी वापरलेल्या ब्रोकर्सकडे तरी वेगळ्या लेग्सच्या वेगळ्या ऑर्डर द्याव्या लागतात. लाँग पोझिशन आधी करायची आणि मग शॉर्ट पोझिशन.
हो. आता याक्षणी १७४०० चा कॉल विकायचा असेल तर मार्जिन १ लाख १३ हजार, १७४०० चा पुट विकायचा असेल तर मार्जिन ९३ हजार आणि दोन्ही विकून शॉर्ट स्ट्रॅडल करायचा असेल तर मार्जिन १ लाख ३१ हजार लागते. स्प्रेड केल्यासही मार्जिनमध्ये फायदा मिळतो.
5 Oct 2021 - 7:52 pm | टीपीके
बापरे , ह्यातले बरेचशे शब्द ऐकले आहेत, काही शब्द थोडेफार कळतात सुध्दा, पण हे असे मशिनगन सारखे एका मागोमाग एक आले कि काही कळत नाही.
हे सर्व पद्धतशीर उदाहरणांसहित शिकण्याचा योग्य मार्ग कोणता? एखादे पुस्तक? ट्रैनिंग कोर्स ?
5 Oct 2021 - 8:00 pm | गॉडजिला
ज्याना आधीच सर्व सऊज्ञा माहित आहेत त्यांनाच ईथे नेमककाय बोलतात ते समजत आहे बाकीच्या साठी सर्वसंभाषण अनाकलनियप्रकरण आहे. धागा लेखकाने किमान बेसिक समजुन यायला काही लिंका दील्या असत्या तर मओठि सोय झाली असती सामान्य वाचकांची पणं तूर्तास धागा लेखकास त्यात रस दिसत नाही
6 Oct 2021 - 5:16 am | चौकस२१२
https://www.cmegroup.com/education/courses/introduction-to-options.html
6 Oct 2021 - 8:34 am | hrkorde
ऑप्शन समजावुन घ्यायला विविध ब्रोकरच्या वेब साइट वर त्याण्चे त्यांचे लेख आहेत. एन एस ई च्या वेब साइट वर पण आहेत.
https://support.zerodha.com/category/trading-and-markets/margin-leverage...
https://www.youtube.com/watch?v=_FxjA_6tSZE
https://www.nseindia.com/learn/online-courses-certifications-recorded-op...
6 Oct 2021 - 8:38 am | hrkorde
https://www.youtube.com/watch?v=DiLUgqA1aDY मराठी आहे
6 Oct 2021 - 9:52 am | टीपीके
धन्यवाद.
19 Sep 2021 - 10:07 pm | सुखी
या सर्व प्रकारात प्रॉफिट / लॉस किती होतो?
20 Sep 2021 - 6:27 am | चौकस२१२
जर ऑप्शन स्प्रेड केलात तर ठरलेला तोटा आणि ठरलेला फायदा स्ट्राईक वॉर अवलंबून ,, म्हणून आलेखाद्वारे पाहिले तर पटकन समजते
जर ऑप्शन विकत घेतलात = ठरलेले तोटा , अमर्याद फायदा
जर नेकेड ऑप्शन विकलांत तर १) कॉल विकला तर अमर्याद तोटा २० पूत विकला तर ठरविक तोटा ( स्ट्राईक - ० इतकं )
21 Sep 2021 - 12:11 am | सुखी
फारसं समजलं नाही... थोडा अभ्यास केला पाहिजे...
माहिती करता धन्यवाद
20 Sep 2021 - 6:17 am | चौकस२१२
माहिती चांगली आहे ( एकदम पुढ्याचं स्ट्रॅटेजी कडेच गेलात ) तुमचं सॉफ्टवेर मध्ये ह्या स्ट्रॅटेजीनचाआलेख ग्राफ काढता येत असेल तर समजणे खूप सोप्पे जाईल
20 Sep 2021 - 8:02 am | आग्या१९९०
शेअरखानच्या ट्रेडिंग सॉफ्टवेअर मध्ये पे ऑफ ग्राफ बघता येतो तसेच iccici Direct मध्ये पे ऑफ टेबल बघता येते.
20 Sep 2021 - 6:05 pm | hrkorde
झिरोदामध्ये बास्केट ऑर्डर टाकून एकदम सगळ्या ऑर्डर देता येतात, पण पुरेसे मार्जिन नसेल तर त्यातली अर्धवट एक्झिक्युट झाली तर फटका बसतो
https://sensibull.com/
पे आउट ग्राफ इथे बघता येतात, पण ते बहुतेक मोफत नाही.
आज मस्त गडगडले
21 Sep 2021 - 11:10 am | hrkorde
36500 स्ट्रॅडल गेल्या 1 सप्टेंबरला विकले आहे , अंदाजे 700 + 700 मिळून 1400 गोळा झाले आहेत
मध्यंतरी 11000 प्रॉफिट मध्ये आले होते
मग ब्या नि वाढल्यावर 5000 लॉस मध्येही गेले होते
दोन दिवसात ब्या नि पडल्यावर आता परत 7000 प्लस आहे
21 Sep 2021 - 3:06 pm | hrkorde
6000 प्लस
21 Sep 2021 - 3:40 pm | hrkorde
37300 कॉल सेल केले , 23 सप्टेंबर
37300 कॉल बाय केले , 30 सप्टेंबर
22 Sep 2021 - 11:36 am | hrkorde
हं
काल थोडे वाढले
आज परत पडले
म्हणजे काल मांजर मेले होते
22 Sep 2021 - 11:48 am | hrkorde
26 Sep 2021 - 6:35 pm | hrkorde
उद्या पडेल म्हणतात
26 Sep 2021 - 8:45 pm | hrkorde
ब्या नि ऑप्शन कॉलपुट मिळून 1900 वरून 1700 रु झालेत , आता 1 तारखेला 1400 होतील , आता येणार्या महिन्यात जर एक आठवडा आधी १८००-१९०० प्रिमियम घेऊन विकायची सण्धि मिळाली , तर विकून टाकीन .
======
मला वाटते, मन्थलि ऑप्शन रोज साडेतीन वाजता अॅट द मनी एक पेअर बाय करायची , दुसृया दिवशी त्यातला एक कोणता तरी ऑप्शन इन द मनी होतोच , कारण किमान १०० पोइन्ट प्लस मायनस तर होतातच , पण मन्थ्लि ऑप्शन असल्याने दुसरा ऑप्शन जास्त झिजत नाही, म्हणजे पहिला १२० ने वाढला तर दुसरा ५० नेच कमी होतो. पण हे फक्त लांबच्या म्हणजे मनथली ऑप्शन मध्ये तेहि पहिले ३ च आठवडे , त्यातही प्रामुख्याने पहिले २ आठवडे दिसते. शेवटच्या आठवड्यात मन्थलि ऑप्शन वीकलि होऊन जातो आणि त्याच्या पुढच्या एक्स्पायारीचे ऑप्शन अजुन लिक्विड नसतात, म्हणुन पहिले काही दिवस हे जमू शकेल, दोन्ही ऑप्शन बाय करायला साधारण २५ गुणिले ८०० गुणिले २ म्ह्णजे अण्दाजे ४०००० लागतील , हे मॅक्सिमम साण्गितले, दिवस जातील तसा प्रिमिय्म कमी होत जाईल.
पण सलग १५ दिवस एका स्वतंत्र अकाउण्ट्ला करुन बघायला हवे.
अपवाद फक्त गुरुवार शुक्रवारचा, गुरुवारी दुपारी बाय करण्याऐवजी गुरुवारी दुपारी किण्वा शुक्रवारी सकाळी पेअर शॉर्ट करावी लागेल. कारण शुक्रवारी मार्केट थण्ड असते. आठवड्यात असे चार ट्रेड आणि शुक्रवारी शॉर्ट ट्रेड घ्यावा लागेल.
१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर करुन बघेन.
===============================================
निफ्टी पी ई रेशो चार्ट
https://nifty-pe-ratio.com/
26 Sep 2021 - 9:02 pm | आग्या१९९०
आदल्या दिवशी ३.१५ पुढे बाय केलेले दोन्ही ऑप्शन दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत काढून टाकल्यास जास्त नफा मिळतो. सध्याच्या मार्केट परिस्थितीत असा जुगार खेळता येतो. असे मार्केट दहा बारा वर्षातून एकदाच येते. एरवी फार थकवते मार्केट.
1 Oct 2021 - 9:40 am | hrkorde
37000 short straddle , Oct expiry
Margin 1.40 L
Premium collected 1850
दीड लाखाची एफ डी केली असे समजायचे . 6 % ने वर्षाला 6000 व्याज मिळाले असते. मागच्या महिन्यात 6000 मिळाले आहेत. पुढच्या ऑगस्ट 2022 पर्यंत ट्रॅक करू.
सप्टेंबर (36500) 6000
ऑक्टोबर ( 37000)
1 Oct 2021 - 10:40 am | hrkorde
1 Oct 2021 - 11:55 am | चौकस२१२
short straddle
दीड लाखाची एफ डी केली असे समजायचे
म्हणजे कॉल ऑप्शन विकला + पूत ऑप्शन विकलं.. बरोबर? म्हणजे अमर्याद तोटा एक बाजूला व्हायची शक्यता नाकारता येत नाही
तुम्ही जर ग्राफ चिकटवलात तर सर्वांचं लगेच लक्षत येईल
मग हे एफ डी सारखे कसे ?
एफ डी मध्ये मुद्दल परत मिळते,,
कृपया चुकीची तुलना करू नका .. ज्यांना हि रिस्क माहित नाही ते भलते करून बसतील
1 Oct 2021 - 12:12 pm | hrkorde
ज्यांना ऑप्शन बेसिक माहीत आहेत , हा धागा त्यांच्यासाठी आहे.
1 Oct 2021 - 12:15 pm | hrkorde
विशेष सूचना : हे ट्रेड्स आपापल्या जबाबदारीवर करावेत
हे लेखातच लिहिलेले आहे,
ह्यात कुठेही कुणासाठीही कुणीही एक्सपर्ट रिकमामंडेशन देत नाही आहे. धाग्याचा उद्देश चर्चा व अभ्यास असा आहे
1 Oct 2021 - 5:48 pm | चौकस२१२
धाग्याचा उद्देश चर्चा व अभ्यास असा आहे
हो माहिती आहे पण आपण अश्या ट्रेंड (स्ट्रॅडल विकणे ) ची एफ डी ठेवणे याच्याशी तुलना केलीत म्हणून विचारले
अगदी कवर्ड कॉल रायटिंग सुद्धा एफ डी ठेवी शी तुलना करू शकत नाही तर स्ट्रॅडल विकणे हे तर किती दूर
माझे म्हणणे चुकत असेल तर सानगा ना कि स्ट्रॅडल विकणे आणि एफ डी ठेवणे यातील संधी आणि धोका दोन्ही सारखे कसे ते ?
1 Oct 2021 - 6:46 pm | hrkorde
आपले म्हणणे पटले
शेअर मार्केट हे रिस्की आहे , एफ डी पेक्षा जास्त आहे,
एफ डी जशी एक महिना , सहा महिने इ ठेवतात , तसे आता हे मार्जिन एक महिना अडकणार , आता त्यात मला बदल करायचा नाही , या अर्थाने त्याला फिक्स्ड असा शब्दप्रयोग केला.
एफ डी अधिक सुरक्षित आहे
शेअर मार्केट रिस्की आहे
2 Oct 2021 - 6:13 am | चौकस२१२
तसे आता हे मार्जिन एक महिना अडकणार , आता त्यात मला बदल करायचा नाही , या अर्थाने त्याला फिक्स्ड असा शब्दप्रयोग केला.
मार्क टू मार्केट रोजचे असते त्यामुळे त्यादृष्टीने पण ते "फिक्स्ड" होत नाही
आपलया माहिती पुरवण्याच्या हेतू बद्दल शंका नाही पण अशी तुलना केली तर भलता अर्थ निघू शकतो म्हणून एवढे खोलात जाऊन बोललो
अनेक ट्रेडिंग गुरु आणि भक्त काय वाटेल ते शब्द वापरता भारतात हे बघतलंय त्यातील गॅरंटी आणि आर्बिट्राज हे शब्द फार चुकीच्या पद्धतीने वापरले जातात ...
असो आपली ऑप्शन स्ट्रॅटेजी बरोबर आलेख ग्राफ चिकटवा खूप उपयोग होईल सगळ्यांना
1 Oct 2021 - 4:15 pm | hrkorde
आज लगेच 3500 प्लस झाले आहे एकच दिवसात.
ओम फट स्वाहा
6 Oct 2021 - 8:35 am | hrkorde
५५०० प्लस
6 Oct 2021 - 10:44 am | hrkorde
October 37000 short straddle 6000 रु प्रॉफिट मध्ये आले होते, पण मार्केट फारच वाढले आणि ते 3100 प्रॉफिटमध्ये काढले .
त्याच्याऐवजी 38000 शॉर्ट केले.
सप्टेंबर 2021 ते ऑगस्ट 2022 तात्या विंचू short straddle series :
सप्टेंबर (36500) 6000
ऑक्टोबर ( 37000) 3100
ऑक्टोबर (38000) सुरू आहे.
6 Oct 2021 - 5:52 pm | hrkorde
मार्केट पडल्याने ब्यानी 2000 लॉस , निफ्टी 1000 रु लॉस मध्ये आहे.
पण short straddle मध्ये हेच तर तपासून बघायचे आहे. आपल्या ब्रेक इव्हनमध्येच मार्केट वरखाली होत राहिले तर नफा नुकसान कसे व कितपत होते ?
माझ्या मते , short straddle 1 तारखेला/ त्याच्या आधीच करावे व 15/20 तारखेच्या आत मोकळे करावे.
7 Oct 2021 - 2:52 pm | hrkorde
मार्केट वर उठले
ब्या नि स्ट्रेडल 2000 प्लस
निफ्टी स्त्रदल 800 प्लस
पण निफ्टी स्ट्रेडल फारच वाकडेतिकडे वरखाली होते , समजत नाही
11 Oct 2021 - 10:38 am | hrkorde
Off time मध्ये चेक केले तर पुढच्या महिन्यात बायर सेलर गॅप फार दिसतात
पण मार्केट चालू असताना नोव्हेम्बर 2021 चे ब्यांक निफ्टी ऑप्शन अगदी लिक्विड आहेत . 2,5 रुपयेच गॅप आहे , टोटल 2100 प्रीमियम
जी ललचाये रहा न जाये
निफ्टी स्ट्रेडल सकाळी 2000 रु नफ्यात होते , आता 600 रु नफा, फारच unpredictable आहे
मार्जिन जास्त गेले तरी ब्या नि च परवडते
12 Oct 2021 - 5:44 pm | श्रीगुरुजी
धागालेखकाचा बाजार उठला.
15 Oct 2021 - 9:36 pm | शानबा५१२
:-)))) पण त्यांनी शॉर्ट स्ट्रॅडलची पोजीशन कव्हर केली आहे ना?
15 Oct 2021 - 9:37 pm | शानबा५१२
बँकनिफ्टी ३९३४०!!!
15 Oct 2021 - 10:09 pm | शानबा५१२
आपण ईंट्राडे करुन ५० हजार रक्कमेवरुन महीन्याला काय दीवसाला २ ते ३ हजार सहज कमवु शकतात. ५० हजारावर ५ पट लेव्हरेज घ्या. कोणत्याही एकाच शेअरमध्ये ट्रेड करा, म्हणजे त्याचे लेवल्स समजतील. IBREALEST सारखा स्टॉक घ्या, १५४३ क्वान्टीटी असेल. ७० पैसे ते १ रुपया कींवा जास्त टारगेट ठेवा. १००० ते दीड हजार एकाच ट्रेड मध्ये येतील. प्रॅक्टीस झाल्यावर २ ते ३ ट्रेड करा. दीड लाख ऑप्शनमध्ये लावुन खुप खुप रीस्की खेळुन फक्त ६ हजार महीना?
चार्टईंन्क व तत्सम टुल्स वापरा. चांगले ट्रेड्स मिळतात.
मी १४ पट लेव्हरेज घेउन ईंट्राडे करायचो(कोटकचे सुपर मल्टीपल), आता फक्त ५ पट लेव्हरेज मिळते. लागोपाठ २६ ट्रेड्स जिंकलो आहे, फेसबुकवर ग्रुपमध्ये नोंद आहे. तुम्हाला एखादी रीस्क मॅनेज करायची ईंट्राडेची पध्दत स्विकारता आली तर लॉस नाहीच्या बरोबर असेल. अशी एक पध्द्त आहे, एव्हरेजिंग.
ह्या कोरोना फंद्यात ईतर काही कारणांमुळे कॅपीटल गमवुन बसलो, तेच ईंट्राडे करत राहीलो असतो, तर फुल टाईम फक्त ऑप्शन सेलिंग पर्यंत मजल गेली असती, जाईल कधितरी. सध्या फुल टाईम ईंट्राडे थोड्या प्रमाणात एन्जोय करतोय. आपणास सल्ला देतो तुम्हीही ईंट्राडे सुरु करा. व्यनिमधला तो मी नव्हेच असे समजा. :-)))))))) मला वाटले तो कोर्स म्हणजे जीव की प्राण असेल ऑप्शन्मध्ये ट्रेड करणा-यांसाठी.
माझी ईंट्राडेची पध्दत मी स्वःताच कधीच कुठेच बघितली नाही आहे व खुप लक्ष देउन ट्रेड केले तर फायदा सवय बनुन जाते, पण प्रॅक्टीस लागेल, व संकल्पना समजुन घ्याव्या लागतील. सध्या एका उच्चशिक्षित तरुणाला शिकवत आहे.
माझी जाहीरात नाही पण एक सल्ला आहे हा कींवा ईतर तत्सम कोर्स करुन ईंट्राडे सुरु करा.
https://sites.google.com/view/marketnotes (वेबसाईट बांधत आहे)
15 Oct 2021 - 10:13 pm | शानबा५१२
सुधारणा : दीवसाला कमीतकमी ७०० ते १००० नक्की येतील, चांगला ट्रेड मिळाला तर २ ते ५ हजार सहज शक्य आहे. प्रत्येक दीवस मार्केटमध्ये वेगळा असतो. ट्रेड योग्यवेली पुर्ण करने महत्वाचे. आणि मी कोणताच ईंडीकेटर शिकवत नाही. ग्राफचा अर्थ समजुन घेता येतो. आपला एक स्वःताचा ईंडीकेटर असेल, तो आपण स्वःता बनवु शकता, काही स्क्रीप्ट नाही.
16 Oct 2021 - 11:34 am | गणेशा
वाचतो आहे,
F&o आणी इन्ट्राडे कधीच केले नसल्याने बऱ्याच माहिती कळत नाहीयेत..
पण नक्कीच अभ्यास करून पुन्हा वाचेल..