पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
3 Sep 2009 - 10:24 pm

पोवाडा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा - राज ठाकरेंचा

सदर पोवाडा हा चालीत म्हणण्यासाठी काही ठिकाणी काही शब्दांची द्विरुक्ती होवू शकते.
(पोवाडा वाचतांना मागे डफ वाजतो आहे अशी कल्पना करा.)

स्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा. पोवाड्यातील काही वाक्ये मनसे च्या अधिक्रुत वेबसाईटवरून घेतलेली आहेत.

पहीले वंदन धरणी मातेला sssssमातेला,
नंतर वंदून मराठी मातीला..
वंदतो शिवाजीराजांना
वंदन माझे मावळ्यांना
वंदतो संयूक्त महाराष्ट्राच्या हुताम्यांना...
वंदतो आई बापाला...
वंदतो हिंदवी सैन्याला....
वंदतो झाशीच्या राणीला
वंदून थोरामोठ्यांना...
शाहीर सचिन बोरसे करतो पोवाड्याला
जी र हा जी जी जी जी जी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापूनी sssssss
महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापूनी... स्थापूनी
केले उपकार राज ठाकरेन राज ठाकरेंनी... राज ठाकरेंनी... राज ठाकरेंनी
मरगळलेला महाराष्ट्र जावून...
घेतली उभारी मराठी मनानंss मनानं ss जीरहा जी जी जी...

{गद्य : २००० च्या दशकात अचानक जिकडेतिकडे भैया लोकांचा संचार सुरू झालेला होता...
रेल्वे तर त्यांच्या बापाचीच मालमत्ता आहे असे समजून भैये लोक वागत होते...
कारखान्यात कमी रोजंदारीवर भैया लोक भरती होत होते... अशा वेळी.....}

महाराष्ट्रावर जोरदार हल्ला झाला भैया लोकांचा
अन कारखान्यात बट्याबोळ झाला आपल्या रोजीचा
रेल्वे भरतीत केला चालूपणा लालूने
साथ दिली त्याला तिकडे मुलायमसिंगने
अमरसिंग आहे तो तर त्याच जातीचा
मनातले त्यांच्या हाणून पाडायचा बेत राज ठाकरेंचा

{गद्य : अशा वेळी लालू, मुलायम, अमरसिंग व ईतर उत्तर भारतीय एकत्र आले...
मुंबईत छट पुजा करायची.... उत्तर भारतीय दिवस साजरे करायचे.... असले कार्यक्रम त्यांनी राबवायला सुरूवात केली....}

मुंबई तो हमारीच माई, बोलले युपीचे भाई
काम हम यहीच करेंगे, पैसा सब गाव ले जायेंगे (अहा)
राम आयेगा यहा... तो लछमन को भी यहा लायेंगे

{गद्य : असल्या वल्गना हे भैया लोक करत असत...
येथे राहून, येथे काम करून सगळा पैसा ते युपी बिहारात नेत असत....
ते येथे एकटे येत असल्यामुळे येथील पोरीबाळींवर आयाबहीणींवर त्यांची वाईट नजर असे...
अशा ह्या महाराष्ट्रावर आलेल्या वाईट वेळी महाराष्ट्राकडे लक्ष देणारे होतेच कोण?}

महाराष्ट्राचे पुढारी फाडारी
बसले होते दिल्ली दरबारी... दिल्ली दरबारी
हाजी हाजी करू चालू होती सोनीयाची चाकरी...चाकरी (अहा..)
बसले होते मुग गिळुन... बोलत होते आवो आवो महाराष्ट्र
संयूक्त महाराष्ट्रासाठीचे विसरले घेतलेले कष्ट...
असले आपले भ्रष्ट नेते नतद्रष्ट अन भैये झालेत पुष्ट...

{गद्य : आपणच लोकसभा, विधानसभेसाठी निवडुन दिलेले नेते दिल्ली, मुंबईत नुसते तोंड बंद करून बसले होते....
पवार, पाटिल, देशमूख असली सरदारे दिल्ली दरबारात मुजरे करत होते...
मराठी जनतेची चाकरी करायची सोडून ईतर संघटना, पक्ष हेही भैया लोकांची चाकरी करीत होते....
भैया लोकांनी पुरवीलेल्या पैशावर मस्ती चालत होती...
ईकडे भैयांचा लोंढा महाराष्ट्रात येतच होता.... अत्याचार वाढतच होता...}

स्थिती ओळखली राज ठाकरेंनी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापियली
एकत्र जनता मराठी आली
युपी बिहारची जनता हादरली....

{गद्य : महाराष्ट्रावर पडलेल्या संकटकाळी राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली.
ज्या ठिकाणी आपले पोट भरते त्या महाराष्ट्राला आपले मानणारे जर युपी बिहारातले असतील तर तेही मराठी बांधव आहेत असे उदात्त विचार मांडणार्‍या या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेत्रूत्व मराठी मनाचे पुरस्कर्ते राज ठाकरेंनी करावे हे महाराष्ट्राचे भाग्यच.}

महाराष्ट्रात राहणारा, राहणारा
महाराष्ट्रात जन्मणारा, जन्मणारा
मराठी बोलणारा, बोलणारा
मराठी मातीला आपलं मानणारा, मानणारा
तोच मराठी माणुस अभिप्रेत राजेंना...राजेंना

{गद्य : जे मूल मराठी आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले आहे ते तर मराठीच! पण त्याचबरोबर इतर भाषिकांमध्येही जो महाराष्ट्रात जन्माला आलेला आहे, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो आणि मराठी भाषा उत्तम बोलतो, आणि महाराष्ट्रात राहतो त्या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच मानते. त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र नवनिर्माण सेना महत्त्वाचा मानते.
अशा या विचारांत काय वाईट आहे हो? जे जे युपी बिहारातल्या बांधव येथे राहून जर ते मराठी मनाचा, मराठी जनांचा, मराठी अस्मितेचा सन्मान करतात त्यांना दुखवायचे काय कारण?
आम्हालाही प्रगती करायचीय, स्वातंत्रानंतरही आपण फक्त चांगले रस्ते, पाणी ईत्यादी गोष्टींसाठीच आग्रह करत होतो.... आता ती वेळच येणार नाही... कारण....}

भौतिक, सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राचे
कर्तव्य आहे आपले प्राप्त करण्याचे...
समस्यांची सोडवणूक करणे,
सर्व जाती, धर्म, पंथ, वर्गांचे...
एकत्र येवूण विकास करण्याचे....
उद्देश असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

{गद्य : विकासाआड येणारे सत्तागटांशी सर्व पातळींवर संघर्ष करणे,विकास करण्यासाठी रचनात्मक व संघर्षात्मक कामे करणे, सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा, मराठी पाट्यांचा आग्रह धरणे,महाराष्ट्रातील रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, क्रीडा, उद्योग, वित्त, गृहखाते, सहकार, रेल्वे, केंद्र-राज्य संबंध या क्षेत्रांतील सर्व प्रश्नांची तड लावणे आणि त्यात मराठी माणसाचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे, ही पक्षाच्या कार्याची मुख्य दिशा आहे.}

{गद्य : भौतिक व सांस्कृतिक समृद्धीचे शिखर गाठलेला, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र व मराठी माणूस बनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीच ह्या पक्षाचा जन्म झाला आहे. }

मराठी माती अन मराठी विचार....
बाळासाहेबांसारखे रक्तात मुरले माझ्या छान.... (अहा)

महाराष्ट्राचा विकास हेच ध्येय्य आयुष्याचे
त्यासाठीच जन्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

असे हे विकासाचे राज ठाकरी विचार...
शाहीर सचिन बोरसे मुजरा करी त्रिवार.... जी र हा जी जी जी जी जी

- शाहीर सचिन बोरसे
०३/०९/२००९
स्टाँग डिस्क्लेमर: माननिय बाळासाहेबांचा व राज ठाकरेंचा मी आदर करतो व यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. तत्राप कोणाला कोणतेही आक्षेप असतील तर हा पोवाडा माझा वैयक्तिक समजावा. पोवाड्यातील काही वाक्ये मनसे च्या अधिक्रुत वेबसाईटवरून घेतलेली आहेत.

वीररसकवितासमाजजीवनमान

प्रतिक्रिया

टारझन's picture

3 Sep 2009 - 10:34 pm | टारझन

मस्त रे !!! झकास !!

sujay's picture

3 Sep 2009 - 10:57 pm | sujay

खणखणीत पोवाडा !!!

(म.न.से प्रेमि) सुजय

प्रभो's picture

3 Sep 2009 - 11:20 pm | प्रभो

असेच म्हणतो

टुकुल's picture

4 Sep 2009 - 1:25 am | टुकुल

एकदम झणझणीत, रापचीक ...

--टुकुल

दशानन's picture

4 Sep 2009 - 8:47 am | दशानन

लै भारी....

देवअजोबा.... तुमच्या चाल अस्त्राचा वापर तेथे होऊ शकतो का :?

प्रमोद देव's picture

4 Sep 2009 - 8:53 am | प्रमोद देव

देवअजोबा...
अरे वा बढती वाटतं? ;)

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

विशाल कुलकर्णी's picture

4 Sep 2009 - 12:16 pm | विशाल कुलकर्णी

मस्त रे भाऊ ! खणखणीत पोवाडा १
फक्त आता राजजी आणि म.न.से. सगळ्या अपेक्षांना पुरी उतरली म्हणजे झाले. :-)

(एक मनसैनिक)
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

गणपा's picture

4 Sep 2009 - 1:46 am | गणपा

पोवाडा आवडला.

आशिष सुर्वे's picture

4 Sep 2009 - 9:21 am | आशिष सुर्वे

'अस्सल मराठमोळा' पोवाडा आहे बर्र का!
माझी खाजगी दाद दिलीच पाहिजे इथे..

@

^
^
^
^
वा!!

(ही माझी 'फेटा' उडवून दाद देण्याची पध्दत आहे)
-
कोकणी फणस

दिपक's picture

4 Sep 2009 - 9:39 am | दिपक

जी र हा जी जी जी जी जी !! एकदम चाबुक !! :)

अमोल केळकर's picture

4 Sep 2009 - 11:05 am | अमोल केळकर

मस्त पोवाडा

-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

ऋषिकेश's picture

4 Sep 2009 - 1:28 pm | ऋषिकेश

पोवाडा आवडला

मात्र चालीत म्हणता आला नाहि.. कोणीतरी रेकॉर्ड करून इथे चढवा प्लीज

ऋषिकेश
------------------
दूपारचे १ वाजून २७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "जय जय महाराष्ट्र माझाऽऽ...."

अनिल हटेला's picture

4 Sep 2009 - 3:21 pm | अनिल हटेला

एकदम चाबूक ...............:-)

(मनसे राजसमर्थक)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

धमाल मुलगा's picture

4 Sep 2009 - 3:38 pm | धमाल मुलगा

शाहीर.....काय पवाडा लिवलाय...व्वा!!
आरं कोनतरी ह्यो पवाडा चालीत बांदा रं... कोन है रं तिकडं...
शाहीरांचा सत्कार करा!

घ्या शाहीर! आसं फुडं या!

निखिल देशपांडे's picture

4 Sep 2009 - 4:01 pm | निखिल देशपांडे

पोवाडा आवडला हो...
आरं कोनतरी ह्यो पवाडा चालीत बांदा रं...

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

सूहास's picture

4 Sep 2009 - 4:44 pm | सूहास (not verified)

वाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवावाहवा वाहवा वाहवा

सू हा स...

लसणाच्या चटणी अन भरल्या वांग्यासारखा झालाय पोवाडा... धमुरावांनी तोडा दिला..आमच्या कडुन घोडा शा।हीरांना...
कबुल करा शा।हीर

पाषाणभेद's picture

4 Sep 2009 - 10:19 pm | पाषाणभेद

लई लई आभार सगळ्यांचे.

खर म्हणजे परवा संध्याकाळी डोक्यात काहीतरी या संदर्भात काहीतरी येत होते पण शब्दबद्ध होत नव्हते. नंतर पहाटे शब्द सुचत गेले. असो.

काही लोक वाचून म्हणतील की ईलेक्शन चा टायमाला असले काहीतरी येणार वैगेरे. पण नाही, मला ईलेक्शन फिलेक्शन शी घेणे नाही. आपल्याला विचार आवडले तेवडेच बास.

मर्राठमोळ्या मर्दाच्या पवाड्याला मर्राठमोळं मर्दाची बक्षीशी आपण समद्यांनी द्येली त्याबद्दल म्या कोना एकाच नाव घ्येवून आभार मानुनशान मी नतद्रष्टपना करू नाय शकत हो.
म्हुन म्या समद्यांचे आभार मानतो. हे आभार म्हंजे निरोपाच भाषाण समजू नका. आजुन लय येळा आभार मानयची येळ येवू द्या हितं बरकां.

आन डोक्यात असलेच भडक ईचार ठ्येवा, नायतर आपली म्होरली पिढी कदाचीत उत्तर प्रदेशी आडनाव लावल. आपल्याला एखांद्या भैट्याच्या घरात भाड्यान राहाव लागल.

एकडाव परत आता बदलल्येली सामाजीक परिस्थिती पाहूनशान आपन समजून उमजून वागाल हिच आपेक्शा बाळगून हाय. जात, पात, पंथ, धर्म काही पाहू नका मराठीसाठी आन महाराष्ट्रासाठी.

जय हिंद - जय महाराष्ट्र!
-----------------------------------
"मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे."

"ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा."

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

शैलेन्द्र's picture

4 Sep 2009 - 11:04 pm | शैलेन्द्र

एकदम जोरदार...

Think twice before you speak, and then you may be able to say something more insulting than if you spoke right out at once.

अवलिया's picture

5 Sep 2009 - 7:13 am | अवलिया

झक्कास !!!!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

पारंबीचा भापू's picture

5 Sep 2009 - 8:11 am | पारंबीचा भापू

लई लई लई लई लई लई लई लई लई लई लई लई लई भारी! "बहुत खूब" आहे पोवाडा तुमचा. आता तो पाठवा राजसाहेबांना आणि चाल लावून निवडणुकीच्या रणधुमाळीत शस्त्रासारखा सोडा भैय्या समुदायावर.
भापू

सुधीर काळे's picture

5 Sep 2009 - 8:50 am | सुधीर काळे

पाषाणभेदसाहेब,
"दगडफोडी" सोडून आता "शब्दजोडी"ला लागा! किती सुरेख पोवाडा लिहिलात!
माझा शिवसेनेवरचा लेख वाचलात का? त्याला जे प्रतिसाद आले त्यात जवान मराठी तरुण राजसाहेबांना "नवे आगमन"च समजतात असे दिसत होते. तुमच्या पोवाड्यावरून तुम्हीही तरुण वर्गात मोडत असणार असे वाटते.
अशा पोवाड्यांना "ठाकरे-द्वयां"कडे पोचवायचे कसे व काका-पुतण्यांना एकत्र आणायचे कसे हाच गहन प्रश्न आहे. सगळ्यांना हे कदाचित पटणार नाही, पण जो माणूस त्यांच्यातली दुही संपवून त्यांना परत एकत्र आणेल तो महराष्ट्रावर व मराठी लोकांवर अनंत उपकार करेल.
तुमच्या हातून हे सत्कार्य होवो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना.
माझा मूळ लेख वाचला नसल्यास ई-मेल पत्ता कळवा, पाठवून देईन.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

तेन्नालीराम's picture

5 Sep 2009 - 3:49 pm | तेन्नालीराम

पाषाणभाऊ,
काय एक नंबरी पोवाडा आहे! वा, वा!
दु:ख एकाच गोष्टीचे वाटते की इतका चांगला नंबरी पोवाडा असूनसुद्धा त्यामानाने प्रतिसाद फारच कमी आहेत! मार्केटिंगला कमी पडलो काय आपण? (मराठी लोकांचा एक वीकनेस!)
अजून लिहा असेच पोवाडे व टाका इथे. वाचायला आवडेल.
सुधीरभाऊंनी सांगितल्याप्रमाणे राजसाहेबांना पाठवलात तर चीज होईल बघा या पोवाड्याचे. नाही तर पत्ता द्या मला. मी व्यवस्था करतो पाठवायची!! अगदी कुरियरने!!
ते. रा.

तेन्नालीराम's picture

5 Sep 2009 - 3:49 pm | तेन्नालीराम

पाषाणभाऊ,
काय एक नंबरी पोवाडा आहे! वा, वा!
दु:ख एकाच गोष्टीचे वाटते की इतका चांगला नंबरी पोवाडा असूनसुद्धा त्यामानाने प्रतिसाद फारच कमी आहेत! मार्केटिंगला कमी पडलो काय आपण? (मराठी लोकांचा एक वीकनेस!)
अजून लिहा असेच पोवाडे व टाका इथे. वाचायला आवडेल.
सुधीरभाऊंनी सांगितल्याप्रमाणे राजसाहेबांना पाठवलात तर चीज होईल बघा या पोवाड्याचे. नाही तर पत्ता द्या मला. मी व्यवस्था करतो पाठवायची!! अगदी कुरियरने!!
ते. रा.

तेन्नालीराम's picture

5 Sep 2009 - 3:49 pm | तेन्नालीराम

पाषाणभाऊ,
काय एक नंबरी पोवाडा आहे! वा, वा!
दु:ख एकाच गोष्टीचे वाटते की इतका चांगला नंबरी पोवाडा असूनसुद्धा त्यामानाने प्रतिसाद फारच कमी आहेत! मार्केटिंगला कमी पडलो काय आपण? (मराठी लोकांचा एक वीकनेस!)
अजून लिहा असेच पोवाडे व टाका इथे. वाचायला आवडेल.
सुधीरभाऊंनी सांगितल्याप्रमाणे राजसाहेबांना पाठवलात तर चीज होईल बघा या पोवाड्याचे. नाही तर पत्ता द्या मला. मी व्यवस्था करतो पाठवायची!! अगदी कुरियरने!!
ते. रा.

पाषाणभेद's picture

5 Sep 2009 - 5:57 pm | पाषाणभेद

आपली जीवतोडून लिहीलेली प्रतिक्रिया हृदयापाशी पोहचली. काही जणांना पोवाडा आवडला असेल, ते मनात खवळलेही असतील. असते काही जणांना मनातल्या मनात बोलण्याची सवय किंवा प्रतिक्रिया द्देवून ते राज ठाकरेंच्या बाजूचे आहे असे त्यांना दाखवून द्यायचे नसेल किंवा हा लिखाणप्रकार (म्हणजे कोणाचाही पोवाडा) त्यांना आवडत नसेल किंवा ......... अजून जास्त लिहीलेले आहे. व्य. नी. बघा.

असो. लोकांनी कमीतकमी वाचले व त्यांच्या मनाला पटले तरी मला माझ्या पोवाड्याचा उद्देश साध्य झाला असे वाटेल. अहो भाऊ, प्रत्येक चांगल्या चित्रपटाला ऑस्कर मिळतेच का? किंवा ऑस्कर म्हणजेच चांगला चित्रपट का? किंवा...... अजून जास्त लिहीलेले आहे. व्य. नी. बघा. ? असे असते तर....अजून जास्त लिहीलेले आहे. व्य. नी. बघा.

पोवाड्यातून जर माझे, मनसेचे व राज ठाकरेंचे नाव काढून टाकले व हा पोवाडा वाचला तर त्यांना मराठीची (मराठी लोकांची) सत्य परिस्थीती समजली असेल.

हे लोक मनातून मराठी पणाला मानतात व प्रतिक्रीया नाही तर मत देतात, कारण मत दिल्याचे कोणाला समजत नाही.

असो.

बाकी काही असो, पोवाडा वाचकांनो, वर दिलेल्या एका प्रतिक्रीयेत जे लिहीले आहे तेच खाली लिहीतो :

काही लोक वाचून म्हणतील की ईलेक्शन चा टायमाला असले काहीतरी येणार वैगेरे. पण नाही, मला ईलेक्शन फिलेक्शन शी घेणे नाही. आपल्याला विचार आवडले तेवडेच बास.

मर्राठमोळ्या मर्दाच्या पवाड्याला मर्राठमोळं मर्दाची बक्षीशी आपण समद्यांनी द्येली त्याबद्दल म्या कोना एकाच नाव घ्येवून आभार मानुनशान मी नतद्रष्टपना करू नाय शकत हो.
म्हुन म्या समद्यांचे आभार मानतो. हे आभार म्हंजे निरोपाच भाषाण समजू नका. आजुन लय येळा आभार मानयची येळ येवू द्या हितं बरकां.

आन डोक्यात असलेच भडक ईचार ठ्येवा, नायतर आपली म्होरली पिढी कदाचीत उत्तर प्रदेशी आडनाव लावल. आपल्याला एखांद्या भैट्याच्या घरात भाड्यान राहाव लागल.

एकडाव परत आता बदलल्येली सामाजीक परिस्थिती पाहूनशान आपन समजून उमजून वागाल हिच आपेक्शा बाळगून हाय. जात, पात, पंथ, धर्म काही पाहू नका मराठीसाठी आन महाराष्ट्रासाठी.

जय हिंद - जय महाराष्ट्र!

-----------------------------------
"मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे."

"ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा."

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या