यंत्र (भाग ४)

गतीशील's picture
गतीशील in जनातलं, मनातलं
11 Oct 2018 - 10:56 pm

यंत्र (भाग १)
https://www.misalpav.com/node/43400

यंत्र (भाग २)
https://www.misalpav.com/node/43408

यंत्र (भाग ३)
https://www.misalpav.com/node/43412

परीक्षित अजयकडे आश्चर्यचकित होऊन बघत होता. अजय मात्र एकदम सहज आत आला..
"कसा आहेस परीक्षित?"
"........"
"अरे बोल ना"
"तुला मराठी येतं?"
" हा हा हा ..मला हिंदी आणि इंग्लिश सोडून भारतातील ६ भाषा येतात"
"......"
तेवढ्यात चव्हाणांनी त्यांचा मोबाइलला सायलेंट मोड वर टाकला..
"परीक्षित, well done. तुझा 6th sense खूप चांगला आहे. अजयबद्दल तुला जी शंका आली होती ती बरोबर होती. म्हणूनच तू IT cell त्याची तक्रार केली होतीस ना?"
"आता मी तुम्हाला कसं माहिती हे विचारणं मूर्खपणाचं वाटेल, तरी पण.."
"सांगतो, सांगतो.." चव्हाणांनी चहाचा एक घोट घेतला..
"अजय हा तुमच्या कंपनी मध्ये त्याचं career घडवण्यासाठी आलेला नाहीये. तर एका कामगिरीवर आला आहे. तुला जी शंका आली आहे ती योग्य आहे, पण ज्याच्याबद्दल आली आहे तो माणूस चुकीचा आहे.."
"पण याच्याच मोबाईल मध्ये मी फोटो बघितले होते"
"तुला कसं माहिती तो याचा मोबाईल होता?" चव्हाणांनी हसत विचारले
"...."
"बरं, ते जाऊदे, तू जेव्हा अजयचा पाठलाग करत अमनोरा मॉल पर्यंत गेला होतास तो दिवस आठवतोय का?"
"हो"
"तेव्हा तुला कोणी भेटलं होतं का?"
"अं...हो..हरिकृष्णन सर. माझे Department Head.."
"बरोबर. अजयकडे त्यांचा मोबाईल होता....!"
"काय? कसं शक्य आहे? ते तर अजयला ओळखत सुद्धा नसतील"
"ते अशामुळे शक्य झालं कारण मी तो त्यांच्या drawer मधून काढला आणि त्याच्या जागी सेम तसलाच दुसरा मोबाईल ठेवला" अजय म्हणाला..
"पण त्यांना कळालं असणारच नक्की.."
"नाही. कारण मी त्यांच्या मोबाईलच कव्हर मी तिथे बदललेल्या मोबाईलला घालून ठेवलं होतं.."
"हे सगळं ठीक आहे, पण हरिकृष्णन सर आणि या सगळ्याचा काय संबंध आहे?" परीक्षितने त्रासिक चेहऱ्याने विचारले.
"सांगतो..." चव्हाण म्हणाले..
"जो missile launcher ट्रक तुमची कंपनी बनवत आहे, ९०% शक्यता आहे कि त्या ट्रक्सची ऑर्डर हि तुमच्या कंपनीलाच मिळेल. कारण स्पर्धक कंपन्यांकडे अजून defence vehicle ला लागणारी, त्यातूनही अश्या प्रकारच्या ट्रकसाठी लागणारी skilled manpower नाहीये, आणि देशाच्या बाहेरील कंपन्या या tender साठी applicable नाहीयेत."
"OK मग?"
"देशाच्या सुरक्षेविषयी जेव्हा अश्या काही गोष्टी असतात, तेव्हा त्याला बरेच कंगोरे असतात. वरवर दिसतं तेवढं सोप्प नसतं हे. असे tender जेव्हा निघते, तेव्हा आमच्या डिपार्टमेंटला मोठठं काम येतं. Technology check पासून, espionage check पर्यंत सर्व काही.मग जी कंपनी टेंडर मध्ये भाग घेणार आहे तिच्या पासून, त्या कंपनी चे suppliers or vendors सगळ्यांना आम्हाला check करावं लागतं"
"OK " परीक्षित आता लक्षपूर्वक ऐकत होता
"तुमच्या कंपनीने टेंडरप्रमाणे सर्व पार्ट ऑर्डर करायला सुरु केले. पण अशा एका पार्टची ऑर्डर दिली गेली, जो पार्ट त्या टेंडर मध्ये नव्हताच. त्यामुळे लगेच आमच्या इथे Red flag open झाला. तो पार्ट होता एका mineral water bottle च्या टोपणाएवढा GPS transponder...!!"
परीक्षितचे डोळे विस्फारले..
"तुम्हाला कसं कळालं पण कि त्या पार्ट ची ऑर्डर देण्यात येतं आहे?"
"GPS आणि त्यासारख्या बऱ्याच technology सप्लाय करणारे कायम आमच्या नजरेमध्ये असतात. असं समज कि अश्या कंपन्यांमध्ये आमचा एका तरी खबरी असतोच"
"ह्हम्म"
"मग आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी सुरु केली, तेव्हा असा कळालं कि तो पार्ट तुझ्या हरिकृष्णनने ऑर्डर केलाय."
"हो त्यांना हे सहज शक्य आहे, Department Head असल्यामुळे."
"बरोबर. आता त्याचं नेमकं काय चाललंय हे कळावं, म्हणून आम्ही तुमच्या कंपनीच्या Board of Directors सोबत एका मीटिंग घेतली आणि त्यांना सगळं सांगितलं. आणि तिथून मग तुझा मित्र अजय अचानक तुझ्यासमोर प्रकट झाला..."
परीक्षितने अजयकडे चमकून बघितलं...
"म्हणजे अजय तुमच्यासोबत..."
"हो...त्याच्या साठी खास एका पोस्ट create करून त्याला interview वगैरे द्यायला लावून तुमच्या कंपनी मध्ये घेण्यात आलं. तुमच्या Board of Directors मुळे हे सगळं अगदी सहज झालं. तुला माहिती असेल, अजय ज्या डिपार्टमेंट मध्ये काम करतो तिथे 2 shifts असतात. एका सकाळी ७ ते ३ अन दुसरी ३ ते ११. त्यामुळे तो बऱ्याच वेळा संध्याकाळी तुमचे डिपार्टमेंट रिकामे झाले कि जाऊन हरिकृष्णनच्या जागेवर काही धागेदोरे मिळतात का हे बघत असे.
ड्रॉवर चे लॉक उघडणे वगैरे अगदी किरकोळ कामे आहेत याच्यासाठी. तिथे त्याला हरिकृष्णचा एका मोबाईल मिळाला, जो तो कधीच वापरत नसे. कारण त्याचा नेहमी वापरायचा मोबाईल आम्ही tap केला होता. त्या मोबाईल मध्ये ट्रकचे बरेच फोटो, काही sensitive म्हणता येईल अशी माहिती वगैरे होती.
अमनोरा मॉल च्या बाहेर जेव्हा तुला हरिकृष्णन भेटला, तेव्हा तो एका माणसाला भेटायला आला होता. तो माणूस म्हणजे हरिकृष्णनला जाळ्यात ओढणारा ISI चा agent आहे."
"ISI..?? बाप रे..विचित्र आहे हे सगळं.." परीक्षितचा विश्वासच बसत नव्हता..
"हो. हरिकृष्णन आणि त्याची बायको, दोघेही पैश्याला चटावलेले आहेत. ISI वाले अश्या लोकांवर नजर ठेऊनच असतात. ते त्यांच्यासाठी easy target असतात. पैसे तर भरपूर दिलेच त्याला, शिवाय honey trap, अर्थात तरुण मुली योग्य वेळी पुरवून त्याला कायम खुश ठेवलं. त्यांना तो GPS ट्रान्सपॉन्डर ट्रक मध्ये लावायचा होता. जेणेकरून, आपल्या ट्रक्सची movement & exact location ISI ला कळेल"
परीक्षितने डोक्याला हात लावला
"मग अजय तेव्हा हरिकृष्णन सरांच्या मागे आला होता का?"
"हो.. तो माणूस हरिकृष्णनला कायम एखाद्या movie theater मध्येच भेटतो. अन ते सुद्धा एकदम टुकार, पडलेल्या सिनेमाच्याच..कारण सरळ आहे. गर्दी नसते, त्यांना एकांतात आरामात बोलता येतं"
"हहम्म्म"
"पण घाबरू नको. सध्या सगळे आमच्या नजरेखाली आहेत. तू अजयच्या मागे फार हात धुवून लागला होतास म्हणून हे सगळं तुला सांगितलं"
परीक्षितने याजकडे बघितले..अजय हसत होता..
"साल्या पण तू हुशार आहेस.." अजय परीक्षितच्या पाठीत थाप टाकत म्हणाला..
"मग आता पुढे काय?" परीक्षितने विचारले
"पुढे काय ते आम्ही बघतो.." चव्हाण हसत हसत म्हणाले.."पण तू अजयच्या तक्रारी करणं बंद केलंस तर आम्हाला थोडी मदत होईल. अन अजून एक, हे जे सगळं तुला सांगितलंय हे कोणालाही सांगू नको. अगदी स्वतःच्या घरातल्या लोकांना सुद्धा नको."
"हो सर...हि काय सांगायची गोष्ट आहे का..तेवढं कळतं मला.."
"Good. आता घरी जा आणि उद्याचा पेपर वाच..."
अजय आणि चव्हाण दोघेही उठले, आणि एका मागोमाग एका बाहेर पडले...

परीक्षित तिथेच बसून होता...

(...समाप्त...)

कथालेख

प्रतिक्रिया

कथा चांगली फुलवली आहे, पण GPS transponder ची थीम संपुर्ण चुकीची आहे. एकटा माणुस, कीतीही मोठा असेल तरीही असा डीझाईन मध्ये बदल करु धकत नाही. डीझाईन मध्ये नवीन पार्ट फीट करण्यासाठी मॅन्युफॅक्चरीगची प्रोसेस बदलावी लागेल. डीझाईन व त्याचे bill of material कीत्येक लोकांच्या नजरेखालुन जाते. प्रॉडक्टच्या bill of material मध्ये नसणारा एकही पार्ट ऑर्डरमधे अ‍ॅड करता येणार नाही. थोडक्यात अख्खी टीम सामील असल्याशिवाय असे काही करणे शक्य नाही.

एवढे उद्योग करण्यापेक्षा, एकदा ते ट्र्क ची डीलिव्हारी झाली की कुणीतरी गुपचुप GPS transponder बाहेरुन कुठेतरी ट्र्कला चिटकवणे कीतीतरी सोपे आणी कमी घोकादायक.

गतीशील's picture

12 Oct 2018 - 11:24 am | गतीशील

पण एखाद्याने ठरवलंच तर सहज करता येईल. अश्या गाड्या या अगदी कमी quantity मध्ये तयार होतात. त्याचे BoM पण खूप कमी लोकांकडे असते कारण production line वर हजारोंच्या संख्येत production काढणे आणि ५० गाड्या बनवणे यांच्यात खूप फरक असतो.
तुमचा मुद्दा ग्राह्य आहे, पुढच्या कथेत आणखी realistic लिहायचा प्रयत्न कारेन.
धन्यवाद...

कथा खूपच मस्त आणि मजेदार होती बघायला गेलातर सध्याच्या नागपूर येथे झालेल्या गोष्टीवर आधारित आहे.
लेखकाचे अभिनंदन आणि आभार!!!

असेच काहीतरी लिहीत जा म्हणजे वाचायला मजा आणि आम्हाला हि काही लिहिण्यासाठी मोटिवेशन मिळेल

धन्यवाद!!!

गतीशील's picture

12 Oct 2018 - 11:25 am | गतीशील

आभारी आहे..

ज्योति अळवणी's picture

12 Oct 2018 - 10:38 am | ज्योति अळवणी

आवडली कथा. छान खुलवली आहे. पण शेवट फार पटकन झाला अस वाटतं. अजूनही थोडी खुलवता आली असती कथा

गतीशील's picture

12 Oct 2018 - 11:26 am | गतीशील

धन्यवाद कथा आवडल्याच्या अभिप्रायाबद्दल.
पहिलाच प्रयत्न होता, शिवाय मी जातीवंत आळशी माणूस असल्यामुळे लौकर आवरतं घेतलं.
पुढची कथा (जर लिहिली) तर नक्की थोडी फुलवेन अजून

अभ्या..'s picture

12 Oct 2018 - 11:20 am | अभ्या..

छान लिहिली आहे पण वळणं वळणं आणीक असती तर मझा आली असती. शिवाय ते खूप सारे रोमन लिपीतले शब्द खटकतात डोळ्याला.

गतीशील's picture

12 Oct 2018 - 11:29 am | गतीशील

पहिलाच प्रयत्न होता, त्यामुळे अनुभवाची कमतरता..
रोमन लिपी ला तंद्रज्ञानाच्या जगात तरी दुसरा पर्याय नाही. Missile Launcher Truck साठी जर मी 'क्षेपणास्त्र डागण्यास मदत करणारे वाहन' असे लिहिले तर ते हास्यास्पद वाटेल...

अभ्या..'s picture

12 Oct 2018 - 1:12 pm | अभ्या..

इतके गामा पैलवान होऊ नकात, अगदी 'मिसाईल लाँचर ट्रक' असे सुध्दा चालले असते.
छान छान कथेत आकृत्या किंवा रोमन आकडे दिसले की शाळेची ती नकोशी आठवण येते उगीच. ;)

गतीशील's picture

12 Oct 2018 - 1:40 pm | गतीशील

"नेक्स्ट टाईम"....:) :)

श्वेता२४'s picture

12 Oct 2018 - 1:17 pm | श्वेता२४

लिहीत रहा

गतीशील's picture

12 Oct 2018 - 1:41 pm | गतीशील

आभारी आहे

सस्नेह's picture

12 Oct 2018 - 3:21 pm | सस्नेह

प्रयत्न चांगलाआहे. पण डिटेलिंग कमी पडले. तसेच काही गोष्टी अगदी सरधोपट झाल्या आहेत. जसे की परिक्षितला इतक्या सहजासहजी डिपार्टमेंट बद्दल सांगून टाकणे, अजयने गुप्त माहितीअसलेला मोबाईल सहजपणे त्याच्या हाती देन ,.. अंकही बऱ्याच.
असो. पुलेशु.

आवडला प्रयत्न. पु.ले.शु. :-)

मुक्त विहारि's picture

12 Oct 2018 - 9:18 pm | मुक्त विहारि

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

अर्धवटराव's picture

13 Oct 2018 - 12:08 am | अर्धवटराव

मी उगाच पुभाप्र होतो.
काय कन्क्लुजन निघालं मग? अजय आणि मंडळींनी परिक्षीतला मामा बनवलं का?

स्वधर्म's picture

13 Oct 2018 - 6:46 pm | स्वधर्म

कथा छान जमलीय. पहिला भाग वाचायला घेतला, अाणि चारही भाग वाचले!
अवांतर:
"देशाच्या सुरक्षेविषयी जेव्हा अश्या काही गोष्टी असतात, तेव्हा त्याला बरेच कंगोरे असतात. वरवर दिसतं तेवढं सोप्प नसतं हे. असे tender जेव्हा निघते, तेव्हा आमच्या डिपार्टमेंटला मोठठं काम येतं. Technology check पासून, espionage check पर्यंत सर्व काही.मग जी कंपनी टेंडर मध्ये भाग घेणार आहे तिच्या पासून, त्या कंपनी चे suppliers or vendors सगळ्यांना आम्हाला check करावं लागतं"
उगीचच रिलायन्स डिफेन्स अाणि राफेल सेट अाॅफची अाठवण अाली. खरंच जर अशी संपूर्ण तपासणी होऊनच कंत्राटे मिळत असतील, तर चांगली गोष्ट अाहे.

गतीशील's picture

13 Oct 2018 - 8:56 pm | गतीशील

तसा चेक होतसुद्धा असेल..आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. माझ्या वाचनामध्ये श्री. मलय कृष्ण धार यांची १-२ पुस्तके आली आहेत (हे भारताच्या Intelligence Bureau चे उच्चाधिकारी होते) . आपण विचार सुद्धा नसेल केला असल्या काही सत्य घटना होऊन गेल्या आहेत अलीकडच्या ३०-४० वर्षात..

शित्रेउमेश's picture

15 Oct 2018 - 12:20 pm | शित्रेउमेश

छान कथा.... आवडली... पण शेवट गुंडालळा असं वाटल....