लिली

Bhakti's picture
Bhakti in मिपा कलादालन
4 Jul 2021 - 3:59 pm

लिली म्हणजेच लिलीयम ही फुलं असंख्य प्रकारची आहेत.उन्हाळ्यात, पावसाळ्यात फुलणारी फुलं आपल्याकडे आढळतात.कंद (bulb) मातीत लावतात.त्यातील काही प्रकार.
१.पावसाळी पांढरी लिली(Rainy White Lily)
1

२.पावसाळी गुलाबी लिली(Rainy Pinky Lily)
2

३.पावसाळी पिवळी लिली(Rainy Yellow Lily)
33

४.स्पायडर लिली(White spider Lily)
4

५.नारंगी लिली
5

६.मे लिली(Football Lily)

34
हा फोटो नऊ वर्षांपूर्वीचा आहे.

अजून सहज आढळणारी लिली म्हणजे water लिली आणि फायर किंग शोधत आहे.

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

4 Jul 2021 - 5:03 pm | गुल्लू दादा

माझ्या आईला झाडांची प्रचंड आवड असल्याने बऱ्याच प्रकारचे झाडे घरी आहेत. कालच आमच्या मेसच्या काकूंना मी घरून 30-40 विविध प्रकारच्या कलमा आणून दिल्यात. लिली बद्दल एक आठवण म्हणजे. जर याचे बी जमिनीत पसरले तर प्रचंड त्रास होतो उपटून फेकताना. मागच्या वेळी घरी गेलो तर तेच काम होत माझ्याकडे. परेशान झालो होतो. या निमित्ताने कटू का असेना माझ्या आठवणी ताज्या केल्याबद्दल धन्यवाद.

ओह, माहितीसाठी धन्यवाद.

प्रचेतस's picture

4 Jul 2021 - 7:41 pm | प्रचेतस

फोटो मस्त आहेत एकदम.

गोरगावलेकर's picture

4 Jul 2021 - 8:38 pm | गोरगावलेकर

माझ्या बाल्कनीतील गुलाबी लिली

Bhakti's picture

4 Jul 2021 - 8:45 pm | Bhakti

धन्यवाद
प्रचेतस आणि गोरगावलेकर काका .
गुलाबी लिली सुंदर फुलली आहे.

चौथा कोनाडा's picture

4 Jul 2021 - 8:55 pm | चौथा कोनाडा

सुंदर लिलींचे सुंदर फोटोज !

कंजूस's picture

4 Jul 2021 - 9:43 pm | कंजूस

पावसाळी म्हटली तरी पांढरीला वर्षभर थोडी फुले येतात. बाकीच्या पावसाळी. आणि बिया पिवळीला येतात.

स्पाईडरची फुले म्हणजे हारातली फुले. मंद सुवास येतो. वर्षभर थोडी आणि पावसाळ्यात अधिक.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jul 2021 - 9:02 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त नयनरम्य छायाचित्रे
अत्यंत आवडल्या गेली आहेत
पैजारबुवा,

Bhakti's picture

5 Jul 2021 - 12:29 pm | Bhakti

चौकोजी, कंजूस काका, पैजारबुवा.
@कंजूस काका होय पिवळ्या लिलीला बिया पाहिल्या आहेत.मागणीमुळे स्पायडर लिलीची अनेक ठिकाणी शेती केली जाते.

मदनबाण's picture

5 Jul 2021 - 10:36 pm | मदनबाण

वाह, हल्लीच घरी मोगरा आणि मदनबाण म्हणजे मोगर्‍यांच्या कुळातील राजा अशी मोगर्‍याची दोन रोपटी आणली आहेत. :)
हल्ली मोठ्या पात्रात पाण्यात तरंगणारी फुले ? असतात त्याला काय म्हणतात ? हे कोणास ठावूक आहे काय ? वॉटर लिली असा काही प्रकार असतो का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।10.25।।

मदनबाण's picture

5 Jul 2021 - 11:31 pm | मदनबाण

मदनबाण
जागु तै मदनबाण म्हणजे मोगर्‍यांच्या कुळातील राजा या एका वाक्याने तुला लॉगिन व्हायला भाग पाडलं ना ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।10.25।।

बेकार तरुण's picture

6 Jul 2021 - 10:01 am | बेकार तरुण

खूप छान...

टर्मीनेटर's picture

7 Jul 2021 - 5:28 pm | टर्मीनेटर

मस्त आहेत सगळे फोटो!
आणि हो... गोरगावलेकर 'काका' नाहीयेत हो, त्यांना ताई म्हणा, किंवा नुसते गोरगावलेकर म्हणा...

काका, काकू, ताई काहीही म्हणू द्या. फोटो आवडला हे त्यांनी आवर्जून सांगितले ह्यातच समाधान.

धन्यवाद मदनबाणज,बेकार तरूण,टर्मीनेटर
आणि हो गोरगावलेकर यांच्या बाबतीत माझा घोळ झालाय हे मला नंतर ध्यानात आले खरे :)

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

8 Jul 2021 - 9:57 pm | सौ मृदुला धनंजय...

फोटो अप्रतिम आहेत

सगळ्या लिलि सुंदर आहेत.

अनिंद्य's picture

8 Sep 2021 - 8:36 pm | अनिंद्य

सुंदर लिली संग्रह !

फोटो छान आले आहेत, विशेष करून पांढऱ्या लिलीजचा.

गोरगावलेकरांचा फोटोही सुंदर आहे.