Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by hrkorde on Sun, 09/19/2021 - 19:29
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले होते. 14500 मे कॉल व पुट सेल केले 14500 जून कॉल व पुट बाय केले. नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात. चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो . 15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते . ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात १. ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात. २. ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात. हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे. 1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत. 2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे 3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे 4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते. 5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते. 6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते. 7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात. 8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही. 9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही, 10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही. 11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते. 12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही. 13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही. 14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत. spread Nifty थंड असेल तर स्प्रेड लवकर व जास्त प्रॉफिटमध्ये येतो. समय हा स्प्रेडचा मित्र आहे तर मोमेंटम हा स्प्रेडचा शत्रू आहे , पण मोमेंटम रोज येत नाही , मार्केटचे 20 दिवस पकडले तर रोज 200 पॉईंट वरच किंवा खालीच जात मार्केट एकदम 2000 पॉईंट वर किंवा खालीच उलथले , असे होत नाही, अगदी क्वचित होते. ===================================================================== इतर लोकप्रिय व्हेरिएशन्स ह्यात अजुन काहि लोकप्रिय व्हेरिएशन्स आहेत. १. विकली कॅलेंडर स्प्रेड : वरच्याप्रमाणेच पण वीकलिमध्ये करणे 2. विकली शॉर्ट स्ट्रॅडल करून त्याच आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे 3. पुढच्या आठवड्याचे कॉल पुट विकून ( शॉर्ट करुन) ह्या आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे हे तिन्ही पर्याय सेमच प्रॉफिट लॉस पोटेन्शल देतात , मार्जिनदेखील सेम लागते , सुमारे 50000. 52 आठवड्यात प्रॉफिटवाले आठवडे किती आणि लॉसवाले किती असतील ? इतरही काही ऑप्शन्स स्ट्रटेजी असतील तर त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा आहे. विशेष सूचना : हे ट्रेड्स आपापल्या जबाबदारीवर करावेत
  • Log in or register to post comments
  • 30558 views

प्रतिक्रिया

Submitted by hrkorde on Sun, 09/19/2021 - 19:30

Permalink

हा धागा गुंतवणूक सदरात हलवण्यात यावा

हा धागा गुंतवणूक सदरात हलवण्यात यावा
  • Log in or register to post comments

Submitted by भागो on Sun, 09/19/2021 - 19:51

In reply to हा धागा गुंतवणूक सदरात हलवण्यात यावा by hrkorde

Permalink

हो की

इथे साहित्य संगीत कला कथा ह्यांची मैफिल चालू आहे त्यात ही "पैशाची भाषा" कशाला?
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Sun, 09/19/2021 - 19:53

In reply to हो की by भागो

Permalink

लेख लिहिताना तसा ऑप्शन दिसला नाही.

लेख लिहिताना तसा ऑप्शन दिसला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by भागो on Sun, 09/19/2021 - 20:06

In reply to लेख लिहिताना तसा ऑप्शन दिसला नाही. by hrkorde

Permalink

hrkorde

hrkorde माफ करा. मी आपले असेच गंमत म्हणून लिहिले. हलकेच घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Sun, 09/19/2021 - 19:31

Permalink

सध्याचे लॉट साइझ

निफ्टी ५० ब्यान्क निफ्टी २५
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 09/19/2021 - 19:58

Permalink

माहितीपूर्ण धागा.

वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 09/19/2021 - 21:38

Permalink

काही मुद्दे

13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
हे गृहितक धोकादायक वाटते. ट्रेडिंगसाठी तसेही फंडामेंटल ज्ञान लागत नाही. ते केवळ इन्व्हेस्टिंगसाठी लागते. टेक्निकल ज्ञान मात्र दोन्हींसाठी हवे. व्यवस्थित चार्ट न बघता असा नुसता आकड्यांचा खेळ केला तर त्यात मोठ्या प्रमाणावर हात पोळू शकतात. माणसाला झटपट श्रीमंत आणि त्याच्या चौपट वेगाने गरीब बनविणारा ऑप्शनसारखा दुसरा प्रकार नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्यात डोळे झाकून हा प्रकार करणे धोकादायक ठरू शकेल. जे काही करायचे ते प्रत्येकाने आपली मनी मॅनेटमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट बघून. विकताना या महिन्यातले ऑप्शन विकले जात आहेत आणि विकत घेताना पुढील महिन्यातले. म्हणजे आपण या स्ट्रॅटेजीसाठी आपल्या खिशातून पैसे भरणार आहोत आणि ही डेबिट स्ट्रॅटेजी झाली. हरकत नाही. पण हे करताना पुढील गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात असे वाटते. १. नुसता कॉल साईडचा ट्रेड असेल म्हणजे आताच्या महिन्यातील कॉल विकले असतील आणि पुढच्या महिन्यातील विकत घेतले असतील तर आताच्या एक्सपायरीपर्यंत किंमत जोरदार वर जाणार नाही हे बघायला लागेल. म्हणजे आर.एस.आय ६० च्या वर असेल तर याचा अर्थ सध्या बुलिश मोमेंटम चालू आहे. अशावेळी कॉल विकले तर 'आ बैल मुझे मार'. तेव्हा कॉल साईडला ट्रेड घेण्यापूर्वी आर.एस.आय ६० च्या वर नाही आणि किंमत बॉलिंजरच्या वरच्या बॅन्डला चॅलेन्ज करत नाहीये हे बघायला हवे. २. नुसता पुट साईडचा ट्रेड असेल म्हणजे आताच्या महिन्यातील पुट विकले असतील आणि पुढच्या महिन्यातील विकत घेतले असतील तर आताच्या एक्सपायरीपर्यंत किंमत जोरदार खाली जाणार नाही हे बघायला लागेल. म्हणजे आर.एस.आय ४० च्या खाली असेल तर याचा अर्थ सध्या बेअरीश मोमेंटम चालू आहे. अशावेळी पुट विकले तर 'आ बैल मुझे मार'. तेव्हा पुट साईडला ट्रेड घेण्यापूर्वी आर.एस.आय ४० च्या खाली नाही आणि किंमत बॉलिंजरच्या खालच्या बॅन्डला चॅलेन्ज करत नाहीये हे बघायला हवे. ३. दोन्ही कॉल आणि पुट साईडचे ट्रेड घ्यायचे असतील तर किंमत साईडवेज असेल असा व्ह्यू झाला. अशावेळी आर.एस.आय ४० आणि ६० च्या मध्ये हवा आणि बॉलिंजर फ्लॅट हवेत. नाहीतर एका बाजूला कत्तल होईल. हे लिहायचे कारण म्हणजे किंमत जोरदार वरखाली गेली तर आताच्या महिन्यातील ऑप्शनपेक्षा पुढच्या महिन्यातील ऑप्शन तितक्या प्रमाणावर बदलत नाहीत. त्यामुळे आपल्या शॉर्ट पोझिशनवर झालेला तोटा पुढील महिन्यातील लाँग पोझिशनवर झालेल्या फायद्यापेक्षा जास्त असेल. ४. हा प्रकार निफ्टी किंवा बँकनिफ्टीमध्ये केला जात असेल तसाच स्टॉक ऑप्शनमध्येही करायचा असेल तर लिक्विडिटी जरूर बघून घ्यावी. स्टॉक ऑप्शनमध्ये लिक्विडिटी नसेल तर बीड-आस्क स्प्रेड जास्त असतो. त्यातून आपल्याला किंमत दिसत आहे त्यापेक्षा एक रूपयाने जास्त किंमतीला ऑप्शन विकत घेतला गेला आणि एक रूपयाने कमी किंमतीला ऑप्शन विकला गेला तर दोन बाजूंना २ रूपयांचे नुकसान होईल. हाच प्रकार पोझिशन स्क्वेअर ऑफ करतानाही होईल. म्हणजे असे साडेतीन-चार रूपयांचे नुकसान झाले आणि लॉट साईझ ५०० चा असेल तर २००० पर्यंत नुकसान काही कारण नसताना होऊ शकेल. गेल्या काही दिवसात फ्रिक ट्रेड झाले आहेत. ते पाहता स्क्वेअर ऑफ करताना मार्केट ऑर्डर नको. नाहीतर अशा फ्रिक ट्रेडमुळे जोरदार फटका बसू शकेल. तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करताना फिजिकल सेटलमेंटची भानगड बघून घ्यावी. ऑप्शन इन द मनी असेल (म्हणजे या महिन्यातील आपली पोझिशन तोट्यात असेल) तर ती एक्सपायरीपर्यंत जाऊच देऊ नये. नाहीतर मोठा भुर्दंड बसू शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sun, 09/19/2021 - 22:24

In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार

Permalink

फ्रिक ट्रेडिंग सध्या जोरात

फ्रिक ट्रेडिंग सध्या जोरात असल्याने ऑप्शन ट्रेडिंग करताना मी मार्केट आर्डर बंदच केली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Sun, 09/19/2021 - 22:27

In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार

Permalink

चार्ट

चार्ट बघून इतके correct समजत असेल तर मग नेकेड कॉल पुटच घ्यावे की मग हेजिंग कशाला हवे ?
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sun, 09/19/2021 - 22:35

In reply to चार्ट by hrkorde

Permalink

Pivot, privious day high,low

Pivot, privious day high,low , resistance support आणि resistance लावून दिवसभरात बक्कळ कमाई करता येते. मी ह्या स्ट्रॅटेजी लावणे बंद केले आहे वेळेचा अपव्यय आहे. वेळ मिळेल तेव्हा मनसोक्त इंट्रा डे करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sun, 09/19/2021 - 22:36

In reply to Pivot, privious day high,low by आग्या१९९०

Permalink

स्टॉप लॉस मस्ट.

स्टॉप लॉस मस्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Sun, 09/19/2021 - 23:21

In reply to Pivot, privious day high,low by आग्या१९९०

Permalink

इन्ट्राडे

इन्ट्राडेवर नवीन डिटेलवार लेख लिहा प्लिज
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sun, 09/26/2021 - 11:26

In reply to इन्ट्राडे by hrkorde

Permalink

इंट्राडे बद्दल लिहिण्यापेक्षा

इंट्राडे बद्दल लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष ट्रेडिंग कसे करतो हे मार्केट चालू असताना दाखवायचा प्रयत्न करीन,तेही माबोवर. मिपावर प्रतिसाद वरखाली आणि उजवीकडे जाण्याची शक्यता असल्याने गोंधळ उडू शकतो आणि माबोवर स्वसंपदानाची सोय असल्याने चुकीची दुरुस्ती करता येते. लिमिट ऑर्डर प्राइजकडे जास्त लक्ष देत असल्याने माझ्याकडून बऱ्याचदा लॉट साइज मध्ये चुका झाल्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 09/19/2021 - 22:52

In reply to चार्ट by hrkorde

Permalink

कारण

नेकेड कॉल पुट घेताना किंमत मोमेन्टममध्ये आहे याची खात्री करून मगच घ्यावे. नाहीतर टाईम व्हॅल्यू खाल्ली जाऊन फायदा होणार नाही. प्रत्येक वेळेस पाहिजे तसा सेट-अप मिळेलच असे नसते. आणि ऑप्शन हा प्राणी भयंकर व्होलाटाईल असतो. अनेकदा एका दिवसात १००% फायदा करून देऊ शकतो. पण योग्य वेळेत एक्झिट करणेही महत्वाचे असते. नाहीतर झालेला फायदा पूर्ण संपून तोटा व्हायचीही शक्यता असते. त्यामुळे पूर्ण वेळ चार्ट बघता येणार असेल तरच नेकेड ऑप्शन घ्यावेत. अन्यथा नाही. दुसरे म्हणजे हेजिंग करून आपल्या पोझिशनसाठी लागणारी रक्कम कमी करता येऊ शकते आणि संभाव्य तोटाही कमी करता येऊ शकतो. १०० रूपये भरून कॉल घेतला आणि वरचा कॉल ४० रूपये देऊन विकला तर १०० ऐवजी ६० रूपयेच द्यावे लागतील. दुसरे म्हणजे आपण बुलिश म्हणून कॉल घेतला पण किंमत साईडवेज गेली किंवा खाली गेली आणि कॉल आऊट ऑफ द मनी एक्सपायर झाला त्यावर १०० रूपये तोटा होईल. पण वर विकलेल्या कॉलचे ४० रूपये आधीच मिळालेले असतील ते आपल्याकडेच राहतील. म्हणजे जास्तीत जास्त तोटा १०० ऐवजी ६० होईल. हेजिंग केल्यास तोटा जसा मर्यादित असतो त्याप्रमाणेच किंमत आपल्या दिशेने गेल्यास होणारा फायदा पण मर्यादितच असेल. जर आपला व्ह्यू चांगला बुलिश असेल तर मग अशा स्थितीत रेशो स्प्रेड करावेत- म्हणजे २ ऑप्शन विकत घेऊन १ विकावा. म्हणजे १०० + १०० - ४० = १६० रूपयात दोन ऑप्शन म्हणजे प्रत्येक ऑप्शनला ८० रूपये द्यावे लागतील. ही रक्कम १०० पेक्षा कमी असेल. त्यामुळे किंमत जोरदार वर गेल्यास दोनपैकी एक कॉल ऑप्शन वरच्या बाजूला अमर्याद फायदा करू शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Mon, 09/20/2021 - 06:14

In reply to चार्ट by hrkorde

Permalink

नेकेड कॉल पुटच घ्यावे?

नेकेड कॉल पुटच घ्यावे? ह्याला नेकेड का म्हणताय ? तुम्हाला सरळ पूत विकत घयावे असे म्हणायचे आहे का ? साधारण पाने अमर्याद तोटा असण्याची शक्यता असते त्याला नेकेड म्हणतात - नेकेड कॉल विकणे
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Mon, 09/20/2021 - 06:24

In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार

Permalink

तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड

तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करताना फिजिकल सेटलमेंटची भानगड बघून घ्यावी. भारतीय ऑप्शन बझार संबंधी या संधार्बत एक दोन प्रश्न - स्टोक वर बेतलेले ऑप्शन हे कसे सेटल होतात? प्रत्यक्ष फुचर मध्ये कि स्टोक डिलिव्हरी मध्ये ? - १ ऑप्शन म्हणजे किती शेअर? ते शेअर प्रमाणे बदलते कि अमेरिके सारखे १०० शेअर सगळीकडे - ते अमेरिकन पद्धतीचे कि युरोप पद्धतीचे - इंडेक्स वर बेतलेले ऑप्शन हे "इंडेक्स वर बेतलेले असतात कि इंडेक्स चाय फुचार वर? अमरेइकेतील उद्धरण एस आणि पी= हि झाली इंडेक्स SP ए मिनी आणि ए मिक्रो हे झाले इंडेक्स वरील फुचर ES AND MES एस पी वाय हा झालं एक्सचेंज ट्रेडेड फंड ( ए टी एफ = SPY) आता या सर्वांवर ऑप्शन उपलब्ध आहेत ! SPX , ES / EMS/ SPY तसे निफ्टी चे नक्की काय ? ऑप्शन स्प्रेड : एका क्लिक द्वारे करता येतात कि लेग इन कर्वे लागते मार्जिन ऑफसेट मिळते का ?
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Mon, 09/20/2021 - 07:36

In reply to तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड by चौकस२१२

Permalink

लॉट

लॉट प्रत्येकाचे भिन्न आहेत निफ्टी 50 ब्या नि 25 रिलायन्स 250 त्याची यादी उपलब्ध आहे https://stockezee.com/nse-fno-lot-size
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Mon, 09/20/2021 - 07:47

In reply to लॉट by hrkorde

Permalink

निफ्टी ऑप्शन ची रुपये किंमत

निफ्टी ऑप्शन ची रुपये किंमत ( एक्सपोजर १ कॉन्ट्रॅक्ट) काढायचे तर असे का ५० X ७५ X निफ्टी चा भाव
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Mon, 09/20/2021 - 08:53

In reply to निफ्टी ऑप्शन ची रुपये किंमत by चौकस२१२

Permalink

नाही

ऑप्शनचा भाव गुणिले लॉट साईझ
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Mon, 09/20/2021 - 09:16

In reply to नाही by hrkorde

Permalink

निफ्टी ऑप्शन सेलसाठी निफ्टी

निफ्टी ऑप्शन सेलसाठी निफ्टी फ्युचर इतके मार्जिन लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Mon, 09/20/2021 - 09:35

In reply to नाही by hrkorde

Permalink

माझा प्रश्न थोडा चुकला ...

माझा प्रश्न थोडा चुकला ... १ फुचर ची काँट्रॅकट किंमत किती रुपयात असे विचारायचे होते ? ऑप्शन चे नाही
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Mon, 09/20/2021 - 09:17

In reply to तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड by चौकस२१२

Permalink

उत्तरे

- स्टोक वर बेतलेले ऑप्शन हे कसे सेटल होतात? प्रत्यक्ष फुचर मध्ये कि स्टोक डिलिव्हरी मध्ये ?
भारतात स्टॉक ऑप्शन्स स्टॉक डिलीव्हरीमध्येच सेटल होतात. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील कमोडिटी ऑप्शन्स त्या कमोडिटीवरील फ्युचर्समध्ये सेटल होतात. त्यामुळे एम.सी.एक्सवर ऑप्शन पोझिशन असेल तर ती वेळेत क्लोज करावी. कारण ज्याप्रमाणे एक्सपायरी जवळ येते त्याप्रमाणे मार्जिन खूपच वाढते. क्रूड-नॅचरल गॅस वगैरेंच्या एक लॉटला सव्वा ते दीड लाख मार्जिन लागते. जर त्या फ्युचर्समध्ये पोझिशन सेटल झाली तर आपल्याकडे तेवढे मार्जिन हवे.
- १ ऑप्शन म्हणजे किती शेअर? ते शेअर प्रमाणे बदलते कि अमेरिके सारखे १०० शेअर सगळीकडे
प्रत्येक स्टॉकचा लॉट साईझ वेगळा असतो.
- ते अमेरिकन पद्धतीचे कि युरोप पद्धतीचे
भारतात युरोपिअन ऑप्शन्सच ट्रेड होतात. पूर्वी अमेरिकन ऑप्शन्स असायचे पण १० वर्षांपूर्वी सेबी-एन.एस.ई ने ते बंद केले.
- इंडेक्स वर बेतलेले ऑप्शन हे "इंडेक्स वर बेतलेले असतात कि इंडेक्स चाय फुचार वर?
इंडेक्सवरच बेतलेले असतात.
तसे निफ्टी चे नक्की काय ?
निफ्टीचा ५० चाच लॉट आहे. निफ्टीवर मिनी लॉट वगैरे नाहीत. एम.ची.एक्सवर सोने, चांदी यावर मिनी लॉट्स उपलब्ध आहेत. एन.एस.ई वर नाही.
ऑप्शन स्प्रेड : एका क्लिक द्वारे करता येतात कि लेग इन कर्वे लागते
मी वापरलेल्या ब्रोकर्सकडे तरी वेगळ्या लेग्सच्या वेगळ्या ऑर्डर द्याव्या लागतात. लाँग पोझिशन आधी करायची आणि मग शॉर्ट पोझिशन.
मार्जिन ऑफसेट मिळते का ?
हो. आता याक्षणी १७४०० चा कॉल विकायचा असेल तर मार्जिन १ लाख १३ हजार, १७४०० चा पुट विकायचा असेल तर मार्जिन ९३ हजार आणि दोन्ही विकून शॉर्ट स्ट्रॅडल करायचा असेल तर मार्जिन १ लाख ३१ हजार लागते. स्प्रेड केल्यासही मार्जिनमध्ये फायदा मिळतो.
  • Log in or register to post comments

Submitted by टीपीके on Tue, 10/05/2021 - 19:52

In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार

Permalink

बापरे , ह्यातले बरेचशे शब्द

बापरे , ह्यातले बरेचशे शब्द ऐकले आहेत, काही शब्द थोडेफार कळतात सुध्दा, पण हे असे मशिनगन सारखे एका मागोमाग एक आले कि काही कळत नाही. हे सर्व पद्धतशीर उदाहरणांसहित शिकण्याचा योग्य मार्ग कोणता? एखादे पुस्तक? ट्रैनिंग कोर्स ?
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Tue, 10/05/2021 - 20:00

In reply to बापरे , ह्यातले बरेचशे शब्द by टीपीके

Permalink

बरोब्बर बोललात

ज्याना आधीच सर्व सऊज्ञा माहित आहेत त्यांनाच ईथे नेमककाय बोलतात ते समजत आहे बाकीच्या साठी सर्वसंभाषण अनाकलनियप्रकरण आहे. धागा लेखकाने किमान बेसिक समजुन यायला काही लिंका दील्या असत्या तर मओठि सोय झाली असती सामान्य वाचकांची पणं तूर्तास धागा लेखकास त्यात रस दिसत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Wed, 10/06/2021 - 05:16

In reply to बरोब्बर बोललात by गॉडजिला

Permalink

https://www.cmegroup.com

https://www.cmegroup.com/education/courses/introduction-to-options.html
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Wed, 10/06/2021 - 08:34

In reply to बरोब्बर बोललात by गॉडजिला

Permalink

ऑप्शन

ऑप्शन समजावुन घ्यायला विविध ब्रोकरच्या वेब साइट वर त्याण्चे त्यांचे लेख आहेत. एन एस ई च्या वेब साइट वर पण आहेत. https://support.zerodha.com/category/trading-and-markets/margin-leverage-and-product-and-order-types https://www.youtube.com/watch?v=_FxjA_6tSZE https://www.nseindia.com/learn/online-courses-certifications-recorded-options-trading-strategies
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Wed, 10/06/2021 - 08:38

In reply to ऑप्शन by hrkorde

Permalink

युट्युब सर्च करा

https://www.youtube.com/watch?v=DiLUgqA1aDY मराठी आहे
  • Log in or register to post comments

Submitted by टीपीके on Wed, 10/06/2021 - 09:52

In reply to युट्युब सर्च करा by hrkorde

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on Sun, 09/19/2021 - 22:07

Permalink

या सर्व प्रकारात प्रॉफिट /

या सर्व प्रकारात प्रॉफिट / लॉस किती होतो?
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Mon, 09/20/2021 - 06:27

In reply to या सर्व प्रकारात प्रॉफिट / by सुखी

Permalink

जर ऑप्शन स्प्रेड केलात तर

जर ऑप्शन स्प्रेड केलात तर ठरलेला तोटा आणि ठरलेला फायदा स्ट्राईक वॉर अवलंबून ,, म्हणून आलेखाद्वारे पाहिले तर पटकन समजते जर ऑप्शन विकत घेतलात = ठरलेले तोटा , अमर्याद फायदा जर नेकेड ऑप्शन विकलांत तर १) कॉल विकला तर अमर्याद तोटा २० पूत विकला तर ठरविक तोटा ( स्ट्राईक - ० इतकं )
  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on Tue, 09/21/2021 - 00:11

In reply to जर ऑप्शन स्प्रेड केलात तर by चौकस२१२

Permalink

फारसं समजलं नाही... थोडा

फारसं समजलं नाही... थोडा अभ्यास केला पाहिजे... माहिती करता धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Mon, 09/20/2021 - 06:17

Permalink

माहिती चांगली आहे ( एकदम

माहिती चांगली आहे ( एकदम पुढ्याचं स्ट्रॅटेजी कडेच गेलात ) तुमचं सॉफ्टवेर मध्ये ह्या स्ट्रॅटेजीनचाआलेख ग्राफ काढता येत असेल तर समजणे खूप सोप्पे जाईल
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Mon, 09/20/2021 - 08:02

Permalink

शेअरखानच्या ट्रेडिंग

शेअरखानच्या ट्रेडिंग सॉफ्टवेअर मध्ये पे ऑफ ग्राफ बघता येतो तसेच iccici Direct मध्ये पे ऑफ टेबल बघता येते.
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Mon, 09/20/2021 - 18:05

Permalink

...

झिरोदामध्ये बास्केट ऑर्डर टाकून एकदम सगळ्या ऑर्डर देता येतात, पण पुरेसे मार्जिन नसेल तर त्यातली अर्धवट एक्झिक्युट झाली तर फटका बसतो https://sensibull.com/ पे आउट ग्राफ इथे बघता येतात, पण ते बहुतेक मोफत नाही. आज मस्त गडगडले
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Tue, 09/21/2021 - 11:10

Permalink

Bank nifty short straddle

36500 स्ट्रॅडल गेल्या 1 सप्टेंबरला विकले आहे , अंदाजे 700 + 700 मिळून 1400 गोळा झाले आहेत मध्यंतरी 11000 प्रॉफिट मध्ये आले होते मग ब्या नि वाढल्यावर 5000 लॉस मध्येही गेले होते दोन दिवसात ब्या नि पडल्यावर आता परत 7000 प्लस आहे Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Tue, 09/21/2021 - 15:06

In reply to Bank nifty short straddle by hrkorde

Permalink

6000 रु प्रॉफिटला काढून टाकले

6000 प्लस
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Tue, 09/21/2021 - 15:40

In reply to 6000 रु प्रॉफिटला काढून टाकले by hrkorde

Permalink

आणि नवीन पोझिशन घेतली

37300 कॉल सेल केले , 23 सप्टेंबर 37300 कॉल बाय केले , 30 सप्टेंबर Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Wed, 09/22/2021 - 11:36

In reply to आणि नवीन पोझिशन घेतली by hrkorde

Permalink

Dead cat bounce

हं काल थोडे वाढले आज परत पडले म्हणजे काल मांजर मेले होते
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Wed, 09/22/2021 - 11:48

In reply to Dead cat bounce by hrkorde

Permalink

.

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Sun, 09/26/2021 - 18:35

Permalink

उद्या पडेल म्हणतात

उद्या पडेल म्हणतात
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Sun, 09/26/2021 - 20:45

Permalink

..

ब्या नि ऑप्शन कॉलपुट मिळून 1900 वरून 1700 रु झालेत , आता 1 तारखेला 1400 होतील , आता येणार्‍या महिन्यात जर एक आठवडा आधी १८००-१९०० प्रिमियम घेऊन विकायची सण्धि मिळाली , तर विकून टाकीन . ====== मला वाटते, मन्थलि ऑप्शन रोज साडेतीन वाजता अ‍ॅट द मनी एक पेअर बाय करायची , दुसृया दिवशी त्यातला एक कोणता तरी ऑप्शन इन द मनी होतोच , कारण किमान १०० पोइन्ट प्लस मायनस तर होतातच , पण मन्थ्लि ऑप्शन असल्याने दुसरा ऑप्शन जास्त झिजत नाही, म्हणजे पहिला १२० ने वाढला तर दुसरा ५० नेच कमी होतो. पण हे फक्त लांबच्या म्हणजे मनथली ऑप्शन मध्ये तेहि पहिले ३ च आठवडे , त्यातही प्रामुख्याने पहिले २ आठवडे दिसते. शेवटच्या आठवड्यात मन्थलि ऑप्शन वीकलि होऊन जातो आणि त्याच्या पुढच्या एक्स्पायारीचे ऑप्शन अजुन लिक्विड नसतात, म्हणुन पहिले काही दिवस हे जमू शकेल, दोन्ही ऑप्शन बाय करायला साधारण २५ गुणिले ८०० गुणिले २ म्ह्णजे अण्दाजे ४०००० लागतील , हे मॅक्सिमम साण्गितले, दिवस जातील तसा प्रिमिय्म कमी होत जाईल. पण सलग १५ दिवस एका स्वतंत्र अकाउण्ट्ला करुन बघायला हवे. अपवाद फक्त गुरुवार शुक्रवारचा, गुरुवारी दुपारी बाय करण्याऐवजी गुरुवारी दुपारी किण्वा शुक्रवारी सकाळी पेअर शॉर्ट करावी लागेल. कारण शुक्रवारी मार्केट थण्ड असते. आठवड्यात असे चार ट्रेड आणि शुक्रवारी शॉर्ट ट्रेड घ्यावा लागेल. १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर करुन बघेन. =============================================== निफ्टी पी ई रेशो चार्ट https://nifty-pe-ratio.com/
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sun, 09/26/2021 - 21:02

In reply to .. by hrkorde

Permalink

आदल्या दिवशी ३.१५ पुढे बाय

आदल्या दिवशी ३.१५ पुढे बाय केलेले दोन्ही ऑप्शन दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत काढून टाकल्यास जास्त नफा मिळतो. सध्याच्या मार्केट परिस्थितीत असा जुगार खेळता येतो. असे मार्केट दहा बारा वर्षातून एकदाच येते. एरवी फार थकवते मार्केट.
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Fri, 10/01/2021 - 09:40

Permalink

37000 short straddle , Oct

37000 short straddle , Oct expiry Margin 1.40 L Premium collected 1850 दीड लाखाची एफ डी केली असे समजायचे . 6 % ने वर्षाला 6000 व्याज मिळाले असते. मागच्या महिन्यात 6000 मिळाले आहेत. पुढच्या ऑगस्ट 2022 पर्यंत ट्रॅक करू. सप्टेंबर (36500) 6000 ऑक्टोबर ( 37000)
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Fri, 10/01/2021 - 10:40

In reply to 37000 short straddle , Oct by hrkorde

Permalink

दर एक तारखेला ...

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Fri, 10/01/2021 - 11:55

In reply to 37000 short straddle , Oct by hrkorde

Permalink

दोन्हि सारखे कसे ?

short straddle दीड लाखाची एफ डी केली असे समजायचे म्हणजे कॉल ऑप्शन विकला + पूत ऑप्शन विकलं.. बरोबर? म्हणजे अमर्याद तोटा एक बाजूला व्हायची शक्यता नाकारता येत नाही तुम्ही जर ग्राफ चिकटवलात तर सर्वांचं लगेच लक्षत येईल मग हे एफ डी सारखे कसे ? एफ डी मध्ये मुद्दल परत मिळते,, कृपया चुकीची तुलना करू नका .. ज्यांना हि रिस्क माहित नाही ते भलते करून बसतील
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Fri, 10/01/2021 - 12:12

In reply to दोन्हि सारखे कसे ? by चौकस२१२

Permalink

.

ज्यांना ऑप्शन बेसिक माहीत आहेत , हा धागा त्यांच्यासाठी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Fri, 10/01/2021 - 12:15

In reply to दोन्हि सारखे कसे ? by चौकस२१२

Permalink

.

विशेष सूचना : हे ट्रेड्स आपापल्या जबाबदारीवर करावेत हे लेखातच लिहिलेले आहे, ह्यात कुठेही कुणासाठीही कुणीही एक्सपर्ट रिकमामंडेशन देत नाही आहे. धाग्याचा उद्देश चर्चा व अभ्यास असा आहे
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Fri, 10/01/2021 - 17:48

In reply to . by hrkorde

Permalink

धाग्याचा उद्देश चर्चा व

धाग्याचा उद्देश चर्चा व अभ्यास असा आहे हो माहिती आहे पण आपण अश्या ट्रेंड (स्ट्रॅडल विकणे ) ची एफ डी ठेवणे याच्याशी तुलना केलीत म्हणून विचारले अगदी कवर्ड कॉल रायटिंग सुद्धा एफ डी ठेवी शी तुलना करू शकत नाही तर स्ट्रॅडल विकणे हे तर किती दूर माझे म्हणणे चुकत असेल तर सानगा ना कि स्ट्रॅडल विकणे आणि एफ डी ठेवणे यातील संधी आणि धोका दोन्ही सारखे कसे ते ?
  • Log in or register to post comments

Submitted by hrkorde on Fri, 10/01/2021 - 18:46

In reply to धाग्याचा उद्देश चर्चा व by चौकस२१२

Permalink

हं

आपले म्हणणे पटले शेअर मार्केट हे रिस्की आहे , एफ डी पेक्षा जास्त आहे, एफ डी जशी एक महिना , सहा महिने इ ठेवतात , तसे आता हे मार्जिन एक महिना अडकणार , आता त्यात मला बदल करायचा नाही , या अर्थाने त्याला फिक्स्ड असा शब्दप्रयोग केला. एफ डी अधिक सुरक्षित आहे शेअर मार्केट रिस्की आहे
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Sat, 10/02/2021 - 06:13

In reply to हं by hrkorde

Permalink

तसे आता हे मार्जिन एक महिना

तसे आता हे मार्जिन एक महिना अडकणार , आता त्यात मला बदल करायचा नाही , या अर्थाने त्याला फिक्स्ड असा शब्दप्रयोग केला. मार्क टू मार्केट रोजचे असते त्यामुळे त्यादृष्टीने पण ते "फिक्स्ड" होत नाही आपलया माहिती पुरवण्याच्या हेतू बद्दल शंका नाही पण अशी तुलना केली तर भलता अर्थ निघू शकतो म्हणून एवढे खोलात जाऊन बोललो अनेक ट्रेडिंग गुरु आणि भक्त काय वाटेल ते शब्द वापरता भारतात हे बघतलंय त्यातील गॅरंटी आणि आर्बिट्राज हे शब्द फार चुकीच्या पद्धतीने वापरले जातात ... असो आपली ऑप्शन स्ट्रॅटेजी बरोबर आलेख ग्राफ चिकटवा खूप उपयोग होईल सगळ्यांना
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com