नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती - तमिल जाणकार मिळत नाही हो

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
3 Sep 2009 - 1:21 am

प्रिय वाचक,
अंनिसवाले पळपुटे आहेत असे आपणास वाटत असेल तर आपण वर्तमानपत्रातून वाचा फोडा. एक सल्ला.
अहो, मी कशाला वर्तमानपत्रांकडे धाव घेऊ, जे लाखो रुपयांचे वर्तमानपत्रातून जाहीर आव्हान देतात त्यांची कशी केविलवाणी अवस्था होते ते आपण नुसते एक पत्रातून वाचलेत. अदितीबाईंना तर हे लिखाण अत्यंत जहरी वाटले.
अंनिसवाले याहीपेक्षा अत्यंत हीन शब्दात नाडीग्रंथांवर व अनुषंगाने माझ्यावर व अन्य नाडी ग्रंथप्रेमींवर टीका टिप्पणी करतात. याची अदितींना कल्पना नाही. त्यांची एकएक पत्रे व लेख आपण वाचावेत.
आपण माझ्या चिकाटीचे कौतुक केलेत, ठीक आहे. मात्र नाडी ग्रंथकर्त्या महर्षींची असीम कृपा असल्याने मला त्या लोकांच्या विकृत विचारांवर भाष्य करायला संकोच वा दडपण येत नाही. असे मी मानतो. एरव्ही माझ्या सारख्या शिपाईगड्याला या फंदात पडायचे कारण काय?
कारण अंनिस वा तत्सम विचारकांचा निर्णायक पराभव महर्षींच्या या ग्रंथांतून झालेला आहे. मी त्याला निमित्तमात्र आहे. आता आपणांस तो हळू हळू कळतोय म्हणून असे अवस्थ वाटते इतकेच.
मला सांगा की आपणही, म्हणजे प्रत्यक्ष विजुभाऊच नव्हे याचे वाचन करणाऱ्या सर्वच लोकांना उद्देशून मी म्हणतोय, नाडी ग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला का नाकारता आहात?
एकांनी उदाहरण दिले आहे की गॅलिलीओने त्याने बनवलेल्या दुर्बिणीतून पहायला, त्यावेळच्या तथाकथित धार्मिक नेत्यांना आग्रह केला गेला होता. त्यांनी अनुभव घ्यायला दिलेला नकार नंतर प्रतिगामीपणाचे लक्षण मानते गेले. आता नेमके या उलटे घडते आहे. नाडीग्रंथप्रेमीजन, जे या नाडीभविष्यावर विश्वास ठेवतात (मी फक्त नाडी ग्रंथांबद्दल बोलतोय सरसकट फलज्योतिषाबद्दल मला सांगायचे नाही) त्यांना पुरोगामी विचारधारेचे लोक प्रतिगामी मानतात. असे “प्रतिगामी” असा शिक्का बसलेले लोक “पुरोगामी म्हणून गौरवल्या गेलेत्या व्यक्तींना” आवर्जून भेटून सांगताहेत, “आपण याचा अनुभव घ्या व आम्हा सामान्यांना न उलगडले गेलेले कोडे सोडवायच्यासाठी मार्गदर्शन करा”. अशा वेळी त्यांनी नाडीग्रंथांच्याकडे कुत्सितपणे दुर्ल्क्षून तोंड वळवणे म्हणजे पुर्वीच्या धार्मिक नेत्यांनी केलेली चूकच ते परत उगाळत नाहीत काय? याच लोकांचा अन्य केसेसमधे अनुभव, पुन्हा अनुभव असा वारंवारितेचा नियम म्हणून अनुभवावर जोर असतो. मात्र नाडी ग्रंथाचा वारंवार अनुभव घेण्याची वेळ आली की त्यांचे पाय जड होतात. ‘काही गोष्टी फक्त तर्काने वा शाब्दिक वादाने सुटू शकत नाही. त्याला अनुभवाचे पाठबळ लागते’. असे आम्ही म्हणतोय तर ते आम्ही अनुभव घेणार नाही व घ्यायची गरजही नाही असे समर्थन करत हटून बसले आहेत. वर आम्हालाच हट्टी हा खिताब ते देतात.
प्रत्येकाला माझ्यासारखेच अनुभव यावेत असे मी कधीच म्हणणार नाही. मला हे मान्य आहे की काहींना जास्त प्रभावी तर काहींना अत्यंत सामान्य अनुभव मिळतील. ते तसे का मिळतात याचा ही विचार करावा लागेल.
नाडीग्रंथांच्या ताडपट्टीत व्यक्तीची नावे व अन्य माहिती जरी कोरून येत नसेल तरीही ती येते असे मी म्हणत असेन तर ते जितके खोटे असेल तितकेच नाडीताडपट्टीत ती माहिती येत असूनही ती ताडपट्टीत लिहिलेली नाही किंवा नसतेच असे मी म्हटले तर ते खोटे असेल. अशा परिस्थितीत मला जे सत्य आहे त्याबाजूने उभे राहायला लागणार. नाही तर मी माझ्या अनुभवाशीच प्रतारणा केल्यासारखे होईल. मात्र ती प्रतारणा मी कुठल्याही वैचारिक बांधिलकीशी केलेली नसल्याने खऱ्या अर्थाने मी पुरोगामी ठरतो. भले याठिकाणी लोक मला काही का समजेनात.
अंनिसवाल्यांचे सोडा. ते काही नाही करत तर नाही. कोणाच्या उगाच मागेलागून काही उपयोग नाही. पण आपण म्हणजे आपणांसारख्या सर्व मिपावरील व अन्य जागृत विज्ञानवादी पुरोगामी विचारवंतांना, विरोधकांना नाडी ग्रंथ प्रेमी अशी विनंती करताहेत की आपले भविष्य कथन म्हणून नको तर एका सुहृदाने एक पत्र आपणाला लिहिले आहे. ते वाचा. आग्रह नाही विनंती. पहा तर मग का घडते ते..
आता तर आपल्या सभासद परिवारातील एक मराठीभाषी सभासद नाडीपट्टीतील कूट तमिल वाचनासाठी प्रयत्नशील आहे. त्याने नाडी ग्रंथांचा अनुभव घेतला आहे असे त्याने आपणहून अन्य ठिकाणी नमूद केले आहे. त्यामुळे भाषेचा वा लिपीच्या अडथळ्याचा प्रश्न फार गहन राहिलेला नाही. त्यामुळे अंनिसवाले पुढे करतात ती नेहमीची लंगडी सबब की ‘तमिल जाणकार मिळत नाही हो नाही तर नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती’ आता पुढे करता येणार नाही.
जेंव्हा आपण आपली व संबंधिताची नावे व अन्य माहिती नाडी पट्टीतून आलेली वाचाल तेंव्हा कार्यकारणभावाला, इच्छा स्वातंत्र्याला मानवी जीवनात काही स्थान आहे का नाही, कर्मविपाक व पुनर्जन्मसिंद्धातावर विचार करायला नाडी महर्षी लावतील तेंव्हा मात्र पुर्वविचारधारांमुळे बेचैन व्हायला होईल...

ज्योतिषप्रकटनसद्भावनाअनुभव

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

3 Sep 2009 - 3:22 am | मिसळभोक्ता

याचे वाचन करणाऱ्या सर्वच लोकांना उद्देशून मी म्हणतोय, नाडी ग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला का नाकारता आहात?

मला नाडीग्रंथाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला आवडेल. परदेशातील लोकांच्या नाड्या कुठेशी असतात ?

-- मिसळभोक्ता

सुनील's picture

3 Sep 2009 - 6:30 am | सुनील

परदेशातील लोकांच्या नाड्या कुठेशी असतात ?
परदेशातील लोक आपल्या लेंग्यांना नाड्यांऐवजी बटणे-झिप लावून घेतात, सबब त्यांच्या नाड्या उपलब्ध नाहीत. ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

sujay's picture

3 Sep 2009 - 7:44 am | sujay

नऊवारी कींवा धोतर नेसणारयांची नाडी कशी बघतात?

पण ते एक स्पेश्शल टेक्नीक आहे. अधिक माहितीसाठी व्यनि करा! ;)

(सोटा)चतुरंग

अवलिया's picture

3 Sep 2009 - 10:57 am | अवलिया

फोटो चिकटवा

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

3 Sep 2009 - 8:29 am | दशानन

मात्र नाडी ग्रंथकर्त्या महर्षींची असीम कृपा असल्याने मला त्या लोकांच्या विकृत विचारांवर भाष्य करायला संकोच वा दडपण येत नाही

:|

बरं बरं !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Sep 2009 - 9:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे वा, मी फारच फेमस झालेली दिसत आहे. माझी 'येन-केन प्रकारेण' युक्ती सफल संपूर्ण झाली तर ...

चतुरंगस्टाईल खुद के साथ बाता: ओकसाहेब आता मला पत्र लिहीणार का काय? :?

अदिती

अजुन कच्चाच आहे's picture

3 Sep 2009 - 10:50 am | अजुन कच्चाच आहे

मी स्वतः या नाडीपट्टीच्या प्रयोगासाठी गिनीपीग व्हायला तयार आहे.

ओकसाहेब,
मला पुण्यात येणे शक्य आहे. अगोदर वेळ ठरवून यासाठी मी कितीही वेळा पुण्यात येईन.
येणारे सर्व अनुभव मिपावर टाकूयात.
यासाठी तुम्हा-आम्हावर काही अटी असाव्यात त्या मिपाकरांनी ठरवाव्या.
उदा.
१. प्रश्नोत्तराचे रेकॉर्डींग.
२. कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षीत आहेत?
३. साक्षीदार असावेत का ? कोण असावेत ?
वगैरे वगैरे

त्यासाठी गरज लागल्यास वेगळा धागा काढावा.

काय म्हणता मग ?
.................
अजून कच्चाच आहे.
(असे होईल का ते कळायला पण नाडीपट्टी पहावी लागेल काय?)

रामपुरी's picture

4 Sep 2009 - 2:46 am | रामपुरी

एवढ्या कोट्यावधी नाड्या ठेवल्या कुठं आहेत? या एका साध्या प्रश्नाचे उत्तर द्या. जमत नसेल तर "हे खोटे आहे" हे कबूल करा आणि घरला पळा. बाकी महर्षी, नाडीकेंद्र वगैरे गेले तिकडं... (कुठं कळलं ना?)

शब्देय's picture

4 Sep 2009 - 3:05 am | शब्देय

ओकसाहेब बास करा की आता. असे शिकले सवरलेले ( तुम्ही आणि तिकडे ते उपाध्येसाहेब ) लोक जेव्हा या अशा वायफळ प्रकाराचा पुरस्कार करतात आणि लोकांच्या गळी त्यांना उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात तेव्हा आधी हसू येते, मग जरा राग येतो , आणि शेवटी अशा विचारांची कीव येते.

(अ-नाडी) शब्देय

प्रमोद देव's picture

4 Sep 2009 - 8:19 am | प्रमोद देव

ओकसाहेब,ज्यांना तसा अनुभव घ्यावासा वाटत असेल ते घेतील, ज्यांना घ्यावासा वाटत नाही ते नाही घेणार...तुम्ही का उगाच लोकांच्या मागे लागताय?
ज्याच्या त्याच्या आयुष्यात जे काही घडायचे असेल(विधिलिखित म्हणा) ते घडणारच आहे...मग ते तुम्हाला माहित असो अथवा नसो.
तुमच्या नाडीत लिहिलेले तुम्हाला माहीत झाले म्हणून अभद्र असे काही टाळता येऊ शकेल काय? आणि नाडीवाचन केल्यामुळे झालाच तर त्या नाडीकेंद्रवाल्यांचा उदरनिर्वाह चालेल..बाकी जातकाला काय फायदा?
आणि एखाद्या नाडीपट्टीवर समजा एखाद्या जातकाचे नाव दिसले(किंवा दाखवले) म्हणून असा काय मोठा चमत्कार होणार आहे?

अवांतर: माझ्या इमारतीत राहणार्‍या एका इसमाने मला सांगितले की त्याच्या घरात तो वर्षभर एका तांब्यात पाणी घालून त्या तांब्यावर एक श्रीफल ठेवत असतो. सतत गेली तीन वर्ष त्या त्या श्रीफलांवर गणपती साकारलाय. त्याचा पुरावा म्हणून त्याने मला एक छायाचित्रही दाखवले...पूजेत ठेवलेले.
खरं सांगायचं तर मला तसे काहीही दिसले नाही...पण त्याची श्रद्धा/अंधश्रद्धा आहे..असू द्या. मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही....मात्र मला जे पटत नाही ते मी पटवून घ्यावे असे जर तो म्हणाला तर ते मला आवडणार नाही.
तुम्हीही इथे असेच करत आहात.....जे तुम्हाला पटले ते माना....कुणाला त्याच्याशी काही देणेघेणे नाही...पण उगाच दुसर्‍यांना पीडू नका...इतकेच सांगतो.
तुम्ही सुखात राहा आणि इतरांनाही राहू द्या.

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

अहो ओकसाहेब काय लावलय हे?
ठीक आहे. मी पुण्यातच आहे सध्या. तुम्हाला नाडीपरिक्षेसाठी exactly काय माहिती लागते ते सांगा. मी देईन.
पण सर्व प्रश्नोत्तरे मिसळपाव वर जाहीरपणे व्हायला हवीत. कुठलेही personal calls नकोत.

सध्या जे पुण्यात असतील त्यांन विनंती. तुम्ही पण चला. एकदाचा सोक्षमोक्ष लावूया. निदान या लेखांपासून तरी सुटका मिळेल.

अरे हाय काय न नाय काय

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

अजुन कच्चाच आहे's picture

4 Sep 2009 - 10:47 am | अजुन कच्चाच आहे

खडूसजी,
माझी खव चालू झालेली नाहीय.
त्यामुळे मी तुम्हाला इथेच विनंती करतो की तुम्ही सिनीयर आहात तेंव्हा या प्रयोगासाठी काही नियम ठरवून घेवूयात तेही जाहीर पणे मिपावरच.
सर्व मिपाकरांच्या सम्मती साठी वेगळा धागा काढा की.
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)

अजुन कच्चाच आहे's picture

4 Sep 2009 - 10:38 am | अजुन कच्चाच आहे

एक कच्चा आणि एक खडूस दोघे तयार आहेत ओकसाहेब.

नियम ठरवा, वेळ ठरवा........ होउन जाऊदेत.

कळेल तरी कौन कितने पानीमे
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)