चालू घडामोडी : सप्टेंबर २०१९

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
1 Sep 2019 - 10:37 am
गाभा: 

नमस्कार !
समस्त मिपाकरांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा !

आसाममधे एनआरसी ने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीतून जवळ जवळ १९ लाख नागरीकांची नावे वगळली आहेत.
सुमारे १९ लाख नागरिक एनआरसीने जाहीर केलेल्या यादीतून बाहेर राहिले आहेत. शनिवारी सकाळी ही यादी जाहीर करण्यात आली. सरकारी कारवाई टाळण्यासाठी या लोकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. यापूर्वी गेल्या जुलैमध्ये जाहीर झालेल्या एनआरसीच्या मसुद्यात ४१ लाख लोकांची नावे नव्हती. सुमारे ३ कोटी ११ लाख नागरिकांचा या यादीत समावेश आहे. राज्यातील बेकायदा स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी ही यादी तयार करण्यात आली आहे. यापूर्वी १९५१मध्ये अशा प्रकारची यादी जाहीर करण्यात आली होती.

यादीत मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या असण्याची शक्यता सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. ओवेसींनी भाजपावर पुन्हा एकदा मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप केला आहे. ही यादी पुन्हा जरी तपासली आणि ५०% टक्के यादी जरी बरोबर म्हटली तरी ९-१० लाख हा घुसखोरीचा आकडा प्रचंड मोठा आहे. सरकार एवढ्या मोठ्या लोक संख्येवर कारवाई करु शकणार का हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.

आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार काय ? ह्यावर रोजच वर्तमानपत्रात छापून येत आहेत. मात्र "आमचं ठरलयं" असं दोन्ही पक्ष सांगतात त्यामुळे नेमके काय होईल याचा अंदाज अजून येत नाहिये.

राष्ट्रवादीचे बडे नेते तर सोडून चाललेतच पण आता पवारांचे नातेवाईक देखील सोडून चाललेत. कालच मुख्यमंत्र्यांनी पुढचा विरोधी पक्ष नेता काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा नसेल तर वंचित आघाडीचा असेल असे वक्तव्य केले. महाराष्ट्रातील निवडणूका दिवाळीपूर्वीच पार पडतील असा अंदाज आहे.

चतुर्थी आणी चतुर्दशीला नेहमीप्रमाणे गणेश भक्त गावी जाताना / येताना ट्राफीक जाम मधे तासन तास अडकतील, त्यांचे कसे हाल झाले, रस्ते कसे खराब झाले आहेत, कोणत्या गल्ली च्या राजाला किती किलो सोने मिळाले अशा नेहमीच्या बातम्या येत्या १० दिवसात जास्त प्रमाणावर दिसतील. मंदिमुळे सणावर कसा परिणाम झाला हे वाचायला मिळेल.

मिपावर एखाद दुसरा ध्वनीप्रदुषण, पर्यावरणात्मक / प्रबोधनपर लेख येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या सर्व अडचणींवर मात करुन असे न म्हणता, या सर्व अडचणी आहेत तशा स्वीकारुन किंवा जमल्यास त्यांना वळसा घालून आपण गणरायाचे स्वागत करुया, १० दिवस राजकारणापासून शक्य झाले तर सुट्टी घेऊन नातेवाईक, कुटुंबियांना भेटूया, एकत्र येऊ या आणि गणेशोत्सव साजरा करुया. आणि हो, मिपा श्रीगणेश लेखमालेचा आनंद घेऊया.

धन्यवाद !
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !

प्रतिक्रिया

स्वलिखित's picture

1 Sep 2019 - 11:32 am | स्वलिखित

आमच्या इकडे ऊसाला कोल्हे लागल्यावर कोल्हे बाहेर काढत नाहीत, ऊस पेटऊन देतात

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Sep 2019 - 11:55 am | डॉ सुहास म्हात्रे

HAL-made "Dornier 228" aircraft can now be used in Europe

हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडने (HAL) बनविलेल्या "Dornier 228" या विमानाला भारताच्या Directorate General of Civil Aviation (DGCA) ने २०१७ मध्येच व्यापारी वापराचे प्रमाणपत्र दिले आहे. आता, त्याला European Union Aviation Safety Agency (EASA) नेही प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे, या "मेड इन इंडिया" विमानाची युरोपला निर्यात होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

हे कमी अंतराच्या विमानप्रवासासाठी वापरले जाणारे हे १९ आसनांचे विमान ४२८ किमी/तास वेगाने ७०० किमी अंतर पार करू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वच्छ भारत अभियान राबविल्याबद्दल बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून पुरस्कार जाहीर झाला आहे.

विक्रम आणि प्रज्ञान ने चंद्र यान सोडले.

आता चंद्राकडे कूच. चंद्राच्या अज्ञात क्षेत्रात उतरण्याचे श्रेय्य भारतास मिळणार.

JNU प्रशासनाने " द रोमिला थापर" ला
आपला बायोडेटा सादर करायचा आदेश दिला आहे . गेली २३ वर्ष "रोमिला थापर" JNU मध्ये प्रोफेसर होती. सध्या 86 वर्षाची रोमिला थापर JNU ची
एमिरेटस प्रोफेसर ( आजन्म प्राध्यापक) आहे. सर्वसाधारण पणे प्राध्यापक वयाच्या ६० साली निवृृृृृत्त होतात पण काही खास लोक आजन्म कमाई करत असतात. नेहरु खानदानातली म्हणजे खुपच खास !! डाव्या विचारसरणीची रोमिला थापर ही पं नेहरुची नातेवाईक आहे !!

रोमिला थापरला बायोडेटा मागीतल्यावर बाकीचे डावे पेटुन उठले आहेत ! ह्यात आघाडीवर आहे डाव्या विचारसरणीचा ईरफान हबिब !

ह्याच डाव्या विचारसरणीच्या लोकांनी भारताच्या ईतिहासाला पुर्णपणे बदलल ! शुरवीर हिंदु राज्यांचा सुवर्णकाल पुर्णपणे पुसुन टाकला. ईतकच नाही तर अयोध्येच्या रामजन्म भुमिला हिंदु नव्हेतर जैन बुद्ध धर्मासंबधीत स्थळ अशी नवी ओळख दिली .

माकडतोंड्या's picture

3 Sep 2019 - 6:56 pm | माकडतोंड्या

ही बया कलंक आहे इतिहास संशोधन क्षेत्राला

चतुर्थी आणी चतुर्दशीला नेहमीप्रमाणे गणेश भक्त गावी जाताना / येताना ट्राफीक जाम मधे तासन तास अडकतील, त्यांचे कसे हाल झाले, रस्ते कसे खराब झाले आहेत, कोणत्या गल्ली च्या राजाला किती किलो सोने मिळाले अशा नेहमीच्या बातम्या येत्या १० दिवसात जास्त प्रमाणावर दिसतील. मंदिमुळे सणावर कसा परिणाम झाला हे वाचायला मिळेल.

मिपावर एखाद दुसरा ध्वनीप्रदुषण, पर्यावरणात्मक / प्रबोधनपर लेख येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या सर्व अडचणींवर मात करुन असे न म्हणता, या सर्व अडचणी आहेत तशा स्वीकारुन किंवा जमल्यास त्यांना वळसा घालून आपण गणरायाचे स्वागत करुया, १० दिवस राजकारणापासून शक्य झाले तर सुट्टी घेऊन नातेवाईक, कुटुंबियांना भेटूया, एकत्र येऊ या आणि गणेशोत्सव साजरा करुया. आणि हो, मिपा श्रीगणेश लेखमालेचा आनंद घेऊया.

+१००

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2019 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

Tough to prove 'Kashmir genocide' claim: Pakistan's ICJ lawyer

काश्मिरबाबत जगभर कांगावा करत फिरणार्‍या पाकिस्तानच्या गालावर, प्रत्येक देश आणि आंतरराष्ट्रिय संस्था, चपराक लावत आहेतच. पण, आज त्यांच्यावतीने आंतरराष्ट्रिय कोर्टात केस लढविणारा (उदा : कुलभूषण जाधव केस) वकील, खवर कुरेशी, यानेसुद्धा टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत घरचा आहेर दिला आहे !

वकिलाने त्या मुलाखतीत, "आंतरराष्ट्रिय कोर्टात भारताविरुद्ध काशिमरमध्ये नरसंहाराचा किंवा इतर कोणता मुद्दा घेऊन जाण्यासाठी पाकिस्तानच्या हाती कोणताच सबळ पुरावा नाही", असे स्पष्टपणे सांगितले. हाच एक मुद्दा पाकिस्तानच्या हाती उरला होता, तोसुद्धा फुसका असल्याचे त्यांच्याच वकिलाने सांगितले आहे. त्यामुळे, आता यापुढे अजून काय काय "खोटे मुद्दे बनवावे" असा प्रश्न पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयला पडला आहे (याबाबतीत, इम्रानचा विचार करण्याचा प्रश्नच नाही... त्या बिच्यार्‍याला ना डोके आहे, ना काही ठरवण्याचा अधिकार... त्याला केवळ लिहून दिलेली पोपटपंची करण्याचा आदेश पाळावा लागतो). :)

***************

युरोपियन युनियनने पाकिस्तानला अजून एक धक्का दिला आहे

इयुच्या अधिकृत मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात, "३७० कलमाला रद्दबातल केल्यामुळे अतिरेकाला ताब्यात आणण्यासाठी मदत होईल", असे विधान केलेले आहे. ही तर भारताची अधिकृत भूमिका आहे. त्यामुळे, इयुकडून पाकिस्तानला काही भीक घातली जात नाही, हे स्पष्ट होत आहे.

Abrogation of Article 370 will help curb terrorism, says European Parliament

डँबिस००७'s picture

3 Sep 2019 - 9:33 pm | डँबिस००७

M O Mathaiच्या पुस्तकातुन ,

When we talk of former Prime Minister Indira Gandhi, many Congressmen say that she is the Iron Lady of India; she divided Pakistan into two and many more. But will they speak up about the dark secrets of her?

M.O. Mathai was the Private Secretary to India’s first Prime Minister, Jawaharlal Nehru. He served as Nehru’s special assistant from 1946 to 1959. But Nehru’s personal secretary got too personal with Indira Gandhi. Yes, M.O. Mathai who was with Nehru, knew everything about the Nehru family, actually a bit too much. Mathai wrote a book named “Reminiscences of the Nehru Age” in which he has stripped naked the Nehru family. Several secrets of Nehru is revealed .
In his book Mathai has shown immense respect towards Nehru but he has even openly spoken out of the intimate relationship Nehru had with Edwina, Padmaja Naidu (Sarojini Naidu’s daughter), Mridula Sarabhai and many others. Nehru was deeply busy in impressing these ladies that he forgot to take care of India. Eventually, India lost the 1962 Indo-China war.

डँबिस००७'s picture

4 Sep 2019 - 5:09 pm | डँबिस००७

मनमोहन सींग पंत प्रधान व चिद्दु फायनांस मिनिस्टर असताना काँग्रेसच्या काळात शेतकर्यांच्या आत्महत्या होत असत
ह्याच्या पेक्षा लाजीरवाणी गोष्ट नसेल !!
का ?
अहो घरच्या बागेत, कुंडीतल्या बागेत फायनांस मिनिस्टर चिद्दु लाखो / कोटी रुपयाच्या भाज्या उगवत असे. अश्या भाज्यांमुळे फायनांस मिनिस्टर चिद्दुचे ईंनकंम टॅक्स रिटर्न्सचे आकडे फुगलेले होते असे साक्षात ईंनकंम टॅक्स अधिकार्यांनीच मुलाखतीत सांगीतले !!

इतकी प्रगत पद्धतीने घराच्या गच्चीवत बाग फुलवुन कोट्याधी रुपये कमावणार्या फायनांस मिनिस्टर चिद्दुला भारतातील गरीब शेतकर्यांना अशी प्रगत पद्धत शिकवावेसे का वाटले नाही हा प्रश्न मला पडलेला आहे.

कॉग्रेसच्या कर्नाटकातील नेते शिवकुमारच्या नावावर १२५ फ्लॅट मुंबईत आहेत. ह्या शिवाय बर्मिंगहॅम, युरोप दुबईत मध्ये व्हीलाज , मॉल सुद्धा आहेत. राजकारण सुरु करताना सुरुवातीला त्याची पॉपर्टी फक्त ७५ कोटी होती , आता ती फुगुन तब्बल ८५० कोटी झालेली आहे.

lakhu risbud's picture

4 Sep 2019 - 11:53 pm | lakhu risbud

छे छे !! असे कसे ??
आपण खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेऊ नये. लोकसत्ताच्या मते शिवकुमार वर हे सगळे कथित भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

डँबिस००७'s picture

5 Sep 2019 - 7:17 pm | डँबिस००७

शेवटी चिदंबरमला सु कोर्टाने तिहाड जेल मध्ये आज पाठवले.

कंजूस's picture

5 Sep 2019 - 8:29 pm | कंजूस

अरे काय हे?
आरोप आणि गोळा केलेले पुरावे ठेवा ना कोर्टासमोर पटापट. उगाच वेळ जातोय.

डँबिस००७'s picture

5 Sep 2019 - 9:27 pm | डँबिस००७

>>>>>आरोप आणि गोळा केलेले पुरावे ठेवा ना कोर्टासमोर पटापट.<<<<<
आरोपी चिद्दुवर "पुराव्याची छेडछाड करणार" ह्या कारणाने कोर्टा समोर पुरावे सादर करत नाहीत अशी कारणे दिलेली आहेत !!
चिद्दुवर ६-७ केस वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत !!

डँबिस००७'s picture

5 Sep 2019 - 9:31 pm | डँबिस००७

जागतिक किर्तीचे नेते मा. मोदीजी जगातील पहीले असे पंत प्रधान ठरले आहेत ज्यांना सर्वात जास्त दुसर्या देशाचे सर्वोच्च सन्मान मिळालेले आहेत !
भारताच्या पंत प्रधाना पैकी असे दुसर्या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे मन मोहन सिंग व श्रिमती ईंदिरा गांधी आहेत ज्यांना प्रत्येकी एक सन्मान मिळाला . तो पण बांग्ला देशाचा !!

डँबिस००७'s picture

5 Sep 2019 - 9:34 pm | डँबिस००७

अब्दुल बासित तुम्हाला आठवत असेलच !! तोच ज्यांने शोभा डे ला भारत सरकारच्या काश्मिर विरुद्ध लेख लिहायला सांगितले होते !! ह्या बासित ने हल्लीच एक फोटो ट्विट केला,

पण त्याच्या ह्या खोट्या फोटोचा पर्दा फाश झाला !! फोटोतले पाॅर्न कलाकार असल्याच समोर आले !! हे कळल्यावर बासितने ट्विट पुसला ! पण ट्रोल झालाच !! हाईट म्हणजे त्या पाॅंर्न कलाकाराने सुद्धा बासितला जवाब दिला !

डँबिस००७'s picture

5 Sep 2019 - 9:58 pm | डँबिस००७

अब्दुल बासित

डँबिस००७'s picture

5 Sep 2019 - 10:14 pm | डँबिस००७

संजय दत्त आणि राहुल गांधी यांच्या काय नात आहे ?

"मोतिलाल नेहरु" यांच्या बर्याच बायकांपैकी एक होती "दिलीपा देवी". ही नवाबाच्या दरबारी गायिका होती.
मोतिलाल नेहरु" व "दिलीपा देवी"ची मुलगी "जद्दन देवी". ही सुद्धा एक गायिका होती. "नर्गिस " ही ह्या जद्दन देवी"ची मुलगी !! "संजय दत्त" हा ह्या नर्गिसचा मुलगा !!
संजय दत्त व राहुल गांधी हे नातेवाईक आहेत.

विजुभाऊ's picture

17 Sep 2019 - 1:04 pm | विजुभाऊ

चड्डीवाल्यांची आणखी एक नवी वावडी.
उचलली जीभ आणि लावली आभाळाला……..
कुठच्या कुठे लिंक जोडल्या आहेत.
उद्या म्हणाल की ब्रेट ली आणि ब्रूस ली हे दोघे भाउ भाउ आहेत म्हणून.

डँबिस००७'s picture

5 Sep 2019 - 10:58 pm | डँबिस००७

1. Unbiased Proud
2. Anti-Establishment Biggrin
3. journalist Rofl
Ravish Kumar on ecomomic slowdown
https://twitter.com/Gujju_Er/st

डँबिस००७'s picture

6 Sep 2019 - 3:58 pm | डँबिस००७

मा मोदीजींचा साधेपणा !!
रशिया तल्या वोलाॅडीवोस्टाॅक यैथे भरलेल्या अती पुर्व देशांच्या संम्मेलनानंतर झालेल्या प्रेस काॅंफेरेंस मध्ये मा मोदीजींसाठी स्पेशल सोफा व दोन्ही बाजुला ईतर देशांच्या नेत्यांसाठी खुर्च्या ठेवलेल्या होत्या. मा मोदीजीनी हे बघितल्यावर सोफा हटवुन ईतर नेते बसणार तशीच खुर्चीची व्यवस्था करण्यास सांगुन तिथे उपस्धित सगळ्या नेत्यांची मन जिंकली !!
https://youtu.be/ymv3KmaVM2Q

शशिकांत ओक's picture

10 Sep 2019 - 12:53 am | शशिकांत ओक

व्यवस्थित मांडामाड करून फोटो सेशनच्या ऐनवेळी मोडींनी तो गुबगुबीत सोफा हटवायला लावून आपल्या हट्टी स्वभावाचे दर्शन घडवले. मोडी समर्थक भक्तगण अहो रूपम वगैरे गुणगान करायला मोकळे झाले!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2019 - 9:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

हाँग काँग मधील लोकशाही अधिकार कायम ठेवण्यासाठी चाललेली निशस्त्र नागरिकांची शांतीपूर्ण निदर्शने आणि चिनी पोलिस रबर बुलेट्स, अश्रूधूर आणि दंडूकेशाहीने मोडून काढत आहेत...

हाच चीन भारताला काश्मिरमध्ये लोकशाही तत्वे पाळायचा सल्ला देतो आणि पाकिस्तानला संयुक्त राष्टात मदत करतो.

ढोंगीपणाची कमाल म्हणजे, काश्मिरच्या अतिरेकी आणि फुटीरतावद्यांच्या बाजूने फेकन्युज फॅक्टरी चालवणारे भारतिय डावे, प्रेस्टिट्युट्स, बीबीसी, न्युयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, अ‍ॅम्नेस्टी, इत्यादी हाँग काँगच्या बाबतीत पायात शेपटी घालून गप्प आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2019 - 2:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

Chandrayaan-2: We got the image of Vikram lander, communication yet, says Isro chief

भारताच्या चंद्रयान२ प्रकल्पातील, चंद्रावर उतरणार्‍या "विक्रम" या भागाचा, चंद्रापासून २.१ किमी दूर असताना, पृथ्वीशी संपर्क तुटला. मात्र, चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असलेल्या "ऑर्बायटर" यानाने, चंद्रावर उतरलेल्या "विक्रम"चे फोटो घेऊन पृथ्वीवर पाठवले आहेत.

जर विक्रम उत्तम अवस्थेत असेल आणि त्याच्या कार्यप्रणाली सुरु होऊन, परत संदेशवहन करू लागल्या, तर चंद्रयान मोहिमेचे चंद्राच्या पृष्ठ्भागावरचे संशोधन सुरु करता येईल. तसे झाले नाही तरीही, सर्व प्रकल्प फुकट गेला असेही नाही. कारण, सुमारे ९५% संशोधन प्रणाल्या ऑर्बायटरवर आहेत व त्या उत्तम अवस्थेत आहेत. ऑर्बायटर पुढील ७.५ वर्षे चंद्राभोवती फेर्‍या मारत आपले निर्धारीत काम करत राहणार आहे.

डॉक्टर सुहास म्हात्रे,

आत्तापर्यंतच्या सर्व बातम्यांत केवळ संपर्क खंडित झाला इतपतच माहिती आहे.

वाहिन्यांवर व इतरत्र मोहीम ९५% यशस्वी झाली म्हणजेच थोडक्यात फसली असं म्हणण्यात येतंय. मात्र विक्रम खरोखरंच आपटलंय का ते आजूनही नक्की झालं नाहीये. कदाचित ते व्यवस्थित उतरलं असेलही. अशा परिस्थितीत परत संपर्क प्रस्थापित होऊही शकतो.

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Sep 2019 - 12:57 am | डॉ सुहास म्हात्रे

"विक्रमचे हार्ड लँडिंग झाले आहे. त्याचे तुकडे झालेले नाहीत पण ते एका बाजूला कललेल्या अवस्थेत आहे, असे ऑर्बिटरवरून मिळालेल्या फोटोत दिसत आहे आणि त्याच्याशी अजून संपर्क साधणे शक्य झालेले नाही." असे इस्रोने दिलेल्या निवेदनात सांगितले आहे.

विक्रमची संदेशवहन यंत्रणा चंद्राच्या पृष्ठभागाच्या २.१ किमीवर असताना बंद पडली होती ती अजून सुरू झालेली नाही. पॉवर सप्लायला धोका पोहोचल्याने ती बंद पडलेली असली तर अजून काही आशा आहे... कारण, विक्रमवर सोलार डिश आणि एक छोटी आपत्कालीन वापराची बॅटरी आहे. सद्याच्या विक्रमच्या स्थितीत संदेशवहन करणारी अँटेना त्याच्या खालच्या बाजूला आहे. (अ) पॉवर सप्लाय सुरु झाला आणि (आ) जर संदेशवहन अँटेनालाशी ऑर्बायटरला संपर्क करता आला, तर काही उपाय होऊ शकेल. मात्र, हे सगळे पर्याय सद्या तरी फक्त, "जर तर" असेच आहेत. त्यामुळे, प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर शास्त्रिय निरिक्षणे करणे विक्रमला सद्या तरी शक्य नाही. तरीही, विक्रमवरच्या प्रणाल्यांचा जीवनकाल ७ ऑगस्टपासून १४ दिवसांपर्यंत आहे... व २१ तारखेपर्यंत इस्रोचे संशोधक विक्रमला कार्यरत करण्याचा प्रयत्न चालूच ठेवणार आहेत.

दु:खात सुखाची गोष्ट अशी की शास्त्रिय संशोधनासाठी पाठवलेल्या प्रणाल्यांपैकी ९०-९५% ऑरबायटरवर आहेत, त्या १००% सुस्थितित आहेत आणि त्यांनी काम सुरू केले आहे... ते काम पुढचे १ वर्ष किंवा जास्त वेळ चालू राहील.

शाम भागवत's picture

10 Sep 2019 - 10:31 pm | शाम भागवत
शाम भागवत's picture

10 Sep 2019 - 10:32 pm | शाम भागवत

लँडरचा ऑर्बिटरशी संबंध झालाय.

शाम भागवत's picture

11 Sep 2019 - 8:08 am | शाम भागवत

नाही हो.
हे मिडियावाले टिआरपीसाठी किती उतावीळ झालेले असतात, ते सांगतोय.

https://youtu.be/ACJmWXD5fWM
ही लिंक आमच्या नातेवाईकांच्या ग्रुपवर फिरली व सगळ्यांनाच मनस्ताप झाला.

मिडियासाठी काहीतरी आचारसंहिता पाहिजे बाॅ.

शाम भागवत's picture

10 Sep 2019 - 10:35 pm | शाम भागवत

लँडरचा ऑर्बिटरशी संबंध झालाय.
असं इंडिया टिव्हीवर ७ तारखेला का सांगितल जात होतं कळत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2019 - 12:29 am | डॉ सुहास म्हात्रे

आजच्या दिवसाचे इस्रोचे अधिकृत निवेदन असे आहे...

September 10, 2019

Vikram lander has been located by the orbiter of Chandrayaan-2, but no communication with it yet. All possible efforts are being made to establish communication with lander.

इस्रो वेळोवेळी देत असलेली अधिकृत माहिती पुढील दुव्यावर मिळेल : https://www.isro.gov.in/chandrayaan2-latest-updates

शाम भागवत's picture

11 Sep 2019 - 8:10 am | शाम भागवत

_/\_

डँबिस००७'s picture

9 Sep 2019 - 9:31 pm | डँबिस००७

NDTV चे पत्रकार पल्लव बागला !!
तोच, जो ईज्रोच्या पत्रकार परिषदेत ईज्रो शास्त्रज्ञांवर खेकसत होता. शेवटी जेंव्हा प्रकरण अंगावर शेकल तेंव्हा सगळ्यांची माफी मागीतली !!
त्यावर NDTV च्या अध्यक्ष प्रणय राॅयच म्हणण होत की पल्लव बागला ने जे केल ते चुकीच होत. पण पल्लव बागलाने ईज्रोची सेवा शास्त्रज्ञांपेक्षा जास्त केलेली आहे . त्यावर नेटकर्सनी
पल्लव बागलाची पाळमुळे च खणुन काढली. त्या नेटकर्सनुसार पल्लव बागलाने ईज्रोचे फोटो परवानगी शिवाय गेट्टी नावाच्या साईटला विकल्या !! प्रत्येक फोटोचे ₹२६,००० प्रमाणे.
शेवटी NDTV च्या पत्रकाराकडुन अजुन काय अपेक्षा असेल !!

व्हाट्सएपवर पाठवून तमाम मित्राचीं दिवसभर डोकी तापवली होती , पण त्याने इसरो चे फोटो विकले ही नवीनच माहिती भेटली .
धन्यवाद !!!
लिंक शोधून पुन्हा डोकी तापवायला घेतो .

यू टर्न स्पेशलिस्ट अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांना सकासकाळी घाई होते. मग ते बसल्या बसल्या बोटे हळुवारपणे फिरवत ट्वीटींग करून सरकारचे धोरण बदलून टाकणारे संदेश पाठवतात. काहींना घरी पाठवतात. तर काहींना आपली नियुक्ती झाल्याचे कळते. इम्रान खानची फिरकी घेऊन त्यांना खुषीत घरी पाठवल्यावर पुढल्या ट्वीटींग वरून कळते की आपण तर उल्लू बनलोय!

यशोधरा's picture

11 Sep 2019 - 4:00 pm | यशोधरा

लेख वाचला, आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2019 - 4:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर वास्तविक आणि समतोल लेख.

सुबोध खरे's picture

11 Sep 2019 - 7:19 pm | सुबोध खरे

यथातथ्य लिखाण
अगदी असाच दृष्टिकोन माझ्या काश्मीर मधील लष्करी मित्रांकडून पाहायला मिळतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2019 - 9:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

काश्मिरच्या बाबत जगभर थयथयाट करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानला घरचे आहेर मिळण्याचे काही थांबत नाही ! =))

१. Kuwait refuses to allow anti-India protest by Pakistani groups

कुवेतमधील All Pakistan Overseas Organisation International (APOOI)ने भारताने ३७० कलम रद्दबातल करण्याविरुद्ध आणि काश्मिरमधील कारवाईविरुद्ध निषेध मोर्चा काढण्याचे ठरवले होते. पण, कुवेतने त्याला परवानगी नाकारली इतकेच नव्हे तर, त्या संघटनेच्या तीन मुख्य पाकिस्तानी म्होरक्यांना कैद केले.

२. UAE tells Pakistan, Kashmir is not all Muslim community issue

भारताच्या काश्मिर कारवाईविरुद्ध इस्लामी देशांचे (उम्मा) मत तयार करण्यासाठी व भारताला त्याचे निर्णय परत घेण्यासाठी दबाव आणण्याच्या उद्येशाने, पाकिस्तानने सौदी अरेबिया आणि युएई या दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना खास आमंत्रण देऊन बोलविले होते. परंतु, पाकिस्तानला ठाम नकार देवून दोन्हीही परराष्ट्रमंत्र्यांनी, "काश्मिर प्रश्न उम्माचा (जगभरच्या सर्व मुस्लिम समाजाचा) नसून तो भारत व पाकिस्तानमधील द्विराष्ट्रिय प्रश्न आहे." असे पाकिस्तानच्याच भूमीवर सांगून पाकिस्तानला उलटे लटकावून मिरच्यांची धुरी दिल्यासारखे केले आहे !

अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत, फार मोठी मुस्लीम लोकसंख्या असलेला अण्वस्त्रधारी देश म्हणून उम्मामध्ये (जगभरच्या सर्व मुस्लिम समाजामध्ये) दबदबा असलेल्या पाकिस्तानला, इतके घरचे जोडे यापूर्वी कधीच मिळाले नव्हते (किंबहुना, तसे करण्याचे धाडस सौदी अरेबियासकट कोणत्याच देशाने केले नव्हते) !!! =)) =)) =))

भंकस बाबा's picture

11 Sep 2019 - 10:52 pm | भंकस बाबा

ट्रम्पतात्यानी अफगनिस्तानमधून सैन्य पाठी घ्यायला नकार दिला. आता या निर्णयाचा पाकिस्तानच्या राजकारणावर क़ाय परिणाम होईल हे पाहणे मनोरंजक ठरेल. याचा दूसरा अर्थ असाही होत आहे की अमेरिकेला आता मनापासून पाकिस्तान बेभरवशाचा व धोकादायक वाटत आहे.

डँबिस००७'s picture

12 Sep 2019 - 2:52 pm | डँबिस००७

भारत रक्षा मंत्रालय व अमेरिकेच्या डिफेंस सेक्रेटरी हॉट लाईन ने लवकरच जोडले जाणार आहेत अशी बातमी आज आलेली आहे.
भारत व अमेरिके दरम्यान उच्च स्तरीय बोलणी सुरु आहे त्या वेळेला ह्यावर शिक्का मोर्तब होईल. पण हॉट लाईन त्या अगोदरच सुरु
झालेली असेल.

ह्या नविन बातमीमुळे पिओके मध्ये मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे असा संशय येत आहे. आता अमेरिकेच्या नविन स्टांस मुळे, पाकिस्तानच्या व चीनच्या धोरणामुळे अफगानिस्तानला भारताबरोबर जमिनीने डायरेक्ट जोडण्यासाठी
पिओके ला खुप महत्व आलेले आहे. त्यात चीनने पिओके मध्ये सिपीईसी प्रोजेक्टवर बराच खर्च केलेला आहे. युनओ मध्ये दाखल केलेला पिओके हा भारत व पाकिस्तान मधला वादग्रस्त भुभाग आहे. त्यामुळे चीनने तेथे केलेली ईनवेस्टमेंट ही बेकायदेशीर आहे हे चीनला सुद्धा माहीती आहे.

गामा पैलवान's picture

12 Sep 2019 - 5:52 pm | गामा पैलवान

डँबिस००७,

एकंदरीत पाकव्याप्त काश्मीर मुक्त होणारसं दिसतंय. सैन्यप्रमुख बिपीन रावतांचं हे वक्तव्य सूचक आहे : https://www.loksatta.com/desh-videsh-news/government-should-decide-on-po...

पाकव्याप्त काश्मिरातला एकरस्तारेलमार्गाचं काम थांबवावं अशी मागणी भारताने चीन व पाकिस्तानकडे केलीये : https://obortunity.org/2019/09/10/india-asks-china-pakistan-to-end-activ...

मोदी पक्का लबाड, लुच्चा व डांबरट इसम आहे. रस्ता बांधून होईस्तोवर तोंडातनं चाकर शब्द काढला नाही. तयार झाल्यावर मात्र मानभावीपणे काम थांबवायला सांगतोय. हा रस्ता भारतीय मारगिरीच्या टप्प्यांत आहे हे रस्त्यावरचे शेंबडे पोरही सांगेल. पण ते पाकिस्तानला समजवायचे कोणी! मोदींनी ही बाब हेरून नेमकी खेळी केली. बांधून झालेल्या रस्त्याने वाहतूक सुरू व्हायला हवी असेल तर चीनला पाकिस्तानची नसून भारताची गरज आहे. आगे बढो मोदी!

आ.न.,
-गा.पै.

शरद पवारांनी पाकीस्तान बद्दल प्रेम व्यक्त केल्याची वृत्ते आहेत. त्यांच्या नेमक्या भाषणाची क्लिप युट्यूबवर मिळाली नाही किंवा हल्ली त्यांचे बोलणे क्लिअर ऐकणे कठीण झाल्यामुळे गोंधळ होत आहेत की उतरत्या वयात सोडीयमची कमतरता झाल्यामुळे येणारे डिसओरीएंटेशन आहे ?

विशीष्ट समुदायास लक्ष्य करणे बद्दल टिका , मॉबलिंटींगवर टिका ३७० काढण्याच्या पद्धतीवर टिका इत्यादी ठिक आहे.

...........पाकिस्तान आणि भारतात वेगळी फूट पाडण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जात आहे...………..पाकिस्तानमध्ये एवढी वाईट परिस्थिती नाही. काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी वातावरण दूषित करत आहेत.

म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे त्यांना?

माहितगार's picture

15 Sep 2019 - 1:11 pm | माहितगार

संदर्भ मटा , अबीपी माझा

Speaking at an event for minorities at party headquarters, Pawar said that unlike the belief in India that Pakistanis are unhappy in their country, they are happy living in the Islamic nation.
“People here say Pakistanis are facing injustice and are unhappy but it is not true. Such statements are being said only for political gains without understanding actual situation in Pakistan. Ruling class here is spreading false things for political benefits,” Pawar said संदर्भ जागरण.कॉम

याचा अर्थ काय होतो ?

पवार साहेब म्हणतात की पाकिस्तान म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे पाकिस्तान असं वातावरण बनवलं जात आहे. संदर्भ : https://abpmajha.abplive.in/mumbai/sharad-pawar-on-india-pakistan-issue-...

अहो, पण नेमक्या याच समीकरणावर पाकिस्तान ओरबाडून वेगळा करण्यात आला ना? मग आजून वेगळी फूट कसली? भारत पाक एकीकरण व्हायला पाहिजे, असं पवार साहेब आडून आडून सुचवंत आहेत की काय!

-गा.पै.

जालिम लोशन's picture

15 Sep 2019 - 9:16 pm | जालिम लोशन

निवडणुकीच्या तोंडावर पवार मुस्लिम लांगुचालन करत आहे. आणी फोरमपण तोच निवडला आहे.

डँबिस००७'s picture

16 Sep 2019 - 7:03 pm | डँबिस००७

काॅंग्रेजी सलमान खुर्शीद ,
ह्याचे आजोबा, झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती, ह्याचे पिताश्री खुर्शीद आलम खान , हे सुद्धा काॅंग्रेजी मंत्री.
ह्या सलमान खुर्शीद ने एक पुस्तक लिहीलय, At Home in India. Yr 1986.
ह्या पुस्तकात तो म्हणतो, "ईंदिरागांधीजींच्या मृृृृृृत्युनंतर दिल्ली परीसरात असंख्य शिखांची हत्या झाली. भारतातला मुसलमान हिंदुंच्या हस्ते शिखांची हत्या झाली हे पाहुन सुखावला कारण ह्याच शिखांनी फाळणीच्या वेळी अनेक मुसलमानांची हत्या केली होती."
असे हलकट नेते असलेल्या काॅंग्रेजी पक्षाने शिखांची हत्या झाली म्हणुन ना शोक व्यक्त केला ना त्या दोषींना सजा दिली!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2019 - 1:31 am | डॉ सुहास म्हात्रे

काश्मीरसांबधात पाकिस्तान भारतविरुद्ध जगभर टाहो फोडत फिरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ट्रंप तात्यांनीही, "काश्मिरप्रकरणी मध्यस्ती करू", अशी दोनेकदा आशा लावून पाकिस्तानला तोंडघशी पाडले होते. तरीही, अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य काढण्यात खोडा घालण्यासाठी आपल्या हाती तालिबानचा हुकमाचा एक्का आहे, अशी पक्की खात्री असल्याने पाकिस्तान अमेरिकी पाठिंबा गृहित घरून बसला होता. या बळावर पाकिस्तानने अफगाण शांती परिषदेत भारताच्या सहभागला विरोध केला आणि त्या परिषदेत केवळ अमेरिका, चीन, रशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान व तालिबान यांचाच सहभाग होता.

या पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांत अमेरिकेने पाकिस्तानला अनेक चकवे दिले आहेत...

१. ट्रंप यांनी आपल्या मध्यस्तीच्या बोलण्यासंबंधात घुमजाव करून, "अमेरिकेला काश्मिरप्रश्नी मध्यस्ती करण्यात रस नाही" असे जाहीर करून वर, "हा प्रश्न भारत व पाकिस्तानने बोलणी करून सोडवावा" या भारतिय भूमिकेचा पाठपुरावा केला आहे.

२. अफगाणिस्तानची बोलणी स्थगित करून, तेथून अमेरिकी सैन्य काढून घेण्याचे वेळापत्रक अनिर्णित काळासाठी स्थगित केले. यामुळे, बोलणी करताना आपल्या फायद्याचे अनेक मुद्दे मान्य करून घेऊ असे मनसुबे असलेल्या पाकिस्तान आणि तालिबान या दोघांचीही गोची झाली आहे. हे भारताच्या दृष्टीने खूपच फायद्याचे झाले आहे, कारण पाकिस्तानचे निम्मे सैन्य अफगाण सीमेवर गुंतून राहणे, केव्हाही भारताच्या फायद्याचे आहे.

३. या महिन्यात असलेल्या युनोच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी मोदी व ट्रंप यांची या वर्षातली तीसरी द्विपक्षिय भेट होणार आहे, यामुळे पाकिस्तानची जळजळ अजूनच वाढली आहे !

आणि आता तर...

३. २२ सप्टेंबर रोजी ह्युस्टन, टेक्सास, अमेरिका येथे मोदींची "Howdy, Modi" या नावाने अमेरिकास्थित भारतियांबरोबर जंगी सभा होणार आहे. या सभेला ५०,००० लोकांनी अगोदरच नोंदणी केली आहे. पाश्चिमात्य देशांत एवढी गर्दी फारतर महत्वाच्या सॉकर (फुटबॉल) किंवा बेसबॉल सामन्यांनाच, आणि तिही क्वचितच होते... राजकारणी सभांना दोन पाच हजाराची गर्दी म्हणजे डोक्यावरून पाणी !

आता तर ट्रंप यांनी मोदींच्या या सभेला हजेरी लावण्याचे ठरवले आहे... हे समजल्यामुळे पाकिस्तानी राजकारणी आणि सैन्याधिकार्‍यांना चक्कर आली आहे ! :)

Trump stuns Pakistan with thumbs up for 'Howdy, Modi' rally

या सभेला ट्रंप यांनी हजेरी लावण्यामुळे जागतिक राजकारणातल्या भारताच्या प्रतिष्टेत नक्कीच वाढ झाली आहे. पण त्यात ट्रंप यांनाही फायदा आहे. पुढच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. ट्रंपतात्यांच्या अनेक धरसोडीच्या आणि काही (विशेषतः व्हिसा व इमिग्रेशन संबंधीच्या) निर्णयांमुळे अमेरिकन भारतिय समुदाय नाराज आहे. ५०,००० प्रतिष्ठित भारतिय वंशाच्या अमेरिकनांसमोर मोदींबरोबर एकाच मंचावर दिसण्यामुळे पुढच्या अध्यक्षिय निवडणूकीत मिळणारा फायदा डोळ्यासमोर ठेवूनच ट्रंप यांचा हा निर्णय झाला असणार. याशिवाय, गेल्या दोन-तीन महिन्यांत काश्मिर व पाकिस्तानसंबंधात केलेल्या बेजबाबदार विधानांमुळे दुखावलेल्या भारताचा राग काढण्याचा हा एक प्रयत्न आहे.

या सगळ्यामुळे, परदेशस्थ भारतियांच्या "सॉफ्ट पॉवर"चे परत एकदा प्रदर्शन होत आहे व तिचे महत्व अधोरेखित होत आहे.

***************

आवांतर :

या घटनेमुळे पाकिस्तानला जितका झटका बसला आहे तितकाच तो भारतातिल विरोधी पक्षांनाही बसला आहे... अर्थात त्यांची, "ही सगळी मोदींची शोमनशिप आहे", अशी कोल्हेकुई सुरू झाली आहेच. शिवाय, अश्या गोष्टी मोदी "मॅनेज" करत असतात असा ओरडा करून घसा बसवून घेण्याची अजून एक संधी त्यांना प्राप्त झाली आहे. ;) =))

मात्र, महत्वांच्या राष्ट्रांचे राष्टाध्यक्ष किंवा पंतप्रधान "मोदींच्या शोमनशिपला दुजोरा देणे" आणि "स्वतःला मोदींकरवी मॅनेज करवून घेणे" यासारखे फुकाचे उद्योग करणाइतके निर्बुद्ध खचितच नसतात... त्यात त्यांनाही काहीतरी भरीव फायदा मिळत असतो. आंतरराष्ट्रिय राजकारण हे असेच राष्ट्रिय हितसंबंधांवर चालते, हे कळण्याची बुद्धी काही दुर्दैवाने भारतियांत नाही... आणि त्यासंबंधात काहीतरी बालिश टीका करण्याने आपण स्वतःचेच हसे करून घेत असतो, हे सुद्धा त्यांच्या ध्यानात येत नाही ! असो.

जॉनविक्क's picture

17 Sep 2019 - 1:57 pm | जॉनविक्क

शिवाय, अश्या गोष्टी मोदी "मॅनेज" करत असतात

बाब्बो, POTUS जर मोदी मॅनेज करू शकत असेल तर त्यापेक्षा दुसरा लायक जागतिक नेता कोण हा प्रश्नच निकाली निघतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2019 - 6:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

बैलाचा डोळा !!! =))

शिवाय, अश्या गोष्टी मोदी "मॅनेज" करत असतात असे म्हणणारे हुश्शार लोक 'दिल्लीपासून - व्हाया मिपा - गल्लीपर्यंत' आहेत. =)) =)) =))

मात्र, असा दावा करताना तुमच्या, बाब्बो, POTUS जर मोदी मॅनेज करू शकत असेल तर त्यापेक्षा दुसरा लायक जागतिक नेता कोण हा प्रश्नच निकाली निघतो. या वाक्यात लिहिलेल्या, मोदींच्या जगावेगळ्या व अभूतपूर्व पात्रतेची भलावण ते करत आहेत, हे न दिसण्याएवढा अंध मोदीव्देष त्यांच्या डोक्यात भरलेला आहे ! =)) =)) =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2019 - 1:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पेट्रोल आणि डिझेल दरवाढ लवकरच. या दरवाढीचा कोणत्याही सरकारचा आणि त्यांच्या ध्येयधोरणाचा संबंध नाही.

नाय तर लगेच पं. नेहरूंच्या काळात असा दर होता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी गड़बड़ होती म्हणून असे भाव वाढल्याचे दाखले आणि दुवे देऊ नयेत. धन्यवाद. ;)

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

17 Sep 2019 - 8:20 pm | सुबोध खरे

मागच्या वर्षी घाऊक भाव १-२ रुपया किलो असलेला कांदा जून मध्ये १२ रुपये आणि आता २५ रुपये झाला आहे.

पंडित नेहरूंनी कांदा किती स्वस्त ठेवला होता आणि आणि मोदी निवडून आल्यावर त्यांनी कांदा उत्पादकांकडून पैसे खाल्ले असणार असे एक टमरेल वाला बोलताना ऐकले
पण https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/nashik-rising-onion-pric...
हि बातमी सांगितल्यावर त्याने डोळे फिरवले.

ता क::- याचा पेट्रोल भाववाढीशी काहीही संबंध नाही.

ऋतुराज चित्रे's picture

18 Sep 2019 - 10:03 am | ऋतुराज चित्रे

खरीप कांदा नोव्हेंबरच्या अखेरीस बाजारात येईल, नेमके त्याचवेळेस आयात कांदाही बाजारात येईल आणि कांद्याचे भाव कोसळतील.

शेतकी उत्पादनांपासून मुल्य वर्धित उत्पादन आणि निर्यात या कडे शेतकर्‍याम्नी वळावयास हवे. एके काळी आमचा शेतकरी सरंजाम्दार ते मोघल आणि ब्रिटीशांचे उत्पन्नही सांभाळत होता आता स्वतःचे उत्पन्नही सांभाळू शकत नाही आणि लोकशाही नेतृत्व निवडीवर त्याचेच सर्वाधिक नियंत्रण असूनही अशी गत का असावी? निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार खुला हवा आणि आयातींवर नियंत्रण हवे हा विरोधाभास एका हद्दी पर्यंत पुढे ढकलता ही येतो पण एका मर्यादे बाहेर भविष्य काळात असे शक्य असणार नाही हे लक्षात घेऊन भारतीय शेतकरी वर्गाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेस सज्ज व्हावयास हवे किंवा कसे.

ऋतुराज चित्रे's picture

20 Sep 2019 - 12:04 pm | ऋतुराज चित्रे

निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार खुला हवा आणि आयातींवर नियंत्रण हवे हा विरोधाभास एका हद्दी पर्यंत पुढे ढकलता ही येतो पण एका मर्यादे बाहेर भविष्य काळात असे शक्य असणार नाही हे लक्षात घेऊन भारतीय शेतकरी वर्गाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेस सज्ज व्हावयास हवे किंवा कसे.

हे देशातील प्रत्येक उद्योगाला लागू व्हायला पाहिजे. तसं चित्र दिसतेय का? मग फक्त शेतकरीच का? जगात कोणता देश असे ' उदार धोरण ' १००% राबवतो ह्याचे उदाहरण आहे का?

सुबोध खरे's picture

18 Sep 2019 - 10:29 am | सुबोध खरे

आयात कांदा फारसा येणं नाही
https://www.business-standard.com/article/pti-stories/mmtc-not-to-import...

डँबिस००७'s picture

19 Sep 2019 - 9:15 pm | डँबिस००७

राम मंदिर बाबरी मस्जिद प्रकरणात सुप्रिम कोर्टाने वामपंथी , अर्बन नक्षली ईतिहास कारांना "फिक्शनल रायटर्स " म्हंटलेल आहे.
राममंदिर बाबरी मस्जिद प्रकरणात हिंदु समाजाच खच्चीकरण करण्याच्या हेतुने काही वामपंथी लोकांना ईतिहासकार म्हणुन पुढे केले गेले.
राम ही काल्पनिक व्यक्ती आहे अस ह्या लोकांनी कोर्टाला सांगितल. रामनवमीची सुट्टीचा आनंद घेणार्या कोर्टाला त्यात काहीही वावग वाटल नाही. ह्या ईतिहासकाराचे सोंग वठवणार्या चार लोकांनी खेवळ सहा दिवसात "Historian's Report to Indian Nation" या नावाचा अहवाल स्वःता अयोध्येला न जाता, तिथली एकाही दगडाला हात न लावता लिहीला. ह्या अहवालात अस प्रतिपादन केलेल होत की बाबरी मस्जिद खाली कोणत्याही मंदिंराचे अवशेष नाहीत. या अहवाला पुर्वी ASI च्या बि लाल यांनी केलेल्या संशोधनाच वाचन सुद्धा ह्या लोकांनी केल नव्हत.

शाम भागवत's picture

19 Sep 2019 - 9:54 pm | शाम भागवत

"कतार, युएई व सौदीमधे पाकीस्तानी डॉक्टर्सवर काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे." असे ट्वीट तारेख फताह यांनी केले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Sep 2019 - 11:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतिय मुत्सद्देगिरीचे विजय...

काश्मिर प्रश्न जागतिक मंचावर आणण्यासाठी पाकिस्तान आकांडतांडव करत आहे... किंबहुना, डोके कलम केलेल्या कोंबडीसारखी धडपड करत आहे. मात्र, पाकिस्तानला सगळीकडून थपडीवर थपडा पडत आहेत.

१. युरोपियन युनियनने पाकिस्तानची तक्रार स्विकारण्याला नकार दिला आहे आणि ते करताना,
(अ) "काश्मिर द्विपक्षिय प्रश्न आहे",
(आ) पाकिस्तान संदिग्ध (ambiguous) देश आहे",
(आ) "शेजारच्या देशातून अतिरेकी भारतात येतात, चंद्रावरून नाही (Terrorists come to India from neighbouring countries, not Moon)",
इत्यादी शब्दांत टीप्पणी करत पाकिस्तानला चपराकी दिल्या आहेत...
Kashmir issue: European Union stands with India, says Pakistan an ambiguous country
Terrorists come to India from neighbouring countries, not Moon, say European Union MPs

२. पाकिस्तानने काश्मिर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेण्याचा प्रयत्न केला त्याला युएनच्या सेक्रेटरी जनरलने, "हा प्रश्न द्विपक्षिय आहे आणि संबंधित दोन्ही देशांनी तो युएनकडे आणला तरच आम्हाला विचार करता येईल", असे म्हणून पाकिस्तानच्या तोंडाला पाने पुसली !...
Good offices available to India, Pakistan, if both ask for it: UN chief on Kashmir issue

३. इतके झाले तरी, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेत काश्मिर प्रश्नावर ठराव मांडण्याचा करण्याचा प्रयत्न केलाच. अश्या ठरावासाठी कमीत कमी २४ देशांचा पाठिंबा आवश्यक असतो व त्यापैकी १८ देशांनी ठरावाच्या मसुद्यावर सह्या करणे आवश्यक असते... मात्र, चीनचा सक्रिय पाठींबा असूनसुद्धा पाकिस्तानला ८ देशांच्या सह्या मिळणेही मुष्किल झाले आणि त्यामुळे अर्थातच ठरावाचा प्रयत्न बारगळला !

यावरून, इथे दिलेली वस्तूस्थिती आणि इतर बर्‍याच घटनांवरून, सर्वसामान्य लोकांना, मोदींचे परदेशदौरे स्वतःसाठी नसून भारताचे जागतिक संबंध मजबूत करण्यासाठी असतात, हे कळणे कठीण नाही. पण, डोळे घट्ट बंद करून बसलेल्या काही असामान्य भारतियांना (त्यांच्या तात्कालिक स्वार्थी हितसंबंधांना सोईस्कर नसल्याने) ते कसे कळेल?!

मराठी_माणूस's picture

20 Sep 2019 - 10:03 am | मराठी_माणूस
डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2019 - 6:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

काश्मिरची आतापर्यंत दाबून ठेवलेली दुसरी बाजू...

https://twitter.com/aquibmir7/status/1175075241250263041?s=12

राजकीय चर्चांमधले दिग्गज समजले जाणारे प्रतिसाद्क अशी फुटकळ माहिती हि दमदार पुरावा असल्यागत चेपवतायत हे ऐकून आणि पाहून वैषम्य वाटले. व्हिडीओ मधला साऊंड ट्रॅक आणि त्या युवकाच्या ओठांच्या हालचाली यांचा काही एक संबंध नाहीये हे उघड्या डोळ्यांनी दिसतंय.

जाता जाता: विकासाचे वारे काश्मीर खोऱ्यांमधून कधी वाहणार आहेत म्हणे? ते वाहायला लागल्यावर वाहवत गेलेला काश्मिरी आपोआप राष्ट्रीय प्रवाहात सामील होईल अशी भविष्यवाणी इथेच, या संस्थळावर, वाचायला मिळाली होती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2019 - 11:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

१००% बरोबर आहे. कलम हटवले म्हणजे सगळे चुटकीसरशी सुरळीत व्हावे ही तुमची इच्छा अव्यवहार्य आहे हे म्हणण्याची कोणाची शामत आहे, नाही का???!!!

जे इतरांनी ७० वर्षे, फक्त आणि फक्त बिघडवले, ते सगळे सुरळीत व्हायला जरा वेळ कशाला द्यायला हवा, ताबडतोप व्हायला हवे होते! सरळ विचार करणार्‍यांना हे कसे समजत नाही बरे? आश्चर्य आहे!

मुख्य म्हणजे, "काश्मिरमध्ये हाहाकार माजला आहे" हे मत जगाला मान्य नसले तरी आपण त्याबाबत छाती बडवून घेण्यात धन्यता मानणे आणि त्याविरुद्ध काही पुरावा कोणी पुढे मांडला की त्याच्या नावे होळी खेळणे, ही फॅशन भारतात नवीन नाही. तेव्हा त्याबद्दल आश्चर्य ते काय?!

काश्मीरमधील मोजकी कुटुंबे ३७० कलमाआडून काश्मीरचे बजेट लुटून गब्बर झाली आहेत, या उघड गुपिताबद्दल अज्ञानी असणे, हे किती सोईस्कर आहे ! आणि खरेच अज्ञानी असल्यास, धन्य आहे ! :)

तेव्हा तुमचे नथितून तीर मारणे चालू द्या ! विनोद एक आनंददायी गोष्ट आहे. =))

भंकस बाबा's picture

26 Sep 2019 - 8:46 am | भंकस बाबा

जम्मू एंड कश्मीर बैंकचे अक्काउंट तपासा, मग कळेल विकास कोणाचा झाला तो!
महबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला, यासीन मलिक ही गाढ़वे भर चौकात चाबकाने फोडून काढण्याचे मटेरियल आहे , या स्पष्ट मताचा आहे मी! काही शंका आहे का तुम्हाला?

सुबोध खरे's picture

27 Sep 2019 - 8:36 pm | सुबोध खरे

विकासाचे वारे काश्मीर खोऱ्यांमधून कधी वाहणार आहेत म्हणे?

विकासाचे वारे ७० वर्षे वाहतच होते

आताच ३७० विटांची भिंत बांधून मोदींनी ते अडवले आहेत.

एवढं पण समजेना झालं का?

डँबिस००७'s picture

23 Sep 2019 - 7:40 pm | डँबिस००७

मा मोदीजींच्या शुभ हस्ते UN च्या अमेरिका स्थित ईमारतीच्या टेरेसवर भारताने बनवलेले "म गांधी सोलार पार्क" २३ सप्टेंबर रोजी जगाला सर्मपित होणार आहे !!
50 kWH ची ही सिस्टीम असुन त्यात १९३ सोलार पॅनेल आहेत. ते १९३ सोलार पॅनेल्स १९३ देशांच प्रतिनीधीत्व करतात. २३ सप्टेंबर ला म गांधीजींच्या १५० व्या जयंतीच निमीत्त्य साधुन मा मोदीजींनी हा सोहळा करणार आहेत !

म्हापसा अर्बन बँकेचे १)पंजाब महाराष्ट्र / २) ठाणे जनता सहकारी ,/ ३) डोंबिवली नागरी या तिनांपैकी एकात विलीनीकरण करण्याचे ठरले आहे . यासाठी फंडिंग तर नाही ना पंजाब महाराष्ट्रचे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2019 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात स्वच्छता अभियानाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनचा प्रतिष्ठित ग्लोबल गोलकिपर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कसं कसं जमतं या माणसाला हे देवजाणे. शेठचं अभिनंदन. :)

-दिलीप बिरुटे

गोंधळी's picture

25 Sep 2019 - 2:58 pm | गोंधळी

हे ट्वेन्टिनन सेवन्टिन म्हणजे नक्की किती भक्त लोक सांगतील काय????

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Sep 2019 - 11:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणताही पाढा म्हणतात ते.. त्याचं इतिहास, भूगोलही असाच आहे.
आपण ब्वॉ फॅन आहोत, हे नम्रपणे नमूद करतो.

-दिलीप बिरुटे
( नायंटीन सेवन्टी टू तला) :)

गोंधळी's picture

26 Sep 2019 - 1:33 pm | गोंधळी

अर्थव्यवस्था वाढीचा दर घसरुन ५.८ वर आला आहे.

निवडनुकांनंतर परकिय त्याची गुंतवणुक काढुण घेत आहेत.

वाहन उद्योग संकटात आहे. कित्येकांच्या नोकरया गेल्या आहेत.

IL&FS,JET AIRWAYS,DHFL,...... PMC BANK या सारखे अनेक उद्योग्,संस्था आर्थिक संकटात आहेत्, कर्म्चारी बेकार झाले आहेत्, सामान्य गुंतवणुक
धार्यांचे पैसे बुडाले आहेत.

GST मधुन अपेक्शित महसुल मिळत नाही आहे.

अशा अनेक समस्या आहेत.

पण तरीही भारतात सगळ ठिक आहे..........

कारण भारतीय जनतेला कोणिही मुर्ख बनवु शकत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Sep 2019 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार साहेब, अहो..हे किरकोळ प्रश्न आहेत. तिनशे सत्तर हटवल्याचा आनंद साजरा करा. आदरणीय साहेब, अमेरिकेत साठ हजार भारतीय लोकांसमोर जाऊन ट्रम्प यांनाही वाटावे की अध्यक्ष मी आहे की शेठ आहे, अशी ती परिस्थिती पाहा. अहाहा. काय स्टेडीयम, काय भाषण. सुप्पर. आदरणीय साहेबांनी जेव्हा ट्रम्प अंकलचा हात पकडून स्टेडीयमला चक्कर मारली तेव्हा तर माझे डोळे भरुन आले. केवळ अप्रतिम शीन होता. कसं जमतं त्यांना त्याचा विचार करा. परराष्ट्रीय प्रभावाचा तो एक उत्तम प्रयोग होता. पाकिस्तानला एकाकी पाडलं ते बघा. जीएष्टी, महागाई, बेकारी, खाजगी कंपन्यात रोजगाराची होणारी कपात, अर्थव्यवस्था वाढीचा दर घसरतोय, वाताहात होताहेत, मंदी हे असले क्षुद्र प्रश्न विचारता. आपण जवळ जवळ देशद्रोहीच आहात. चांद्रयान बघा, विक्रम लँडरशी संपर्क जरी तुटला तरी ऑर्बीटर फिरतय त्यात सुख माना. के. शिवनची पाठ थोपटवा, बळजबरी गळ्यात पडतांनाचे फोटो पाहा. आणि मुख्य म्हणजे सत्तर वर्षातला विकास बघा. इथे कालपर्यंत वीज तरी होती का ? रस्ते होते का? पं.नेहरुंनी देशाची वाट लावली ते बघा.

बोलो भारत माता की जय. हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा. बोलो बोलो भारत मात्ता की जय.

-दिलीप बिरुटे

ऋतुराज चित्रे's picture

26 Sep 2019 - 10:41 pm | ऋतुराज चित्रे

सध्या फक्त पुराणातील वानगी आणि भविष्यातील गाजरे ह्यावरच बोलण्यास परवानगी आहे. पेरलेले का उगवले नाही हे विचारायचे नाही.

खासदारकी सोडून काय मिळवलं? पोट निवडणूक खर्च वाढवला. असंही भाजपची कामं आतून करता आली असती ना?

उपेक्षित's picture

27 Sep 2019 - 12:05 pm | उपेक्षित

बाकी काही नाही पण सध्या विठ्ठलाच्या देवळातील बडवे माजलेत एवढे निरीक्षण नोंदवतो आणि खाली बसतो.

आपला उपेक्षीत (छोटा माणूस) :))))

डँबिस००७'s picture

27 Sep 2019 - 12:37 pm | डँबिस००७

Blot on Muslims for being beaten up, get the pistol, I will take care of rest: Haryana judge Fakhruddin incites Muslims to shoot Hindu adversaries
हरयाणातल्या कोर्टाच्या न्यायमुर्तींचे हे विधान आहे. ऐकुन धन्य झालो.
हिंदु लोकांनो सावधान !!!
कोर्टाने सांगितलय हिंदुंना गोळ्या घालायला !!

उपेक्षित's picture

27 Sep 2019 - 8:11 pm | उपेक्षित

१) Bosch | बॉश कंपनीला मंदीची झळ, पुढील आठ दिवस उत्पादन बंद | नाशिक - सौजन्य ABP Majha
>>>>>>>>>अवघड आहे सगळ, २ प्रकारचे व्यवसाय करत असल्याने मंदीचे परिणाम जवळून आणि वरच्या लेवल पासून खालच्या लेवल पर्यंत जाणवत आहेत आणि सत्ताधारी मात्र इतक्या उंचीवर पोहोचले आहेत आणि मोठ्ठे झाले आहेत कि खाली जळत असलेल्याची धग सध्या त्यांना जाणवत नाहीये.

२) गेले २ दिवस पुण्यात झालेल्या पावसाने बर्याच जणांची वाताहत झाली आहे, सिंहगड रोड ला मी राहत असलेल्या परिसरातील प्रत्येक सोसायटीत पाणी शिरून बरेच नुकसान झाले आहे तसेच २ जणांची घरे देखील पडली आहे, पण निवडून दिलेल्यातील सत्ताधारी पक्षाचा एकही प्रतिनिधी (साधा नगरसेवक सुद्धा ) फिरकला देखील नाही.
काल शिवसेनेचे आमदार श्री बापू शिवतारे मात्र स्वतः येऊन सगळीकडे पाहणी करीत होते लोकांशी बोलून धीर देत होते. (निवडणुका आहेत माहिती आहे मात्र सत्ताधारी आमदार फाजील आत्मविश्वासा पायी फिरकले देखील नाहीयेत)

रविकिरण फडके's picture

29 Sep 2019 - 7:15 am | रविकिरण फडके

काय आहे, पूर आल्यानंतर, किंवा अशाच कुठल्याही दुर्घटनेनंतर, संबंधित नगरसेवक/ आमदार/ अन्य कुणी, येतो, पाहणी करतो, धीर देतो, इ.इ. सगळं ठीक आहे. पण अशा घटना मुळातच घडू नयेत ह्यासाठी हे लोक काय करतात हा प्रश्न विचारला पाहिजे. अर्थात, त्याचे उत्तर 'काहीही नाही' हेच येईल. अज्ञान, स्वार्थ, बेपर्वाई, इत्यादि कारणांमुळे हेच जे सर्व नामदार लोकांच्या मृत्यूला कारण ठरतात, त्यांच्यावर खरे तर खटले चालविले पाहिजेत पण दुर्दैवाने, आपले काम न करण्याला आपल्या देशात शिक्षा नाही. आणि हो, बिल्डर्स, PMC चे अभियंते, इत्यादींना ह्यास जबाबदार धरू नका. राजकीय नेतृत्वाकडून काही किमान अपेक्षा असतात (त्यात ह्या सर्व लोकांवर नियंत्रण ठेवणे ही एक मुख्य) त्या पूर्ण करायला सगळे पक्ष अपयशी ठरले आहेत.
त्यामुळे, सत्ता कोणाचीही येवो, सामान्य लोकांचे हेच भागधेय आहे.

सुबोध खरे's picture

30 Sep 2019 - 10:54 am | सुबोध खरे

याचे कारण आपली अफाट वाढणारी लोकसंख्या आहे. ओढे नाले नदी यांच्या काठावर आणि प्रवाहातसुद्धा भारतभर अनधिकृत वस्त्या आहेत त्यामुळे निसर्गाचा कोप झाला तर सर्वात अगोदर याच लोकांचे नुकसान होते. परंतु याना तेथे घरे बांधू नका हे सांगणारे कुणीच नाही कारण जितकी लोकसंख्या जास्त तितके मतदार जास्त.

महापालिकेचे अभियंते काय लोकांना अनधिकृत वस्ती बांधा म्हणून सांगायला जातात का? अनधिकृत वस्तीवर कार्यवाही करायला जाणाऱ्या माणसाला मारच खावा लागतो कारण पोलीस सुद्धा अशावेळेस पाय मागे घेतात. कोणतिहि सरकारी यंत्रणा तुमच्या वाढत्या लोकसंख्येला पुरी पडणार नाही हि वस्तुस्थिती.

प्लास्टिक टाकून ओढे, नाले नद्याचे प्रवाह काय सरकार बंद करतंय का?

घाटकोपर येथे एका सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या भिंतीच्या पलीकडील जमीन खणून झोपड्या बांधल्या. पावसाळ्यात अशी कमकुवत झालेली भिंत पडून दोन माणसे दगावली त्यासाठी कंत्राटदाराला अटक झाली. भिंतीच्या मजबुतीचा लेखा जोखा आय आय टीच्या अभियंत्याद्वारे केला गेला तेंव्हा भिंत व्यवस्थित बांधली होती असा निष्कर्ष निघाला.ती पोखरली गेल्यामुळे पडली. आता त्या व्यक्तीच्या मृत्यूची जबाबदारी कुणाची.

दर डोई सुविधा या सुविधा भागिले लोकसंख्या अशीच मिळणार आहे.

आपल्या जनतेची लायकी हीच आहे.

शाम भागवत's picture

28 Sep 2019 - 9:36 pm | शाम भागवत

DRDO च्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय की, आपण टी ७२ व टी ९० रणगाड्यांना इमेज इन्टेसीव्ह ट्यूब वापरून रात्रीच्या वेळेस १०० ते १५० मिटरपर्यंत दृक्षमानता मिळवून देऊ शकलो होतो. २०११-१२ पासून चालू असलेल्या प्रयत्नांना यश मिळून आपण आता थर्मल इमेजिंग तंत्र आत्मसात केलं आहे. हे तंत्र अंमलात आणून प्रत्यक्ष उत्पादन व वापर आता सुरू होतोय. टी७२ साठी १००० यंत्रणांची जरूरी असून त्यापैकी ३०० यंत्रणा बसवून झाल्या आहेत. हे तंत्रज्ञान खूप अद्ययावत असून ३ किमी पर्यंत याचा आवाका आहे. जास्त अचूकते बरोबर मिट्ट काळोखातही हे वापरता येते. अगोदरच्या यंत्रणातून वेध घेताना बाहेर अंधूकसा का होईना पण थोडाफार तरी उजेड लागायचा.

टी९०ला मात्र काही अडचणींमुळे ही यंत्रणा जरा सुधारित करून बसवायला लागणार आहे. पण त्यामुळे हीचा पल्ला ३ वरून ४ किमी होणार आहे.

नविन यंत्रणेमुळे शत्रू शोधून काढणे. त्यावर नेम धरून मारा करणे शक्य होणार आहे.

स्नायपर्स हेच करत असतात. ते जर रणगाडा करू लागला तर काय होईल हा अंदाजच आश्चर्यकारक असणार आहे. स्नायपरच्च्या गोळीच्या ऐवजी जर तोफगोळाच शत्रूच्या अंगावर जायला लागला तर . . .
:)

गामा पैलवान's picture

29 Sep 2019 - 1:51 am | गामा पैलवान

पुरुषांनो सावधान : वाशीमध्ये पुरुषावर पुरुषांकडून सामूहिक बलात्कार

बातमी :
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/nav...

-गा.पै.

धर्मराजमुटके's picture

30 Sep 2019 - 6:35 pm | धर्मराजमुटके

आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून लढणार असल्याची घोषणा केली. निकाल काहिही लागो पण निवडणूक लढविणारा ठाकरे कुटूंबातील पहिला नेता म्हणून त्यांचे नाव घेतले जाईल. निवडणूकीच्या उतरण्याची हिंमत दाखविल्याबद्द्ल अभिनंदन !

कंजूस's picture

30 Sep 2019 - 7:53 pm | कंजूस

लोकशाहीचा मखन राखला.

कंजूस's picture

30 Sep 2019 - 7:53 pm | कंजूस

लोकशाहीचा मान राखला.

गामा पैलवान's picture

30 Sep 2019 - 7:06 pm | गामा पैलवान

छत्तीसगडाचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणतात की : भाजप आणि संघ यांचे लोक ‘गोडसे मुर्दाबाद’ म्हणतील, तेव्हा मी त्यांना खरे गांधीवादी समजेन !

बातमी :
१. https://sanatanprabhat.org/marathi/276869.html
२. https://hindi.timesnownews.com/india/article/chhattisgarh-cm-bhupesh-bag...

आयला म्हंजे हैदराबादचा तुकडा पडू न देणाऱ्या प्रखर देशभक्त नथुराम गोडसे यांचा निषेध केला तर भूपेश बघेल हा काँग्रेसवासी त्याचा लाडका नॉस्टॅल्जिक डिल्डो संघवाल्यांना वापरायला देणार.

कर्णानंतर इतका दानशूर राजा हाच की हो. राजा उदार झाला, हाती भोपळा दिला.

-गा.पै.