मदनबाण म्हणजे मोगर्यांच्या कुळातील राजाच म्हणायला हरकत नाही. नुसताच आकाराने नाही तर सुगंधानेही हा राजाच आहे. नावात आणि दिसण्यात जरी ह्याच्या कळीत बाण असला तरी ह्याची कळी म्हणजे जणु नाजूक, सुंदर नारच दिसते. फुलाच रुपही तितकच मनमोहक असत.
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
प्रतिक्रिया
24 Apr 2012 - 3:29 pm | अमोल खरे
मला आधी वाटलं की आपल्या मिपावरच्या मदनबाणाचे फोटो टाकलेत म्हणुन. पानांच्या आड कुठे त्याचा चेहरा दिसतोय का पाहात होतो ५ मिनिटे. बाकी फोटो मस्तच.
24 Apr 2012 - 3:37 pm | पियुशा
मला वाट्ल मामुनेच( म.बा.) फोटो टाकलेत अन चुकुन शिर्षकात त्याचच नाव घातलय ;)
अशा नावाच फुल असत हे आजच कळल्.मस्त आहे फोटु :)
जागु तै एखादी फक्कड रेसेपीपण टाक ना :) बरेच दिवस झालेत
25 Apr 2012 - 12:43 am | पाषाणभेद
अगदी मलाही तसेच वाटले. मस्त माहीती मिळत असते तुमच्याकडून.
24 Apr 2012 - 3:38 pm | प्यारे१
ॐ 'गणेशा'य नम:
फोटो दिसण्यासाठी किती वेळा हा मंत्र म्हणावा????
24 Apr 2012 - 3:44 pm | रुमानी
.
मोगरा मस्त! .
24 Apr 2012 - 3:48 pm | मदनबाण
वा... माझ्या नावाचे सुगंधी फुल ! ;)
मस्त फोटो ! :)
बाकी माझ्या मदनबाण आयडी घेण्यामागची कथा याच धाग्यावर आटपुन टाकतो.
जेव्हा मिपावर आलो होतो, तेव्हा अनेक फंडु फंडु आयडीज होते,मग इचार केला कंच नाव घ्याव? एक आठवडा फकस्त इचार करण्यातच घालवला... मला आयडीत ५ अक्षरेच हवी होती. मग एक व्यक्तीरेखा आठवली... अभिनेता चंदु पारखी यांनी साकारलेल्या एका व्यक्तिरेखेचे नाव मदनबाण होते,काळाच्या पडद्याआड अनेक जेष्ठ अभिनेत्यांची नावे जातात, पण त्यांची एक वेगळी आठवण राहवी म्हणुन मी हे आयडी नाम धारण केले. :)
(सुगंध प्रेमी) ;)
24 Apr 2012 - 4:28 pm | अत्रुप्त आत्मा
जागु तै...नेहमी प्रमाणेच सुंदर धागा... मस्त :-)
@अभिनेता चंदु पारखी यांनी साकारलेल्या एका व्यक्तिरेखेचे नाव मदनबाण होते,काळाच्या पडद्याआड अनेक जेष्ठ अभिनेत्यांची नावे जातात, पण त्यांची एक वेगळी आठवण राहवी म्हणुन मी हे आयडी नाम धारण केले. >>> मदनबाण,,, तुमच्या नावनिवडीला सलाम आपला --^--
24 Apr 2012 - 4:43 pm | स्मिता.
नेहमीप्रमाणे सुंदर फुलं. कळी कुंदासारखी दिसतेय तर फुल अनंतासारखं :)
24 Apr 2012 - 5:11 pm | सुहास झेले
मस्त गं जागुतै..... !!!
24 Apr 2012 - 7:20 pm | रेवती
हे फूल किती वर्षांनी पाहिलं. मस्तच. याला मदनबाण म्हणतात हेच मुळात माहित नव्हतं.
आधी वाटलं बाणाचे फटू चढवलेत काय?
24 Apr 2012 - 7:31 pm | गणपा
एला ही नवीच माहिती कळली.
25 Apr 2012 - 10:27 am | जागु
मदनबाण तुमच्या नावाचा इतिहास त्यानिमित्ताने कळला.
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
25 Apr 2012 - 2:30 pm | सानिकास्वप्निल
मस्तचं :)
25 Apr 2012 - 2:39 pm | इरसाल
किती किती सुंदर आहे. फुलाचे शुभ्रपण भावले.
25 Apr 2012 - 6:30 pm | राही
ह्या फुलाला काही ठिकाणी कस्तुरी मोगरा म्हणतात. नेहमीच्या मोगर्यापेक्षा तो खूपच महाग मिळतो.
26 Apr 2012 - 10:21 am | जागु
राही छान नाव आहे कस्तुरी मोगरा. हो हा महाग असतो खुप इतर मोगर्यापेक्षा.
सानिका, इरसाल धन्यवाद.