यंत्र (भाग २)

गतीशील's picture
गतीशील in जनातलं, मनातलं
8 Oct 2018 - 11:24 pm

यंत्र (भाग १)
https://www.misalpav.com/node/43400

परीक्षित त्या गल्लीत डोकावून बघत होता. अजय गल्लीच्या आत थोडा पुढे जाऊन थांबला. १०-१५ मिनिटानंतर ऍक्टिवावरून एक मुलगी आली आणि अजय जवळ जाऊन थांबली. ते दोघे थोडा वेळ बोलत होते आणि मग दोघांनी आपापल्या गाड्या सुरु केल्या. हे बघताच परीक्षितने आपली गाडी स्टार्ट केली आणि U टर्न घेऊन रस्त्याच्या पलीकडे थांबला व स्वतःच्या गाडीच्या आरश्यातून मागे नजर ठेऊन उभा राहिला.
ते दोघे त्या गल्लीतुन एक मागोमाग एक असे बाहेर आले आणि अमनोरा मॉल च्या दिशेने जाऊ लागले. परीक्षितने लगेच गाडी वळवली आणि तो पण त्यांच्या मागे जाऊ लागला. एव्हाना अंधार झाला होता, पण परीक्षित अजयच्या रेडियमने चमकणाऱ्या सॅकवर नजर ठेऊन होता त्यामुळे लांबून सुद्धा अजय त्याला कळत होता.
ते दोघेसुद्धा सरळ अमनोरा मॉल च्या पार्किंग मध्ये गेले. आता परीक्षित तिथे गेला असता तर अजयने त्याला बघितले असते, त्यामुळे तो काय करावे याचा विचार करत बाहेरच थांबला. १५-२० मिनिटे वाट बघून शेवटी परीक्षित कंटाळला व तिथून निघायच्या तयारीत होताच, तोपर्यंत त्याला त्याच्या कंपनीमध्ये त्याच्या डिपार्टमेंटलाच असणारे General मॅनेजर हरिकृष्णन सर समोरून त्याच्याकडे पाहत हसत हसत येताना दिसले.
"Mr Sawant, what are you doing here alone?"
"Hello Sir...! I was waiting for a friend, but he just sent me a message that his plans are changed, so I was about to leave"
" Ok...Ok.."
"Sir do you live around here?"
"No my boy, I came here to watch a movie. You know kids nowadays. You will also go through this phase" हरिकृष्णन सर मोठयाने हसत म्हणाले
"Ha Ha. Let's see sir, I'll cross the bridge when it comes."
"That's right champ. Ok, I'll not hold you up any longer. Please carry on"
"Thank you sir. Have a nice evening. Bye"
"Bye"
परीक्षित घरापासून बराच लांब आला होता, त्यामुळे जाताना तो अजयविषयीच विचार करत सावकाश जात होता. एक गोष्ट तर त्याच्या मनात नक्की झाली होती कि अजयचे काहीतरी गौडबंगाल चालू आहे. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्याला असंही वाटत होते कि आपण एका साध्या गोष्टीला उगाचच वेगळ्या अर्थाने बघत आहे. ती मुलगी अजयची Girlfriend पण असु शकते आणि weekend असल्यामुळे दोघे सिनेमा बघायला सुद्धा गेले असतील. पण मग मोबाईल मधल्या फोटोंचे काय? घरी पोचता पोचता त्याने ठरवले कि अजयला याच्याबद्दल विचारायचे.
सोमवारी कंपनीमध्ये गेल्या पासून त्याच्या डोक्यात तेच चालू होते, पण कामाच्या व्यापात त्याला दुपारपर्यंत अजयकडे जायला जमलेच नाही. जेवण झाल्यावर मात्र त्याने सरळ अजयला फोन लावला अन अगदी सहज त्याच्याशी कामासंबंधी ५-७ मिनिटे बोलला. फोन ठेवता ठेवता अजयच त्याला म्हणाला कि तुला एका पार्टचे failure दाखवायचे आहे, जेव्हा जमेल तेव्हा ये माझ्या डिपार्टमेंटला. परीक्षित लगेच म्हणाला १५ मिनिटात येतो.. नाहीतरी त्याला तेच पाहिजे होते.
थोड्या वेळाने परीक्षित अजयच्या डिपार्टमेंट ला गेला व अजय त्याला तो failed पार्ट दाखवू लागला. अर्धा तास त्यात घालवल्यावर..
"चल यार, चाय पिते हैं"
"चल"
चहा पिताना दोघांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या...
"अजय, पिछले फ्रायडे मैं अमनोरा मॉल के रोड से शाम को जा रहा था, मुझे ऐसा लगा कि मैने तुम्हे देखा. सेम तुम्हारे जैसी सॅक थी. तू गया था क्या उधर?"
अजय ने तोंडावर एकदम आश्चर्याचा भाव आणत म्हंटले
"नहीं तो. फ्रायडे शाम तो मेरे घर मेहेमान आये थे, मैं कंपनीसे घर जाने के बाद फिर बाहर निकला हि नाही"
"फिर कोई और होगा..छोड.."

आणि तो विषय तिथेच संपला. पण परीक्षित साठी आता तो विषय खऱ्या अर्थाने सुरु झाला होता. त्याच्या मनाची आता पक्की खात्री झाली होती कि अजय काहीतरी लपवत आहे .

पण आता नेमके करायचे काय हेच त्याला कळत नव्हतं. २-३ दिवस त्याने असेच विचार करण्यात घालवले. चौथ्या दिवशी त्याला वाटू लागले कि आपण नुसता विचार करण्यात वेळ वाया घालवतोय अन तो अजय तिकडे काय काय माहिती बाहेर नेत असेल कंपनी मधून.
त्याने कंपनी च्या IT vigilance cell ला एक इ-मेल टाकला कि अजय रैना आपल्या कंपनीच्या IT Policy पाळत नाहीये. त्याला माहिती होते कि IT Vigilance cell कधीच माहिती देणाऱ्याचे नाव जाहीर करत नाही, त्यामुळे तो बिनधास्त होता. त्या दिवशी त्याला थोडे बरे वाटत होते कि आपण कमीतकमी याला वाचा तर फोडली आहे. आता पुढे काय होतंय बघू.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी cafeteria मध्ये त्याने अजय च्या डिपार्टमेंटलाच असणाऱ्या प्रणवला बघितले...त्याच्या पाठीवर थाप मारत परीक्षित म्हणाला
"काय प्रणव, काय चाललंय?"
"काही नाही रे. आज खूप काम आहे, मला आज रात्री उशिरापर्यंत थांबायचं आहे म्हणून आत्ता एक डोसा खायला आलो होतो"
"ह्हम्म. बाकी काय..आमचे अजय साहेब काय म्हणतायेत?"
"अरे तुला माहितीये का आज अजयला IT Vigilance वाले घेऊन गेले होते..!!" प्रणवने एकदम मोठया आवाजात त्याला सांगितले
"काय?? का पण?" परीक्षितने थोडी acting केली. पण त्याला मनातून खूप बरं वाटत होतं
"माहिती नाही रे. पण तो १ तासात आला सुद्धा परत. सगळ्यांनी त्याला विचारलं काय झालं तर म्हणाला routine चेक होता"
"बरं." परीक्षितचा चेहरा पडला.."चल प्रणव, मी निघतो आता. भेटू परत. बाय"
"बाय"

परीक्षितचा मूड एकदम खराब झाला होता. त्याला वाटलं कि अजयच्या मोबाईलवर त्याने बघितलेले फोटो सापडले असतील IT वाल्याना.
दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीमध्ये आल्यावर त्याने डेस्क फोन वरून अजयला फोन लावला. काहीतरी कामाचं थोडंफार बोलणं झाल्यावर त्याने अजयला विचारलं
"अरे अजय, कल वो प्रणव मिला था मुझे, केह रहा था कि 'तेरी IT वालोंने चेकिंग कि. सच है क्या?"
"हां, पर कुछ सिरीयस नाही यार. हमारे इधर कभी कभी surprise चेकिंग होती है. कुछ नही था मेरे मोबाईल मे objectionable"
"ह्हम्म. फिर ठीक है."
याचा अर्थ सरळ होता,अजयने ते फोटो delete करून टाकले होते. परीक्षितला आता स्वतःचाच राग येत होता. कारण त्याला आता नेमकं काय करायचं हेच कळत नव्हतं. संध्याकाळी घरी गेला तर त्याच्या अपार्टमेंटच्या ७व्या मजल्यावर राहणारे धुमाळ काका त्याच्या घरी होते. त्यांना बघून परीक्षितची एकदम टयूब पेटली. कारण हे काका होते पोलीस फोर्स मध्ये. वायरलेस मध्ये PSI होते. परीक्षितचे बाबा आणि काका बोलत बसले होते तोपर्यंत परीक्षित झटकन आवरून बाहेर आला. काका जेव्हा जायला निघाले तेव्हा त्यांच्या सोबत तो बाहेर आला..
"काका, माझं थोडं काम आहे तुमच्याकडे"
"बोल ना"
"इथे नको. तुम्हाला थोडा वेळ असेल तर आपण खाली गार्डन यामध्ये जाऊया का?"
"हो. पण किती वेळ लागेल? मला घरी सोडशील ना जेवायला?" काका हसत म्हणाले
"हा हा हा..१५-२० मिनिटेच फक्त. जास्ती नाही"
"चल मग"
परीक्षितने मग काकाना थोडक्यात पण पहिल्यापासून सगळी गोष्ट सांगितली. काकांनी पण अधे मध्ये काहीही ना बोलता फक्त ऐकून घेतलं. मग म्हणाले..
"तू जे सांगतोय ते संशयास्पद आहे खरं, पण असा लगेच निष्कर्ष काढू शकत नाही आपण"
"हो काका. म्हणूनच मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे. मलाही कळत नाहीये नेमकं काय करायचं ते"
"ह्हम्म" काका थोडे विचारात पडले होते. "ठीक आहे. आपण बोलू या विषयावर उद्या किंवा परवा. तोपर्यंत तू काही करू नकोस आता...आणि जास्ती विचार पण नको करू. तू तुझ्या कामावर लक्ष ठेव. आपण काहीतरी करू"

दुसऱ्या दिवशी परीक्षित कंपनीमध्ये गेला ते ठरवूनच कि अजय प्रकरण थोडं बाजूला ठेऊ अन आपल्या कामावर लक्ष देऊ. दिवसभर त्याने अजयचा विचार पण नाही आणला डोक्यात. संध्याकाळी घरी थोडा उशिरा, म्हणजे ७ वाजता तो निघाला. घरापासून जवळच एक भाजीचे दुकान होते, तिथून तो आईने सांगितलेली भाजी घेत होता तेव्हाच एका माणसाने मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला..
"काय परीक्षित साहेब..काय म्हणता?"
"...."

क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

बबन ताम्बे's picture

9 Oct 2018 - 7:43 am | बबन ताम्बे

पुढे चांगलीच उत्कनठा लागून राहिली आहे.

ज्योति अळवणी's picture

9 Oct 2018 - 4:03 pm | ज्योति अळवणी

वा... मस्त