मोदी सरकार चे कौतुकास्पद निर्णय !!!

ट्रम्प's picture
ट्रम्प in राजकारण
18 Sep 2018 - 6:44 pm

मी मोदीभक्त तर मुळीच नाही पण सतत 18 तास कामात व्यस्त असणारे सध्याचे पंतप्रधान आणि डोळे मिचकवणारे लहरी महंमद भावी पंतप्रधान यातील फरक समजण्या इतका माझा मेंदू नक्कीच जागृत आहे .
मिपावरील आदरणीय सभासद अभिजित 1 यांनी मोदींनी गेल्या 4 वर्षात केलेल्या चांगल्या कामा संबंधित यादी योग्य त्या लिंक सहित बनविण्यास मला सांगितले होते . त्यांचा आदेश शिरोधार्य मानून मी सुरवात केली आहे , तसेच त्यांच्या धाग्यांवर त्यांनी प्रतिसाद व मोदींच्या चांगल्या कामाच्या लिंक्स टाकायला विरोध केला होता पण मी अभिजित 1 यांचे मोदी विरोधातील लिंक्स सहित या धाग्यावर स्वागतच करीन .

तर काँग्रेस ला वैतागलेल्या आणि भाजप ला अजून किमान 10 वर्ष सत्तेत पाहू इच्छिणाऱ्या मतदार / सभासदांचे चांगल्या कामाच्या लिंक सहित या धाग्यावर स्वागत .

' Give up lpg subsidy ' ही मोहीम मार्च 2015 ला मोदींच्या भाजप सरकारने चालू केली , फक्त गरजू गरीब लोकांना सबसिडी दारात सिलेंडर उपलब्ध व्हावा आणि सधन लोकांवर सबसिडी च्या रूपाने होणारी उधळपट्टी थांबावी म्हणून . या मोहिमे मूळे एप्रिल 2016 पर्यंत 1 करोड लोकांनी स्वेच्छेने सबसिडी नाकारली . एका सिलेंडर ची सबसिडी किमान 200 रु धरली तर 1 करोड लोकांचे महिन्याचे 200 करोड तर वर्षाचे किमान 2000 करोड ची उधळपट्टी थांबून ती गरजू लोकांना उपलब्ध करून दिली .

Give up LPG subsidy https://g.co/kgs/hwAknf

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

1 Nov 2018 - 10:35 am | सुबोध खरे

EPCA, appointed by India's Supreme Court,

कावीळ झाली कि अस होतय पहा

Read more at:
//economictimes.indiatimes.com/articleshow/66428882.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

सुबोध खरे's picture

1 Nov 2018 - 10:38 am | सुबोध खरे

As part of graded action plan against rising air pollution in Delhi, Environment Pollution Control Authority (EPCA) on Tuesday said private cars will be stopped from plying in the capital if air pollution continues to worsen.

"Let us hope the air pollution situation in Delhi doesn't deteriorate or else we will have to stop plying of private vehicles. Only public transport will be used," Bhure Lal, Chairman, Environment Pollution Control Authority, was quoted as saying by news agency ANI.
EPCA, appointed by India's Supreme Court, has already proposed halting construction, the use of diesel-run power generators, brick kilns and the burning of garbage between Nov. 1 and Nov. 10 when pollution levels are expected to rise.

Read more at:
//economictimes.indiatimes.com/articleshow/66428882.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

काँग्रेस ला हे कधीच जमले नसते.

अभिजित - १'s picture

1 Nov 2018 - 4:23 pm | अभिजित - १

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/rbi-head-s...
RBI governor should work with the government or quit, says head of RSS economic wing
उर्जित पटेल ना अल्टिमेटम !! बहुतेक अर्थक्रांती चे बोकील आता RBI चे गव्हर्नर होणार !!

खरे साहेब , ET आहे का तुम्हाला पुरेसा पुरोगामी ? आता तो पण पटत नसेल तर BJP ला सांगा कि एक नवीन पुरोगामी पेपर सुरु करायला . सगळा प्रश्नच मिटेल मग !!

सुबोध खरे's picture

14 Nov 2018 - 7:30 pm | सुबोध खरे

काय सांगताय?
यात काय चूक आहे हो?
तुमचे लाडके माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह पण तेच म्हणतात कि
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/finance-minister-is-always-superior-rbi-governor-cant-defy-him-manmohan-singh-in-2014-book/articleshow/66531984.cms
आणि हे त्यांनी २०१४ मध्येच म्हटलंय.
परत सांगतो कि चष्मा काढा.( इकॉनॉमिक टाइम्स पुरोगामी आहे कि नाही ते नंतर ठरवू.)

कौन्तेय's picture

14 Nov 2018 - 2:17 pm | कौन्तेय

सगळ्या कमेंट्स पहात होतो, पण जी.एस.टी. मुद्द्यावरून एकही साधक बाधक टिप्पणी दिसली नाही.
मी स्वतः जी.एस.टी. या एका मुद्द्यावरूनही भाजपा सरकार परत आणायला तयार आहे. मोदी - शहा दुकलीने कामे आजवर चांगलीच केली आहेत. काँग्रेसवाल्यांना, डाव्या वर्चस्ववादाला आणि मुस्लिम वर्चस्ववादाला ठेचण्यासाठी तेच हवेत. पण, ... कालान्तराने - बहुदा तिसऱ्या टेन्युअरमधे वगैरे आता मोदीला उचला म्हणत आन्दोलन करण्याची पाळी संघवाल्यांवर येऊ शकते. मला मोदीबद्दल पर्सनली प्रेम नाही वा आकसही नाही. पण विनाप्रश्न मिळालेली १००% सत्ता मोदीसारख्या नार्सिसिस्टची काय अवस्था करील हे याची चिन्हे दिसत आहेत.

डँबिस००७'s picture

15 Nov 2018 - 6:21 pm | डँबिस००७

काँग्रेस पक्षाने स्वतः १० वर्षे राफाएल विमान खरेदीत दिरंगाई करुन देशाच अपरीमीत नुकसान केल आहे आणी तोच पक्ष राफाएल विमान खरेदीत दिरंगाई करुन देशाच अपरीमीत नुकसान केल आहे असा दोष भाजपावर देत आहे. त्याच बरोबर राफाएल विमानाच्या सर्व डिटेल्स सार्वजनिक करा असाही आग्रह धरणारा विरोधी पक्ष देशाच वाटोळ्ळ करायलाच टपला आहे.

त्या पेक्षा मोदी परवडले !!

डँबिस००७'s picture

20 Nov 2018 - 9:01 am | डँबिस००७

Western Periferral Delhi Express High way (Ring Road) ह्या माहामार्गाच श्री मोदींजींच्या हस्ते उद्घाटन काल करण्यात आल
Eastern Periferral Express Highway च उद्घाटन या पुर्वीच केल गेलय !
दिल्लीच्या शेजारच्या 5 राज्यातल ट्राफीक हे दिल्लीतुन जात असे त्यामुळे दिल्लीला ट्राफिक व प्रदुषणाचा भयंकर त्रास सहन करावा लागत होता. त्यावर उपाय म्हणुन हा Outer Ring Road ची कल्पना मांडली गेली व 11,000 कोटी रु ची योजना केवळ ३ वर्षांत प्रत्यक्षात उतरली !!

मदनबाण's picture

22 Nov 2018 - 10:01 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Na Ja (Official Video) :- Pav Dharia

डँबिस००७'s picture

28 Nov 2018 - 12:30 am | डँबिस००७

Essar Steel becomes the 1st company to come around & say it wants to settle its 54,000 cr NPA loan to banks taken between UPA period of 2004-14.

- Amount is 6 times of Vijay Mallya's default.
- Amount is 8 times of Nirav Modi's default.
- Amount equal to entire Rafale deal.
- All given under UPA era.

*Big victory for Modi and his Insolvency & Bankruptcy code (IBC)*

- IBC would do to corporate lending what CIBIL did to retail lending .
*- IBC insolvency is as big a reform as GST.*

Media will not show such developments in their primetime debates coz appeasing INC which gave NPA worth 54,000 crore is important than doing justice to Modi who is yielding results despite facing odds.

https://m.economictimes.com/industry/indl-goods/svs/steel/essar-steel-se...

IBC is a great success.
To loot the banks the UPA government had disbursed 47 lac crores between 2007 to 2013.
This figure looks stunning if you know that only 19 lac crores was disbursed by banks from 1947 to 2006.
It was specifically mentioned by the PM recently. He calls it "phone banking".
Congress was taking a 6% fee for arranging such loans.....

Blackcat's picture

30 Dec 2018 - 5:22 pm | Blackcat (not verified)

(स्पेशल रिपोर्ट) बोगीबील पुलाचं बांधकाम कुठल्या सरकारच्या काळात झालं ?
स्पेशल रिपोर्ट) बोगीबील पुलाचं बांधकाम कुठल्या सरकारच्या काळात झालं ?
Posted on December 26, 2018 by EG NewsDesk

WhatsAppFacebookTwitterFacebook MessengerEmailShare1,067
नवी दिल्ली: आसामच्या दिब्रूगढ आणि धेमाजी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या बोगीबिल पुलाचे उद्घाटन काल (25 डिसेंम्बर 2018) पंतप्रधान मोदींनी मोठ्या थाटात केले. 4.94 किलोमीटरच्या या पुलामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या दोन काठांवर वसलेल्या आसामच्या या दोन जिल्ह्यांना नदी पार करण्यासाठी मोठ्या अंतराचा वळसा घालायची गरज राहणार नाही.

आपल्या नेहमीच्या शैलीत पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात देखील विरोधी पक्षांवर तोंडसुख घेतले. अटल बिहारी वाजपेयी यांना अजून एकदा पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली असती तर हा पूल लवकर बांधून पूर्ण झाला असता अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच 2014 सालापर्यंत पुलाच्या बांधकामात ढिसाळपणा केला गेल्याचाही दावा त्यांनी केला. 1997 साली पंतप्रधान देवेगौडाच्या हातून या पुलाची कोणशीला ठेवण्यात आली, 2002 साली वाजपेयींनी या पुलाचं काम सुरू केलं आणि माझ्याच कार्यकाळात मी हा पूल पूर्ण केल्याचा त्यांनी दावा केला.

त्यांचा हा दावा कितपत खरा आहे हे आपण पाहूया :

1) राजीव गांधींनी आसाम मधली फुटीर चळवळ संपवली त्या वेळेस आसाम चळवळीशी संबंधित प्रफुल्ल मोहंतो यांच्यासोबत भारत सरकारने आसामी जनतेच्या हितरक्षणासाठी एक करार केला होता त्याला आसाम अकोर्ड असे म्हणतात, बोगीबिल पूल हे त्या करारातलं एक वचन होतं.

2) 1997 साली एच डी देवेगौडा पंतप्रधान असताना या पुलाची घोषणा करण्यात आली. मात्र पुलाचं काम सुरू व्हायला 2002 साल उजाडलं, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते.

आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आतच 2004 साली त्यांनी सार्वत्रिक निवडणूक घेतल्या व त्यात काँग्रेस पक्ष व सहकारी विजयी होऊन देशात युपीएचं राज्य आलं. या 2004 सालापर्यंत बोगीबिल पूल फक्त कागदावर होता. सर्वे व आखणी इतपतच काम ग्राउंडवर होत होतं.

3) 2004 ते 2005 सालापर्यंत बोगीबिल पुलाच्या संकल्पनेला अंतिम स्वरूप देण्यात आलं, रेल्वे व रस्ता असा दुहेरी पुल तसेच सिंगल वेल्डेड पूल बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रह्मपुत्रा नदीच्या दोन्ही बाजूंना भूकंप संवेदनशील क्षेत्र असल्याने 10 रिष्टर स्केलचे भूकंप सहन करू शकेल असा पूल बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वीडन व डेन्मार्क या दोन देशांना जोडणाऱ्या ओरेसंद पुलाचा विशेष अभ्यास यासाठी करण्यात आला होता.

4) ब्रह्मपुत्रा नदीवर बांधकाम करणे सततच्या प्रवाहामुळे अशक्य होते, त्यात सततच्या पावसाने बोगीबिल प्रोजेक्ट वर फक्त डिसेंम्बर ते एप्रिल या चार महिन्याच्या कालावधीतच काम करता येत होते.रेल्वेचं इतर विभागात काम सुरू असल्याने फंडिंग कमी पडत होती म्हणून 2006 ते 07 या वर्षी पुलाचं काम मंदावलं होतं, म्हणूनच 2007 साली केंद्र सरकारने या पुलाला राष्ट्रीय प्रकल्प घोषित केलं, राष्ट्रीय प्रकल्प घोषित झाल्यावर 75% अर्थसहाय्य थेट केंद्र सरकारकडून मिळालं व उरलेले पैसे रेल्वे ने गुंतवावेत असं ठरवलं. केंद्रीय प्रकल्प घोषीत झाल्यावर या प्रकल्पाला खरी गती आली.

5) 2007 ते 2011 सालापर्यंत नदीच्या तळावर वेल्स खणून त्यातून सपोर्ट स्ट्रक्चर उभं करणे, दोन्ही साईडचे dykes उभे करणे व पुलाचा संपूर्ण पाया, खांब व वरील पृष्ठभाग तयार करणे हे सर्व सबस्ट्रक्चर चे काम झालेले होते. मात्र सुपरस्ट्रक्चर तयार करायला जे तांत्रिक कौशल्य लागतं ते रेल्वे जवळ नव्हतं व केंद्रीय बांधकाम खात्याकडे (cpwd) ते उपलब्ध होतं मात्र पुलावर काम करायला जे चार महिने उपलब्ध होते तेव्हा ते होऊ शकलं नाही.

6) रेल्वेने तयार केलेल्या बोगीबिल प्रकल्पाच्या प्रोग्रेस रिपोर्टचं एक पान आपण बघू शकता

त्यात स्पष्टपणे असं लिहिलं आहे की सबस्ट्रक्चरल कामे 100 टक्के पूर्ण झाली आहेत. संपूर्ण रिपोर्ट इंडियन रेल्वेच्या या लिंकवर उपलब्ध आहे http://www.indianrailways.gov.in/ क्लीक केल्यास रिपोर्ट डाउनलोड होईल

7) 2007 ते 2016 ह्या सर्व कालखंडात या प्रकल्पावर फक्त वर्षाचे चारच महिने काम होऊ शकलेलं आहे. कारण ब्रह्मपुत्रेचा प्रवाह व त्याभागातील पाऊस. तांत्रिक सहाय्यासाठी गमोन इंडिया ही कंपनी व काही डच तसेच जर्मन कंपन्यांना बोलावून सुपरस्ट्रक्चर चं काम पुढे पूर्ण करण्यात आलं. ज्यात सिग्नल यंत्रणा, मोटरवे व सरफेस कोटिंग सारखी कामं होती.

8) 12 डिसेंम्बर 2013 रोजी नॉर्थ ईस्ट रेल्वेने प्रेस कॉन्फरन्स बोलावून जाहीर केलं की बोगीबिल प्रकल्पाचं काम (सबस्ट्रुक्चर व सुपरस्ट्रक्चर) 90% पूर्ण झालं आहे. ही प्रेस कॉन्फरन्स नॉर्थ ईस्ट रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एस लाहिरी यांनी घेतली होती. या प्रेस कॉन्फरन्सचं कव्हरेज सर्व वाहिन्या व वृत्तपत्रे यांनी केलं आहे.

वरील सर्व तथ्ये लक्षात घेता आपण सहज समजू शकतो की कुठल्या सरकारच्या काळात बोगीबिल प्रकल्पाचं कामकाज सर्वात जास्त झालं आहे, व कुठल्या सरकारने फक्त फित कापून श्रेय घेतलं आहे.

http://egnews.in/marathi-news/who-built-bogibeel-assam/

विशुमित's picture

30 Dec 2018 - 6:50 pm | विशुमित

आयत्या पिटावर रेघोट्या की आयत्या बिळात फेकोबा!!
...
पण अजुन थोडे थांबले पाहिजे, समर्थकांची सालवार अभ्यासू आकडेवारी येणे बाकी आहे. मग कामगिरी ठरवू. नाहीतर उगाच देशद्रोही, पुरोगामी अणि प्प्पू भक्त घोषित करायचे.

ट्रेड मार्क's picture

31 Dec 2018 - 5:47 am | ट्रेड मार्क

समर्थकांची सालवार अभ्यासू आकडेवारी येणे बाकी आहे. मग कामगिरी ठरवू.

म्हणजे तुम्ही पण आयत्या बिळावर नागोबाच की! याचाच दुसरा अर्थ असा पण होतो की तुम्ही स्वतः अभ्यास न करता फक्त सोशल मिडीयावर येणाऱ्या ढकलपत्रांवर विश्वास ठेवता.

डँबिस००७'s picture

30 Dec 2018 - 7:15 pm | डँबिस००७

10 वर्षात युपिए सरकासला लढाउ विमान विकत घेता आली नाहीत त्यांच्या कडुन ईतक्या मोठ्या पुलाची अपेक्षा ?

ट्रेड मार्क's picture

31 Dec 2018 - 5:44 am | ट्रेड मार्क

काय काय आणि किती स्पष्टीकरणं द्यायला लागत आहेत. तुम्हीच दिलेल्या लिंक मध्ये लिहिलंय की आसाम एकॉर्ड मध्ये हा पूल तयार करण्याचं मान्य झालं होतं. आता आसाम एकॉर्ड कधी झाला? तर १९८५ साली, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यानंतर तब्बल ४ वर्षे राजीव गांधी पंप्र होते, पण प्रकल्प मंजूर व्हायला १९९७ साल आणि शिलान्यास करायला २००२ साल उजाडलं. मग तिथून २००७ साली हा जरी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झाला तरी जुलै २०१४ पर्यंत, म्हणजे तब्बल ७ वर्षात, एकूण ४२ पिलर्स पैकी १५ पिलर्सचे काम चालू होते. आणि मग २०१४ नंतर २०१८ मध्ये मात्र नुसते उर्वरित २७ पिलर्स नव्हे तर संपूर्ण पूल बांधून वाहतुकीसाठी खुला पण झाला!

भौगोलिक, राजकीय, सामरिक या सर्वच बाजूने हा पूल महत्वाचा आहे हे आधीच मान्य केलेलं होतं. मग असा महत्वाचा पूल बांधण्यात एवढी दिरंगाई का बरं केली गेली? ब्रम्हपुत्रेचा पूर, प्रचंड पाणी वगैरे या सगळ्या अडचणी या गेल्या ४ वर्षात नव्हत्या का? २००७ ते २०११/२०१४ पर्यंत वर्षातले फक्त ४ महिने काम होऊ शकायचं म्हणताय मग २०१४ नंतर अशी काय परिस्थिती बदलली की एवढ्या वेगाने काम पूर्ण झालं?

बादवे मुद्दा क्र ६ मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक केलं की ती सरळ भारतीय रेल्वेच्या होम पेज वर घेऊन जाते. पुढे बोगीबीलच्या प्रकल्पाची माहिती काही मला सहज सापडली नाही.

तसंही प्रोजेक्ट पूर्ण करण्याची मूळ तारीख २००९ मधील होती, जी तर नाहीच पाळता आली. पण पुढे सुद्धा अजून ५ वर्ष हातात असूनही काम पूर्ण झालं नाही. हेच नव्हे तर अशी कितीतरी कामं UPA सरकारने तशीच ठेवण्यात धन्यता मानली. ब्रह्मपुत्रेचा पूर आणि त्यामुळे होणारे नुकसान हे पूर्वापार आहे. मग वाजपेयी सरकारने तयार केलेला नद्या जोड प्रकल्प का UPA सरकारने १० वर्षात पुढे राबवला नाही? तो पूर्ण करायला सुद्धा का मोदी सरकार यायला लागलं?

सुबोध खरे's picture

31 Dec 2018 - 10:49 am | सुबोध खरे

कशाला लोकांना समजवायला जाताय?
एखाद्याला भगवा रंग आवडतच नाही म्हणून मग ते श्रीखंड बिर्याणी इ. स्वादिष्ट पदार्थात पण केशर घालतच नाहीत.
काय करणार?

डँबिस००७'s picture

31 Dec 2018 - 9:53 am | डँबिस००७

२००४ ते २०१३-१४ हा देशातला सर्वात अंधकारमय काळ होता !!
अनेक देशासाठी महत्वाचे प्रकल्प कॉंग्रेसने बंद केले / रखडवले .

प्रकल्प वेळेत पुर्ण झाले तरच त्याचा फायदा विविध स्तरांवर मिळु शकतो .
भारताला पाकिस्तान व चीन कडुन असलेल्या धोक्याच्या संदर्भात काही महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले होते.
त्यात चाबहार बंदर विकास , मिझोराम सारख्या पुर्वोत्तर भागाला जोडणारा Kaladan Multi-Modal Transit Transport Project. हे दोन्ही प्रोजेक्ट कॉंग्रेसने बासनात बांधुन ठेवले !
देशाच्या पुर्वोत्तर भागात ५ महत्वाची राज्ये आहेत व त्यांना जोडणारा भुभागाला चिकन्स नेक म्हणतात. अतिशय चिंचोळा असलेला हा भुप्रदेश चीन कधीही अतिक्रमण करु शकेल असा आहे व त्यामुळे देशाचा संपर्क ह्या पुर्वोत्तर राज्यांशी तुटेल. अश्या परिस्थितीवर मात देण्यासाठी ब्रम्हदेशातल्या कलादान बंदरातुन पलेटवा पर्यंत व तिथुन मिझोराम पर्यंत हम रस्ता असा हा प्रकल्प आहे. २००९ मध्ये हा प्रकल्प पुर्ण करण्याची डेडलाईन होती. २०१४ ही नविन डेडलाईन दिली गेली पण त्यात सुद्धा काही काम केल नाही. गेल्या ४ वर्षात हा प्रोजेक्ट पुर्णत्वा कडे येत आहे . २०२० ला पुर्ण होईल !,

ट्रेड मार्क's picture

1 Jan 2019 - 5:47 am | ट्रेड मार्क

एकूण प्रतिक्रिया बघता असं वाटतंय की इथे फक्त मला काय फायदा आणि/ किंवा मला कोण आवडत नाही वा आवडतो यालाच जास्त महत्व आहे.

२०१२ मध्ये आर्मी चीफला पंतप्रधानांना पत्र लिहून सैन्याला लागणारा दारुगोळा आणि इतर सामग्रीची दारुण परिस्थिती सांगायला लागली. वायुदलाला आवश्यक असणारी लढाऊ विमाने मिळायला २० वर्षे लागली. सैनिकांना आवश्यक असणारी बुलेटप्रूफ वेस्टस, सियाचीन सारख्या ठिकाणी असणाऱ्या सैनिकांसाठी गूज फेदरची जॅकेट्स हे मिळायलासुद्धा किती वर्षे गेली.

याचबरोबर बांगलादेश बरोबरच सीमावाद सोडवायला मोदी पंप्र व्हायला लागले. NRC ची अंमलबजावणी करायला पण मोदीच. ईशान्येकडील राज्यामध्ये प्रगतीसाठी विमानतळ, मुख्य रस्ते यासाठी पण मोदीच. सबसिडी आणि त्यायोगे होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या चक्रव्यहातून बाहेर काढायला पण मोदीच आले. गोरगरिबांपर्यंत बँकिंग, अपघात विमा तसेच आयुर्विमा, शेतीचा विमा, युरिया व इतर बीबियाणांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर उपाय, गरिबांना मोफत उपचार, शाळांमध्ये तसेच गावांमध्ये शौचालयं, स्वच्छ भारत, गंगा स्वच्छ करणे, नदी जोड प्रकल्प अश्या कितीतरी गोष्टींसाठी मोदीच यायला लागले.

बोनस म्हणून एकही शहरात/ गावात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. पाकिस्तानची अवस्था भिकार्यासारखी झाली आहे, इतरांवर निर्बंध लावणारी अमेरिका सुद्धा इराणकडून तेल घेतलं; इस्रायल, रशिया कडून शस्त्र घेतली तरी गप्प बसली. महागाई दर नीचांकी आहे.

पण २००२ ची दंगल, १५ लाख खात्यात आले नाही, नोटबंदी/ जीएसटी मध्ये त्रास झाला, देशाचा जीडीपी २/३ तिमाही घसरला, मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत, पत्रकारांना परदेश दौऱ्यावर घेऊन जात नाहीत, भाषणं करतात, आमच्या भागातील रस्ते चांगले झाले नाही, आमच्या गल्लीतील दिवे कायम बंद असतात यामुळे आम्हाला मोदी आवडत नाहीत. म्हणून आम्ही २०१९ मध्ये श्रीमान राहुल गांधी यांना पंतप्रधान करणार.

आमच्या गल्लीतील दिवे कायम बंद असतात यामुळे आम्हाला मोदी आवडत नाहीत. म्हणून आम्ही २०१९ मध्ये श्रीमान राहुल गांधी यांना पंतप्रधान करणार.

बराबर हाये. आम्चे ह्युच्च्विद्याविबूशित आनी तारणहार राहुलबाबाच्च येयाला होवे. मंग आमी आमच्या गल्लीत लुटालूट परत सूरू कर्नार. मोदीनी आमची मस्तं चालनारी दुकाणं बंद पाडली. लय तरास दिला बगा. :(

तेजस आठवले's picture

1 Jan 2019 - 3:01 pm | तेजस आठवले

सैन्याचं आणि लष्कराचं इथे काहीही सांगू नका, आम्ही भरलेल्या करांतून सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय मज्जा करतात, काश्मीरसारख्या थंड ठिकाणी महिनोन महिने राहतात हे सांगणारे आणि नाक्यानाक्यांवर "देशाचा ढाण्या वाघ" असलेल्या आमच्या भाऊ/साहेब/दादांच्या फ्लेक्सवर खालच्या कोपऱ्यात फोटो मिरवणारे पासरीला पन्नास सापडतील.
दहशतवादी हल्ले आम्ही आता विसरलो आहोत, त्यामुळे निवडणुकीत हा मुद्दाच नाही.बांगलादेशबरोबरच्या सीमाकराराशी मला काहीही देणेघेणे नाही, मला बेकरीत पाव मिळाला की झालं.
अमेरिका गप्प आहे ह्याचे कारण पेंग्विनने फोडलेली डरकाळी हे तुम्हाला माहित नाही ? ट्रम्प सामनाचे अग्रलेख(सामना न मिळाल्यास लोकसत्तारूपी मुखपत्र) वाचत नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? काही वर्षांनी नासाने चंद्रावर/मंगळावर एखादी वास्तू बांधायचे ठरवले तर आम्ही एक दिवस आधी त्याचे गुपचूप भूमिपूजन उरकून घेऊ शकतो, आहात कुठं. त्या वास्तूला नाव कोणाचं द्यायचं हा त्या वर्षीच्या निवडणुकीतील प्रमुख मुद्दा असू शकतो.

गामा पैलवान's picture

3 Jan 2019 - 12:22 am | गामा पैलवान

मोदी हलकट आहे. १९८५ साली मी बोगीबीळ पुलाच्या संभावित ठिकाणी खुल्या वातावरणात सुवासिक शीशी केली होती. त्यातनंच त्या हरामखोर मोद्याला स्वच्छ भारताची कल्पना सुचली. शिवाय बोगीबीळ पुलाची जागासुद्धा आयतीच मिळाली, हा बोनस! एवढा दुहेरी मलिदा हापसूनही त्या नालायकानं मला उद्घाटनास बोलवलंच नाही. मोदी कृतघ्न आहे.

-गा.पै.

नमकिन's picture

2 May 2019 - 10:12 pm | नमकिन

आपलीच कामं विसरलं, प्रचारात नुसत्या गांधी घराण्याच्या नावाने, महाआघाडीच्या नावं ठेवली.
सर्व हक्क सुरक्षित-RBI चा पुढे जाहीर होणारा लाभांश पण बजेट मध्ये जमा दाखवले व दास लावून बसवून वसूल केले.
दिल्ली व पूद्दूचेरीत लोकनियुक्त सरकार लागले कामात खोडे घातले, शेवटी न्यायालयाने राजभवन अधिकार काढून घेतले.
गोगोईच्यामागे लचांड लावलं, लोया ढगात, हमीभाव जाहीर केले का ५०% नफा मिळाला का शेतकऱ्यांना?

सुबोध खरे's picture

3 May 2019 - 9:44 am | सुबोध खरे

याला काही पुरावा कि अशीच फुसकुली सोडली आहे?

प्रसाद_१९८२'s picture

3 May 2019 - 10:01 am | प्रसाद_१९८२

ते रा'फूल' गांधीचे समर्थक असल्याने, पुरावे वैगेरे देणे त्यांना जरुरी वाटत नाही. तो रा'फूल' कसा मनाला येईल तोआकडा फेकत असतो, तसे त्याचे समर्थक ही शेंडा-बुडखा नसलेल्या बातम्या इथे फेकत असतात.