✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्वतःचे खरे रूप .

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 07/15/2023 - 20:38
स्वतःचे स्वरूप ,पाहू दे मज डोळा नाही मी भोळा , कळेल मज . जाऊ दे मला , माझीया आत्म्याकडे अन्य कुणीकडे , कळेल निजरूप??? पहीला मी खादाड , नंतरचा आसक्त त्यानंतर अजून काही (?), भ्रम हा गेला ! आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने . ऐश्या निरंतराची , आहे मज गाठी याशिवाय पाठी , नाही काही ! आत्मा म्हणे आता , पाहूनी मूळ रुप होऊ नको तद्रूप , पुन्हा एकदा . मूळ रुप खरे , जन्मांतरीचे बरे . साफ करुनी त्याला , घडव पुन्हा . आहे ऐसी क्रिया , धुवेल मूळ रूप हाती देईल खूप , पुन्हा मातीचा गोळा . पुन्हा घडव त्याला , तव जीवनी योग आला आत्मारती तयाला , सहज विद्या सापडली . ऐका रसीकजन , बोलते माझे मन पुन्हा आणखिन , सांगीन तुम्हा काही . तुम्हीच माझे स्वर्ग , इहलोक हाची सर्ग तिकडे जायाचा मार्ग , टीका टीप्पणी तुमची ! घेतो आता विराम , स्वल्प काळापुरता काही हाती उरता , येइन पुन्हा सांगावया ! ----------------------- ( जास्ती सिरियस होऊ नका . [ मी तर कधीच नसतो . =)) ] अधिक मासात स्वतःतले उणे शोधण्यासाठी काही डाएट प्लॅन करतोय . त्याचेच हे हलक्या शब्दातले जड काव्य आहे. ) अतृप्त .. ( १५/७/२३ ) #आत्मकाव्य #आत्म्याच्या_कविता

प्रतिक्रिया द्या
6617 वाचन

💬 प्रतिसाद (11)

सुरेख कविता.

प्रचेतस
Mon, 07/17/2023 - 05:53 नवीन
सुरेख कविता. अत्रुप्तजी आत्मा यांचे दमदार पुनरागमन.
  • Log in or register to post comments

कविता आवडली

विवेकपटाईत
Mon, 07/17/2023 - 08:59 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments

परममित्रा तू परत आलास....

कंजूस
Mon, 07/17/2023 - 09:02 नवीन
काही औषधी थेंब घेऊनी सवे. शोध तुझा नेईल निज इच्छास्थानी त्या गूढ मार्गावरी राहू तुज सदैव साथी
  • Log in or register to post comments

वा चांगले आहे बुवा. वेलकम

गवि
Mon, 07/17/2023 - 09:19 नवीन
वा चांगले आहे बुवा. वेलकम बॅक. अता लिहिण्यात खंड नको.
  • Log in or register to post comments

कवितेचे दालन...

कर्नलतपस्वी
Mon, 07/17/2023 - 18:06 नवीन
ओस पडले आहे. अधिकाधिक रचना इथे आणून समृद्ध होईल आशी वेडी आशा. स्वसरूप आवडले.
  • Log in or register to post comments

प्रचेतस , विवेकपटाईत , कंजूस

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/20/2023 - 08:22 नवीन
प्रचेतस , विवेकपटाईत , कंजूस , गवि , कर्नल तपस्वी सर्वेषाम् धन्यवादम् .
  • Log in or register to post comments

मस्त, भारी आवडली.

चौथा कोनाडा
गुरुवार, 07/20/2023 - 12:19 नवीन
मस्त, भारी आवडली. आत्मूस गुर्जी +१
तुम्हीच माझे स्वर्ग , इहलोक हाची सर्ग तिकडे जायाचा मार्ग , टीका टीप्पणी तुमची !
मिपाकरांचा असा गौरव पाहून ड्वोले पानावले
  • Log in or register to post comments

छान!

राघव
गुरुवार, 07/20/2023 - 13:50 नवीन
आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने .
आमचंही काही फार वेगळं नाहीच! प्रयत्न करणं महत्त्वाचं. :-)
  • Log in or register to post comments

सदा स्वरूपानुसंधान। हें मुख्य साधूचें लक्षण ।

चित्रगुप्त
गुरुवार, 07/20/2023 - 14:22 नवीन
व्वा बुवा, तुमचा "आपणासि जाणावे आपण" वाला 'डाएट प्लॅन' जबरदस्तच आहे. मिपाने राजकारण-संन्यास घेतल्यापासून जुने जाणते मिपाकर पुन्हा नव्याने प्रकट होऊ लागले आहेत हे उत्तमच. यापुढील "पुन्हा आणखिन , सांगीन तुम्हा काही .... .येइन पुन्हा सांगावया" ची प्रतिक्षा आहे. सदा स्वरूपानुसंधान। हें मुख्य साधूचें लक्षण । जनीं असोन आपण । जनावेगळा ॥ ९ ॥ स्वरूपीं दृष्टी पडतां । तुटोन गेली संसारचिंता । पुढें लागली ममता । निरूपणाची ॥ १० ॥ स्वरूपीं स्वरूपचि जाला । मग तो पडोनिच राहिला । अथवा उठोनि पळाला । तरी चळेना ॥ १६ ॥ (श्री दासबोधः दशक ८, समास ९ : सिद्धलक्षण)
  • Log in or register to post comments

_/\_

राघव
गुरुवार, 07/20/2023 - 16:05 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

@चौथा कोनाडा, राघव ,

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/08/2023 - 09:40 नवीन
@चौथा कोनाडा, राघव , चित्रगुप्त - धन्यवाद
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा