जे न देखे रवी...
कावळ्यांची फिर्याद -२
कावळ्यांची फिर्याद
पिंपळाच्या झाडावर कावळ्यांची भरली होती सभा....
चला,चला,चला...समोर मास भादव्याचा उभा.
संतप्त सारे काक होते,काकरव आसमंती गुजंला....
पितृपक्षी दुर जाऊ,प्रस्ताव त्यांनी मांडला.
चांद्रयान तीन......स्वप्न पूर्ण जाहले
देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले
स्वप्न चांद्रयान, जेव्हां विखुरले
हसले फिदीफिदी, छद्मवेषी
म्हणती
नऊशे कोटी मातीत घातले.
पावसाचं वय....
मऊ मऊ दुपटं,ऊबदार कुशीत
तोंडात अंगठा,गाल लुसलुशीत
तड तड ताशा,मोत्याच्या माळा
सांगतो का रे पावसा वय माझ्या बाळा?
भिरभीर डोळे, संतत धार
रस्त्यातले डबके,आईचा मार
भिजलेलं डोकं,कागदी होड्या
सांग ना रे पावसा वय तुझं गड्या?
मनात चुळबुळ,बाहेर भुरभुर
मातीला गंध,हिरवळ दूरदूर
छत्रीतलं भिजणं,भेटीची सय
सांग ना रे पावसा काय तुझं वय?
शपथ
धर्म, पंथ, वंश, जात भेदभाव मालवू
एक सूर, एक ताल, एक राग आळवू ॥ ध्रु ॥
सावळे कुणी जरी, कुणास रूप गोरटे
रक्त आमुच्या नसानसांत लाल वाहते
कुंचले जरी विभिन्न, एक चित्र रंगवू ॥१॥
एक सूर...
द्रौपदी, तुझी इथे युगेयुगे विटंबना
हात रोखणार मात्र यापुढे, नराधमा
बद्ध या पणात नित्य पौरुषास चेतवू ॥२॥
एक सूर...
जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली
https://www.lokmat.com/pune/sharad-pawar-and-ajit-pawar-4-hours-secret-m...
जेव्हा त्याची नि माझी चोरून भेट झाली,
झाली फुले स्वप्नांची, सीएम पद खरचं आले?!...
चांद्रयान ३
चांद माझा हांसरा, उधाण येई सागरा
चंद्र उगवला नभी, लाजली वसुंधरा
स्मरणातील रुप तुझे जे कवीने रेखले
चांदभरल्या रातीतले स्वप्न आज भंगले
चंद्रमुखी तू मेघसावळी कसे म्हणू मी....
क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा
कसे म्हणू मी.....
आयुष्य
निर्णय चुकतात, चुकू द्यावे
श्रेय हुकतात, हुकू द्यावे
जगता जगता आयुष्याकडून
जुगारातले दान घ्यावे.
बंध सुटतात,सुटू द्यावे
माणसं तुटतात, तुटू द्यावे
जगता जगता नात्याकडून
आपुलकीचे फुल घ्यावे.
मार्ग चुकतात, चुकू द्यावे
रस्ते सरतात, सरु द्यावे
चालता चालता रस्त्याकडून
सावलीचे दान घ्यावे.
खेळीया शब्दांचा
कसे स्मरतात शब्द त्यांना नित्य कवीता बांधती
त्याच वाटा, त्याच लाटा, तोच चंद्रमा अन् त्याच चांदराती
शिशिर तोच ,वसंत तोच,तेच क्षितिज, भुवरी टेकले
उगवती अन् मावळती तीच,अंबरात तेच रंग पेरले
गुंजारव तोच, तोच मधुप, तीच राधा बावरी
तोच कृष्ण सावळा, तरी नित्य वेगळे कवन यावरी
‐------------------------------------------------
राधा..
राधे !!!
एकेकाळी उभ्या गोकुळाला
वेड लावणाऱ्या या बासरीला कधीतरी
तुझे ओठ लावून बघ ना...
तेव्हा तुझं तुलाचं कळेल की
त्या बासरीच्या अवीट सुरांमध्ये
माझ्या स्पंदनांची कर्तबगारी नव्हतीचं कधी...
तुझ्या-माझ्यातील दुष्कीर्त नात्याला
सांभाळताना तुझ्या स्वतःशीच चाललेल्या
अविरत झगड्यातून बाहेर पडणारे
अस्वस्थ उमाळेचं तिची ऊर्जा होती...
इलाज नाही
कविवर्य विंदा करंदीकर यांची माफी मागून......
गर्भात वेदनेच्या रुजवू नकोस काही
उसळू दे वेदनांना त्याला इलाज नाही.
उसने घेवून बीज पेरु नकोस काही
मातीत खोट आहे त्याला इलाज नाही.
सद्भाव माणसांचा आणि स्वप्ने सुखाची
विषवल्लीनी वेढली त्याला इलाज नाही.
बोल ते फुकाचे आणि आदर्श देवाघरचे
नजरेत विखार आहे त्याला इलाज नाही.
निरोपाच्या क्षणी . . …
निरोपाच्या क्षणी . . …
निरोपाच्या क्षणी अश्रू डोळ्यातील चटका लावून गेले,
मन कातर, हळवे हळवे करून गेले.
म्हणालो, “वेडे, ह्या जन्मी जरी जमले नाही तरी पुढच्या जन्मी नक्कीच जमवू.
हातात हात घालून चालू,
एकच कॉफी मागवून, ऊष्टी ऊष्टी पिवू,
चंद्राच्या साक्षीने बिलगून वाळूत पाऊल खुणा ऊमटवू,
पावसात भिजू, ऊन्हात तापू.
कर जरा कंट्रोल...! :-)
किती ते मेसेज लिहितो अन् मला छळतोस तू
कर जरा कंट्रोल बाबा का उगा जळतोस तू
मित्र मज असले जरी पैशास येथे पासरी
तुज नको कसलीच चिंता तू मला सर्वोपरी
राग का यावा तुला हे गूढ मजला नाकळे
लिस्टातला तो एकजण, नाही कुणी रे आगळे
फक्त कॉफीचे निमंत्रण एक मी स्वीकारले
चार घटका हास्य, गप्पा यामधे वाहावले
स्वप्नजा!
बऱ्याच दिवसांनी एक रोमँटिक कविता झाली!! :-)
कोण तू, माझी कुणी आहेस का?
स्वप्नजा.. जागेपणी आहेस का?
त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी..
ब्रह्मकमळाची सखी आहेस का?
चाल नुपुरांची किती अलवार.. नाजुक!
चालुनी येते खरी आहेस का?
राग छेडी तार हृदयाचीच माझ्या..
अजुनी तू "रागा"वली आहेस का?
हे सुरांनो चंद्र व्हा
https://www.esakal.com/desh/woman-climbs-tower-in-madhya-pradeshs-shivpu...
या बातमीवर कविता
(कुसुमाग्रजांची क्षमा मागून)
हे सर्वांनो, तारयंत्र व्हा!
हे सर्वांनो, तारयंत्र व्हा!
नांदण्याचे निरोप माझ्या
प्रियकराला पोचवा ॥
स्वतःचे खरे रूप .
स्वतःचे स्वरूप ,पाहू दे मज डोळा
नाही मी भोळा , कळेल मज .
जाऊ दे मला , माझीया आत्म्याकडे
अन्य कुणीकडे , कळेल निजरूप???
पहीला मी खादाड , नंतरचा आसक्त
त्यानंतर अजून काही (?), भ्रम हा गेला !
आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ
वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने .
ऐश्या निरंतराची , आहे मज गाठी
याशिवाय पाठी , नाही काही !
कलंक
कलंक
स्वत: धरला
घरचा पलंग
म्हणे नागपूरचा
तुम्ही कलंक
धोका दिल्याने
तुम्ही,त्यांनी
केला हा चंग
फिरवले मोहरे
झालात दंग
पार्टी फोडून
केले हो नंग
वाचवेल कोण
तो तैमूरलंग?
थांबवा आता
बोलणे सवंग
भेटा मग त्या
ममतास वंग
रॅप साँग....,बडबडगीत
मी कार्यकर्ता,
मीsssss कार्यकर्ता.....
वारसा,लाभ.... नेत्यांची मुलं-मुली
पदं मर्जीतल्यांना,आमच्या थंड चूली
सतरंजी उचलायला मात्र मी
टाईमपास खेळतो,जंगली रमी
मी कार्यकर्ता
मी कार्यकर्ता
वर्षानूवर्ष पक्षात मी ठाम
शपथघेती आयारामगयाराम
संकटमोचन मी,मी विघ्नहर्ता
जो विसरला जातो चरताचरता
मी कार्यकर्ता..मी मी मी कार्यकर्ता...
- ‹ previous
- 11 of 468
- next ›