भाग १ https://www.misalpav.com/node/42802
भाग २ https://www.misalpav.com/node/42838
रेकॉर्ड करण्यासाठी ऍपमधले खालचे लाल रंगाचे माइकचे बटन टच करा.
टच केल्या केल्या लगेच बोलायला सुरवात करू नका. दोन - तीन सेकंद मध्ये जाऊद्या आणि मगच बोलायला सुरुवात करा. बोलत असताना मोबाईल चेहऱ्याजवळ धरा - म्हणजे नीट रेकॉर्ड होईल.
सुरुवातीला दोन - तीन सेकंदांचा गॅप ठेवला म्हणजे नन्तर एडिटिंग ला सोपं जातं
टेस्ट वाक्य म्हणून "भारत माझा देश आहे" असं म्हणा. वाक्य म्हणून झाल्यावर परत दोन सेकंद थांबा आणि मग खाली उजवीकडच्या चेकमार्क ✔ च्या बटनाला टच करा. त्याने रेकॉर्डिंग थांबेल आणि फाईल मोबाईलवर सेव्ह होईल.
मग LISTEN सेक्शन मध्ये जा.
तिथे तुम्हाला तुम्ही रेकॉर्ड केलेले वाक्य ऐकता येईल. (निळे बटन टच करून).
रेकॉर्डिंगच्या उजवीकडे तीन उभे बिंदू दिसतात त्यावर क्लिक करून दुसरीकडे शेअर ही करता येईल.
ही फाईल तुमच्या कॉम्प्युटरवर सेव्ह करा.
या फाईल चे नाव "My recording #1.wav" या टाईपचे असेल. या नावातील .wav हा भाग या फाईल चा फॉरमॅट wav आहे असे दर्शवतो. कधीही आवाज रेकॉर्ड करत असताना चांगली क्वालिटी हवी असेल तर wav फॉरमॅटच निवडावा (इतर फॉरमॅट, जसे कि mp3 निवडू नयेत) . यासंबंधी अधिक माहिती हवी असेल ही लिंक वाचा (थोडे क्लिष्ट वाटू शकते)
इथून पुढचं काम आपण कॉम्पुटरवर करणार आहोत.
ऑडासिटी सुरु झाल्यावर वरती फाईल मेनू मधून आधी Import आणि मग Audio हे ऑप्शन सलेक्ट करा.
मग एक फाईल सलेक्शन ची विंडो येईल. मग तुमच्या कॉम्प्युटर मध्ये तुम्ही तुमची रेकॉर्डिंग जिथे ठेवली असेल तिथे जाऊन ती फाईल ओपन करा.
फाईल ओपन झाल्यावर काहीसे असे दृश्य दिसेल.
त्यात तुम्हाला दोन आडव्या ओळी (ज्यांना आपण लेफ्ट आणि राईट ट्रॅक असे म्हणतो) आणि त्यावर निळ्या रंगांचे - शाईच्या डागासारखे काहीतरी दिसेल.
हे शाईचे डाग म्हणजे तुमच्या आवाजाचा वेव्हफॉर्म (ध्वनिलहरी)!
तुमचा आवाज जेवढा जोरात (लाऊड)असेल तेवढी या ध्वनिलहरिंची उंची (amplitude) जास्त असते.
तुमचा आवाज ऐकण्यासाठी वरचे हिरवे प्ले चे बटन दाबा.
एक उभी रेषा हळू-हळू उजवीकडे सरकताना दिसेल, आणि त्याच वेळी तुमचा रेकॉर्ड केलेला आवाज तुम्हाला ऐकू येईल.
आजपुरते एवढेच. काही प्रॉब्लेम आले तर खाली प्रतिसाद द्या. धन्यवाद!
नमस्कार,
मागे कबूल केल्याप्रमाणे ऑडिओ/व्हिडिओ एडिटिंगवर सदर सुरु करत आहोत. पहिल्या भागात आपण आवाजाचं रेकॉर्डिंग कसं करायचं आणि ते रेकॉर्डिंग ऑडासिटी (Audacity) मध्ये कसं पहायचं हे बघणार आहोत. आम्ही असे गृहित धरले आहे की तुमच्या कडे अँड्रॉइड स्मार्टफोन आहे आणि तुम्ही विंडोज वर काम करत आहात. कॉम्प्युटरचा बेसिक वापर (माउस, कीबोर्ड वापरणे, इंटरनेट वरून डाउनलोड/इंस्टाल करणे) कसा करायचा हे तुम्हाला माहित आहे असे समजत आहोत. त्याचबरोबर स्मार्टफोनमधून कॉम्प्युटरवर फायली कशा पाठवायच्या हे तुम्हाला माहित असेल असे गृहीत धरत आहोत. (नसेल माहिती तर प्रतिसादात मदत मागा)१. रेकॉर्डिंग
तुम्ही कॉम्प्युटर ला माईक जोडून ऑडासिटी मध्ये डायरेक्टली रेकॉर्ड करू शकता, पण असा माईक सगळ्यांकडे असतोच असं नाही (आणि कॉम्प्युटर चा इनबिल्ट माईक फारसा खास नसतो). म्हणून आपण मोबाईलच्या माईक चा वापर करणार आहोत. आवाज रेकॉर्ड करण्याची अनेक ऍप्स अँड्रॉइड वर आहेत. Easy Voice Recorder हे ऍप मला चांगलं वाटलं म्हणून त्याची लिंक देत आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.coffeebeanventures.ea… ते फोनवर इन्स्टॉल करा.
रेकॉर्ड करण्यासाठी ऍपमधले खालचे लाल रंगाचे माइकचे बटन टच करा.
टच केल्या केल्या लगेच बोलायला सुरवात करू नका. दोन - तीन सेकंद मध्ये जाऊद्या आणि मगच बोलायला सुरुवात करा. बोलत असताना मोबाईल चेहऱ्याजवळ धरा - म्हणजे नीट रेकॉर्ड होईल.
सुरुवातीला दोन - तीन सेकंदांचा गॅप ठेवला म्हणजे नन्तर एडिटिंग ला सोपं जातं
टेस्ट वाक्य म्हणून "भारत माझा देश आहे" असं म्हणा. वाक्य म्हणून झाल्यावर परत दोन सेकंद थांबा आणि मग खाली उजवीकडच्या चेकमार्क ✔ च्या बटनाला टच करा. त्याने रेकॉर्डिंग थांबेल आणि फाईल मोबाईलवर सेव्ह होईल.
मग LISTEN सेक्शन मध्ये जा.
तिथे तुम्हाला तुम्ही रेकॉर्ड केलेले वाक्य ऐकता येईल. (निळे बटन टच करून).
रेकॉर्डिंगच्या उजवीकडे तीन उभे बिंदू दिसतात त्यावर क्लिक करून दुसरीकडे शेअर ही करता येईल.
ही फाईल तुमच्या कॉम्प्युटरवर सेव्ह करा.
या फाईल चे नाव "My recording #1.wav" या टाईपचे असेल. या नावातील .wav हा भाग या फाईल चा फॉरमॅट wav आहे असे दर्शवतो. कधीही आवाज रेकॉर्ड करत असताना चांगली क्वालिटी हवी असेल तर wav फॉरमॅटच निवडावा (इतर फॉरमॅट, जसे कि mp3 निवडू नयेत) . यासंबंधी अधिक माहिती हवी असेल ही लिंक वाचा (थोडे क्लिष्ट वाटू शकते)
इथून पुढचं काम आपण कॉम्पुटरवर करणार आहोत.
२. ऑडासिटी
https://www.audacityteam.org/download/ या लिंक वर जा आणि तुमच्या ऑपरेटिंग सिस्टिमसाठी ऑडासिटी चा सेटअप डाउनलोड करा. विंडोजवाल्यांची इथून डाउनलोड करावे https://www.audacityteam.org/download/windows/ डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल झाल्यावर ऑडासिटी प्रोग्राम सुरु करा.
ऑडासिटी सुरु झाल्यावर वरती फाईल मेनू मधून आधी Import आणि मग Audio हे ऑप्शन सलेक्ट करा.
मग एक फाईल सलेक्शन ची विंडो येईल. मग तुमच्या कॉम्प्युटर मध्ये तुम्ही तुमची रेकॉर्डिंग जिथे ठेवली असेल तिथे जाऊन ती फाईल ओपन करा.
फाईल ओपन झाल्यावर काहीसे असे दृश्य दिसेल.
त्यात तुम्हाला दोन आडव्या ओळी (ज्यांना आपण लेफ्ट आणि राईट ट्रॅक असे म्हणतो) आणि त्यावर निळ्या रंगांचे - शाईच्या डागासारखे काहीतरी दिसेल.
हे शाईचे डाग म्हणजे तुमच्या आवाजाचा वेव्हफॉर्म (ध्वनिलहरी)!
तुमचा आवाज जेवढा जोरात (लाऊड)असेल तेवढी या ध्वनिलहरिंची उंची (amplitude) जास्त असते.
तुमचा आवाज ऐकण्यासाठी वरचे हिरवे प्ले चे बटन दाबा.
एक उभी रेषा हळू-हळू उजवीकडे सरकताना दिसेल, आणि त्याच वेळी तुमचा रेकॉर्ड केलेला आवाज तुम्हाला ऐकू येईल.
आजपुरते एवढेच. काही प्रॉब्लेम आले तर खाली प्रतिसाद द्या. धन्यवाद!
- चहा-बिस्कीट प्रोडक्शन
आमची वेब सिरीज आम्ही कोण आहोत
वाचने
17720
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
या लेखाची पीडीएफ आवृत्ती -
वा! भारीच काम झाले. अत्यंत
धन्यवाद. लेखात
In reply to वा! भारीच काम झाले. अत्यंत by एस
मीही गेले काही दिवस ह्यात हात
In reply to धन्यवाद. लेखात by चहाबिस्कीट
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
नक्की, एका आठवड्यात टाकू.
In reply to पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत by प्रीत-मोहर
अत्यंत उपयुक्त माहिती !
प्रोत्साहनासाठी सर्वांचे आभार
एका सदरात ईतकी कमी माहिती
नवीन लोकांना एखादे सॉफ्टवेअर
In reply to एका सदरात ईतकी कमी माहिती by शाली
व्हिडीओ एडीटींग हा माझा आवडता
In reply to नवीन लोकांना एखादे सॉफ्टवेअर by चहाबिस्कीट
धन्यवाद!
In reply to व्हिडीओ एडीटींग हा माझा आवडता by शाली
एका सदरात ईतकी कमी माहिती
In reply to एका सदरात ईतकी कमी माहिती by शाली
१) मुख्यत: मोबाइलचा इनबिल्ट
सध्या बाजारात स्वस्त आणि
In reply to १) मुख्यत: मोबाइलचा इनबिल्ट by कंजूस
हार्डवेअर पेक्षा सॉफ्टवेअर वर
In reply to सध्या बाजारात स्वस्त आणि by शाली
मला सांगा
In reply to सध्या बाजारात स्वस्त आणि by शाली
पुढे एडिटींग करायचे नसेल तर
In reply to १) मुख्यत: मोबाइलचा इनबिल्ट by कंजूस
माइक हे अॅक्ससेरी आहे.
काही व्याव्यसायिक कामासाठी
बहुधा Noise Cancellation मुळे
In reply to काही व्याव्यसायिक कामासाठी by कंजूस
हे Noise Cancellation डिसेबल
App store वरचे wavestudio
Audacity ॲप स्टोअरवर नसले तरी
In reply to App store वरचे wavestudio by कंजूस
खूपच माहितीपूर्ण
माहितीपूर्ण लेखन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shyama Meghame | ശ്യാമമേഘമേ | Adhipan | Malayalam Cover | Sanah Moidutty