Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज
ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले होते.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.
नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.
चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .
15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात
१. ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.
२. ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.
हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.
1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Nifty थंड असेल तर स्प्रेड लवकर व जास्त प्रॉफिटमध्ये येतो. समय हा स्प्रेडचा मित्र आहे तर मोमेंटम हा स्प्रेडचा शत्रू आहे , पण मोमेंटम रोज येत नाही , मार्केटचे 20 दिवस पकडले तर रोज 200 पॉईंट वरच किंवा खालीच जात मार्केट एकदम 2000 पॉईंट वर किंवा खालीच उलथले , असे होत नाही, अगदी क्वचित होते.
=====================================================================
इतर लोकप्रिय व्हेरिएशन्स
ह्यात अजुन काहि लोकप्रिय व्हेरिएशन्स आहेत.
१. विकली कॅलेंडर स्प्रेड : वरच्याप्रमाणेच पण वीकलिमध्ये करणे
2. विकली शॉर्ट स्ट्रॅडल करून त्याच आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे
3. पुढच्या आठवड्याचे कॉल पुट विकून ( शॉर्ट करुन) ह्या आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे
हे तिन्ही पर्याय सेमच प्रॉफिट लॉस पोटेन्शल देतात , मार्जिनदेखील सेम लागते , सुमारे 50000.
52 आठवड्यात प्रॉफिटवाले आठवडे किती आणि लॉसवाले किती असतील ?
इतरही काही ऑप्शन्स स्ट्रटेजी असतील तर त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
विशेष सूचना : हे ट्रेड्स आपापल्या जबाबदारीवर करावेत

विशेष सूचना : हे ट्रेड्स आपापल्या जबाबदारीवर करावेतवर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
हा धागा गुंतवणूक सदरात हलवण्यात यावा
हो की
लेख लिहिताना तसा ऑप्शन दिसला नाही.
hrkorde
सध्याचे लॉट साइझ
माहितीपूर्ण धागा.
काही मुद्दे
फ्रिक ट्रेडिंग सध्या जोरात
चार्ट
Pivot, privious day high,low
स्टॉप लॉस मस्ट.
इन्ट्राडे
इंट्राडे बद्दल लिहिण्यापेक्षा
कारण
नेकेड कॉल पुटच घ्यावे?
तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड
लॉट
निफ्टी ऑप्शन ची रुपये किंमत
नाही
निफ्टी ऑप्शन सेलसाठी निफ्टी
माझा प्रश्न थोडा चुकला ...
उत्तरे
बापरे , ह्यातले बरेचशे शब्द
बरोब्बर बोललात
https://www.cmegroup.com
ऑप्शन
युट्युब सर्च करा
धन्यवाद.
या सर्व प्रकारात प्रॉफिट /
जर ऑप्शन स्प्रेड केलात तर
फारसं समजलं नाही... थोडा
माहिती चांगली आहे ( एकदम
शेअरखानच्या ट्रेडिंग
...
Bank nifty short straddle
6000 रु प्रॉफिटला काढून टाकले
आणि नवीन पोझिशन घेतली
Dead cat bounce
.
उद्या पडेल म्हणतात
..
आदल्या दिवशी ३.१५ पुढे बाय
37000 short straddle , Oct
दर एक तारखेला ...
दोन्हि सारखे कसे ?
.
.
धाग्याचा उद्देश चर्चा व
हं
तसे आता हे मार्जिन एक महिना