मोदी सरकार चे कौतुकास्पद निर्णय !!!

Primary tabs

ट्रम्प's picture
ट्रम्प in राजकारण
18 Sep 2018 - 6:44 pm

मी मोदीभक्त तर मुळीच नाही पण सतत 18 तास कामात व्यस्त असणारे सध्याचे पंतप्रधान आणि डोळे मिचकवणारे लहरी महंमद भावी पंतप्रधान यातील फरक समजण्या इतका माझा मेंदू नक्कीच जागृत आहे .
मिपावरील आदरणीय सभासद अभिजित 1 यांनी मोदींनी गेल्या 4 वर्षात केलेल्या चांगल्या कामा संबंधित यादी योग्य त्या लिंक सहित बनविण्यास मला सांगितले होते . त्यांचा आदेश शिरोधार्य मानून मी सुरवात केली आहे , तसेच त्यांच्या धाग्यांवर त्यांनी प्रतिसाद व मोदींच्या चांगल्या कामाच्या लिंक्स टाकायला विरोध केला होता पण मी अभिजित 1 यांचे मोदी विरोधातील लिंक्स सहित या धाग्यावर स्वागतच करीन .

तर काँग्रेस ला वैतागलेल्या आणि भाजप ला अजून किमान 10 वर्ष सत्तेत पाहू इच्छिणाऱ्या मतदार / सभासदांचे चांगल्या कामाच्या लिंक सहित या धाग्यावर स्वागत .

' Give up lpg subsidy ' ही मोहीम मार्च 2015 ला मोदींच्या भाजप सरकारने चालू केली , फक्त गरजू गरीब लोकांना सबसिडी दारात सिलेंडर उपलब्ध व्हावा आणि सधन लोकांवर सबसिडी च्या रूपाने होणारी उधळपट्टी थांबावी म्हणून . या मोहिमे मूळे एप्रिल 2016 पर्यंत 1 करोड लोकांनी स्वेच्छेने सबसिडी नाकारली . एका सिलेंडर ची सबसिडी किमान 200 रु धरली तर 1 करोड लोकांचे महिन्याचे 200 करोड तर वर्षाचे किमान 2000 करोड ची उधळपट्टी थांबून ती गरजू लोकांना उपलब्ध करून दिली .

Give up LPG subsidy https://g.co/kgs/hwAknf

प्रतिक्रिया

http://cashlessindia.gov.in/upi.html
Unified Payments Interface (UPI) is a system that powers multiple bank accounts into a single mobile application (of any participating bank), merging several banking features, seamless fund routing & merchant payments into one hood. It also caters to the “Peer to Peer” collect request which can be scheduled and paid as per requirement and convenience. Each Bank provides its own UPI App for Android, Windows and iOS mobile platform(s).

Nitin Palkar's picture

18 Sep 2018 - 8:45 pm | Nitin Palkar

LPG subsidy उपभोक्त्याच्या खात्यात थेट जमा होणे. युरीयाला नीम कोटींग करणे. स्वच्छतेचा आग्रह धरणे, शौचालये बांधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर जागृती करणे.

मराठी कथालेखक's picture

20 Sep 2018 - 5:51 pm | मराठी कथालेखक

युरीयाला नीम कोटींग करणे.

याचा अर्थ नाही कळाला.. जाणून घेण्यास उत्सुक आहे

समाज कंटकांकडून युरियाचा वापर दुध भेसळी करता, नकली दुध बनवण्याकरता मोठ्या प्रमाणात केला जात असे. युरीयाला कडूलीम्बाचे तेल लावल्याने हा गैरवापर थांबला. तसेच नीम कोटेड युरियाचा पिकांना अधिक उपयोग होतो. अधिक माहितीसाठी काही लिंक्स देत आहे.


डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2018 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. युरिया अनेक कारखान्यांतील रासायनिक प्रक्रियांमध्ये वापरला जातो. शेतीसाठी खत म्हणून मिळविलेला (सबसिडी असलेला) स्वस्त युरिया, सर्रास, रासायनिक कारखान्यांना विकला जात असे. आता सबसिडिवाल्या युरियाला नीम (कडूनिंब) वृक्षाच्या तेलाने कोटींग केले जाते. अश्या युरियाचा केवळ शेतीसाठीच उपयोग करता येतो. रासायनिक कारखान्यांसाठी तो निरुपयोगी असतो अर्थातच तो गैरवापर टाळला गेला व सबसिडिचे प्रतिवर्षी सुमारे रु६,५०० कोटी वाचत आहेत.

त्याचबरोबर, नीम तेलाचे कोटींग केलेल्या युरियामुळे खालील फायदे मिळतात...

२. नीम कोटिंग केलेल्या युरियातून नायट्रोजन साध्या युरियापेक्षा सुमारे १०-१५% हळू सुटा होतो. त्यामुळे, अनेक फायदे दिसून आले आहेत...
अ) नायट्रोजनचे रोपात जास्त शोषण होऊन भाताचे उत्पन्न ९.६%ने वाढते असे प्राथमिक अहवाल आहेत.
आ) पीकाने वापरलेल्या युरियाचे प्रमाण जास्त झाल्याने, त्याचे जमीन आणि पाण्यातले उर्वरित प्रमाण होऊन, तितके कमी प्रदुषण होते.
इ) नीम तेलाचे औषधी उपयोगही आहेत... biopesticide, fungicide, organic manure, suffocate mites, whiteflies, aphids and other types of soft bodied insects on contact, इ.

ट्रेड मार्क's picture

19 Sep 2018 - 2:39 am | ट्रेड मार्क

धागा काढलात हे चांगलंच आहे, पण कौतुकास्पद निर्णय हे कोणाच्या दृष्टीने कौतुकास्पद, हे महत्वाचं आहे. जे तुम्हाला मला कौतुकास्पद वाटतील ते मोदीत्रस्तांना वाटत नाहीत. त्याचं काय करायचं?

काही चांगले निर्णय -

१. वन रँक वन पेन्शन
२. जनधन योजना आणि सबसिडी, पेन्शन वगैरे सर्व सरकारी देणी परस्पर बँक खात्यात जमा करणे
३. फसल बीमा योजना
४. युरिया नीम कोटिंग
५. १२ आणि ३५० रुपयात विमा
६. उत्तरपूर्व राज्यांच्या प्रगतीसाठी दिलेले महत्व
७. स्वच्छ भारत अभियान
८. मेक इन इंडिया
९. काश्मीर मध्ये सैन्याला दिलेले निर्णय स्वातंत्र्य आणि तथाकथित मानवाधिकारवाल्याना किंमत न देणे
१०. सैनिकांसाठी बुलेटप्रूफ वेस्ट आणि (सियाचीन मधल्या सैनिकांसाठी) गूजच्या पिसांपासून बनवलेलं जॅकेट, स्लीपिंग बॅग्जची खरेदी
११. खूप वर्षांपासून घोळत ठेवलेला राफेल विमानांचा सौदा पूर्ण करणे
१२. जपान व इतर आशियाई देशांशी वाढवलेले राजकीय संबंध
१३. इराण, सौदी वगैरे मध्यपूर्व देशांशी वाढवलेले संबंध
१४. भारतातल्या सगळ्या गावात वीज पोचवणे
१५. नुसत्या नवीन रेल्वेमार्गाच्या घोषणा न करता रेल्वेमधील सुधारणा
१६. Insolvency and Bankruptcy Code

माझ्यामते पुढील निर्णय चांगले असूनही कदाचित मोदींच्या विरोधात जाऊ शकतील -

१७. बँकांच्या एनपीएची खरी रक्कम जाहीर करण्याची हिम्मत
१८. सुडाचं राजकारण न करता विरोधकांवरील भ्रष्टाचाराबद्दल कारवाई कायदेशीर मार्गाने लढणे
१९. वर्षाच्या सुरुवातीला एवढा ड्रामा करूनही ज्येष्ठतेनुसार रंजन गोगोईंना सरन्यायाधीश बनवण्यात अडथळा न आणणे

वैयक्तिकरित्या मला नोटबंदी आणि जीएसटी पण बऱ्याच प्रमाणात सफल आहेत असं वाटतं.पण त्यावर बरेच वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

एक गोष्ट मला आग्रहाने नमूद करावीशी वाटते की निर्णय घेणे किंवा दिशा दाखवणे हे नेत्याचे काम असते. अंमलबजावणी करणे किंवा निर्णय प्रत्यक्षात आणणे हे बाबुंचे काम असते आणि निर्णयाची वाट लावणे किंवा यशस्वी करणे हे जनतेच्या हातात असते.

देश भरात वहातुकी मध्ये क्रांती आणली !!
सागर माला !
भारत माला !
पुर्व व पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरीडोर !

अभिजित - १'s picture

20 Sep 2018 - 9:53 pm | अभिजित - १

छे छे !! ५० ला ७ द्या !! :) :) उगाच इथे नावं टाकण्यात काय अर्थ आहे ? झाल्या का बांधून ? कधी होणार ? भाजप या बाबतीत expert आहे .. चकचकीत नावं !!

ट्रेड मार्क's picture

21 Sep 2018 - 1:17 am | ट्रेड मार्क

सागरमाला प्रोजेक्ट

ही वेबसाईट आहे. तुम्हाला तिथे दिलेल्या माहितीवर विश्वास नसेल तर प्रोजेक्ट्स कुठे कुठे आहेत याची माहिती साईटवर दिली आहे, त्या ठिकाणी स्वतः जाऊन खात्री करून घेऊ शकता.

भारतमाला प्रोजेक्ट संबंधी काही लिंका

https://www.india.gov.in/spotlight/bharatmala-pariyojana-stepping-stone-...

https://www.indiatoday.in/mail-today/story/bharatmala-project-narendra-m...

https://indianexpress.com/article/what-is/what-is-bharatmala-project-490...

एप्रिल महिन्यात उत्तरप्रदेश मध्ये गार्ड नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर झालेल्या अपघातात १३ शाळकरी मुलं दगावली. यानंतर रेल्वेने भराभर पावलं उचलून एकतर सबवे बांधले किंवा गार्ड नियुक्त केले.

https://indianexpress.com/article/india/in-five-months-railways-removes-...

डँबिस००७'s picture

21 Sep 2018 - 5:49 pm | डँबिस००७

ईंडीयन पोस्टल पेमेंट बँक : पोस्टच्या भारतभरातील नेटवर्कचा उपयोग करत जनतेला जवळ अशी बँ क निर्माण करण्याच काम श्री मोदीजींनी केलेल आहे.

आमच्या इथे बिल्डिंग मध्ये खाली प्रत्येक घराच्या स्वतंत्र पोस्ट पेट्या आहेत. पण पोस्टमनला ती पत्रे पेटीत टाकायला पण वेळ नसतो !! तो ती watchman कडे देतो. watchman मग पत्रे सॉर्ट करून प्रत्येकाच्या पेटीत टाकतो !!

ट्रम्प's picture

21 Sep 2018 - 8:41 pm | ट्रम्प

अहो मग सॉर्ट करून तुम्ही टाका ना !!!
एक समाजसेवा केल्याचे समाधान मिळेल .
पण काहीही म्हणा तुमच्या या अवाढव्य तक्रारी वाचून मंगु शेठ ची खूप आठवण येतेय हो .

नाखु's picture

23 Sep 2018 - 12:25 am | नाखु

१ पोस्टमन पत्रे वाचून दाखवत नाही (आम्ही सिनेमात पाहीले आहे,डाकीया डाक लाया), आम्ही कायप्पा ढकलपत्रे इत्यादीवर व्यस्त असल्याने आम्हाला शक्य नाही
२ पंचवीस माळ्यांची असली तरी घरपोच पत्र दिली पाहिजेत (कालच मी सूचना लावलीय, पेपरवाले, दूधवाला आणि पोस्टमन यांनी लिफ्टचा वापर करु नये)
३.सोसायटी सुरक्षारक्षकाला पगार सोसायटी देत असली तरी त्याने सोसायटीच्याच पाण्याने कामाच्या वेळात व कामाच्या ठिकाणी काही गाड्या धुतल्या तर काही आक्षेप घेतला तर खबरदार! रोजचे रोज येणारी शेकडो पत्रे शेकडो पत्रपेट्यांमध्ये टाकायचे काम अवघड तर आहेच शिवाय जोखमीचे आहे.
(शेकडो पत्रे कोण लिहितोय हा एक शोधनिबंध विषय आहे, पुन्हा कधीतरी पाहू)
३ पोष्टात वरचेवर जाणे आहे माझे, आयसीआयसीआय एच् डी एफ सी बँक, यांना लाजवणारे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी अक्षरशः मजेत बसलेले असतात लेकाचे काही काम नको की जबाबदारी नको.
४ मुळातच जो विभाग सरकारी आहे आणि त्या नतद्रष्ट मोदींच्या काही भल्याबुर्या योजना असतील तर त्या मी सपशेल टाळतो.
एकदमच कंडम माणूस हो!
तुम्हाला सांगतो आता या पोष्टाची बँक केली तर उगाच खेड्यापाड्यातील लोकांना चटक लागली म्हणजे,उगा आमच्या शहरीबँका तालुक्याचे पुढे जात नाहीत.
कसं आहे आम्ही दरवर्षी मोबाईल, गाडी नवनवीन तंत्रज्ञान असलेलं घेऊ पण वाडीवस्तीच्या लोकांना कशाला असली थेरं!
(आता आहे त्याच जागेवर,आहे त्याचउपलब्ध मनुष्यबळ वापरून करतायत, त्याचं कौतुक तुम्हाला)
आम्ही आमच्या म्हाद्याने टांगा विकून रिक्षाचा धंदा चालू केला ते सांगत फिरू.पोस्ट आहे तसेच राहीले पाहीजे म्हणजे अनुदान/शिष्यवृत्ती खात्यात थेट जमा करण्यात काय हशील.
उपकार कर्त्याचा वाटा टाळताय काय?
व मनीआर्डर आहे की.
५ शेवटचं आणि गाभार्यात असलेलं.
सरकारी खाते बदलायचे काम वरून खाली होते हे आम्ही कधीच सहन करणार नाही.
आम्हाला गॅस पाइपलाइन मधून पाहिजे,गटारे बंदीस्त पाहिजे, मनपाकडून पाणी शुद्ध करून पाहीजे (तेच गाडी धुवायला वापरतो तिकडं नका पाहू तुम्ही) पण जराही पोष्टवाल्यांची प्रगती होता कामा नये.

तारांकित तक्रारी फेम नाखु तरकारीवाला

मुक्त विहारि's picture

13 Oct 2018 - 10:07 pm | मुक्त विहारि

+१

डँबिस००७'s picture

21 Sep 2018 - 6:11 pm | डँबिस००७

गेल्या चार वर्षांत काय काय घडल !!

१. रुरल रोड कंस्ट्रकशन
६९ कि मी / डे ( २०१३ - १४ )
१३४ कि मी / डे ( २०१७ - १८ )

२. महागाई
९.८ % ( २०१०-११ ते २०१३-१४)
४.७ % ( २०१४ -१५ ते २०१७-१८)


३८.७० % २०१४ पुर्वी
९२% आता

४. नॅशनल हायवे कंस्ट्रकशन
९२, ८५१ कि मी ( २०१४ पुर्वी )
१,२०,५४३ कि मी २०१४ नंतर आता पर्यंत

५. निव्वळ धातुचा स्टेंट हृदय शस्त्रक्रियेत वापरला जाणारा
रु. ७५,००० ( २०१४ पुर्वी )
रु. ७, ९२३ ( २०१४ नंतर )

६. क्रोमियम धातुचा सांधा, गुढङ्याचा सांधा रोपण शस्त्रक्रियेत वापरला जाणारा
रु. १,५८,००० ( २०१४ पुर्वी )
रु. ५४, ७२० ( २०१४ नंतर )

७. खाद्यपदार्थ महागाई
१६.६५ % ( २०१०-११ ते २०१३-१४)
१.७३ % ( २०१४ -१५ ते २०१७-१८)

८. टॅक्स बेनेफिटस, वरीष्ठ नागरीक, हेल्थ विमा
१५,००० ( २०१३-१४ पुर्वी )
५०,००० आता

९. पेड मॅटरनिटी रजा
१२ आठवडे ( २०१३-१४ पुर्वी )
२६ आठवडे , आता

१०. वीजे शिवाय गाव
१८ ,४५२ ( २०१३-१४ पुर्वी )
० , आता

नितिन थत्ते's picture

22 Sep 2018 - 2:35 pm | नितिन थत्ते

आमच्या शहरातल्या न्याशनल हायवेवर खूप अच्छे दिन उर्फ खड्डे झालेले आहेत.

डँबिस००७'s picture

22 Sep 2018 - 6:47 pm | डँबिस००७

बहुदा काँग्रेसच्या काळात झालेला नॅशनल हाय वे असावा !!

मार्मिक गोडसे's picture

22 Sep 2018 - 8:06 pm | मार्मिक गोडसे

बहुदा काँग्रेसच्या काळात झालेला नॅशनल हाय वे असावा !!
म्हणून त्याला वाळीत टाकायचे का? गेल्या चार वर्षात ' दत्तक 'घेण्याचा मोठेपणा करता आला नाही का?

सत्तेवर भाजप किंवा काँग्रेस कोणीही असू द्या दर पावसाळ्यात भारतातील प्रत्येक रस्ता हा खड्डेमय असतोच , त्याला अपवाद तुमच्या शहरातील नॅशनल हायवे कसा होऊ शकतो ?
त्याला कारणीभूत आहे वर्षानुवर्षे बोकाळलेला भ्रष्ट्राचार !!
निविदा किती रुपयांची असते ? खरा खर्च किती करतात ? गुणवत्ता तपासणी इमानदारीने होते का ? हे सगळे प्रश्न जादूच्या कांडी ने लगेचच सुटणार नाहीत .
आजच्याच बातमी मध्ये पैसे खाऊन वाहनांना पासिंग सर्टिफिकेट देणारे RTO चे 17 इन्स्पेक्टर निलंबित केले गेले , एकदम एव्हढे निलंबन पहिल्यादा झाले आहे . मोदींनी गर्जना केली होती नखवुनगा और न खाणे दुन्गा , पण अशी निलंबनाची कारवाई केली गेली तर पूर्ण देश लुळापांगळा होऊन जाईल .

नया है वह's picture

24 Sep 2018 - 11:41 am | नया है वह

एक नबंर

गेल्या चार वर्षांत काय काय घडल !!

पुढे चालु ..................

११. डेटा विक्री चा दर !
रु २६९.०० प्रती जी. बी. २०१४ पुर्वी
रु १९.०० प्रती जी. बी. आता

१२. कॉमन सर्विस सेंटर्स !
८३,००० २०१४ पुर्वी
२,७००,००० आता

१३. मोबाईल व्हॉईस दर !
रु ०. ५१ प्रती मिनीट २०१४ पुर्वी
रु ०.१७ प्रती मिनीट आता

१४. पासपोर्ट सेवा केंद्र !
७७ २०१४ पुर्वी
३०५ आता

१५. नॅशनल हायवे कंस्ट्रक्शन प्रती दिवसाचा दर !
१२ कि मी / दिवस ( २०१४ पुर्वी )
२७ कि मी / दिवस २०१७ -१८ पर्यंत

१६. ऑपरेशनल एअर पोर्टस !
७५ २०१४ पुर्वी
१०० आता

१७. ग्राम पंचायत ऑप्टिक फायबरने जोडणे !
५९ २०१४ पुर्वी
१,१९, ००,०००० आता

१८. हॉटेल बीलावरचा टॅक्स !
१३ -- २८ % २०१४ पुर्वी
५ % आता

१९. एल ई डी बल्ब ची किंमत !
रु ३१०.०० प्रती बल्ब २०१४ पुर्वी
रु ७०.०० प्रती बल्ब आता

ईतकी नेत्र दिपक कामगीरी फक्त चार वर्षांत करुन दाखवलेली आहे. जनतेला हे सर्व दिसत आहे.
आता येत्या काही महीन्यात काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांना गजा आड केल तर जनतेला कळुन येईल की आता पर्यंत अच्छे दिन व जनतेच्या
मध्ये आड येणारे , तोंड खुपसणारे आता गजा आड झालेले आहेत.

नाखु's picture

24 Sep 2018 - 4:12 pm | नाखु

सुद्धा मी पाहीली नाही आणि प्रमाणित केली नाही सबब अमान्य!!

उठाठेवी-१

*****

मा. द्धव ठाकरे (यांच्या अमूल्य) ठेवणीतले विचार

मुक्त विहारि's picture

13 Oct 2018 - 10:00 pm | मुक्त विहारि

मी सुद्धा....

उठाठेवी-२

ज्या एकतर्फी तलाक केस मध्ये राजीव गांधींनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवून कोर्टालातोंडावर पाडले त्याच कोर्टात आता तोंडी तलाक च्या विरोधात केस दाखल केली जाऊ शकते आणि गुन्हेगाराला शासन होऊ शकते ते फक्त भाजप ने कायदा केल्या मूळे .

स्वधर्म's picture

26 Sep 2018 - 3:25 pm | स्वधर्म

सध्या खरोखरच ह्या सौद्याबद्दल इतका द्विपक्षिय गदारोळ चालू अाहे, की खरं काय खोटं काय काही समजेनासं झालंय. मी खालील दोन दुवे पाहिले. एन डी टी व्ही सरकारसमर्थकांना पटत नाही, म्हणून इंडीया टुडेवरची चर्चाही पाहिली. त्यात तर भाजपा व कॉंग्रेसचे प्रवक्ते अाहेत. भाजपा वाले नेहमीप्रमाणे अाधीच्या सरकारने केलेले कसे चुकीचे होते, यावर घसरलेत, अाणि राफेलबाबत, रिलायन्स कंपनीच्या सहभागाबद्दल काहीच ठोस कारणं सांगू शकले नाहीत, असे वाटते.
इंडीया टुडेवरील चर्चा
https://www.youtube.com/watch?v=WiyPi_Rbyl0
एन डी टीव्हीवरील मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=aJyADfiCerI&t=235s
अशा अत्यंत गुंतागुंतीच्या कराराबाबत सर्वसामान्यांना समजेल असे संतुलित माहितीचे काही स्त्रोत अाहेत का? असल्यास इथे शेअर करावे.
हा वेगळा धागा काढावा का, या विचारात होतो, पण मोदी सरकारच्या निर्णयाबद्दलच अाहे, म्हणून इथेच दिला. कदाचित ह्या प्रकरणाची व्याप्ती वेगळा धागा काढण्याइतकी असू शकेल.

alokhande's picture

13 Oct 2018 - 11:32 am | alokhande

swatantra bhartachya itihasatil sarvat prabhavi parrashtra dhoran ya eka muddyavr ya sarkarla nivdun dyave itke changal kam yani kel aahe

https://youtu.be/JIqd_T_uf0E
Watch "१९४७ ते २०१४ आणि मोदी सरकारच्या काळातील भारताचा आर्थिक प्रवास :अर्थतज्ञ विनायक गोविलकरांचे व्याख्यान" on YouTube

हा व्हिडीयो बघितल्यावर तर भारत देशाला खरोखर अतिशय चांगला शासक मिळाला आहे ह्याची खात्री पटते !

सर्वांनी हा व्हिडीयो आवर्जुन बघावा !!

मुक्त विहारि's picture

13 Oct 2018 - 9:59 pm | मुक्त विहारि

वाचत आहे...