क क क क कमीने

अनामिक's picture
अनामिक in जनातलं, मनातलं
16 Aug 2009 - 11:19 am

फ्पॉयलर अलर्टः या परिक्फणात(?) कथा न फांगण्याचा खूप प्रयत्न केलाय. तरी वाचकांनी आपापल्या जबाबदारीवर वाचावे.

आताच 'कमीने' बघून आलो. आता मी हा चित्रपट का पाहिला अफे विचारणार अफाल तर उत्तर आहे केवळ करमणूकीकरता आणि फनीवारचा वेळ चांगला जावा म्हणून. कालपरवाच्या पेपरात ह्या चित्रपटाला चार चांदण्या (कोण तात्यांच नाव घेतंय रे?) मिळालेल्या पाहिल्या आणि जायचं पक्कं केलं. तफा फमिक्फकांनी दिलेल्या चांदण्यांचा आजकाल माझ्यावर काही परिणाम होत नाही. केवळ एक चांदणी मिळालेला 'कंबख्त इफ्क' आणि तीन का चार चांदण्या मिळालेला 'लव्ह आज कल' हे दोन्ही चित्रपट भंगार (पहिला अतिफय आणि दुसरा जरा कमी) कॅटेगरीमधेच मोडतात... त्यामुळे कमीनेपासून 'करमनूक व्हावी' एवढीच माफक अपेक्फा होती. तफेच विफाल भारद्वाजचा चित्रपट (नाही, माझा मित्र नाहीये तो) अफल्याने चांगला अफणार अफेही वाटले होते. चित्रपट पाहण्याचं अजून एक कारण म्हणजे प्रियांका चोप्रा... तात्यांच्या भाफेत फांगायचं म्हणजे "ह्या पोरीवर आमचा फार जीव!", तिच्या चेहर्‍यावरचं एक हफू आणि तिने केलेला ओठांचा चंबू आम्हाला कुठं कुठं जाऊन भिडतो आणि मग अमंळ गुदगुल्या होतात. अफो, चित्रपट फंपल्यावर मात्र त्यावर खर्च झालेले पैफे वफूल झाल्याच फमाधान मी धरून बर्‍याच जणांच्या चेहर्‍यावर दिफलं.

चित्रपट चांगला आहे यात वादच नाही. चित्रपटाची कथा फांगत बफत नाही... थोडीफार कल्पना मात्र जरूर देतो. कथा एकमेकांपाफून दुर राहणार्‍या आणि पुर्वायुफ्यात झालेल्या एका प्रफंगावरून आपफात वितुफ्ट आलेल्या दोन जुळ्या भावांची आहे. गुड्डू आणि चार्ली (दोघेही फाहीद कपूर). त्यातला गुड्डू फरळमार्गी, कॉलेजात फिकणारा आणि फ्वीटीच्या (म्हणजे प्रियांका चोप्राच्या) प्रेमात पडून बराच पुढे गेलेला. तर चार्ली जरा गुंड प्रवृत्तीचा, घोड्यांच्या रेफचा बुकी व्हायचं फ्वप्न बघणारा, आणि फॉर्टकट वापरून पैफे कमवण्याचा मागे अफलेला. चित्रपटातील हे मुख्य दोन ओळखीचे चेहरे फोडले तर बाकी फगळे नवीन चेहरे आहेत. त्यातल्या त्यात अमोल गुप्ते, ज्यानी फ्वीटीच्या महाराफ्ट्राभिमानी गुंड भावाची ज्याला नेता व्हायचंय अफी भूमीका फाकारली आहे, हे नाव ऐकून होतो. अमोल गुप्ते हा एकच गुंड या चित्रपटात नाहीये. अजून दोघे भ्रफ्ट पोलीफ, आणि ड्रग्फ फ्मगल करणारी एक गँगही या चित्रपटात आहे. चार्लीला अचानक मिळालेल्या एका फॉर्टकट्मुळे आणि गुड्डूच्या नाईलाजाने एकमेकांपाफून दुर राहणारे दोघे भाऊ फंकटात फापडतात. त्यात जुळे अफल्याने वेगवेगळ्या गुंडाच्या ताब्यात (म्हणजे जो ज्या गुंडाच्या ताब्यात हवा नेमके त्याऊलट) येतात... पुढेही बरेच काही घडते ते चित्रपटातच पहा. फुरवातीला अगदी थोडावेळ फंथगती अफलेला हा चित्रपट पुढे खूप वेग घेतो तो फंपेपर्यंत थांबतच नाही. प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात चित्रपट यफस्वी होतो.

चित्रपटातल्या फगळ्याच कलाकारांच काम छान झालं आहे. फाहीद कपूरने दोन जुळे भाऊ किंबहुना दोन भिन्न व्यक्ती उत्तमरित्या फाकारल्या आहेत. प्रियांका चोप्राने मराठी मुलीची डिग्लॅमरफ भुमीका फाकरली आहे जी तिच्या पुर्वीच्या चित्रपटांपे़क्फा बरीच वेगळी आहे. तिच्या तोंडी अफलेले मराठी फंवाद ऐकायला चांगले वाटतात. अमोल गुप्तेनेही त्याच्या भुमीकेचं फोनं केलं आहे. चार्लीच्या मित्राची भुमीका फाकारणारा नवकलाकारही लक्फात राहतो. बाकीचे कलाकार नवीनच दिफले, म्हणूनच की काय त्या त्या भुमीकेत योग्य वाटतात. गुंडगीरीची पारफ्वभूमी अफली तरी अधेमधे येणारे हलकेफुलके फंवाद प्रेक्फकांचं चांगलं मनोरंजन करतात.

विफाल भारद्वाजच्या बर्‍यापैकी गाजलेल्या ओंकारानंतर कमीने हा चित्रपट तो एक परिपक्व दिग्दर्फक अफण्यावर फिक्कामोर्तब करतो. खरंतर जुळे भाऊ, गुंडगीरीची पार्फ्वभूमी, बॉलीवूड फ्टाईल कथा अफूनही कमीने आपलं वेगेळेपण राखून ठेवतो. दिग्दर्फकाचं खरं यफ कथेच्या हाताळणीत आहे कारण कथेचा विफय बघता चित्रपटात तोच-तोपणा येऊ फकला अफता किंवा कंटाळवाणा होऊ फकला अफता. पण उत्तम चित्रीकरण, फंकलन आणि कथेला दिलेल्या वेगामुळे अफे घडत नाही. आता अफं होईल अफं वाटत अफताना तफं घडतही नाही. काही जणांना फेवटी चित्रपट थोडा अतिरंजीत वाटू फकतो, पण तेव्हाही दिग्दर्फकाने एक-दोन हलके फुलके प्रसंग घालून तो अतिरंजीतपणा कमी करण्याचा प्रयत्न केलाय. चित्रपटात दाखवलेली मुंबई खुपच खरी वाटते. कुठेही विनाकारण फ्वच्छ फेट नाहीत. आपल्या आजूबाजूला जफे वातावरण अफेल तफेच आहे (नाहीतर करण जोहरच्या चित्रपटातला भिकारीफुद्धा डिझायनर कपडे घालून फंगमरवरी वाडग्यात भिक मागत अफतो). चित्रपटातलं 'ढँ ट ढॅण' हे गाणं फोडलं तर दुफरी कोणतीच गाणी माहीत नव्हती, तरीही चित्रपट बघताना काही फरक पडला नाही. गाणी मोजकीच आणि योग्य ठिकाणी अफल्याने चित्रपटात अडथळा वाटत नाहीत. एकंदरीत चित्रपट प्रभावी आणि बघण्यासारखा झालांय. फ्वाईन फ्लूचा धफका कमी झाला की हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन जरूर बघा.

मी चित्रपटाला चार चांदण्या देतो.
*****

अवांतरः चित्रपटाचा परिणाम म्हणून फंपुर्ण लेखात 'फ' हा 'फ' अफा टंकण्यात आलाय.

-(चित्रपट प्रेमी) अनामिक

चित्रपटमतसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

दशानन's picture

16 Aug 2009 - 11:23 am | दशानन

हा हा हा !

मस्त परिक्षण !
आवडले....

ची लागण तुम्हाला पण झाली वाटतं ;)

पाहीला नाही.. पण पाहणार आहे आज नाईट शो !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

टारझन's picture

16 Aug 2009 - 12:00 pm | टारझन

"परिक्षण -कमिने छोटा डॉण स्टाईल" लिहीले नसल्याने जास्त आवडले नाही
=)) तुम्ही छोटा डॉण स्टाईलने लिहा ... उत्तम सुधारणा होतील !

अवांतर : छाण लिहीलंस भावा , नाय तरी तो फोकलीचा शाहिद डॉक्यात जातो साला !! बक्वास पिक्चर आहे !!!

-(प्रियांकाप्रेमी) टारोबा चोप्रा

छोटा डॉन's picture

16 Aug 2009 - 12:06 pm | छोटा डॉन

"कमिने" आणि "छोटा डॉन" हे शब्द एकच वाचले आणि डोळ्यासमोर अंधारी आली व बाकीचे "परिक्षण" आणि "स्टाईल" हे शब्द दिसले नाहीत.
असो.

सत्य कितीही कठोर असले तरी ते तोंडावर असे सांगण्याची हिंमत कुणी अजुन तरी केली नव्हती, टारझनरावांचा अभिमान वाटला ...
(बाकी गप्पा (आम्ही ऑनलाईन असलो तर ) खरडवहीत )

------
छोटा डॉन

टारझन's picture

16 Aug 2009 - 12:14 pm | टारझन

=)) =)) =)) =))
डॉणराव ... आम्हाला "आपल्या स्टाईलचा" (जालिय) बालपणापासूनच अभिमान वाटत आला आहे !!

मागे कोणीतरी सर्किट स्टाईलनं लिहायचा प्रयत्न केलेला ... त्याचा तो प्रयत्न साफ फसला होता !! त्यात सर्किटाचं यश होतं ! बाकी बोलायला हवं का ? आपण सुज्ञ आहात ;)

- (छोटा डॉण स्टाईल प्रेमी) टारोबा पेस्टर

बाकी चर्चा खरडवहीत .
-टारंजय

विशाल कुलकर्णी's picture

17 Aug 2009 - 10:33 am | विशाल कुलकर्णी

मफ्त परिक्फण ! आवडले !

अवांतर : चित्रपट पाहीला, फारफा आवडला नाही. :-(

सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!

छोटा डॉन's picture

16 Aug 2009 - 11:24 am | छोटा डॉन

परिक्षण आवडले रे अनामिकशेठ.
स्पॉयलर्स नाहीत असे म्हणतो, पिक्चर जरुर पाहु थेटरातच ( जरा स्वाईन फ्ल्युची साथ ओसरली की ) ...
काल तिकीटे मिळत असुनसुद्धा थेटरात जाण्याचे टाळले कारण चित्रपट कसा असेल ते माहित नव्हते ( व लै पैसे घालण्याची रिस्क घ्यायची नव्हती ;)
आता पाहिन लवकरच ...

परिक्षण मस्त जमले आहे, धन्यवाद ...

------
छोटा डॉन

JAGOMOHANPYARE's picture

16 Aug 2009 - 11:30 am | JAGOMOHANPYARE

वा वा .. छाण फरिक्षण आहे..

मदनबाण's picture

16 Aug 2009 - 11:38 am | मदनबाण

र्स्टक्लास!!!
फार फान फिहलेस... :)
सध्या या चित्रपटाच्या या गाण्यावर मी थिरकतोय.... :)

चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Aug 2009 - 11:40 am | बिपिन कार्यकर्ते

मफ्तच रे परिक्फण. जाम आवडलं. ट्रेलर बघून तरी अपेक्फा खूपच वाढल्या आहेत. बाकी, तुमचा आमची आवड जुळतेय म्हणायची. प्रियांकाबाई म्हणजे एकदम भारी. मला फगळ्यात जाफ्त आवडलेला डायलॉग (अभिनयाफकट, कारण अमोल गुप्तेच्या अभिनयामुळे त्या डायलॉगला एक वेगळेच वजन येते) म्हणजे, "फ को फ नही बोलेगा तो क्या ल बोलेगा?"

बघायलाच पाहिजे हा फिनेमा.

बिपिन कार्यकर्ते

अनामिक's picture

16 Aug 2009 - 7:14 pm | अनामिक

अरे वा बिपीन दा.. तु पण माझ्या फारकेच बोलायला फिकलाफ तर!

-अनामिक

यशोधरा's picture

16 Aug 2009 - 11:43 am | यशोधरा

>>करण जोहरच्या चित्रपटातला भिकारीफुद्धा डिझायनर कपडे घालून फंगमरवरी वाडग्यात भिक मागत अफतो

अफदी! अफदी!! :P
मस्त परीक्षण..

स्वप्निल..'s picture

16 Aug 2009 - 1:09 pm | स्वप्निल..

परिक्षण मिळालं आपल्या कोणाकडुन तरी .. :)

>>मी चित्रपटाला चार चांदण्या देतो.

आता कमीत कमी ऑनलाईन बघायला हरकत नाही.. ;)
नाहीतर सध्या हिंदी चित्रपट फुकटात ऑनलाईन मिळाला तरी बघायची हींमत होत नाही ..

स्वप्निल

आशिष सुर्वे's picture

16 Aug 2009 - 9:04 pm | आशिष सुर्वे

आताच "कमिने" पाहून आलो.

शाहीदच्या दुहेरी भूमिका आणि प्रियांकाच्या तोंडचे 'मराठी' बरे वाटले.
पार्श्वसंगीतही छान आहे.

माझ्या मते ३ * योग्य आहेत..

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

अनामिका आपली तुफली काय ओलक नाय बघ. पण एक सांग्तु त्वा लई भारी लिवलय. सुरवात तर एकमद झाक पाह्य. (म्हंजी : "कोण तात्याचं नाव घेतोय रे...' आणि "नाही, माझा मित्र नाहीये तो')
तुहे कंसातले टोले लईच भारी वाटले भौ. पण एका गोस्टीची खंत हाय बघ. अरं या पिच्चरमंदी आपल्या मराठीतला नाहीका त्यो. म्हंजी हृषीकेश जोशी म्हंत्यात त्याला. तो बी हाये म्हणे. त्येच्याबद्दल त्वा काई बी लिवलं नाही. हे काय पटलं नाय बुवा आपल्येला.
म्हंजे पाह्य तुला पटत्येय का ते...
नसंल पटत तर सोडून दे. काई लई टेन्सन घेवू नको भौ.

अनामिक's picture

17 Aug 2009 - 5:12 pm | अनामिक

मित्रा, मी हृषीकेश जोशी ह्या कलाकाराचं नाव पहिल्यांदाच ऐकलं. तु बोलल्यावर गुगलून पाहीलं तर ओळख पटली. मी परिक्षणात लिहिलं आहेच की जवळ जवळ सगलेच नवे चेहरे दिसले म्हणून...

-अनामिक

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Aug 2009 - 9:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

झक्कास लिवलं आहेस रे अनामिक! तसाही विशाल भारद्वाजचा पिक्चर म्हणून पहाणार होतेच हा, आता फक्त थेट्रं उघडू देत पुण्यातली.

अमोल गुप्तेनेही त्याच्या भुमीकेचं फोनं केलं आहे

या वाक्याला मात्र जोरात हसले ...

अदिती

कानडाऊ योगेशु's picture

17 Aug 2009 - 12:24 pm | कानडाऊ योगेशु

जुळी पात्रे...त्यातील एक स ला फ म्हणणारे... वाईट(खोडकर) पात्रामुळे सभ्य पात्र संकटात पडणार आणि शेवटी दोघे मिळुन त्यातुन मार्ग काढणार...कथेची असलेली अशी धाटणी ऐकुनच कालपासुन अस्वस्थ होतो कि कुठेतरी अश्या धाटणीची कथा पाहीली आहे.आणि आज लक्षात आले.. "मकडी" मधे... अर्थात हा एक बालचित्रपट(!) होता.विशाल भारद्वाजचा.. केवळ त्या कथेमधील बालविश्व बदलुन त्यात युवकविश्व आणले आहे... अधिक साधर्य्म चित्रपट पाहील्यावरच कळेल.
मकडीमध्ये ही "स को फ बोलती हु ..स नही" असा एक डायलॉग होता.

ऍडीजोशी's picture

17 Aug 2009 - 1:41 pm | ऍडीजोशी (not verified)

पिक्चरमधे तोतरा असलेल्या शाहिदची नक्कल परिक्षणात गरजेपेक्षा उगाचच जास्त ताणल्याने आनंद घेता आला नाही, पहिल्या परिच्छेदानंतर परिक्षण वाचावसं वाटलं नाही.

घोडीवाले वैद्य's picture

17 Aug 2009 - 6:44 pm | घोडीवाले वैद्य

हेच म्हणतो मी पण

प्राजु's picture

17 Aug 2009 - 9:07 pm | प्राजु

परिक्षण आवडले.
चित्रपट पाहिन आता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/