राजा भोज याने कालिदासाला दिलेली समस्या

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
28 Feb 2008 - 12:28 am

भोज राजाने फक्त दोन ओळी दिल्या आणि कालिदासाला श्लोक पूर्ण करण्यास सांगितले - काय आहेत त्या दोन ओळी?
--- -- --- ------ -- --- ---सिंदूर बिंदू विधवा ललाटेते पाहुनी विस्मय फार वाटे
(उत्तर माहीत असेल तर व्य. नी. तून कळवावे - शुक्रवारी मी अचूक ओळखणार्‍यांच्या नावासह इथे देईन.)

प्रतिक्रिया

सुनील's picture

28 Feb 2008 - 12:57 am | सुनील

राजा भोज आणि कालिदास दोघे मराठी होते का? काव्यपंक्ती मराठीत आहेत म्हणून शंका आली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पण ही समस्या मी लहानपणी ह्या दोघांच्या संदर्भात मराठीतूनच ऐकली आहे.
(कदाचित मूळ श्लोक संस्कृतमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालौघात मराठी भाषांतरच पुढे आले असावे...)
चतुरंग

प्रमोद देव's picture

28 Feb 2008 - 9:23 am | प्रमोद देव

जम्बू फलांनी पक्वानी पतन्ती विमले जले...ह्याची पुढची ओळ लिहा.इथेच लिहिली तरी चालेल.ही समस्या देखिल राजा भोजच्या संदर्भातील आहे.

बेसनलाडू's picture

28 Feb 2008 - 1:36 pm | बेसनलाडू

?????
(जलतरणपटू)बेसनलाडू

जम्बू फलांनी पक्वानी पतन्ती विमले जले...परीपक्वानी जम्बू फलानी पतन्ती विमले जले...
........... जाल गोल शन्कया:
( पिकलेली जांभळे पण्यात पदतात्...पण मासे ते जाळे (जाल गोल) टाकण्याचे गोळे समजुन खात नाहीत...)

प्रमोद देव's picture

28 Feb 2008 - 1:45 pm | प्रमोद देव

उत्तराच्या जवळ आला आहात. पण दुसरी ओळ अर्धवट का सोडलीत?बेला आम्हाला एक संस्कृतमध्ये धडा होता. त्यात हीच समस्या भोज राजा दरबारात विचारतो असे होते. आणि त्या दरबारातील एक विद्वानही
जलमध्ये डुबुक् डुबुक्  असेच उत्तर देतो. अर्थात ते चूक आहे.त्यातही खूप गमती जमतीची उत्तरे होती. दूर्दैवाने आज ते नीटसे आठवत नाही.

 
तानि मत्स्यानि/मत्स्या (विभक्ती प्रत्ययातील संदिग्धतेबद्दल क्षमस्व - बहुतेक 'मत्स्या'च असावे) न खादन्तिजालगोलकशन्कया
असे आहे का?
(स्मरणशील?)बेसनलाडू

प्रमोद देव's picture

28 Feb 2008 - 3:34 pm | प्रमोद देव

मत्स्यान तानि खादन्ति जालगोलकशन्कया!शाब्बास बेला. तुझ्या स्मरणशीलतेला दाद द्यायला हवी.संस्कृतमध्ये तसेही शब्द मागेपुढे झाले तरी चालतात.  त्यामुळे हेच शब्द कोणत्याही क्रमाने उच्चारले तरी हरकत नाही.

भाग्यश्री's picture

29 Feb 2008 - 12:32 am | भाग्यश्री

ठंठंठठंठ: .. असंच काहीतरी.. कुणाला आठवतय का? राजानी ही वरची ओळ दिलेली असते आणि एक विद्वान घडा जिन्यावरून पडतो आणि असा आवाज होतो, अशी समस्यापुर्ती करतो.. ते ठंठंठठंठ: म्हणताना खुप मजा यायची !!
जलमध्ये डुबुक डुबुक च लक्षात राहीले आहे कायम..  :)
 

चतुरंग's picture

29 Feb 2008 - 12:49 am | चतुरंग

भोज राजा एकदा एका युवतीला पाणी भरायला जाताना बघतो, तिच्या हातून घट पडून पायर्‍यांवरुन गडगडत जातो आणि त्याचा आवाज होतो --                  ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाःदुसर्‍यादिवशी तो ही समस्या दरबारात देतो.दोन दिवस राजाच्या दिनचर्येचे निरीक्षण करुन कालिदास समस्यापूर्ती करतो -
रामाभिषेके जलमाहरन्त्याःहस्ताच्च्युतो हेमघटो युवत्याःसोपान मार्गेण करोति शब्दंठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः
(संस्कृत माझा विषय नाही, त्यामुळे चुका असू शकतील, हे सर्व लहानपणी ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.:)
चतुरंग

ऋषिकेश's picture

29 Feb 2008 - 3:29 am | ऋषिकेश

रामाभिषेके जलमाहरन्त्याः न्त्याहस्ताच्च्युतो हेमघटो युवन्त्याः त्यासोपानमार्गेण करोति शब्दंठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः ठंठं ठ ठंठं ठ ठठ ठंठ ठंठ: ||
असं पाठ केलेलं आठवतंय.. चुभूदेघे (दहावी का नववीच्या पुस्तकात होती ही समस्या पुर्ती )
अजून एक झाडावर माकडचढतात नी पाण्यात जांभळं टाकतात आणि मग बुक्वुबुकबुकबुक असा काहिसा आवाज येतो अशीही एक समस्यापूर्ती होती कोणाला आठवतेय का?(याच समस्यापूर्तीवर दुसर्‍याएका कविने पौर्णिमेच्यारात्री एक सुंदर ललना घागरीने नदीवर पाणी भरायला आली असता बुक्वुबुकबुकबुक आवाज येत होता अशी पूर्तता केली होती. तोहि श्लोक आठवत असल्यास द्यावा :) )
-(विसरळभोळा) ऋषिकेश

धनंजय's picture

29 Feb 2008 - 12:52 am | धनंजय

रामाभिषेकीं जल नेइ कन्यासांडोन सुवर्णघडा पडे हासोपानमार्गीं* करून शब्दठठं ठठंठं ठठठं ठठंठःसंस्कृत पद बहुधा तुम्हाला ठाऊक असावे.*सोपानमार्ग म्हणजे जिना

आनंद घारे's picture

29 Feb 2008 - 11:57 am | आनंद घारे

ही समस्यापूर्ती नाही पण बुचकळ्यात टाकणारा श्लोक आहे.
केशवंपतितंदृष्ट्वापांडवाहर्षनिर्भरा।
रुदंतिकौरवास्सर्वेहाहाकेशवकेशव॥

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2008 - 10:25 am | पिवळा डांबिस

केशवं = कुठल्यातरी प्राण्याचे शव
पतितं दृष्ट्वा = पडल्याचे पाहून (पाण्यात पडल्याचे पाहून)
पाण्डवा = पाण्यामधे रहाणारे प्राणी (मासे)
हर्षनिर्भरा
रुदन्ति
कौरवा = (जमिनीवर रहाणारे प्राणी)
सर्वे = सगळे
हा: हा: केशवः केशवः||
आता समजलं?

प्रमोद देव's picture

1 Mar 2008 - 11:52 am | प्रमोद देव

म्हणजे कावळे म्हणू शकतो.

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2008 - 11:55 am | पिवळा डांबिस

कावळे तर कावळे!!

चतुरंग's picture

29 Feb 2008 - 5:32 pm | चतुरंग

तसा श्लोक सोपा होता पण एकही उत्तर आले नाही. असो. समस्यापूर्ती पुढीलप्रमाणे -
नमीत होती विधवा शिवालामसूर डाळी जडली कपाळासिंदूर बिंदू विधवा ललाटेते पाहुनी विस्मय फार वाटे
चतुरंग

सुधीर कांदळकर's picture

29 Feb 2008 - 8:28 pm | सुधीर कांदळकर

नापास. आम्ही परीक्षाच दिली नाही.

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2008 - 10:19 am | पिवळा डांबिस

राजा भोज (चतुरंग) आणि सर्व गंगू तेली यांचे अभिनंदन!!!:))))

श्रीकांत धुंडिराज जोशी's picture

14 Oct 2017 - 7:42 pm | श्रीकांत धुंडिर...

माझ्या ऐकण्यातील ओळी पुढील प्रमाणे -

नमित होती विधवा शिवाला, मसूर डाळी जडली कपाळा!
तेणे तुम्हा विस्मय फार वाटे! सिंदूर कैसा विधवा ललाटे!

(पाठभेद असू शकतात; मूळ संस्कृतचे हे मराठीकरण!)

श्रीकांत धुंडिराज जोशी's picture

14 Oct 2017 - 7:53 pm | श्रीकांत धुंडिर...

राजा भोज व कालिदास यांच्या बऱ्याच चतुर्यकथा प्रसीद्ध आहेत.

पण हा कालिदास संस्कृत कवी, नाटककार कालिदासहून भिन्न असावा, असे संशोधकांना वाटते.

भोज राजाचा काळ इसवी सनाचे अकरावे शतक (१००० ते ११००)हा निश्चित आहे; पण साहित्यिक कालिदासाचा काळ इसवी सनाचे चौथे शतक सांगितले जाते.

हा दुसरा कालिदास देखील चतुर, विद्वान असल्याचे दिसते, हे मात्र खरे!