यंत्र (भाग १)

गतीशील's picture
गतीशील in जनातलं, मनातलं
8 Oct 2018 - 12:29 am

"पऱ्या, यार सिर्फ लास्ट answer दिखा दे, पास हो जाऊंगा भाई " ...
परीक्षित हसला व त्याने आपली उत्तर पत्रिका मागे बसलेल्या अजयला दिसेल अशी ठेवली.

परीक्षित सावंत, BE Mechanical Engineer ..वडिलांचा ऊर अगदी भरून आला होता जेव्हा परीक्षित चा फायनल इयरचा निकाल लागला तेव्हा. कारण साहेबाना एका प्रथितयश अश्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये पुण्यातच R & D मध्ये कॅम्पस selection मधून नोकरी सुद्धा लागली होती. परीक्षित तसा लहानपणापासूनच हुशार होता. नुसता पुस्तकी कीडा न होता तो चौफेर लक्ष ठेऊन असे. चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय राजकारण, संगीत, खेळ सगळ्यांचंच त्याला थोडेफार ज्ञान होते. त्याच्या या स्वभावामुळे कंपनी मध्ये सुद्धा तो लौकर रूळला व कंपनी च्या भाषेत चांगलं output देऊ लागला.

"परीक्षित, तुला पुढच्या महिन्यापासून एका डिफेन्स vehicle वर काम करायचं आहे. खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे आपल्या कंपनीसाठी. २ वर्ष तुझे रिपोर्टींग जाधव सरांना असेल "
"Yes सर, मला सुद्धा आवडेल असं काहीतरी वेगळं काम करायला"

एका महिन्या नंतर परीक्षित डिफेन्स प्रोजेक्ट वर काम करू लागला. ती vehicle म्हणजे एक missile launcher ट्रक होता. ज्याच्या मागच्या भागात missile launching device ठेवता येत होते. तो ट्रक शत्रूच्या हद्दीच्या अगदी जवळ नेऊन (म्हणजे ४-५ किमी) तेथून शत्रूवर हल्ला करण्यासाठी अतिशय उपयुक्त होता. तसा भारताकडे एका रशियन कंपनीचा अगदी तसाच ट्रक होता, पण ती कंपनी भ्रष्टाचारामध्ये सापडली. सरकार बदलले तेव्हा नवीन सरकारने ठरवले कि भारताला जागतिक महासत्ता बनवायची असेल तर देशी उत्पादनावर जोर दिला पाहिजे. परीक्षितच्या कंपनीला आधी थोडा डिफेन्स vehicle पुरवण्याचा अनुभव होताच, त्यामुळे त्यांनी यात उडी घेतली.
खूप अवघड असा प्रोजेक्ट होता, शिवाय वेळ कमी त्यामुळे परीक्षित त्यात प्रचंड गुंतून गेला. त्यांची टीम छोटीच होती पण सगळे अतिशय हुशार आणि कसबी लोक होते त्यामुळे प्रोजेक्ट चांगलं बाळसं धरत होते. साधारण १ वर्षानंतर त्या ट्रकचा पहिला prototype तयार झाला. आता काम होते ते ट्रक चे field टेस्टिंग करायचे. त्यासाठी एका वेगळी टीम होती. परीक्षित पहिल्यांदाच त्या टीम ला भेटत होता
" अरे अजय तू?"
" क्या बात हैं परीक्षित भाई. सपनेमे भी नही सोचा था कि तुम ऐसे मिलोगे."
"हां यार. तू कब जॉईन हुआ इधर?"
" अरे अभी ३ महिने हुए. पेहेले मैं अपनेहि कंपनी के एक व्हेंडर के यहाँ काम करता था "
"ग्रेट. ले लो ये ट्रक, और अच्छेसे टेस्ट कराना" डोळे मिचकावत परीक्षित म्हणाला.

परीक्षित design ला असल्यामुळे त्याचे व अजय चे आता सारखे संबंध येऊ लागले. टेस्ट करताना काही भाग तुटले, फुटले तर अजय परीक्षितला लगेच सांगत असे जेणेकरून तो त्या भागात सुधारणा कशी करता येईल याचा आराखडा बनवून तयार ठेवत असे

असा ५-६ महिने चालू होतं. या काळात अजय रैना व तो खूप चांगले मित्र सुद्धा होऊन गेले. जरी अजय इंजिनीरिंगला त्याच्या वर्गात होता तरी तो एक वर्ष नापास झाल्यामुळे परीक्षित सोबत आला होता. त्यामुळे त्याची आणि परीक्षितची फक्त जुजबी ओळख होती. आता दोघे चांगले मित्र झाले होते. अजय काश्मिरी होता, त्याचं व्यक्तिमत्व रांगडं होतं. उंच, गोरा आणि सरळसोट नाक शिवाय बोलघेवडासुद्धा. मग काय त्याची पटकन छाप पडत असे समोरच्यावर.

पण परीक्षितला काहीतरी वेगळं वाटायचं त्याच्या सोबत असताना. काय ते नक्की सांगता येत नव्हतं, पण त्याला असा वाटायचं कि हा माणूस आपल्याला कळलाच नाहीये. बऱ्याच वेळा अजय त्याला missile सिस्टिमचे कार्य कसे असेल, एका वेळी किती missiles सोडता येतील वगैरे विचारायचा. पहिल्या-पहिल्यांदा कुतूहल असेल असे म्हणून परीक्षित सोडून द्यायचा (परीक्षित आणि DRDO ची एक टीम यावर काम करत होती ज्यात सुद्धा परीक्षित चा रोल अगदीच जुजबी होता, जसे कि missile सिस्टिम design लोड लिमिट ओलांडत नाहीये ना हे बघणे नाहीतर missile सिस्टिम आणि ट्रक वरचा एखादा पार्ट हे कुठं एकमेकांना अडवत [fouling] नाहीयेत ना वगैरे) पण अजय चे कुतूहल जरा जास्तीच खोल जात आहे असा परीक्षित ला सारखं वाटत होतं.

असाच एकदा दोघे काहीतरी चर्चा करत असताना परीक्षितला एकदम लक्षात आले कि त्याच्या खिशात त्याचा मोबाइलला नाहीये. आणि त्याला आठवत सुद्धा नव्हते कि तो कुठे ठेवलाय.

" अजय, मेरे मोबाईल पर कॉल कर जरा. शायद काही भूला है."
" ये ले मेरा मोबाईल, तू हि कर. मैं टॉयलेट जा के आता हूँ"

परीक्षितने फोन लावला तर त्याच्या डेस्कवर आहे असा प्राचीने सांगितलं (परीक्षितची cubicle mate).

परीक्षितच्या हातात आता अजय चा फोन होता. तसा परीक्षित एकदम शिष्टाचार पाळणारा होता, पण अजय विषयी त्याला मनात सारखी काहीतरी शंका येत होती म्हणून त्याने त्याची फोटो गॅलरी उघडली. बघतो तर काय त्या missile launcher ट्रक चे खूप सारे फोटो होते. (त्यांच्या कंपनी मध्ये मोबाईल कॅमेरावर फोटो काढायला परवानगी नव्हती. कॅमेरा वर स्टिकर लावले जात असे) परीक्षितने तेवढंच बघितलं तोपर्यंत त्याला अजय येताना दिसला म्हणून त्याने फोन लॉक केला व अजय ला दिला.

आता परीक्षितने ठरवलं कि अजय असा का वागतोय याचा छडा लावायचाच. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. आठवड्याचा शेवटचा कामाचा दिवस. परीक्षित त्या दिवशी अजय ला भेटलाच नव्हता. पण संध्याकाळी तो अजयच्या मागे मागे थोडे अंतर ठेऊन जाऊ लागला. दोघे सुद्धा मोटारसायकलेवर होते. अजय ने त्याला सांगितलं होतं कि तो खराडीला राहतो. पण अजय तर खराडी ओलांडून मुंढव्याच्या दिशेला जात होता. केशवनगर ओलांडून अजय डावीकडे आत वळला. परीक्षित वळला नाही पण तो त्या गल्ली च्या कोपऱ्यावरच थांबला व गल्लीमध्ये डोकावून बघत होता.

पण त्याला हे माहिती नव्हते कि त्याच्या मागे सुद्धा एक जीप बराच वेळ येत आहे...

क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Oct 2018 - 1:00 am | मुक्त विहारि

कथा रंगत आहे...

जयन्त बा शिम्पि's picture

8 Oct 2018 - 4:14 am | जयन्त बा शिम्पि

वा ! ! पहिल्या भागातच उत्सुकता ताणली गेली आहे . सुरु ठेवा. स्वागत आहे.

निशाचर's picture

8 Oct 2018 - 4:20 am | निशाचर

वाचत आहे.

उगा काहितरीच's picture

8 Oct 2018 - 11:39 am | उगा काहितरीच

पुभाप्र

"डीआरडीओच्या इंजिनीअरला अटक, ब्राह्मोसची माहिती पाकला दिल्याचा आरोप
निशांत अग्रवाल मॅकेनिकल इंजिनीअर असून डीआरडीओचमध्ये शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहे."
तुमचा लेख या आजच्या बातमिवर आधरित आहे.

गतीशील's picture

8 Oct 2018 - 7:12 pm | गतीशील

नाही. हा लेख मी काळ रात्री लिहायला सुरु केला होता. ती बातमी मी आज सकाळी वाचली.

गतीशील's picture

8 Oct 2018 - 7:18 pm | गतीशील

काल*

अथांग आकाश's picture

8 Oct 2018 - 7:33 pm | अथांग आकाश

छान सुरुवात! उत्कंठा वाढली आहे!

.

ज्योति अळवणी's picture

9 Oct 2018 - 3:57 pm | ज्योति अळवणी

उत्तम सुरवात.