कावळ्याची फिर्याद

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
21 May 2021 - 3:14 pm

सद्दपरीस्थीतीत एकमेकाची भेट तर होऊ शकत नाही म्हणून अधुन मधून एकमेकाची मोबाईल, टेलिफोन विचारपुस करणे हा अलिखित नियमच झालाय.

आजच गावाकडं मावशीला फोन लावला, सर्वसाधारण इकडची तीकडची विचारपुस झाल्यावर विषय करोनाच्या महामारी कडे वळाला. बोलता बोलता मावशी म्हणाली आज आपल्या गावात २१ दशक्रिया विधी आहेत, आमक्या तमक्याचा नंबर आकरावा आहे, दुपारी अडीच ची वेळ मीळाली. हल्ली विधी करण्यासाठी माणसं पण मीळत नाहीत. विषयाला गंभीर वळण लागतय पाहून विषय बदलला, म्हटंल काळजी घ्या वगैरे वगैरे बोलून फोन ठेवला.

दुपारचा दिड वाजत होता, सौभाग्यवती म्हणाल्या स्वयंपाक झालाय जेवून घ्या. " उडदाचं घुट् ", म्हणजे लसणाची फोडणी घालून उडदाच्या डाळीची आमटी, पोळी, भाजी, भात, तोंडी लावायला लिबांच लोणचं आसा साधाच पण चविष्ट बेत होता. " उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म मानुन, अन्नदाता सुखी भव आजच्या सारखं उद्या मिळो" आशी देवाची प्रार्थना आणी आन्नदात्याला आशीर्वाद देत जेवण संपवले आणी वामकुक्षी करता शयन कक्षा कडे म्हणजे बेडरूम कडे मोर्चा वळवला.

लवकरच झोप लागली पण डोक्यात विचार चक्र चालूच होते. अचानक झोप चाळवली आणी काव काव आसा आ़वाज ऐकू आला, एक काळा कुळकुळीत कावळा गांधी टोपी, नेहरू शर्ट वेषातला ,काळ्या कपाळावर पांढरा टिळा आसा डोळ्यासमोर आला. म्हणला लाँकडाऊन आहे पण आमच काम काही संपत नाहीये, कित्येक दिवसांपासून घरी गेलो नाही, चिल्ली, पिल्ली धरून सर्व कुटुंब काम करतय पण घडीची उसंत नाही. जाम वैतागलो आहे काही उपाय सांगा. मला जरा नवलच वाटले, म्हटलं बाबा रे मी काय करू , चित्रगुप्ता कडे जा तोच कर्माचा हिशोब ठेवतो तोच काहीतरी उपाय सांगेल. एवढ म्हणसतोवर काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आला आणी झोप उडाली.

बघितले तर संध्याकाळ व्हयला आली होती, चहा घेऊन फिरायला बाहेर पडलो. पडलेल स्वप्न आणी घडलेल्या दिवसभरातील गोष्टींचं मंथन मनात चालूच होतं. त्यातुनच खालील ओळींचा जन्म झाला...........

भरला होता दरबार
कारवाई जोरात सुरू होती
चित्रगुप्ता पुढं सुनवाई चालू होती

एक एक फिर्यादी पेश होत होता
चित्रगुप्ताचा हिशोब एकदम चोख होता
कावळ्यान एन्ट्री मारली अन
कारवाई अचानक थाबंली

सारी सभा अचंबित झाली
आसं काय झालं ड्युटी सोडुन आला
कावळ्याला दरबारात बघुन
चित्रगुप्त उदास झाला

बोल काय म्हणतोयस काग राज
कशी काय आज आठवण आली
पृथ्वी वरची कामं सारी निपटून झाली !!
दरबारी यायला सवड कशी काय झाली? .....

कावळा म्हणला काय सांगु महाराज
करोनाच्या आजाराने माणुस बेजार झाला
अन पिडं खाऊन खाउन
कावळ्यानां अतिसार झाला

किती झाले क्वारंटाईन
अन पोट शुळानं किती कावळे मेले
हिशेब ठेवता ठेवता नाकीनऊ आले
तुमच्या लक्षात कसे नाही आले

विनंती करायला आलो होतो
द्या काही दिवस सुट्टी
लावा काही दिवस कबुतरांची ड्युटी
कावळा संतापला होता, म्हणला
आम्ही जाऊ संपावर काम नाही करणार,
असचं चालू राहिले तर आम्हीच नाही उरणार

ऐक माझं, चित्रगुप्त म्हणाला
तुझं काम तुच करायचं
कबुतरानां नाही जमायचं
जाऊन सांग माणसांना
लावा मास्क अन दुरी पाळा
अन अवकाळी पिडंदाना ची वेळच टाळा......

- कसरत
२०-५-२०२१
जनहीत मे जारी........

कथाविचार

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

21 May 2021 - 4:19 pm | कर्नलतपस्वी

वरील लेख हा फक्त एक कल्पना विस्तार आहे कृपया याला इतर कोणत्याही प्रकारचा वेगळा आयाम देऊ नये. यामधून एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश कदापी नाही.

इथेच तर मेख आहे.

कंजूस's picture

21 May 2021 - 5:57 pm | कंजूस

कामाला का लावायचे?

गॉडजिला's picture

21 May 2021 - 6:51 pm | गॉडजिला

त्यानाही जिव आहे त्यांनाही आपल्याप्रमाणे जगायचा अधिकार आहे...

कर्नलतपस्वी's picture

21 May 2021 - 7:52 pm | कर्नलतपस्वी

तुषार, कंजुस आणी गाँडजिला प्रतीसादा बद्दल धन्यवाद.