✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आपला आवाज कसा रेकॉर्ड करावा [ऑडिओ-व्हिडीओ एडिटिंग / दृक-श्राव्य संपादन] [भाग १]

च
चहाबिस्कीट यांनी
Tue, 06/12/2018 - 09:43  ·  लेख
लेख
भाग १ https://www.misalpav.com/node/42802 भाग २ https://www.misalpav.com/node/42838

नमस्कार,

मागे कबूल केल्याप्रमाणे ऑडिओ/व्हिडिओ एडिटिंगवर सदर सुरु करत आहोत. पहिल्या भागात आपण आवाजाचं रेकॉर्डिंग कसं करायचं आणि ते रेकॉर्डिंग ऑडासिटी (Audacity) मध्ये कसं पहायचं हे बघणार आहोत. आम्ही असे गृहित धरले आहे की तुमच्या कडे अँड्रॉइड स्मार्टफोन आहे आणि तुम्ही विंडोज वर काम करत आहात. कॉम्प्युटरचा बेसिक वापर (माउस, कीबोर्ड वापरणे, इंटरनेट वरून डाउनलोड/इंस्टाल करणे) कसा करायचा हे तुम्हाला माहित आहे असे समजत आहोत. त्याचबरोबर स्मार्टफोनमधून कॉम्प्युटरवर फायली कशा पाठवायच्या हे तुम्हाला माहित असेल असे गृहीत धरत आहोत. (नसेल माहिती तर प्रतिसादात मदत मागा)

१. रेकॉर्डिंग

तुम्ही कॉम्प्युटर ला माईक जोडून ऑडासिटी मध्ये डायरेक्टली रेकॉर्ड करू शकता, पण असा माईक सगळ्यांकडे असतोच असं नाही (आणि कॉम्प्युटर चा इनबिल्ट माईक फारसा खास नसतो). म्हणून आपण मोबाईलच्या माईक चा वापर करणार आहोत. आवाज रेकॉर्ड करण्याची अनेक ऍप्स अँड्रॉइड वर आहेत. Easy Voice Recorder हे ऍप मला चांगलं वाटलं म्हणून त्याची लिंक देत आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.coffeebeanventures.easyvoicerecorder ते फोनवर इन्स्टॉल करा. audio1 रेकॉर्ड करण्यासाठी ऍपमधले खालचे लाल रंगाचे माइकचे बटन टच करा. टच केल्या केल्या लगेच बोलायला सुरवात करू नका. दोन - तीन सेकंद मध्ये जाऊद्या आणि मगच बोलायला सुरुवात करा. बोलत असताना मोबाईल चेहऱ्याजवळ धरा - म्हणजे नीट रेकॉर्ड होईल. सुरुवातीला दोन - तीन सेकंदांचा गॅप ठेवला म्हणजे नन्तर एडिटिंग ला सोपं जातं टेस्ट वाक्य म्हणून "भारत माझा देश आहे" असं म्हणा. वाक्य म्हणून झाल्यावर परत दोन सेकंद थांबा आणि मग खाली उजवीकडच्या चेकमार्क ✔ च्या बटनाला टच करा. त्याने रेकॉर्डिंग थांबेल आणि फाईल मोबाईलवर सेव्ह होईल. मग LISTEN सेक्शन मध्ये जा. audio2 तिथे तुम्हाला तुम्ही रेकॉर्ड केलेले वाक्य ऐकता येईल. (निळे बटन टच करून). audio3 रेकॉर्डिंगच्या उजवीकडे तीन उभे बिंदू दिसतात त्यावर क्लिक करून दुसरीकडे शेअर ही करता येईल. ही फाईल तुमच्या कॉम्प्युटरवर सेव्ह करा. या फाईल चे नाव "My recording #1.wav" या टाईपचे असेल. या नावातील .wav हा भाग या फाईल चा फॉरमॅट wav आहे असे दर्शवतो. कधीही आवाज रेकॉर्ड करत असताना चांगली क्वालिटी हवी असेल तर wav फॉरमॅटच निवडावा (इतर फॉरमॅट, जसे कि mp3 निवडू नयेत) . यासंबंधी अधिक माहिती हवी असेल ही लिंक वाचा (थोडे क्लिष्ट वाटू शकते) इथून पुढचं काम आपण कॉम्पुटरवर करणार आहोत.

२. ऑडासिटी

https://www.audacityteam.org/download/ या लिंक वर जा आणि तुमच्या ऑपरेटिंग सिस्टिमसाठी ऑडासिटी चा सेटअप डाउनलोड करा. विंडोजवाल्यांची इथून डाउनलोड करावे https://www.audacityteam.org/download/windows/ डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल झाल्यावर ऑडासिटी प्रोग्राम सुरु करा. audio4 ऑडासिटी सुरु झाल्यावर वरती फाईल मेनू मधून आधी Import आणि मग Audio हे ऑप्शन सलेक्ट करा. audio5 मग एक फाईल सलेक्शन ची विंडो येईल. मग तुमच्या कॉम्प्युटर मध्ये तुम्ही तुमची रेकॉर्डिंग जिथे ठेवली असेल तिथे जाऊन ती फाईल ओपन करा. फाईल ओपन झाल्यावर काहीसे असे दृश्य दिसेल. audio6 त्यात तुम्हाला दोन आडव्या ओळी (ज्यांना आपण लेफ्ट आणि राईट ट्रॅक असे म्हणतो) आणि त्यावर निळ्या रंगांचे - शाईच्या डागासारखे काहीतरी दिसेल. हे शाईचे डाग म्हणजे तुमच्या आवाजाचा वेव्हफॉर्म (ध्वनिलहरी)! तुमचा आवाज जेवढा जोरात (लाऊड)असेल तेवढी या ध्वनिलहरिंची उंची (amplitude) जास्त असते. तुमचा आवाज ऐकण्यासाठी वरचे हिरवे प्ले चे बटन दाबा. एक उभी रेषा हळू-हळू उजवीकडे सरकताना दिसेल, आणि त्याच वेळी तुमचा रेकॉर्ड केलेला आवाज तुम्हाला ऐकू येईल. आजपुरते एवढेच. काही प्रॉब्लेम आले तर खाली प्रतिसाद द्या. धन्यवाद!

- चहा-बिस्कीट प्रोडक्शन

आमची वेब सिरीज आम्ही कोण आहोत
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17651 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

या लेखाची पीडीएफ आवृत्ती -

चहाबिस्कीट
Tue, 06/12/2018 - 09:47 नवीन
या लेखाची पीडीएफ आवृत्ती - https://drive.google.com/file/d/1WAbyVCyhNvktHtiiUF5C34rpwY2zI4__/view?usp=sharing
  • Log in or register to post comments

वा! भारीच काम झाले. अत्यंत

एस
Tue, 06/12/2018 - 10:01 नवीन
वा! भारीच काम झाले. अत्यंत उपयुक्त माहिती. अजून लिहा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. लेखात

चहाबिस्कीट
Tue, 06/12/2018 - 10:23 नवीन
धन्यवाद. लेखात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करून पहा आणि सांगा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मीही गेले काही दिवस ह्यात हात

प्रीत-मोहर
Tue, 06/12/2018 - 11:20 नवीन
मीही गेले काही दिवस ह्यात हात पाय मारतेय. अगदी योग्य वेळी योग्य लेख आला तुमचा. धन्यवाद चहा बिस्कीट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चहाबिस्कीट

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

प्रीत-मोहर
Tue, 06/12/2018 - 11:21 नवीन
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

नक्की, एका आठवड्यात टाकू.

चहाबिस्कीट
Tue, 06/12/2018 - 11:52 नवीन
नक्की, एका आठवड्यात टाकू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

अत्यंत उपयुक्त माहिती !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/12/2018 - 12:04 नवीन
अत्यंत उपयुक्त माहिती ! पुभाप्र.
  • Log in or register to post comments

प्रोत्साहनासाठी सर्वांचे आभार

चहाबिस्कीट
Tue, 06/12/2018 - 12:24 नवीन
प्रोत्साहनासाठी सर्वांचे आभार. तुम्हाला एखादी ऑडियो/व्हिडीओ एडिटिंग संबंधित विशिष्ट गोष्ट कशी करायची हे जाणून घ्यायचे असेल तर मला व्यनि/खरड करा. म्हणजे पुढच्या एखाद्या लेखामध्ये त्या समस्येवरचा उपाय सांगण्यात येईल.
  • Log in or register to post comments

एका सदरात ईतकी कमी माहिती

शाली
Tue, 06/12/2018 - 15:35 नवीन
एका सदरात ईतकी कमी माहिती दिली तर सदर पुढे कधी सरकणार?
  • Log in or register to post comments

नवीन लोकांना एखादे सॉफ्टवेअर

चहाबिस्कीट
Tue, 06/12/2018 - 16:47 नवीन
नवीन लोकांना एखादे सॉफ्टवेअर शिकवताना थोडी-थोडी माहिती दिली तर ती त्यांना चांगली समजते असा माझा अनुभव आहे. आणि एखादी गोष्ट प्रत्यक्षात करून बघितल्यावरच त्यातली गुंतागुंत कळते. तिसरी गोष्ट म्हणजे मोठा लेख लिहायचा म्हणजे तेवढा मोकळा वेळ सलग पाहिजे. वरचा लेख लिहायला मला एक तास लागला. त्यामुळे वेळेअभावी खूप काही गोष्टी एकाच भागात येऊ शकल्या नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली

व्हिडीओ एडीटींग हा माझा आवडता

शाली
Tue, 06/12/2018 - 19:30 नवीन
व्हिडीओ एडीटींग हा माझा आवडता विषय असल्यामुळे मला घाई झाली पुढे वाचण्याची म्हणून तसा प्रतिसाद दिला गेला. असो. छान माहिती देता आहात. पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चहाबिस्कीट

धन्यवाद!

चहाबिस्कीट
Wed, 06/13/2018 - 09:04 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली

एका सदरात ईतकी कमी माहिती

Nitin Palkar
Wed, 06/13/2018 - 20:04 नवीन
नवशिक्यांकरता/नवख्यान्कारता एवढी माहिती एका लेखात पुरेशी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली

१) मुख्यत: मोबाइलचा इनबिल्ट

कंजूस
Tue, 06/12/2018 - 19:11 नवीन
१) मुख्यत: मोबाइलचा इनबिल्ट माइक चांगला असावा लागतो. २)पुढे एडिटींग करायचे नसेल तर app मधले mp3 option घ्यावे. करायचे झाल्यास wav format निवडावे. ३) कोणत्याही विडिओला बाहेरून कॅामेंट्री जोडायची झाल्यास " add audio to video" type app वापरून जोडले की झाले. ४) मोबाइलातून सर्व होतं.
  • Log in or register to post comments

सध्या बाजारात स्वस्त आणि

शाली
Tue, 06/12/2018 - 19:36 नवीन
सध्या बाजारात स्वस्त आणि ऊत्तम दर्जा असणारे माईक सहज ऊपलब्ध आहेत. पहाटेचा पक्षांचा किलबिलाटही अतिशय क्लिअर रेकॉर्ड होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हार्डवेअर पेक्षा सॉफ्टवेअर वर

चहाबिस्कीट
Wed, 06/13/2018 - 09:08 नवीन
हार्डवेअर पेक्षा सॉफ्टवेअर वर आमच्या लेखात भर असेल. माईक निवडण्याबद्दल आत्ताच लेख टाकायचा आमचा विचार नाही, म्हणून तुम्ही/इतर कोणी या संबंधी लेख लिहिलात तर लोकांना उपयोगी पडेल. माईक चे वेगवेगळे प्रकार आणि प्रत्येक प्रकारातले काही बेस्ट मॉडेल्स (जे भारतात मिळतात) या टाईप चा लेख आला तर आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली

मला सांगा

चौकटराजा
गुरुवार, 06/14/2018 - 15:37 नवीन
सध्या बाजारात स्वस्त आणि ऊत्तम दर्जा असणारे माईक सहज ऊपलब्ध आहेत नाझ्या कडे काराओके आहे . माझ्याकडे वायरलेस माईक ही आहेत . पण त्याला चालवायचे म्हणजे एका तासाला ३० रूपये खर्च बॅटरीचा येतो. सबब थेट कने क्शन असणारा वायरवाला माइक मला आवा आहे . कोणता घेऊ ? महाग नको . पण एकदम कामचालावू पण नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली

पुढे एडिटींग करायचे नसेल तर

चहाबिस्कीट
Wed, 06/13/2018 - 09:02 नवीन
पुढे एडिटींग करायचे नसेल तर app मधले mp3 option घ्यावे. करायचे झाल्यास wav format निवडावे.
लेखात सांगितलेल्या ऍप मध्ये mp3 चा ऑप्शन नाहीये (Setting -> Tuning -> Encoding). आणि त्यात बाय डीफॉल्ट wav format च आहे, म्हणून एडिटिंग ला वेगळा ऑप्शन निवडायची गरज नाही. wav -> mp3 कन्व्हर्ट करायचे खूप सारे मार्ग आहेत (वेगवेगळे ऍप्स / वेबसाईट्स इत्यादी). ऑडासिटी मध्ये सुद्धा हे कन्व्हर्जन करता येते. पुढच्या लेखात सुरुवातीला फाईल फॉरमॅट बद्दल अजून माहिती जोडू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

माइक हे अॅक्ससेरी आहे.

कंजूस
Wed, 06/13/2018 - 08:18 नवीन
माइक हे अॅक्ससेरी आहे. मोबाइलला जोडा इत्यादी ( युएसबीमधूनच?) मोबाइलमधलाच माइक चांगला हवा. Clyp dot itवर अपलोड करून त्याचा ओडिओप्लेअर इथे देता येतो.
  • Log in or register to post comments

काही व्याव्यसायिक कामासाठी

कंजूस
Wed, 06/13/2018 - 09:58 नवीन
काही व्याव्यसायिक कामासाठी ओडिओ टाकायचा झाल्यास चांगले सॅाफ्टवेर लागेल. मोबाइलमधली एकदोनच तपासली आहेत. १) एक प्रश्न - पावसाळ्यांतल्या ढगांचा गडगडाट/विजेचा कडाका रेकॅाड का होत नाही मोबाइलमध्ये?
  • Log in or register to post comments

बहुधा Noise Cancellation मुळे

शाली
Wed, 06/13/2018 - 10:22 नवीन
बहुधा Noise Cancellation मुळे बाकीचे आवाज रेकॉर्ड होत नाही व्यवस्थीत. इतर फोनचे माहित नाही पण iPhone वर Noise Cancellation डिसेबल केले तर विजांचा कडकडाट बऱ्यापैकी रेकॉर्ड करता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हे Noise Cancellation डिसेबल

कंजूस
Wed, 06/13/2018 - 12:57 नवीन
हे Noise Cancellation डिसेबल करणे /करावे लागते माहित नव्हते. अमच्या फोनात डिसेबल ओप्शन नसावा.
  • Log in or register to post comments

App store वरचे wavestudio

कंजूस
Wed, 06/13/2018 - 16:29 नवीन
App store वरचे wavestudio audio recorder app (unreleased) soundbased llc या मध्ये audacity सारखंच फीचर आहे.
  • Log in or register to post comments

Audacity ॲप स्टोअरवर नसले तरी

शाली
Wed, 06/13/2018 - 19:35 नवीन
Audacity ॲप स्टोअरवर नसले तरी थर्ड पार्टीकडून ऊपलब्ध आहे. पण मला Audio Edit जास्त सोपे वाटले. माझ्या बेसिक गरजाही आरामात पुर्ण होतात. जसे Trim, Split, Merge, Volume, Fadein/Fadeout, Stitching वगैरे. व्हिडीओ एडीटींग साठी मी iMovie वापरतो. त्यातही बरेच फिचर्स inbuilt आहेत. मी काही प्रोफेशनल नाही. हौस म्हणून काहीतरी करत असतो. त्यामुळे जास्त फिचर्सची आवश्यकता भासत नाही. GarageBand वर तर अमर्याद फिचर्स आहेत. शिवाय हे ॲप inbuilt असल्याने वेगळे डाऊनलोड करायची भानगड नाही. पण कधी कधी डोक्यावरुन जाते GarageBand.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

खूपच माहितीपूर्ण

Nitin Palkar
Wed, 06/13/2018 - 20:11 नवीन
खूपच माहितीपूर्ण! तज्ज्ञांच्या प्रतिसादांमधूनही खूपच माहिती मिळतेय. तुमच्या सोयीने लिहा पण... पुभाप्र.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण लेखन !

मदनबाण
गुरुवार, 06/14/2018 - 06:39 नवीन
माहितीपूर्ण लेखन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Shyama Meghame | ശ്യാമമേഘമേ | Adhipan | Malayalam Cover | Sanah Moidutty
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा