एक वेगळे जग- सीमलेस ट्युब

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
28 Oct 2009 - 7:50 pm

बॉल-बेअरींग, बंदूकीच्या आणि तोफांच्या नळ्या, प्रत्येक दुचाकी/चारचाकीचे सांगाडे, बॉम्बशेल, अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य इमारती आणि जमीनीतून कच्चे तेल काढण्यासाठी तयार केलेल्या विंधणविहीरींच्या केसिंगसाठी ज्या सीमलेस ट्यूब वापरल्या जातात त्या कशा तयार करतात ह्याची माहिती अगदी थोडक्यात येथे द्यावीशी वाटते.

६० च्या दशकात जमशेदपुरला आपल्या देशातील पहिला प्रकल्प ईटलीच्या तंत्रज्ञानांच्या मदतीने उभा राहिला. नंतर ७० च्या दशकात नगरला जमशेद्पूरच्याच काही भारतीय तंत्रज्ञांनी एकत्र येऊन सुधारीत प्रकल्प टाकला व एक सरकारी प्रकल्प कोचीला उभा राहिला. नंतर जवळजवळ १५ वर्षे भारतात एवढेच प्रकल्प होते.
नंतर सीमलेस ट्यूबचा वापर वाढला तो ओएनजीसी सारख्या कंपन्यांनी केलेली गंतवणूक वाढ, ऑटोमोबाईल क्षेत्रात झालेली प्रचंड वाढ देशात अशा अनेक कारणांनी. व हे पाहून नव्या उद्योग समुहांनी ह्यात गुंतवणूक करणे सुरु केले. सीमलेस ट्यूब तयार करण्यासाठी सगळ्या मशिनी जर्मनीतून ( व काही रशियातून) आयात कराव्या लागतात. एक-एक सीमलेस ट्यूब हा प्रकल्प प्रचंड आकारांच्या मशिनींनी बनतो व त्यांची एकत्रीत लांबी ३००-४०० मीटर पर्यंत असू शकते. एका प्रकल्पाला ३०० ते ८०० कोटी रुपये लागू शकतात; ह्यावरुन त्यातील तंत्रज्ञानाच्या गुंतागूंतीची कल्पना यावी.

येथे काम करणाऱ्यांना मेटलर्जीची उत्तम जाण असणे आवश्यक असते- निकेल, टंगस्टन, मॉली, अशा अनेक धातूंच्या मिश्रणातून येथे लागणारे टूल्स करावे लागतात व ते अत्यंत महाग असतात व ते सतत बदलावेही लागतात. असा प्रकल्प बंद पडला की, साधारणतः २५०० ते ३५०० रुपये प्रति सेकंद अशा गतिने नुकसान करतो त्यामुळे काम करणाऱ्यांवर एक प्रचंड दडपण असते. एक साधा बोल्ट तुटला की अख्खा प्रकल्प अक्षरशः थंडावतो. ह्यामुळे बारामतीला असलेल्या अशाच एका प्रकल्पामधे अत्याधुनिक यंत्रणा वापरुन अनेक कामे, व कंट्रोल संगणकाच्या सहाय्याने चालू असतात.

खाली दाखवलेल्या पिअर्सिंग मिल मधे बिलेट (गोल आकारचा लोखंडी बार- ज्याचा डायमीटर १०० ते २५० मिमी असू शकतो व वजन १.५ टनांपर्यंत असू शकते) जाण्याअगोदर ते एका फिरत्या भट्टीमधे अतिशय काळजीपुर्वक, अनेक प्रकारची यंत्रणा राबवून व गणितेकरुन तापवले जाते. ते साधारण १२००-५० डिसें पर्यंत आले की, एक रोबॉट त्याला आतून बाहेर घेउन येतो व असे तप्त बिलेट पिअर्सिंग मिलकडे सरकू लागते. लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा नियम पाळून ह्या तप्त बिलेटवर पटापट पुढची ३ महत्वाची प्रक्रिया करुन ट्युब तयार करावी लागते त्यामुळे प्रत्येक सेकंदाला महत्व असते व तो वेळ कमीतकमी असण्यासाठी प्रत्येकाला डोके वापरावे लागते.

भरीव बिलेटला एखाद्या उसाच्या चरकाप्रमाणे पिअर्सिंग मिल आत ओढून घेते व दुसऱ्या बाजूने जेव्हा (दुसरी बाजू तुम्हाला चित्रात दिसत आहे) त्याची पोकळ आणि थोडीशी ओबड-धोबड ट्युब बाहेर येते.

ही लगेचच दुसऱ्या प्रक्रियेसाठी जाते व त्या ट्युबला बऱ्यापैकी चांगला गुळगुळीत आकार मिळतो:

नंतर एका स्ट्रेच ऑपरेशन मधून ट्युबला अक्षरशः ताणतात व ही बनते हॉट-फिनिश्ड ट्युब. गार झाल्यावर ट्युबवर कोल्ड-फिनिशिंगसाठी रशियन बनावटीच्या मिल मधून अत्यंत अचूक असे व्यास व जाडी मिळवतात व अशा ट्युब बेअरींगसाठी वापरतात.

काही कामांसाठी हॉट-फिनिश्ड ट्युबही वापरतात जसे- खाली दाखवल्याप्रमाणे ऑईल रिगवर ह्याच ट्युब एका मागोमाग ड्रीलिंग करुन आत सोडतात. त्या जमीनीखाली २ किमी पेक्षाही खाली जातात व त्यातून नंतर ऑईल खेचून काढले जाते. ऑईल बाहेर काढतांना त्याबरोबर अत्यंत वेगाने खालील माती, दगडही वर ओढले जातात व त्यामुळे ह्या ट्युब बऱ्यापैकी घासल्या जातात व कालांतराने बदलाव्या लागतात.

सीमलेस ट्युब ला "सीमलेस" नाव पडले आहे त्याच्या जोड-नसलेल्या घडणीमुळे. हलक्या दर्जाच्या व कमी स्ट्रेस असलेल्या वापरासाठी वेल्डेड ट्युब वापरतात- जसे पाणी वाहून नेण्यासाठी.

सीमलेस ट्युबची किंमतही बरीच असते. हॉट-फिनिश्ड ट्युब साधारणतः ७०००० प्रति टन व त्यावर पुढील प्रक्रिया केल्यास २००,००० प्रतिटन असू शकते. व हे अजस्त्र प्रकल्प वर्षाकाठी २ ते ३ लाख टन ट्युब तयार करतात. त्यामुळे ह्या मालाची वाहतूकही एक मोठा उद्योग असतो.

तंत्रविज्ञानसंदर्भमाहिती

प्रतिक्रिया

अवलिया's picture

28 Oct 2009 - 7:51 pm | अवलिया

छान माहीती... अजुन येवु द्या तुमच्या पोतडीतुन. :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अजय भागवत's picture

28 Oct 2009 - 8:44 pm | अजय भागवत

नक्की! आहेत असे बरेच विषय.

प्रभो's picture

28 Oct 2009 - 7:54 pm | प्रभो

येऊद्या..वाचतोय...

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

मदनबाण's picture

28 Oct 2009 - 7:56 pm | मदनबाण

व्वा. अतिशय उत्तम लेख...
असेच इतर विषय आपल्या जवळ असतील तर त्यावर जरुर लिहा. :)

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

अजय भागवत's picture

28 Oct 2009 - 8:44 pm | अजय भागवत

धन्यवाद. नक्की लिहीन!

रामदास's picture

28 Oct 2009 - 7:56 pm | रामदास

माहीती आवडली.

आनंद's picture

28 Oct 2009 - 8:11 pm | आनंद

छान लेख. फोटू आणि आक्रुत्यां मुळे समजायला सोपा.
मी ही साधारण ह्याच क्षेत्रात ( ट्युब टु ट्युब वेल्डींग मशीनस बनवतो.)आहे.
>>हलक्या दर्जाच्या व कमी स्ट्रेस असलेल्या वापरासाठी वेल्डेड ट्युब वापरतात- जसे पाणी वाहून नेण्यासाठी. >>
हे थोडे पटले नाही, कारण फार्मा , फुडस & बेवरेजेस ह्या साठी लागणारी पाइप लाइन ह्या वेल्डेड ट्युबस असतात. अधीक माहीती समजावुन घ्यायला आवडेल.

---- आनंद

अजय भागवत's picture

28 Oct 2009 - 8:22 pm | अजय भागवत

रॅडीयल स्ट्रेसेस किंवा आतून वाहून नेण्याच्या द्रवाचा दाब एका ठराविक रेषेच्या बाहेर गेला की, सीमलेस ट्युबशिवाय पर्याय राहत नाही कारण त्या कमी वजनात अधिक क्षमता देतात. वेल्डेड ट्युबही सीमलेस ट्युब एव्हढी सक्षम करता येईल पण त्यासाठी तिची थिकनेस अनेक पटींनी वाढेल व एकंदरीतच सीमलेस ट्युब विकत घेणे परवडेल. काही केमिकल प्रकल्पात आवर्जून सीमलेस ट्युब वापरली जाते.

अवांतर- संपृक्त सल्फ्युरील ऍसिड सारखे द्रव वाहून नेण्यासाठी दगड वितळवून लाव्हा करतात व तो साच्यात घालून त्याच्या नळ्या करतात. लोखंडी नळ्या अशा ठिकाणी वापरतातच येत नाहीत.

आनंद's picture

28 Oct 2009 - 9:00 pm | आनंद

वर उल्लेख केलेल्य क्षेत्रात वेल्डेड ट्युबसच वापरतात कारण समजाउन घेतले पाहीजे,
सिमलेस ट्युबस आल्या तर माझ्या मशीन्सची गरज च राहणार नाही. (नविन काही बनवण्याच्या मागे लागल पाहिजे अस दिसतय......)

----आनंद

अजय भागवत's picture

28 Oct 2009 - 9:20 pm | अजय भागवत

वेल्डेड ट्युबचा वापर ज्याठिकाणी आज होतोय तो होतच राहणार. बाकी चर्चा आपण खरडीतून करु शकू.

सीमलेस् ट्युबही वेल्डींगने जोडतात (काही वापरात) पण ओसीटीजी साठी टेपर थ्रेडींग करावे लागते- ज्यामुळे ऑईल रीगवर एक-एक ट्युब आत सोडतांना ती आधी आत गेलेल्या ट्युबला थ्रेडेड कपलिंगने जोडतात- ऑईल रीग वर ट्युब फिरत असलेल्या तुम्ही पाहिल्या असतील.

संजय अभ्यंकर's picture

30 Oct 2009 - 6:59 am | संजय अभ्यंकर

आनंदभाऊ,

तुम्ही ट्यूब टू ट्यूब वेल्डींग मशिन्स बनवता त्या बद्दल जास्त माहिती हवी आहे.

जेथे जागा कमी असते (किंवा वाचवायची असते) अथवा हाय प्रेशर कपलिंग्स महाग पडतात, तेथे तुमच्या मशिन्स वापरल्या जात असाव्यात.

माझ्या मते, तुमची यंत्रे वेल्डेड किंवा सिमलेस ट्यूब, दोन्ही ठिकाणी वापरता येऊ शकतात.

मला वाटते, तुमची यंत्रे स्पेस अप्लीकेशन, विमान निर्मीती अथवा जेथे पोचून दुरुस्ती कठीण असते तेथे जास्त उपयोगी आहेत.

स्पेस अप्लीकेशन मध्ये ट्यूब्ज व सुटेभाग जोडणे बरेचदा अत्यावश्यक असते, परंतु, उच्च वेगावर हे जोड तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे, नट-बोल्टस वापरता येत नाहीत. Electron Beam Welding (EBW), ज्यामध्ये Laser किंवा HF तंत्र वापरून दोन भाग जोडाच्या जागीच वितळवून जोडले जातात. ह्या जोडाला मजबूती असते, तसेच जागा ही वाचते. एरोस्पेस मध्ये जागा वाचवण्याला अनन्य साधारण महत्व आहे. यंत्रे जितकी कमी जागा घेतील तितके पे लोड वाढवता येते.

ISRO ने अती उंचावर, प्रचंड थरथराट (vibrations) व तापमानातील अतीरेकी बदल ह्या परीस्थीत टिकाव धरणार्‍या वेल्डींग तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे विकसित केले आहे. (आपण विमानाच्या पंखांजवळ बसतो, तेव्हा आपल्याला पंखांवर रोव्हेटेड जोड दिसतात). परंतू लढाऊ विमाने व रॉकेटस सारख्या स्वनातित वेगाने पळणार्‍या वाहनात वेल्डीगला पर्याय नाही).

तुम्ही तुमची यंत्रे ह्या उद्योगांना देता का?

आपल्या कंपनीची वेबसाईट असल्यास, कृपया लींक द्या.
तसेच आपण एरोस्पेस किंवा विमान उद्योगाला यंत्रे देता का ह्याची शक्य असल्यास माहीती द्या.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

धनंजय's picture

28 Oct 2009 - 8:12 pm | धनंजय

माहिती आवडली.

गणपा's picture

28 Oct 2009 - 8:13 pm | गणपा

नवीन आणि रंजक माहिती आहे.
अजुन वाचायला आवडेल. :)

परिकथेतील राजकुमार's picture

29 Oct 2009 - 3:23 pm | परिकथेतील राजकुमार

नवीन आणि रंजक माहिती आहे.
अजुन वाचायला आवडेल.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अक्षय पुर्णपात्रे's picture

28 Oct 2009 - 8:22 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री भागवत, चांगली माहिती. How it is made या मालिकेतही असेच काहीतरी दाखवत असतात. श्री अधीर लोखंडेंचा मार्केटशेअर खाताय की तुम्ही.;)

अजय भागवत's picture

28 Oct 2009 - 8:45 pm | अजय भागवत

स्पर्धेतूनच गुणवत्ता वाढते असे अनुभवत आलो आहे. ती मालिका कोणत्या वाहिनीवर दाखवतात?

अक्षय पुर्णपात्रे's picture

28 Oct 2009 - 8:49 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री भागवत, स्पर्धेतून वाढीस लागते आणि ईर्ष्येने धुळीस मिळते. ही मालिका डिस्कवरी चॅनेलवर दाखवतात.

बिनशिवणीच्या नळ्या निर्मितीची सुंदर हकिकत! आवडली!!

ह्याची माहिती अगदी थोडक्यात येथे द्यावीशी वाटते.>> उत्तम.

अगदी सविस्तर माहिती दिलीत तरीही ती अधिकच आवडेल. तुमच्या माहितीचे तंत्र, आम्हालाही अवगत करून द्या. किमान ओळख तरी घडवा.

या लेखाखातर हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद.

पक्या's picture

28 Oct 2009 - 11:01 pm | पक्या

छान माहिती.

स्वाती२'s picture

28 Oct 2009 - 11:15 pm | स्वाती२

सोप्या भाषेतील माहिती आवडली.

निमीत्त मात्र's picture

29 Oct 2009 - 12:02 am | निमीत्त मात्र

प्यांटीतले लिंग ओळखणारे टारझन महाराज अजून ह्य 'वेल्डेड ट्यूब' आणि 'सिमलेस ट्यूब' प्रकाराकडे कसे काय वळले नाहीत? :)

टारझन's picture

29 Oct 2009 - 1:33 pm | टारझन

हॅहॅहॅ ... काय हो निमित्त मात्र ... आपले छंद दुसर्‍यांवर सोपवताय ?
असो .. अतिशय हस्यास्पद प्रतिसाद आहे हा !!

टिप : वरील प्रतिसादातही "हॅहॅहॅ" आहे .. ह्यातही आपल्याला काही दिसतंय का ?

-- निवृत्त कुत्र

चित्रा's picture

29 Oct 2009 - 6:42 am | चित्रा

खूपच माहिती आणि चित्रांसहित लेख.

आवडला, आणि असेच अधिक येऊ देत.

सुनील's picture

29 Oct 2009 - 6:54 am | सुनील

का़ळे साहेबांनंतर आता तुम्हीही! अश्याच निरनिराळ्या तांत्रीक विषयांवरील लेख येऊदेत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अजय भागवत's picture

29 Oct 2009 - 8:08 am | अजय भागवत

काळे साहेबांनी लिहिलेला लेख वाचला होता व तेव्हा पासूनच वाटायला लागले होते की, ह्याबद्दल लिहावे.

असे लिखाण संवादस्थाळांवर कितपत रुचेल असे वाटत असे व किती खोलवर लिहावे ही मर्यादा एकदोनदा बुडी मारल्याशिवाय समजत नाही. त्यामुळे वरील लेख ५०००० फूटावरुन पहावे असा आहे.

काळे साहेबांचे कित्येक वर्षे स्टील क्षेत्रात गेले आहे तरीही त्यांची लिहिण्याची उर्मी शाबूत आहे हे पाहून बरे वाटते. स्टील मिल मधील अतिशय खडतर काम माणसाच्या मनातील तो सॉफ्ट टच-पॉइंट काढून टाकू शकत नाही हेच खरे.

मी 'ISSAL'मध्ये काम करत असतांना ISMT ला त्यांचे रॉ मटेरियल पुरवायचो. त्यामुळे मी तो कारखानाही खूपदा पाहिला आहे. तुमचा लेख वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद लुटला.
तसेच जमशेदपूरचा कारखानाही पाहिला आहे. बारामतीचा कारखाना मात्र पहायची संधी नाहीं मिळाली!
लिहा या व अशा विषयावर. कांहीं लोकांना ही 'स्पर्धा' का वाटते कळत नाहीं. पण आयुष्यात अशा लोकांशी गाठ तर पडतेच ना! मला तुम्ही आणखी असेच लिहिलेले खूप आवडेल. खरं तर माझ्याकडे आता या विषयावर लिहायला आणखी कांहीं नाहीं. कांहीं video काढून एकाकडे "You-Tube-able" करायला दिले आहेत ते मिळाले कीं मी ते चढवीन.
तरी अगदी अनमान न करता लिहा!
आपण मॅन्युफॅक्चरिंगकडे आहात कीं प्रोजेक्टकडे? मॅन्युफॅक्चरिंगकडे असाल तर कधीतरी नोटस compare करायला मजा येईल.
आपण कधी भेटलो होतो का? आपले नाव परिचित वाटले म्हणून विचारतोय. 'मराठी शब्द' नावाच्या एका संस्थेशी आपला संबध आहे काय? कारण त्या विषयावर आपला कांहीं पत्रव्यवहार झाला असावा असे वाटते.
सुधीर काळे
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!

सहज's picture

29 Oct 2009 - 8:07 am | सहज

लेख छान आहे. अजुन येउ दे.

विजुभाऊ's picture

29 Oct 2009 - 9:50 am | विजुभाऊ

सीमलेस ट्यूब्ज बनवण्यासाठी प्लास्टीक पाईप साठी वापरतात तशी एक्स्ट्रुजन सारखी प्रोसेस वापरतात का?

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अजय भागवत's picture

29 Oct 2009 - 10:23 am | अजय भागवत

एक्स्ट्रुजन प्रोसेस पुर्वी - तिसेक वर्षांआधी- वापरत पण त्यास अनेक गुणवत्ता मर्यादा असत. ट्युबच्या लांबीवरही खूप मर्यादा येत. ऑइल काढण्यासाठी ट्युबची लांबी १५ मीटर असावी लागते त्यामुळे अशा कामांसाठी एक्स्ट्रुजन सारखी प्रोसेस वापरता येत नाही.

मला वाटते आजही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी एक्स्ट्रुजन प्रोसेस वापरुन कार्बन स्टीलची सीमलेस ट्युब तयार करत असावेत.

अर्थात तांब्याच्या सीमलेस ट्युब करण्यासाठी आजही एक्स्ट्रुजन प्रोसेस वापरली जाते- ह्या तांब्याच्या सीमलेस ट्युबचा आपण एसी, फ्रिज, अनेक ठिकाणी हायड्रॉलिक ऑईल, ग्रीज वाहून नेण्यासाठी वापर करतात.

आणि हो, स्टेनलेस स्टील रोलेबल नसल्याने, एक्स्ट्रुजन प्रोसेस हाच पर्याय आहे. मी स्वतः स्टेनलेस स्टीलची सीमलेस ट्युब रोलींग करुन तयार करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण यिल्ड फार कमी यायचे व ते परवडत नसे.

१. पिअर्सिंग किंवा विंधण प्रक्रिया नक्की डोळ्यासमोर उभी रहात नाही.
कृपया मँड्रेलबद्दल अधिक माहिती द्यावी. (आकृती दिल्यास उत्तम)
२. बारामतीच्या प्रकल्पात जास्तीत जास्त किती लांबीच्या ट्यूब बनतात?
३. स्टेनलेस स्टील रोलेबल नसेल तर बॉल बेअरिंगसाठी एसेस सीमलेस ट्यूब कशी तयार करतात?

अजय भागवत's picture

29 Oct 2009 - 1:05 pm | अजय भागवत

तुम्हाला नक्कीच बरीच माहिती आहे ह्या प्रोसेसची. :-)
पिअर्सिंग बद्दल येथे वाचा

बॉल बेअरिंगसाठी एसेस सीमलेस ट्यूब वापरत नाहीत. SAE 52100 वापरतात.

बारामतीच्या प्रकल्पात जास्तीत जास्त किती लांबीच्या ट्यूब बनतात?- १५ मीटर. आता माझे ते प्रोफेशन नाही- प्रोजेक्ट व्यवस्थापन केल्यानंतर काही महीने उत्पादन विभाग प्रमुख म्हणून काम पाहीले तेव्हा बराच रिसर्च करावा लागला होता त्याकाळातील माहिती मी एस-एस ट्युब बद्दल दिली.

विसुनाना's picture

29 Oct 2009 - 2:43 pm | विसुनाना

प्रकाटाआ - दोनदा आल्यामुळे.

विसुनाना's picture

29 Oct 2009 - 2:37 pm | विसुनाना

उत्तराबद्दल आभार.
दुव्यावरील आकृती आणि स्पष्टीकरणामुळे समजले.

तुम्हाला नक्कीच बरीच माहिती आहे ह्या प्रोसेसची.

नाही. माझे कार्यक्षेत्र ते नाही.पण कुतुहल आहे.