राजा भोज याने कालिदासाला दिलेली समस्या
भोज राजाने फक्त दोन ओळी दिल्या आणि कालिदासाला श्लोक पूर्ण करण्यास सांगितले - काय आहेत त्या दोन ओळी?
--- -- --- ---
--- -- --- ---
सिंदूर बिंदू विधवा ललाटे
ते पाहुनी विस्मय फार वाटे
(उत्तर माहीत असेल तर व्य. नी. तून कळवावे - शुक्रवारी मी अचूक ओळखणार्यांच्या नावासह इथे देईन.)
वाचने
12547
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
एक भाप्र
राजा भोज आणि कालिदास दोघे मराठी होते का? काव्यपंक्ती मराठीत आहेत म्हणून शंका आली.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
In reply to एक भाप्र by सुनील
राजा भोज आणि कालिदास दोघे मराठी होते का? मला माहीत नाही.
पण ही समस्या मी लहानपणी ह्या दोघांच्या संदर्भात मराठीतूनच ऐकली आहे.
(कदाचित मूळ श्लोक संस्कृतमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालौघात मराठी भाषांतरच पुढे आले असावे...)
चतुरंग
अजून एक समस्या!
ह्याची पुढची ओळ लिहा.
इथेच लिहिली तरी चालेल.
ही समस्या देखिल राजा भोजच्या संदर्भातील आहे.
In reply to अजून एक समस्या! by प्रमोद देव
जलमध्ये डुबुक् डुबुक्
?????
(जलतरणपटू)बेसनलाडू
जम्बू फलांनी पक्वानी पतन्ती विमले जले...
जम्बू फलांनी पक्वानी पतन्ती विमले जले...
परीपक्वानी जम्बू फलानी पतन्ती विमले जले...
........... जाल गोल शन्कया:
( पिकलेली जांभळे पण्यात पदतात्...पण मासे ते जाळे (जाल गोल) टाकण्याचे गोळे समजुन खात नाहीत...)
विजूभाऊ...
बेला आम्हाला एक संस्कृतमध्ये धडा होता. त्यात हीच समस्या भोज राजा दरबारात विचारतो असे होते. आणि त्या दरबारातील एक विद्वानही
जलमध्ये डुबुक् डुबुक् असेच उत्तर देतो. अर्थात ते चूक आहे.
त्यातही खूप गमती जमतीची उत्तरे होती. दूर्दैवाने आज ते नीटसे आठवत नाही.तानि मत्स्यानि/मत्स्या न खादन्ति?
तानि मत्स्यानि/मत्स्या (विभक्ती प्रत्ययातील संदिग्धतेबद्दल क्षमस्व - बहुतेक 'मत्स्या'च असावे) न खादन्ति
जालगोलकशन्कया
असे आहे का?
(स्मरणशील?)बेसनलाडू
बरोबर!
शाब्बास बेला. तुझ्या स्मरणशीलतेला दाद द्यायला हवी.
संस्कृतमध्ये तसेही शब्द मागेपुढे झाले तरी चालतात. त्यामुळे हेच शब्द कोणत्याही क्रमाने उच्चारले तरी हरकत नाही.
अशीच अजुन एक ओळ होती..
ठंठंठठंठ: .. असंच काहीतरी.. कुणाला आठवतय का?
राजानी ही वरची ओळ दिलेली असते आणि एक विद्वान घडा जिन्यावरून पडतो आणि असा आवाज होतो, अशी समस्यापुर्ती करतो.. ते ठंठंठठंठ: म्हणताना खुप मजा यायची !!
जलमध्ये डुबुक डुबुक च लक्षात राहीले आहे कायम.. :)
In reply to अशीच अजुन एक ओळ होती.. by भाग्यश्री
हो, असं आहे ते
भोज राजा एकदा एका युवतीला पाणी भरायला जाताना बघतो, तिच्या हातून घट पडून पायर्यांवरुन गडगडत जातो आणि त्याचा आवाज होतो --
ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः
दुसर्यादिवशी तो ही समस्या दरबारात देतो.
दोन दिवस राजाच्या दिनचर्येचे निरीक्षण करुन कालिदास समस्यापूर्ती करतो -
रामाभिषेके जलमाहरन्त्याः
हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्याः
सोपान मार्गेण करोति शब्दं
ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाः
(संस्कृत माझा विषय नाही, त्यामुळे चुका असू शकतील, हे सर्व लहानपणी ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे.:)
चतुरंग
In reply to हो, असं आहे ते by चतुरंग
समस्या
रामाभिषेके जलमाहर
न्त्याःन्त्याहस्ताच्च्युतो हेमघटो युव
न्त्याःत्यासोपानमार्गेण करोति शब्दं
ठाठं ठठं ठं ठठठं ठ ठं ठाःठंठं ठ ठंठं ठ ठठ ठंठ ठंठ: ||
असं पाठ केलेलं आठवतंय.. चुभूदेघे (दहावी का नववीच्या पुस्तकात होती ही समस्या पुर्ती )
अजून एक झाडावर माकडचढतात नी पाण्यात जांभळं टाकतात आणि मग बुक्वुबुकबुकबुक असा काहिसा आवाज येतो अशीही एक समस्यापूर्ती होती कोणाला आठवतेय का?
(याच समस्यापूर्तीवर दुसर्याएका कविने पौर्णिमेच्यारात्री एक सुंदर ललना घागरीने नदीवर पाणी भरायला आली असता बुक्वुबुकबुकबुक आवाज येत होता अशी पूर्तता केली होती. तोहि श्लोक आठवत असल्यास द्यावा :) )
-(विसरळभोळा) ऋषिकेश
In reply to अशीच अजुन एक ओळ होती.. by भाग्यश्री
ठठं ठठंठं ठठठं ठठंठः
सांडोन सुवर्णघडा पडे हा
सोपानमार्गीं* करून शब्द
ठठं ठठंठं ठठठं ठठंठः
संस्कृत पद बहुधा तुम्हाला ठाऊक असावे.
*सोपानमार्ग म्हणजे जिना
एक श्लोक
ही समस्यापूर्ती नाही पण बुचकळ्यात टाकणारा श्लोक आहे.
केशवंपतितंदृष्ट्वापांडवाहर्षनिर्भरा।
रुदंतिकौरवास्सर्वेहाहाकेशवकेशव॥
In reply to एक श्लोक by आनंद घारे
उत्तर!
केशवं = कुठल्यातरी प्राण्याचे शव
पतितं दृष्ट्वा = पडल्याचे पाहून (पाण्यात पडल्याचे पाहून)
पाण्डवा = पाण्यामधे रहाणारे प्राणी (मासे)
हर्षनिर्भरा
रुदन्ति
कौरवा = (जमिनीवर रहाणारे प्राणी)
सर्वे = सगळे
हा: हा: केशवः केशवः||
आता समजलं?
In reply to उत्तर! by पिवळा डांबिस
कौरवा
In reply to कौरवा by प्रमोद देव
जरूर!
समस्यापूर्ती
तसा श्लोक सोपा होता पण एकही उत्तर आले नाही. असो. समस्यापूर्ती पुढीलप्रमाणे -
नमीत होती विधवा शिवाला
मसूर डाळी जडली कपाळा
सिंदूर बिंदू विधवा ललाटे
ते पाहुनी विस्मय फार वाटे
चतुरंग
चतुरंग चिद्यापीठात सगळे .......
राजा भोज!
माझ्या ऐकण्यातील ओळी पुढील
राजा भोज व कालिदास यांच्या