बाबा नवाथे!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
22 Sep 2009 - 3:13 pm

तसे बाबा नवाथे जॉली होते. वयस्करच होते. ८० प्लस म्हणा ना! अलिकडेच वारले!

सोसायटीत सर्वांशी तसे मिळून मिसळून वागायचे. गच्चीत जायच्या जिन्यावर नेहमी बसलेले असायचे. पण सोसायटीतलं पब्लिक नेहमी त्याची थट्टा-मस्करीच करायचं. आणि ती करताना बर्‍याचदा त्यांच्या वयाचा मुलाहिजा राखला जात नसे. पण बाबा नवाथे कधी कुणावर रागावायचे नाहीत! पुढे पुढे तर लोकं त्या म्हातार्‍याची जास्तच भंकस करू लागले, टेर उडवू लागले.

नाही, तसं बाबांचही चुकायचं. म्हातार्‍याला बसण्या-उठण्याची जराही आदब नसे. उघडेबंब, आत लंगोट नसलेली चट्टेरीपट्टेरी हाफ चड्डी घालून बघावं तेव्हा म्हातारा गच्चीत जायच्या जिन्यात बसलेला असायचा. आमचा गोविंदा भोसडीचा महा-हलकट! आत लंगोटी नसल्यामुळे जरा बाबांनी पायांची पोझिशन बदलून मांडी बदलली की साजहिकच त्या अघळपघळ चड्डीतून पब्लिकला विश्वरूप दर्शन व्हायचं. ते झालं की गोंद्या चेकाळायाचा आणि टाळ्या पिटत आनंदाने ओरडायचा,

"हर हर महादेव,
लंगोटीत तीन देव!

बाबा नवाथे की जय!":)

हजर असणारं पब्लिक मनमुराद हसायचं आणि आपापल्या कामाला निघून जायचं. मला मात्र त्याबद्दल मनात कुठेतरी वाईट वाटायचं. आमचा माधवही तसाच. बघावं तेव्हा बाबांची टेर उडवायचा. मी म्हणायचाही त्यांना की 'जाऊ दे रे, वयस्कर माणूस आहे! त्याची अशी सारखी थट्टा बरी नव्हे.'

मी बाबांनाही म्हणायचा, "काय बाबा, सगळीजण तुमची खेचतात ते मला आवडत नाही." त्यावर बाबाच हसून म्हणायचे, "जाऊ दे रे. चलता है!"

अलिकडेच बाबा नवाथे वारले. दहावा झाला, तेरावा झाला आणि चौदाव्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास बाबा पुन्हा तसेच जिन्यात बसलेले लोकांना दिसले! बाबांचं भूत झालं. हो, बाबांचं भूत झालं!

पण बाबांच्या भुतालाही कुणी घाबरेना. बाबांच्या भुताचीही थट्टामस्करी होऊ लागली. रात्रीचे साडेदहा-अकरा वाजले की बाबांचं भूत त्या गच्चीत जायच्या जिन्यात येऊन बसायचं ते अगदी पहाटेपर्यंत. तसेच उघडेबंब, विनालंगोट चट्टेरीपट्टेरी हाफ चड्डी घातलेले बाबा नवाथे!

महिन्याभरापूर्वीची गोष्ट. मी आणि गोविंदा गच्चीत विड्या फुंकायला गेलो होतो. विड्या फुंकून झाल्या. बारा वगैरे वाजले असतील. परतीच्या जिन्यातच बाबा नवाथे बसले होते.

"चल, जरा बाबांची खेचू! तेवढाच जरा टीपी!" गोंद्या म्हणाला.

"जाऊ दे रे. उगाच त्यांची मस्करी नको. लेको, जिवंतपणी त्यांना दिलात तेवढा त्रास पुरे नाही का झाला? निदान त्यांच्या भुताला तरी आता स्वस्थ बसू दे की!" मी.

तेवढ्यात बाबांनी मांडी बदलली. विश्वरूप दर्शन झालं! गोंद्या खदाखदा हसत, टाळ्या पिटत ओरडला,

"हर हर महादेव,
लंगोटीत तीन देव!

बाबा नवाथे की जय!":)

"हम्म! जा आता घरी चुपचाप. आगीशी खेळू नकोस गोंद्या!" बाबा थोडं दटावून म्हणाले.

"अरेच्च्या, बाबा भडकले वाटतं!"

"हर हर महादेव,
लंगोटीत तीन देव!

बाबा नवाथे की जय!":)

एवढं बोलून गोंद्या फिदिफिदी हासला.

पुढच्याच क्षणी दिवे गेले. मिट्ट अंधार झाला आणि आमच्या डोळ्यासमोर खणकन काजवे चमकावे तशी खालील आकृती जिन्यात उभी राहिली!

काही सेकंदांनंतर दिवे आले. जिन्यात आता कुणीच नव्हतं. मी कसाबसा भानावर होतो. माझ्या बाजूलाच गोंद्या पडला होता. मी धावाधाव केली, डॉक्टरांना बोलावलं. गोंद्या जागीच संपला होता. कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट! डॉक्टरांनी निदान केलं!

गोंद्याची अंतयात्रा निघायला दुसर्‍या दिवशीची रात्र उजाडली. आम्ही इमारतीपासून थोडे दूर गेलावर माझी नजर सहजच वरती गच्चीकडे वळली. उघडेबंब बाबा नवाथे फिदिफिदी हासत कठड्यापाशी उभे होते!

पुढे आठच दिवसांनी माधवही वारला.

कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट. डॉक्टरांनी निदान केलं..!

कथाअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

22 Sep 2009 - 4:24 pm | विशाल कुलकर्णी

तात्यानु, तुमालाबी परा चावला काय? ;-)
चालु द्या !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सूहास's picture

22 Sep 2009 - 4:27 pm | सूहास (not verified)

सू हा स...

पर्नल नेने मराठे's picture

22 Sep 2009 - 4:27 pm | पर्नल नेने मराठे

8|
चुचु

पर्नल नेने मराठे's picture

22 Sep 2009 - 4:27 pm | पर्नल नेने मराठे

8|
चुचु

लवंगी's picture

22 Sep 2009 - 5:44 pm | लवंगी

अफलातूनच !! :SS

प्रशान्त पुरकर's picture

22 Sep 2009 - 5:55 pm | प्रशान्त पुरकर

बापरे...म्हजी मिपावर कमेन्तस पन अता साम्भालून द्याव्या लगतिल्...न जनो कोन उद्या बदला घेइन ते.....!!!!!!!!! /:)

विदेश's picture

22 Sep 2009 - 6:02 pm | विदेश

बापरे !
म्हणजे आणखी आठ दिवसानी ...?
डागदरबाबू ....! ?

संदीप चित्रे's picture

22 Sep 2009 - 6:39 pm | संदीप चित्रे

आधी वाटलं की तुझ्या व्यक्तिचित्रांपैकी एक वाचायला मिळतंय :)
छोटेखानी कथा आवडली

स्वाती२'s picture

22 Sep 2009 - 7:56 pm | स्वाती२

+१
असेच म्हणते.

बाकरवडी's picture

22 Sep 2009 - 8:35 pm | बाकरवडी

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

प्राजु's picture

22 Sep 2009 - 9:04 pm | प्राजु

कथा ठिकठाक वाटली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विंजिनेर's picture

23 Sep 2009 - 7:13 am | विंजिनेर

असेच म्हणतो...
पण नेहेमीच्या (खुमासदार) व्यक्तिचित्रांपेक्षा काही तरी वेगळे लिहिले म्हणून अभिनंदन....
पुलेशु ;)

(अगोचर) विंजिनेर

भोचक's picture

22 Sep 2009 - 9:07 pm | भोचक

तात्या, भारीच्चे कथा.

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

हा आहे आमचा स्वभाव

मदनबाण's picture

23 Sep 2009 - 9:35 am | मदनबाण

हेच म्हणतो...

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

रेवती's picture

22 Sep 2009 - 9:39 pm | रेवती

हॅलोवीन आला, एकमेका घाबरवू चला!
तुम्हीही घाबरवा आम्हाला.......त्या देवकाकांचं एक बरयं त्यांच्या आडनावातच 'देव' आहे!

रेवती

प्रमोद देव's picture

22 Sep 2009 - 11:03 pm | प्रमोद देव

मी 'देव'आडनावाचा 'माणूस' असून माझा 'राक्षस'गण आहे.

हीहाहाहाहाहाहा!

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

धनंजय's picture

22 Sep 2009 - 9:58 pm | धनंजय

वेगळेच व्यक्तिचित्र!

सहज's picture

23 Sep 2009 - 7:18 am | सहज

मिपाकर कट्ट्यावर बसले आहेत व एकएक जण भूतकथा सांगतायत.

काल परा, तात्या, प्रमोदकाका, आज कोण नंबर लावतय :-)

अवलिया's picture

23 Sep 2009 - 9:31 am | अवलिया

हा हा हा
सहजरावांनी का ही ही लिहिल तरी ती भुताटकीच असेल :)

तात्या... फार दिवसांनी लिहिलेस. बरे वाटले. !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

क्रान्ति's picture

23 Sep 2009 - 8:38 am | क्रान्ति

पण भूत! अरे देवा! पळा आता इथून! :''( @)

वेगळ्या शैलीतली भयकथा मस्त जमलीय. >:) :D

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

गणपा's picture

23 Sep 2009 - 1:07 pm | गणपा

तात्या तुम्ही सुध्धा?
भुताचा फटु क्लास.

-(भुताचा भाऊ) गण्या

शक्तिमान's picture

27 Sep 2009 - 1:33 am | शक्तिमान

तात्यांची चित्रकला एकदम फॉर्मात आहे!
भूताचे रेखाचित्र आवडले!