आपला आवाज कसा रेकॉर्ड करावा [ऑडिओ-व्हिडीओ एडिटिंग / दृक-श्राव्य संपादन] [भाग १]

चहाबिस्कीट's picture
चहाबिस्कीट in तंत्रजगत
12 Jun 2018 - 9:43 am

भाग १ https://www.misalpav.com/node/42802
भाग २ https://www.misalpav.com/node/42838

नमस्कार,

मागे कबूल केल्याप्रमाणे ऑडिओ/व्हिडिओ एडिटिंगवर सदर सुरु करत आहोत.

पहिल्या भागात आपण आवाजाचं रेकॉर्डिंग कसं करायचं आणि ते रेकॉर्डिंग ऑडासिटी (Audacity) मध्ये कसं पहायचं हे बघणार आहोत.

आम्ही असे गृहित धरले आहे की तुमच्या कडे अँड्रॉइड स्मार्टफोन आहे आणि तुम्ही विंडोज वर काम करत आहात. कॉम्प्युटरचा बेसिक वापर (माउस, कीबोर्ड वापरणे, इंटरनेट वरून डाउनलोड/इंस्टाल करणे) कसा करायचा हे तुम्हाला माहित आहे असे समजत आहोत. त्याचबरोबर स्मार्टफोनमधून कॉम्प्युटरवर फायली कशा पाठवायच्या हे तुम्हाला माहित असेल असे गृहीत धरत आहोत. (नसेल माहिती तर प्रतिसादात मदत मागा)

१. रेकॉर्डिंग

तुम्ही कॉम्प्युटर ला माईक जोडून ऑडासिटी मध्ये डायरेक्टली रेकॉर्ड करू शकता, पण असा माईक सगळ्यांकडे असतोच असं नाही (आणि कॉम्प्युटर चा इनबिल्ट माईक फारसा खास नसतो). म्हणून आपण मोबाईलच्या माईक चा वापर करणार आहोत.

आवाज रेकॉर्ड करण्याची अनेक ऍप्स अँड्रॉइड वर आहेत.

Easy Voice Recorder हे ऍप मला चांगलं वाटलं म्हणून त्याची लिंक देत आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.coffeebeanventures.eas...

ते फोनवर इन्स्टॉल करा.

audio1

रेकॉर्ड करण्यासाठी ऍपमधले खालचे लाल रंगाचे माइकचे बटन टच करा.

टच केल्या केल्या लगेच बोलायला सुरवात करू नका. दोन - तीन सेकंद मध्ये जाऊद्या आणि मगच बोलायला सुरुवात करा. बोलत असताना मोबाईल चेहऱ्याजवळ धरा - म्हणजे नीट रेकॉर्ड होईल.

सुरुवातीला दोन - तीन सेकंदांचा गॅप ठेवला म्हणजे नन्तर एडिटिंग ला सोपं जातं

टेस्ट वाक्य म्हणून "भारत माझा देश आहे" असं म्हणा. वाक्य म्हणून झाल्यावर परत दोन सेकंद थांबा आणि मग खाली उजवीकडच्या चेकमार्क ✔ च्या बटनाला टच करा. त्याने रेकॉर्डिंग थांबेल आणि फाईल मोबाईलवर सेव्ह होईल.

मग LISTEN सेक्शन मध्ये जा.

audio2

तिथे तुम्हाला तुम्ही रेकॉर्ड केलेले वाक्य ऐकता येईल. (निळे बटन टच करून).

audio3

रेकॉर्डिंगच्या उजवीकडे तीन उभे बिंदू दिसतात त्यावर क्लिक करून दुसरीकडे शेअर ही करता येईल.

ही फाईल तुमच्या कॉम्प्युटरवर सेव्ह करा.

या फाईल चे नाव "My recording #1.wav" या टाईपचे असेल. या नावातील .wav हा भाग या फाईल चा फॉरमॅट wav आहे असे दर्शवतो. कधीही आवाज रेकॉर्ड करत असताना चांगली क्वालिटी हवी असेल तर wav फॉरमॅटच निवडावा (इतर फॉरमॅट, जसे कि mp3 निवडू नयेत) . यासंबंधी अधिक माहिती हवी असेल ही लिंक वाचा (थोडे क्लिष्ट वाटू शकते)

इथून पुढचं काम आपण कॉम्पुटरवर करणार आहोत.

२. ऑडासिटी

https://www.audacityteam.org/download/ या लिंक वर जा आणि तुमच्या ऑपरेटिंग सिस्टिमसाठी ऑडासिटी चा सेटअप डाउनलोड करा.

विंडोजवाल्यांची इथून डाउनलोड करावे
https://www.audacityteam.org/download/windows/

डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या.

इन्स्टॉल झाल्यावर ऑडासिटी प्रोग्राम सुरु करा.

audio4

ऑडासिटी सुरु झाल्यावर वरती फाईल मेनू मधून आधी Import आणि मग Audio हे ऑप्शन सलेक्ट करा.

audio5

मग एक फाईल सलेक्शन ची विंडो येईल. मग तुमच्या कॉम्प्युटर मध्ये तुम्ही तुमची रेकॉर्डिंग जिथे ठेवली असेल तिथे जाऊन ती फाईल ओपन करा.

फाईल ओपन झाल्यावर काहीसे असे दृश्य दिसेल.

audio6

त्यात तुम्हाला दोन आडव्या ओळी (ज्यांना आपण लेफ्ट आणि राईट ट्रॅक असे म्हणतो) आणि त्यावर निळ्या रंगांचे - शाईच्या डागासारखे काहीतरी दिसेल.

हे शाईचे डाग म्हणजे तुमच्या आवाजाचा वेव्हफॉर्म (ध्वनिलहरी)!

तुमचा आवाज जेवढा जोरात (लाऊड)असेल तेवढी या ध्वनिलहरिंची उंची (amplitude) जास्त असते.

तुमचा आवाज ऐकण्यासाठी वरचे हिरवे प्ले चे बटन दाबा.

एक उभी रेषा हळू-हळू उजवीकडे सरकताना दिसेल, आणि त्याच वेळी तुमचा रेकॉर्ड केलेला आवाज तुम्हाला ऐकू येईल.

आजपुरते एवढेच. काही प्रॉब्लेम आले तर खाली प्रतिसाद द्या. धन्यवाद!

- चहा-बिस्कीट प्रोडक्शन

आमची वेब सिरीज

आम्ही कोण आहोत

प्रतिक्रिया

चहाबिस्कीट's picture

12 Jun 2018 - 9:47 am | चहाबिस्कीट

या लेखाची पीडीएफ आवृत्ती - https://drive.google.com/file/d/1WAbyVCyhNvktHtiiUF5C34rpwY2zI4__/view?u...

वा! भारीच काम झाले. अत्यंत उपयुक्त माहिती. अजून लिहा.

चहाबिस्कीट's picture

12 Jun 2018 - 10:23 am | चहाबिस्कीट

धन्यवाद. लेखात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करून पहा आणि सांगा!

प्रीत-मोहर's picture

12 Jun 2018 - 11:20 am | प्रीत-मोहर

मीही गेले काही दिवस ह्यात हात पाय मारतेय. अगदी योग्य वेळी योग्य लेख आला तुमचा.

धन्यवाद चहा बिस्कीट

प्रीत-मोहर's picture

12 Jun 2018 - 11:21 am | प्रीत-मोहर

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

चहाबिस्कीट's picture

12 Jun 2018 - 11:52 am | चहाबिस्कीट

नक्की, एका आठवड्यात टाकू.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jun 2018 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत उपयुक्त माहिती ! पुभाप्र.

चहाबिस्कीट's picture

12 Jun 2018 - 12:24 pm | चहाबिस्कीट

प्रोत्साहनासाठी सर्वांचे आभार. तुम्हाला एखादी ऑडियो/व्हिडीओ एडिटिंग संबंधित विशिष्ट गोष्ट कशी करायची हे जाणून घ्यायचे असेल तर मला व्यनि/खरड करा. म्हणजे पुढच्या एखाद्या लेखामध्ये त्या समस्येवरचा उपाय सांगण्यात येईल.

एका सदरात ईतकी कमी माहिती दिली तर सदर पुढे कधी सरकणार?

चहाबिस्कीट's picture

12 Jun 2018 - 4:47 pm | चहाबिस्कीट

नवीन लोकांना एखादे सॉफ्टवेअर शिकवताना थोडी-थोडी माहिती दिली तर ती त्यांना चांगली समजते असा माझा अनुभव आहे.

आणि एखादी गोष्ट प्रत्यक्षात करून बघितल्यावरच त्यातली गुंतागुंत कळते.

तिसरी गोष्ट म्हणजे मोठा लेख लिहायचा म्हणजे तेवढा मोकळा वेळ सलग पाहिजे. वरचा लेख लिहायला मला एक तास लागला. त्यामुळे वेळेअभावी खूप काही गोष्टी एकाच भागात येऊ शकल्या नाहीत.

व्हिडीओ एडीटींग हा माझा आवडता विषय असल्यामुळे मला घाई झाली पुढे वाचण्याची म्हणून तसा प्रतिसाद दिला गेला. असो. छान माहिती देता आहात. पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

चहाबिस्कीट's picture

13 Jun 2018 - 9:04 am | चहाबिस्कीट

धन्यवाद!

नवशिक्यांकरता/नवख्यान्कारता एवढी माहिती एका लेखात पुरेशी आहे.

१) मुख्यत: मोबाइलचा इनबिल्ट माइक चांगला असावा लागतो.
२)पुढे एडिटींग करायचे नसेल तर app मधले mp3 option घ्यावे. करायचे झाल्यास wav format निवडावे.
३) कोणत्याही विडिओला बाहेरून कॅामेंट्री जोडायची झाल्यास " add audio to video" type app वापरून जोडले की झाले.
४) मोबाइलातून सर्व होतं.

सध्या बाजारात स्वस्त आणि ऊत्तम दर्जा असणारे माईक सहज ऊपलब्ध आहेत. पहाटेचा पक्षांचा किलबिलाटही अतिशय क्लिअर रेकॉर्ड होतो.

चहाबिस्कीट's picture

13 Jun 2018 - 9:08 am | चहाबिस्कीट

हार्डवेअर पेक्षा सॉफ्टवेअर वर आमच्या लेखात भर असेल. माईक निवडण्याबद्दल आत्ताच लेख टाकायचा आमचा विचार नाही, म्हणून तुम्ही/इतर कोणी या संबंधी लेख लिहिलात तर लोकांना उपयोगी पडेल. माईक चे वेगवेगळे प्रकार आणि प्रत्येक प्रकारातले काही बेस्ट मॉडेल्स (जे भारतात मिळतात) या टाईप चा लेख आला तर आवडेल.

चौकटराजा's picture

14 Jun 2018 - 3:37 pm | चौकटराजा

सध्या बाजारात स्वस्त आणि ऊत्तम दर्जा असणारे माईक सहज ऊपलब्ध आहेत नाझ्या कडे काराओके आहे . माझ्याकडे वायरलेस माईक ही आहेत . पण त्याला चालवायचे म्हणजे एका तासाला ३० रूपये खर्च बॅटरीचा येतो. सबब थेट कने क्शन असणारा वायरवाला माइक मला आवा आहे . कोणता घेऊ ? महाग नको . पण एकदम कामचालावू पण नको.

चहाबिस्कीट's picture

13 Jun 2018 - 9:02 am | चहाबिस्कीट

पुढे एडिटींग करायचे नसेल तर app मधले mp3 option घ्यावे. करायचे झाल्यास wav format निवडावे.

लेखात सांगितलेल्या ऍप मध्ये mp3 चा ऑप्शन नाहीये (Setting -> Tuning -> Encoding). आणि त्यात बाय डीफॉल्ट wav format च आहे, म्हणून एडिटिंग ला वेगळा ऑप्शन निवडायची गरज नाही.

wav -> mp3 कन्व्हर्ट करायचे खूप सारे मार्ग आहेत (वेगवेगळे ऍप्स / वेबसाईट्स इत्यादी). ऑडासिटी मध्ये सुद्धा हे कन्व्हर्जन करता येते.

पुढच्या लेखात सुरुवातीला फाईल फॉरमॅट बद्दल अजून माहिती जोडू.

कंजूस's picture

13 Jun 2018 - 8:18 am | कंजूस

माइक हे अॅक्ससेरी आहे. मोबाइलला जोडा इत्यादी ( युएसबीमधूनच?)
मोबाइलमधलाच माइक चांगला हवा. Clyp dot itवर अपलोड करून त्याचा ओडिओप्लेअर इथे देता येतो.

काही व्याव्यसायिक कामासाठी ओडिओ टाकायचा झाल्यास चांगले सॅाफ्टवेर लागेल. मोबाइलमधली एकदोनच तपासली आहेत.
१) एक प्रश्न - पावसाळ्यांतल्या ढगांचा गडगडाट/विजेचा कडाका रेकॅाड का होत नाही मोबाइलमध्ये?

शाली's picture

13 Jun 2018 - 10:22 am | शाली

बहुधा Noise Cancellation मुळे बाकीचे आवाज रेकॉर्ड होत नाही व्यवस्थीत. इतर फोनचे माहित नाही पण iPhone वर Noise Cancellation डिसेबल केले तर विजांचा कडकडाट बऱ्यापैकी रेकॉर्ड करता येतो.

कंजूस's picture

13 Jun 2018 - 12:57 pm | कंजूस

हे Noise Cancellation डिसेबल करणे /करावे लागते माहित नव्हते.

अमच्या फोनात डिसेबल ओप्शन नसावा.

कंजूस's picture

13 Jun 2018 - 4:29 pm | कंजूस

App store वरचे wavestudio audio recorder app (unreleased) soundbased llc

या मध्ये audacity सारखंच फीचर आहे.

Audacity ॲप स्टोअरवर नसले तरी थर्ड पार्टीकडून ऊपलब्ध आहे. पण मला Audio Edit जास्त सोपे वाटले. माझ्या बेसिक गरजाही आरामात पुर्ण होतात. जसे Trim, Split, Merge, Volume, Fadein/Fadeout, Stitching वगैरे. व्हिडीओ एडीटींग साठी मी iMovie वापरतो. त्यातही बरेच फिचर्स inbuilt आहेत. मी काही प्रोफेशनल नाही. हौस म्हणून काहीतरी करत असतो. त्यामुळे जास्त फिचर्सची आवश्यकता भासत नाही. GarageBand वर तर अमर्याद फिचर्स आहेत. शिवाय हे ॲप inbuilt असल्याने वेगळे डाऊनलोड करायची भानगड नाही. पण कधी कधी डोक्यावरुन जाते GarageBand.

Nitin Palkar's picture

13 Jun 2018 - 8:11 pm | Nitin Palkar

खूपच माहितीपूर्ण! तज्ज्ञांच्या प्रतिसादांमधूनही खूपच माहिती मिळतेय. तुमच्या सोयीने लिहा पण... पुभाप्र.

मदनबाण's picture

14 Jun 2018 - 6:39 am | मदनबाण

माहितीपूर्ण लेखन !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shyama Meghame | ശ്യാമമേഘമേ | Adhipan | Malayalam Cover | Sanah Moidutty