Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by धर्मराजमुटके on Sun, 09/01/2019 - 10:37
नमस्कार ! समस्त मिपाकरांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा ! आसाममधे एनआरसी ने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीतून जवळ जवळ १९ लाख नागरीकांची नावे वगळली आहेत. सुमारे १९ लाख नागरिक एनआरसीने जाहीर केलेल्या यादीतून बाहेर राहिले आहेत. शनिवारी सकाळी ही यादी जाहीर करण्यात आली. सरकारी कारवाई टाळण्यासाठी या लोकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. यापूर्वी गेल्या जुलैमध्ये जाहीर झालेल्या एनआरसीच्या मसुद्यात ४१ लाख लोकांची नावे नव्हती. सुमारे ३ कोटी ११ लाख नागरिकांचा या यादीत समावेश आहे. राज्यातील बेकायदा स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी ही यादी तयार करण्यात आली आहे. यापूर्वी १९५१मध्ये अशा प्रकारची यादी जाहीर करण्यात आली होती. यादीत मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या असण्याची शक्यता सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे. ओवेसींनी भाजपावर पुन्हा एकदा मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप केला आहे. ही यादी पुन्हा जरी तपासली आणि ५०% टक्के यादी जरी बरोबर म्हटली तरी ९-१० लाख हा घुसखोरीचा आकडा प्रचंड मोठा आहे. सरकार एवढ्या मोठ्या लोक संख्येवर कारवाई करु शकणार का हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार काय ? ह्यावर रोजच वर्तमानपत्रात छापून येत आहेत. मात्र "आमचं ठरलयं" असं दोन्ही पक्ष सांगतात त्यामुळे नेमके काय होईल याचा अंदाज अजून येत नाहिये. राष्ट्रवादीचे बडे नेते तर सोडून चाललेतच पण आता पवारांचे नातेवाईक देखील सोडून चाललेत. कालच मुख्यमंत्र्यांनी पुढचा विरोधी पक्ष नेता काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा नसेल तर वंचित आघाडीचा असेल असे वक्तव्य केले. महाराष्ट्रातील निवडणूका दिवाळीपूर्वीच पार पडतील असा अंदाज आहे. चतुर्थी आणी चतुर्दशीला नेहमीप्रमाणे गणेश भक्त गावी जाताना / येताना ट्राफीक जाम मधे तासन तास अडकतील, त्यांचे कसे हाल झाले, रस्ते कसे खराब झाले आहेत, कोणत्या गल्ली च्या राजाला किती किलो सोने मिळाले अशा नेहमीच्या बातम्या येत्या १० दिवसात जास्त प्रमाणावर दिसतील. मंदिमुळे सणावर कसा परिणाम झाला हे वाचायला मिळेल. मिपावर एखाद दुसरा ध्वनीप्रदुषण, पर्यावरणात्मक / प्रबोधनपर लेख येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या सर्व अडचणींवर मात करुन असे न म्हणता, या सर्व अडचणी आहेत तशा स्वीकारुन किंवा जमल्यास त्यांना वळसा घालून आपण गणरायाचे स्वागत करुया, १० दिवस राजकारणापासून शक्य झाले तर सुट्टी घेऊन नातेवाईक, कुटुंबियांना भेटूया, एकत्र येऊ या आणि गणेशोत्सव साजरा करुया. आणि हो, मिपा श्रीगणेश लेखमालेचा आनंद घेऊया. धन्यवाद ! गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !
  • Log in or register to post comments
  • 42620 views

प्रतिक्रिया

Submitted by डँबिस००७ on Mon, 09/16/2019 - 19:03

Permalink

काॅंग्रेजी सलमान खुर्शीद ,

काॅंग्रेजी सलमान खुर्शीद , ह्याचे आजोबा, झाकिर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती, ह्याचे पिताश्री खुर्शीद आलम खान , हे सुद्धा काॅंग्रेजी मंत्री. ह्या सलमान खुर्शीद ने एक पुस्तक लिहीलय, At Home in India. Yr 1986. ह्या पुस्तकात तो म्हणतो, "ईंदिरागांधीजींच्या मृृृृृृत्युनंतर दिल्ली परीसरात असंख्य शिखांची हत्या झाली. भारतातला मुसलमान हिंदुंच्या हस्ते शिखांची हत्या झाली हे पाहुन सुखावला कारण ह्याच शिखांनी फाळणीच्या वेळी अनेक मुसलमानांची हत्या केली होती." असे हलकट नेते असलेल्या काॅंग्रेजी पक्षाने शिखांची हत्या झाली म्हणुन ना शोक व्यक्त केला ना त्या दोषींना सजा दिली!!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 09/17/2019 - 01:31

Permalink

काश्मीरसांबधात पाकिस्तान

काश्मीरसांबधात पाकिस्तान भारतविरुद्ध जगभर टाहो फोडत फिरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ट्रंप तात्यांनीही, "काश्मिरप्रकरणी मध्यस्ती करू", अशी दोनेकदा आशा लावून पाकिस्तानला तोंडघशी पाडले होते. तरीही, अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य काढण्यात खोडा घालण्यासाठी आपल्या हाती तालिबानचा हुकमाचा एक्का आहे, अशी पक्की खात्री असल्याने पाकिस्तान अमेरिकी पाठिंबा गृहित घरून बसला होता. या बळावर पाकिस्तानने अफगाण शांती परिषदेत भारताच्या सहभागला विरोध केला आणि त्या परिषदेत केवळ अमेरिका, चीन, रशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान व तालिबान यांचाच सहभाग होता. या पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांत अमेरिकेने पाकिस्तानला अनेक चकवे दिले आहेत... १. ट्रंप यांनी आपल्या मध्यस्तीच्या बोलण्यासंबंधात घुमजाव करून, "अमेरिकेला काश्मिरप्रश्नी मध्यस्ती करण्यात रस नाही" असे जाहीर करून वर, "हा प्रश्न भारत व पाकिस्तानने बोलणी करून सोडवावा" या भारतिय भूमिकेचा पाठपुरावा केला आहे. २. अफगाणिस्तानची बोलणी स्थगित करून, तेथून अमेरिकी सैन्य काढून घेण्याचे वेळापत्रक अनिर्णित काळासाठी स्थगित केले. यामुळे, बोलणी करताना आपल्या फायद्याचे अनेक मुद्दे मान्य करून घेऊ असे मनसुबे असलेल्या पाकिस्तान आणि तालिबान या दोघांचीही गोची झाली आहे. हे भारताच्या दृष्टीने खूपच फायद्याचे झाले आहे, कारण पाकिस्तानचे निम्मे सैन्य अफगाण सीमेवर गुंतून राहणे, केव्हाही भारताच्या फायद्याचे आहे. ३. या महिन्यात असलेल्या युनोच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी मोदी व ट्रंप यांची या वर्षातली तीसरी द्विपक्षिय भेट होणार आहे, यामुळे पाकिस्तानची जळजळ अजूनच वाढली आहे ! आणि आता तर... ३. २२ सप्टेंबर रोजी ह्युस्टन, टेक्सास, अमेरिका येथे मोदींची "Howdy, Modi" या नावाने अमेरिकास्थित भारतियांबरोबर जंगी सभा होणार आहे. या सभेला ५०,००० लोकांनी अगोदरच नोंदणी केली आहे. पाश्चिमात्य देशांत एवढी गर्दी फारतर महत्वाच्या सॉकर (फुटबॉल) किंवा बेसबॉल सामन्यांनाच, आणि तिही क्वचितच होते... राजकारणी सभांना दोन पाच हजाराची गर्दी म्हणजे डोक्यावरून पाणी ! आता तर ट्रंप यांनी मोदींच्या या सभेला हजेरी लावण्याचे ठरवले आहे... हे समजल्यामुळे पाकिस्तानी राजकारणी आणि सैन्याधिकार्‍यांना चक्कर आली आहे ! :) Trump stuns Pakistan with thumbs up for 'Howdy, Modi' rally या सभेला ट्रंप यांनी हजेरी लावण्यामुळे जागतिक राजकारणातल्या भारताच्या प्रतिष्टेत नक्कीच वाढ झाली आहे. पण त्यात ट्रंप यांनाही फायदा आहे. पुढच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. ट्रंपतात्यांच्या अनेक धरसोडीच्या आणि काही (विशेषतः व्हिसा व इमिग्रेशन संबंधीच्या) निर्णयांमुळे अमेरिकन भारतिय समुदाय नाराज आहे. ५०,००० प्रतिष्ठित भारतिय वंशाच्या अमेरिकनांसमोर मोदींबरोबर एकाच मंचावर दिसण्यामुळे पुढच्या अध्यक्षिय निवडणूकीत मिळणारा फायदा डोळ्यासमोर ठेवूनच ट्रंप यांचा हा निर्णय झाला असणार. याशिवाय, गेल्या दोन-तीन महिन्यांत काश्मिर व पाकिस्तानसंबंधात केलेल्या बेजबाबदार विधानांमुळे दुखावलेल्या भारताचा राग काढण्याचा हा एक प्रयत्न आहे. या सगळ्यामुळे, परदेशस्थ भारतियांच्या "सॉफ्ट पॉवर"चे परत एकदा प्रदर्शन होत आहे व तिचे महत्व अधोरेखित होत आहे. *************** आवांतर : या घटनेमुळे पाकिस्तानला जितका झटका बसला आहे तितकाच तो भारतातिल विरोधी पक्षांनाही बसला आहे... अर्थात त्यांची, "ही सगळी मोदींची शोमनशिप आहे", अशी कोल्हेकुई सुरू झाली आहेच. शिवाय, अश्या गोष्टी मोदी "मॅनेज" करत असतात असा ओरडा करून घसा बसवून घेण्याची अजून एक संधी त्यांना प्राप्त झाली आहे. ;) =)) मात्र, महत्वांच्या राष्ट्रांचे राष्टाध्यक्ष किंवा पंतप्रधान "मोदींच्या शोमनशिपला दुजोरा देणे" आणि "स्वतःला मोदींकरवी मॅनेज करवून घेणे" यासारखे फुकाचे उद्योग करणाइतके निर्बुद्ध खचितच नसतात... त्यात त्यांनाही काहीतरी भरीव फायदा मिळत असतो. आंतरराष्ट्रिय राजकारण हे असेच राष्ट्रिय हितसंबंधांवर चालते, हे कळण्याची बुद्धी काही दुर्दैवाने भारतियांत नाही... आणि त्यासंबंधात काहीतरी बालिश टीका करण्याने आपण स्वतःचेच हसे करून घेत असतो, हे सुद्धा त्यांच्या ध्यानात येत नाही ! असो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Tue, 09/17/2019 - 13:57

In reply to काश्मीरसांबधात पाकिस्तान by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

शिवाय, अश्या गोष्टी मोदी

शिवाय, अश्या गोष्टी मोदी "मॅनेज" करत असतात
बाब्बो, POTUS जर मोदी मॅनेज करू शकत असेल तर त्यापेक्षा दुसरा लायक जागतिक नेता कोण हा प्रश्नच निकाली निघतो.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 09/17/2019 - 18:16

In reply to शिवाय, अश्या गोष्टी मोदी by जॉनविक्क

Permalink

बैलाचा डोळा !!! =))

बैलाचा डोळा !!! =)) शिवाय, अश्या गोष्टी मोदी "मॅनेज" करत असतात असे म्हणणारे हुश्शार लोक 'दिल्लीपासून - व्हाया मिपा - गल्लीपर्यंत' आहेत. =)) =)) =)) मात्र, असा दावा करताना तुमच्या, बाब्बो, POTUS जर मोदी मॅनेज करू शकत असेल तर त्यापेक्षा दुसरा लायक जागतिक नेता कोण हा प्रश्नच निकाली निघतो. या वाक्यात लिहिलेल्या, मोदींच्या जगावेगळ्या व अभूतपूर्व पात्रतेची भलावण ते करत आहेत, हे न दिसण्याएवढा अंध मोदीव्देष त्यांच्या डोक्यात भरलेला आहे ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 09/17/2019 - 13:44

Permalink

खुशख़बर...

पेट्रोल आणि डिझेल दरवाढ लवकरच. या दरवाढीचा कोणत्याही सरकारचा आणि त्यांच्या ध्येयधोरणाचा संबंध नाही. नाय तर लगेच पं. नेहरूंच्या काळात असा दर होता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी गड़बड़ होती म्हणून असे भाव वाढल्याचे दाखले आणि दुवे देऊ नयेत. धन्यवाद. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 09/17/2019 - 20:20

Permalink

मागच्या वर्षी घाऊक भाव १-२

मागच्या वर्षी घाऊक भाव १-२ रुपया किलो असलेला कांदा जून मध्ये १२ रुपये आणि आता २५ रुपये झाला आहे. पंडित नेहरूंनी कांदा किती स्वस्त ठेवला होता आणि आणि मोदी निवडून आल्यावर त्यांनी कांदा उत्पादकांकडून पैसे खाल्ले असणार असे एक टमरेल वाला बोलताना ऐकले पण https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/nashik-rising-onion-prices-make-farmers-cry-tears-of-joy/articleshow/69734484.cms हि बातमी सांगितल्यावर त्याने डोळे फिरवले. ता क::- याचा पेट्रोल भाववाढीशी काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋतुराज चित्रे on Wed, 09/18/2019 - 10:03

Permalink

खरीप कांदा नोव्हेंबरच्या

खरीप कांदा नोव्हेंबरच्या अखेरीस बाजारात येईल, नेमके त्याचवेळेस आयात कांदाही बाजारात येईल आणि कांद्याचे भाव कोसळतील.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 09/18/2019 - 10:44

In reply to खरीप कांदा नोव्हेंबरच्या by ऋतुराज चित्रे

Permalink

शेतकरी वर्गाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेस सज्ज व्हावयास हवे

शेतकी उत्पादनांपासून मुल्य वर्धित उत्पादन आणि निर्यात या कडे शेतकर्‍याम्नी वळावयास हवे. एके काळी आमचा शेतकरी सरंजाम्दार ते मोघल आणि ब्रिटीशांचे उत्पन्नही सांभाळत होता आता स्वतःचे उत्पन्नही सांभाळू शकत नाही आणि लोकशाही नेतृत्व निवडीवर त्याचेच सर्वाधिक नियंत्रण असूनही अशी गत का असावी? निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार खुला हवा आणि आयातींवर नियंत्रण हवे हा विरोधाभास एका हद्दी पर्यंत पुढे ढकलता ही येतो पण एका मर्यादे बाहेर भविष्य काळात असे शक्य असणार नाही हे लक्षात घेऊन भारतीय शेतकरी वर्गाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेस सज्ज व्हावयास हवे किंवा कसे.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋतुराज चित्रे on Fri, 09/20/2019 - 12:04

In reply to शेतकरी वर्गाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेस सज्ज व्हावयास हवे by माहितगार

Permalink

निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय

निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार खुला हवा आणि आयातींवर नियंत्रण हवे हा विरोधाभास एका हद्दी पर्यंत पुढे ढकलता ही येतो पण एका मर्यादे बाहेर भविष्य काळात असे शक्य असणार नाही हे लक्षात घेऊन भारतीय शेतकरी वर्गाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेस सज्ज व्हावयास हवे किंवा कसे. हे देशातील प्रत्येक उद्योगाला लागू व्हायला पाहिजे. तसं चित्र दिसतेय का? मग फक्त शेतकरीच का? जगात कोणता देश असे ' उदार धोरण ' १००% राबवतो ह्याचे उदाहरण आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 09/18/2019 - 10:29

Permalink

आयात कांदा फारसा येणं

आयात कांदा फारसा येणं नाही https://www.business-standard.com/article/pti-stories/mmtc-not-to-import-onions-from-pak-119091301359_1.html
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on गुरुवार, 09/19/2019 - 21:15

Permalink

राम मंदिर बाबरी मस्जिद

राम मंदिर बाबरी मस्जिद प्रकरणात सुप्रिम कोर्टाने वामपंथी , अर्बन नक्षली ईतिहास कारांना "फिक्शनल रायटर्स " म्हंटलेल आहे. राममंदिर बाबरी मस्जिद प्रकरणात हिंदु समाजाच खच्चीकरण करण्याच्या हेतुने काही वामपंथी लोकांना ईतिहासकार म्हणुन पुढे केले गेले. राम ही काल्पनिक व्यक्ती आहे अस ह्या लोकांनी कोर्टाला सांगितल. रामनवमीची सुट्टीचा आनंद घेणार्या कोर्टाला त्यात काहीही वावग वाटल नाही. ह्या ईतिहासकाराचे सोंग वठवणार्या चार लोकांनी खेवळ सहा दिवसात "Historian's Report to Indian Nation" या नावाचा अहवाल स्वःता अयोध्येला न जाता, तिथली एकाही दगडाला हात न लावता लिहीला. ह्या अहवालात अस प्रतिपादन केलेल होत की बाबरी मस्जिद खाली कोणत्याही मंदिंराचे अवशेष नाहीत. या अहवाला पुर्वी ASI च्या बि लाल यांनी केलेल्या संशोधनाच वाचन सुद्धा ह्या लोकांनी केल नव्हत.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 09/19/2019 - 21:54

Permalink

"कतार, युएई व सौदीमधे

"कतार, युएई व सौदीमधे पाकीस्तानी डॉक्टर्सवर काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे." असे ट्वीट तारेख फताह यांनी केले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 09/20/2019 - 11:30

In reply to "कतार, युएई व सौदीमधे by शाम भागवत

Permalink

https://www.businesstoday.in

https://www.businesstoday.in/current/world/pakistani-doctors-ms-md-programmes-saudi-arabia-arab-countries-reject-degrees-qatar-uae/story/371067.html
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 09/19/2019 - 23:09

Permalink

भारतिय मुत्सद्देगिरीचे विजय..

भारतिय मुत्सद्देगिरीचे विजय... काश्मिर प्रश्न जागतिक मंचावर आणण्यासाठी पाकिस्तान आकांडतांडव करत आहे... किंबहुना, डोके कलम केलेल्या कोंबडीसारखी धडपड करत आहे. मात्र, पाकिस्तानला सगळीकडून थपडीवर थपडा पडत आहेत. १. युरोपियन युनियनने पाकिस्तानची तक्रार स्विकारण्याला नकार दिला आहे आणि ते करताना, (अ) "काश्मिर द्विपक्षिय प्रश्न आहे", (आ) पाकिस्तान संदिग्ध (ambiguous) देश आहे", (आ) "शेजारच्या देशातून अतिरेकी भारतात येतात, चंद्रावरून नाही (Terrorists come to India from neighbouring countries, not Moon)", इत्यादी शब्दांत टीप्पणी करत पाकिस्तानला चपराकी दिल्या आहेत... Kashmir issue: European Union stands with India, says Pakistan an ambiguous country Terrorists come to India from neighbouring countries, not Moon, say European Union MPs २. पाकिस्तानने काश्मिर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेण्याचा प्रयत्न केला त्याला युएनच्या सेक्रेटरी जनरलने, "हा प्रश्न द्विपक्षिय आहे आणि संबंधित दोन्ही देशांनी तो युएनकडे आणला तरच आम्हाला विचार करता येईल", असे म्हणून पाकिस्तानच्या तोंडाला पाने पुसली !... Good offices available to India, Pakistan, if both ask for it: UN chief on Kashmir issue ३. इतके झाले तरी, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेत काश्मिर प्रश्नावर ठराव मांडण्याचा करण्याचा प्रयत्न केलाच. अश्या ठरावासाठी कमीत कमी २४ देशांचा पाठिंबा आवश्यक असतो व त्यापैकी १८ देशांनी ठरावाच्या मसुद्यावर सह्या करणे आवश्यक असते... मात्र, चीनचा सक्रिय पाठींबा असूनसुद्धा पाकिस्तानला ८ देशांच्या सह्या मिळणेही मुष्किल झाले आणि त्यामुळे अर्थातच ठरावाचा प्रयत्न बारगळला ! यावरून, इथे दिलेली वस्तूस्थिती आणि इतर बर्‍याच घटनांवरून, सर्वसामान्य लोकांना, मोदींचे परदेशदौरे स्वतःसाठी नसून भारताचे जागतिक संबंध मजबूत करण्यासाठी असतात, हे कळणे कठीण नाही. पण, डोळे घट्ट बंद करून बसलेल्या काही असामान्य भारतियांना (त्यांच्या तात्कालिक स्वार्थी हितसंबंधांना सोईस्कर नसल्याने) ते कसे कळेल?!
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Fri, 09/20/2019 - 10:03

Permalink

एका माळेचे मणी

एका माळेचे मणी https://www.loksatta.com/aurangabad-news/irrigation-projects-in-bjp-blacklist-approved-by-maharashtra-government-zws-70-1975286/
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 09/22/2019 - 18:51

Permalink

काश्मिरची आतापर्यंत दाबून

काश्मिरची आतापर्यंत दाबून ठेवलेली दुसरी बाजू... https://twitter.com/aquibmir7/status/1175075241250263041?s=12
  • Log in or register to post comments

Submitted by सर टोबी on Tue, 09/24/2019 - 21:22

In reply to काश्मिरची आतापर्यंत दाबून by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

<<काश्मिरची आतापर्यंत दाबून>>

राजकीय चर्चांमधले दिग्गज समजले जाणारे प्रतिसाद्क अशी फुटकळ माहिती हि दमदार पुरावा असल्यागत चेपवतायत हे ऐकून आणि पाहून वैषम्य वाटले. व्हिडीओ मधला साऊंड ट्रॅक आणि त्या युवकाच्या ओठांच्या हालचाली यांचा काही एक संबंध नाहीये हे उघड्या डोळ्यांनी दिसतंय. जाता जाता: विकासाचे वारे काश्मीर खोऱ्यांमधून कधी वाहणार आहेत म्हणे? ते वाहायला लागल्यावर वाहवत गेलेला काश्मिरी आपोआप राष्ट्रीय प्रवाहात सामील होईल अशी भविष्यवाणी इथेच, या संस्थळावर, वाचायला मिळाली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 09/24/2019 - 23:54

In reply to <<काश्मिरची आतापर्यंत दाबून>> by सर टोबी

Permalink

१००% बरोबर आहे. कलम हटवले

१००% बरोबर आहे. कलम हटवले म्हणजे सगळे चुटकीसरशी सुरळीत व्हावे ही तुमची इच्छा अव्यवहार्य आहे हे म्हणण्याची कोणाची शामत आहे, नाही का???!!! जे इतरांनी ७० वर्षे, फक्त आणि फक्त बिघडवले, ते सगळे सुरळीत व्हायला जरा वेळ कशाला द्यायला हवा, ताबडतोप व्हायला हवे होते! सरळ विचार करणार्‍यांना हे कसे समजत नाही बरे? आश्चर्य आहे! मुख्य म्हणजे, "काश्मिरमध्ये हाहाकार माजला आहे" हे मत जगाला मान्य नसले तरी आपण त्याबाबत छाती बडवून घेण्यात धन्यता मानणे आणि त्याविरुद्ध काही पुरावा कोणी पुढे मांडला की त्याच्या नावे होळी खेळणे, ही फॅशन भारतात नवीन नाही. तेव्हा त्याबद्दल आश्चर्य ते काय?! काश्मीरमधील मोजकी कुटुंबे ३७० कलमाआडून काश्मीरचे बजेट लुटून गब्बर झाली आहेत, या उघड गुपिताबद्दल अज्ञानी असणे, हे किती सोईस्कर आहे ! आणि खरेच अज्ञानी असल्यास, धन्य आहे ! :) तेव्हा तुमचे नथितून तीर मारणे चालू द्या ! विनोद एक आनंददायी गोष्ट आहे. =))
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on गुरुवार, 09/26/2019 - 08:46

In reply to <<काश्मिरची आतापर्यंत दाबून>> by सर टोबी

Permalink

टोबी सर,

जम्मू एंड कश्मीर बैंकचे अक्काउंट तपासा, मग कळेल विकास कोणाचा झाला तो! महबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला, यासीन मलिक ही गाढ़वे भर चौकात चाबकाने फोडून काढण्याचे मटेरियल आहे , या स्पष्ट मताचा आहे मी! काही शंका आहे का तुम्हाला?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 09/27/2019 - 20:36

In reply to <<काश्मिरची आतापर्यंत दाबून>> by सर टोबी

Permalink

विकासाचे वारे काश्मीर

विकासाचे वारे काश्मीर खोऱ्यांमधून कधी वाहणार आहेत म्हणे? विकासाचे वारे ७० वर्षे वाहतच होते आताच ३७० विटांची भिंत बांधून मोदींनी ते अडवले आहेत. एवढं पण समजेना झालं का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 09/22/2019 - 20:46

Permalink

“आदित्य शिवसेनेचे राहुल गांधी

“आदित्य शिवसेनेचे राहुल गांधी ठरणार, लिहून ठेवा”; अँकरचे पडद्यामागील बोल लाइव्ह गेले अन्…

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सुमीत राघवनचा आदित्य ठाकरेंना खरमरीत टोला
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Mon, 09/23/2019 - 19:40

Permalink

मा मोदीजींच्या शुभ हस्ते UN

मा मोदीजींच्या शुभ हस्ते UN च्या अमेरिका स्थित ईमारतीच्या टेरेसवर भारताने बनवलेले "म गांधी सोलार पार्क" २३ सप्टेंबर रोजी जगाला सर्मपित होणार आहे !! 50 kWH ची ही सिस्टीम असुन त्यात १९३ सोलार पॅनेल आहेत. ते १९३ सोलार पॅनेल्स १९३ देशांच प्रतिनीधीत्व करतात. २३ सप्टेंबर ला म गांधीजींच्या १५० व्या जयंतीच निमीत्त्य साधुन मा मोदीजींनी हा सोहळा करणार आहेत !
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Tue, 09/24/2019 - 15:01

Permalink

पंजाब महाराष्ट्र बँकेवर निर्बंध !

पंजाब महाराष्ट्र बँकेवर निर्बंध ! पंजाब = घोटाळा ???? थॉमस कुकने गुंडाळला गाशा !
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 09/25/2019 - 05:00

Permalink

म्हापसा अर्बन बँकेचे १)पंजाब

म्हापसा अर्बन बँकेचे १)पंजाब महाराष्ट्र / २) ठाणे जनता सहकारी ,/ ३) डोंबिवली नागरी या तिनांपैकी एकात विलीनीकरण करण्याचे ठरले आहे . यासाठी फंडिंग तर नाही ना पंजाब महाराष्ट्रचे?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/25/2019 - 10:21

Permalink

अभिनंदन सेठ.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात स्वच्छता अभियानाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनचा प्रतिष्ठित ग्लोबल गोलकिपर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कसं कसं जमतं या माणसाला हे देवजाणे. शेठचं अभिनंदन. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Wed, 09/25/2019 - 14:58

Permalink

अ रारारारा

हे ट्वेन्टिनन सेवन्टिन म्हणजे नक्की किती भक्त लोक सांगतील काय????
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 09/28/2019 - 23:10

In reply to अ रारारारा by गोंधळी

Permalink

हा हा हा

कोणताही पाढा म्हणतात ते.. त्याचं इतिहास, भूगोलही असाच आहे. आपण ब्वॉ फॅन आहोत, हे नम्रपणे नमूद करतो. -दिलीप बिरुटे ( नायंटीन सेवन्टी टू तला) :)
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on गुरुवार, 09/26/2019 - 13:33

Permalink

सगळ ठिक आहे..........

अर्थव्यवस्था वाढीचा दर घसरुन ५.८ वर आला आहे. निवडनुकांनंतर परकिय त्याची गुंतवणुक काढुण घेत आहेत. वाहन उद्योग संकटात आहे. कित्येकांच्या नोकरया गेल्या आहेत. IL&FS,JET AIRWAYS,DHFL,...... PMC BANK या सारखे अनेक उद्योग्,संस्था आर्थिक संकटात आहेत्, कर्म्चारी बेकार झाले आहेत्, सामान्य गुंतवणुक धार्यांचे पैसे बुडाले आहेत. GST मधुन अपेक्शित महसुल मिळत नाही आहे. अशा अनेक समस्या आहेत. पण तरीही भारतात सगळ ठिक आहे.......... कारण भारतीय जनतेला कोणिही मुर्ख बनवु शकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 09/29/2019 - 09:35

In reply to सगळ ठिक आहे.......... by गोंधळी

Permalink

ओह नो...

नमस्कार साहेब, अहो..हे किरकोळ प्रश्न आहेत. तिनशे सत्तर हटवल्याचा आनंद साजरा करा. आदरणीय साहेब, अमेरिकेत साठ हजार भारतीय लोकांसमोर जाऊन ट्रम्प यांनाही वाटावे की अध्यक्ष मी आहे की शेठ आहे, अशी ती परिस्थिती पाहा. अहाहा. काय स्टेडीयम, काय भाषण. सुप्पर. आदरणीय साहेबांनी जेव्हा ट्रम्प अंकलचा हात पकडून स्टेडीयमला चक्कर मारली तेव्हा तर माझे डोळे भरुन आले. केवळ अप्रतिम शीन होता. कसं जमतं त्यांना त्याचा विचार करा. परराष्ट्रीय प्रभावाचा तो एक उत्तम प्रयोग होता. पाकिस्तानला एकाकी पाडलं ते बघा. जीएष्टी, महागाई, बेकारी, खाजगी कंपन्यात रोजगाराची होणारी कपात, अर्थव्यवस्था वाढीचा दर घसरतोय, वाताहात होताहेत, मंदी हे असले क्षुद्र प्रश्न विचारता. आपण जवळ जवळ देशद्रोहीच आहात. चांद्रयान बघा, विक्रम लँडरशी संपर्क जरी तुटला तरी ऑर्बीटर फिरतय त्यात सुख माना. के. शिवनची पाठ थोपटवा, बळजबरी गळ्यात पडतांनाचे फोटो पाहा. आणि मुख्य म्हणजे सत्तर वर्षातला विकास बघा. इथे कालपर्यंत वीज तरी होती का ? रस्ते होते का? पं.नेहरुंनी देशाची वाट लावली ते बघा. बोलो भारत माता की जय. हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा. बोलो बोलो भारत मात्ता की जय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by ऋतुराज चित्रे on गुरुवार, 09/26/2019 - 22:41

Permalink

सध्या फक्त पुराणातील वानगी

सध्या फक्त पुराणातील वानगी आणि भविष्यातील गाजरे ह्यावरच बोलण्यास परवानगी आहे. पेरलेले का उगवले नाही हे विचारायचे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 09/27/2019 - 05:37

Permalink

खासदारकी सोडून काय मिळवलं?

खासदारकी सोडून काय मिळवलं? पोट निवडणूक खर्च वाढवला. असंही भाजपची कामं आतून करता आली असती ना?
  • Log in or register to post comments

Submitted by उपेक्षित on Fri, 09/27/2019 - 12:05

Permalink

बाकी काही नाही पण सध्या

बाकी काही नाही पण सध्या विठ्ठलाच्या देवळातील बडवे माजलेत एवढे निरीक्षण नोंदवतो आणि खाली बसतो. आपला उपेक्षीत (छोटा माणूस) :))))
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Fri, 09/27/2019 - 12:37

Permalink

Blot on Muslims for being

Blot on Muslims for being beaten up, get the pistol, I will take care of rest: Haryana judge Fakhruddin incites Muslims to shoot Hindu adversaries हरयाणातल्या कोर्टाच्या न्यायमुर्तींचे हे विधान आहे. ऐकुन धन्य झालो. हिंदु लोकांनो सावधान !!! कोर्टाने सांगितलय हिंदुंना गोळ्या घालायला !!
  • Log in or register to post comments

Submitted by उपेक्षित on Fri, 09/27/2019 - 20:11

Permalink

१) Bosch | बॉश कंपनीला मंदीची

१) Bosch | बॉश कंपनीला मंदीची झळ, पुढील आठ दिवस उत्पादन बंद | नाशिक - सौजन्य ABP Majha >>>>>>>>>अवघड आहे सगळ, २ प्रकारचे व्यवसाय करत असल्याने मंदीचे परिणाम जवळून आणि वरच्या लेवल पासून खालच्या लेवल पर्यंत जाणवत आहेत आणि सत्ताधारी मात्र इतक्या उंचीवर पोहोचले आहेत आणि मोठ्ठे झाले आहेत कि खाली जळत असलेल्याची धग सध्या त्यांना जाणवत नाहीये. २) गेले २ दिवस पुण्यात झालेल्या पावसाने बर्याच जणांची वाताहत झाली आहे, सिंहगड रोड ला मी राहत असलेल्या परिसरातील प्रत्येक सोसायटीत पाणी शिरून बरेच नुकसान झाले आहे तसेच २ जणांची घरे देखील पडली आहे, पण निवडून दिलेल्यातील सत्ताधारी पक्षाचा एकही प्रतिनिधी (साधा नगरसेवक सुद्धा ) फिरकला देखील नाही. काल शिवसेनेचे आमदार श्री बापू शिवतारे मात्र स्वतः येऊन सगळीकडे पाहणी करीत होते लोकांशी बोलून धीर देत होते. (निवडणुका आहेत माहिती आहे मात्र सत्ताधारी आमदार फाजील आत्मविश्वासा पायी फिरकले देखील नाहीयेत)
  • Log in or register to post comments

Submitted by रविकिरण फडके on Sun, 09/29/2019 - 07:15

In reply to १) Bosch | बॉश कंपनीला मंदीची by उपेक्षित

Permalink

हेच भागधेय

काय आहे, पूर आल्यानंतर, किंवा अशाच कुठल्याही दुर्घटनेनंतर, संबंधित नगरसेवक/ आमदार/ अन्य कुणी, येतो, पाहणी करतो, धीर देतो, इ.इ. सगळं ठीक आहे. पण अशा घटना मुळातच घडू नयेत ह्यासाठी हे लोक काय करतात हा प्रश्न विचारला पाहिजे. अर्थात, त्याचे उत्तर 'काहीही नाही' हेच येईल. अज्ञान, स्वार्थ, बेपर्वाई, इत्यादि कारणांमुळे हेच जे सर्व नामदार लोकांच्या मृत्यूला कारण ठरतात, त्यांच्यावर खरे तर खटले चालविले पाहिजेत पण दुर्दैवाने, आपले काम न करण्याला आपल्या देशात शिक्षा नाही. आणि हो, बिल्डर्स, PMC चे अभियंते, इत्यादींना ह्यास जबाबदार धरू नका. राजकीय नेतृत्वाकडून काही किमान अपेक्षा असतात (त्यात ह्या सर्व लोकांवर नियंत्रण ठेवणे ही एक मुख्य) त्या पूर्ण करायला सगळे पक्ष अपयशी ठरले आहेत. त्यामुळे, सत्ता कोणाचीही येवो, सामान्य लोकांचे हेच भागधेय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 09/30/2019 - 10:54

In reply to हेच भागधेय by रविकिरण फडके

Permalink

याचे कारण आपली अफाट वाढणारी

याचे कारण आपली अफाट वाढणारी लोकसंख्या आहे. ओढे नाले नदी यांच्या काठावर आणि प्रवाहातसुद्धा भारतभर अनधिकृत वस्त्या आहेत त्यामुळे निसर्गाचा कोप झाला तर सर्वात अगोदर याच लोकांचे नुकसान होते. परंतु याना तेथे घरे बांधू नका हे सांगणारे कुणीच नाही कारण जितकी लोकसंख्या जास्त तितके मतदार जास्त. महापालिकेचे अभियंते काय लोकांना अनधिकृत वस्ती बांधा म्हणून सांगायला जातात का? अनधिकृत वस्तीवर कार्यवाही करायला जाणाऱ्या माणसाला मारच खावा लागतो कारण पोलीस सुद्धा अशावेळेस पाय मागे घेतात. कोणतिहि सरकारी यंत्रणा तुमच्या वाढत्या लोकसंख्येला पुरी पडणार नाही हि वस्तुस्थिती. प्लास्टिक टाकून ओढे, नाले नद्याचे प्रवाह काय सरकार बंद करतंय का? घाटकोपर येथे एका सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या भिंतीच्या पलीकडील जमीन खणून झोपड्या बांधल्या. पावसाळ्यात अशी कमकुवत झालेली भिंत पडून दोन माणसे दगावली त्यासाठी कंत्राटदाराला अटक झाली. भिंतीच्या मजबुतीचा लेखा जोखा आय आय टीच्या अभियंत्याद्वारे केला गेला तेंव्हा भिंत व्यवस्थित बांधली होती असा निष्कर्ष निघाला.ती पोखरली गेल्यामुळे पडली. आता त्या व्यक्तीच्या मृत्यूची जबाबदारी कुणाची. दर डोई सुविधा या सुविधा भागिले लोकसंख्या अशीच मिळणार आहे. आपल्या जनतेची लायकी हीच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Sat, 09/28/2019 - 21:36

Permalink

DRDO च्या अधिकाऱ्यांनी असं

DRDO च्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय की, आपण टी ७२ व टी ९० रणगाड्यांना इमेज इन्टेसीव्ह ट्यूब वापरून रात्रीच्या वेळेस १०० ते १५० मिटरपर्यंत दृक्षमानता मिळवून देऊ शकलो होतो. २०११-१२ पासून चालू असलेल्या प्रयत्नांना यश मिळून आपण आता थर्मल इमेजिंग तंत्र आत्मसात केलं आहे. हे तंत्र अंमलात आणून प्रत्यक्ष उत्पादन व वापर आता सुरू होतोय. टी७२ साठी १००० यंत्रणांची जरूरी असून त्यापैकी ३०० यंत्रणा बसवून झाल्या आहेत. हे तंत्रज्ञान खूप अद्ययावत असून ३ किमी पर्यंत याचा आवाका आहे. जास्त अचूकते बरोबर मिट्ट काळोखातही हे वापरता येते. अगोदरच्या यंत्रणातून वेध घेताना बाहेर अंधूकसा का होईना पण थोडाफार तरी उजेड लागायचा. टी९०ला मात्र काही अडचणींमुळे ही यंत्रणा जरा सुधारित करून बसवायला लागणार आहे. पण त्यामुळे हीचा पल्ला ३ वरून ४ किमी होणार आहे. नविन यंत्रणेमुळे शत्रू शोधून काढणे. त्यावर नेम धरून मारा करणे शक्य होणार आहे. स्नायपर्स हेच करत असतात. ते जर रणगाडा करू लागला तर काय होईल हा अंदाजच आश्चर्यकारक असणार आहे. स्नायपरच्च्या गोळीच्या ऐवजी जर तोफगोळाच शत्रूच्या अंगावर जायला लागला तर . . . :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sun, 09/29/2019 - 01:51

Permalink

पुरुषांनो सावधान!

पुरुषांनो सावधान : वाशीमध्ये पुरुषावर पुरुषांकडून सामूहिक बलात्कार बातमी : https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/man-gangraped-in-navi-mumbai/articleshow/71304290.cms -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Mon, 09/30/2019 - 18:35

Permalink

आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून लढणार असल्याची घोषणा केली. निकाल काहिही लागो पण निवडणूक लढविणारा ठाकरे कुटूंबातील पहिला नेता म्हणून त्यांचे नाव घेतले जाईल. निवडणूकीच्या उतरण्याची हिंमत दाखविल्याबद्द्ल अभिनंदन !
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 09/30/2019 - 19:53

In reply to आदित्य ठाकरे by धर्मराजमुटके

Permalink

लोकशाहीचा मखन राखला.

लोकशाहीचा मखन राखला.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 09/30/2019 - 19:53

In reply to लोकशाहीचा मखन राखला. by कंजूस

Permalink

लोकशाहीचा मान राखला.

लोकशाहीचा मान राखला.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 09/30/2019 - 19:06

Permalink

राजा उदार झाला ....

छत्तीसगडाचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणतात की : भाजप आणि संघ यांचे लोक ‘गोडसे मुर्दाबाद’ म्हणतील, तेव्हा मी त्यांना खरे गांधीवादी समजेन ! बातमी : १. https://sanatanprabhat.org/marathi/276869.html २. https://hindi.timesnownews.com/india/article/chhattisgarh-cm-bhupesh-baghel-says-when-rss-start-raising-slogan-godse-murdabad-i-will-accept-modi-ji-become-true-gandhian/496809 आयला म्हंजे हैदराबादचा तुकडा पडू न देणाऱ्या प्रखर देशभक्त नथुराम गोडसे यांचा निषेध केला तर भूपेश बघेल हा काँग्रेसवासी त्याचा लाडका नॉस्टॅल्जिक डिल्डो संघवाल्यांना वापरायला देणार. कर्णानंतर इतका दानशूर राजा हाच की हो. राजा उदार झाला, हाती भोपळा दिला. -गा.पै.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com