गराज सेल- लेखिका मीनल गद्रे- चतुरंग पुरवणी लोकसत्ता

सुवर्णमयी's picture
सुवर्णमयी in जनातलं, मनातलं
12 Jul 2009 - 1:07 am

http://www.loksatta.com/daily/20090711/chchou.htm
या दुव्यावर मीनल गद्रे यांचा 'गराजसेल 'यावरील लेख लोकसत्ताच्या 'चतुरंग' पुरवणीत वाचला. लेखाबद्दल मीनलचे अभिनंदन. लेखाखालील पत्ता पाहून मिपाकर मीनल या लेखिका असाव्यात असे वाटले.
संपादकांनी मिपावर याची दखल इतरत्र घेतलेली असेल तर हा नोड तिथे जोडावा.
हा लेखावर प्रतिसाद, चर्चा करता यावी म्हणून दुवा दिलेला आहे.

साहित्यिकसमाजजीवनमानअभिनंदन

प्रतिक्रिया

मीनल's picture

12 Jul 2009 - 7:55 am | मीनल

हो. मीच ती.

भारतात `गॅरेज सेल` नामक प्रकार नाही.म्हणून माझ्या अनुभवाचा लेख पाठवला होता. तोच प्रकाशित झाला.

मिपावर या लेखाबद्दल माहिती दिल्याबद्दल तुझे आभार.

मीनल.

मिसळभोक्ता's picture

12 Jul 2009 - 8:05 am | मिसळभोक्ता

लय भारी !

मुख्य म्हणजे पुरवणीचे नाव "चतुरंग" ! जबरा !

-- मिसळभोक्ता

नीधप's picture

12 Jul 2009 - 8:36 am | नीधप

चांगला लेख. मलाही सुरूवातीला असं वापरलेलं विकत द्यायचं/ घ्यायचं हे फारसं पचलं नाही. पण पुस्तकांच्या(टेक्स्टबुकांच्या) किमती, थंडी आणि असिस्टंटशिपचा दणदणीत पेचेक अश्या सगळ्याच्या मेळ घालायचा म्हणल्यावर काही बेसिक फर्निचर, गादी इत्यादी कुणीकुणी टाकलेल्या मधून उचललं. काही स्वेटर्स साल्व्हेशन आर्मी मधून घेतले. तर पुस्तकं बहुतांशी वापरलेलीच घेतली.

बादवे, जॉर्जियात कुठे असता तुम्ही? मी अथेन्सला होते.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विसोबा खेचर's picture

12 Jul 2009 - 8:21 am | विसोबा खेचर

अरे वा! मीनलतैंचे अभिनंदन....

आणि सोनालीचे आभार..

अवांतर - सोनाली, बाकी सर्व क्षेमकुशल ना? तिकडची काय खबर? सर्व मंडळी ठीक ना? महेशरावांना म्हणावं तात्या विचारत होता! :)

तात्या.

टारझन's picture

12 Jul 2009 - 8:23 am | टारझन

ह्या धाग्याच्या निमित्ताने कोदांचेही हार्दिक अभिणंदण !! त्यांचे लेख बर्‍याच "दिनां"च्या वेळी बर्‍र्‍याच पेप्रांत छापून आलेले आहेत !!

मिनल ताईंचेही अभिनंदन ...
चतुरंगांचेही अभिनंदन ...
मिसळपावच्या लेखिकेचा लेख छापून आल्याबद्दल मिपाचेही अभिणंदण ,
मिसळपावचे च्येयरमॅन तात्याबांचे ही अभिनंदण ,,,
हा धागा काढल्याबद्दल सुवर्णमयींचेही अभिणंदण. ..
आणि आम्ही हे वाचू शकलो ह्या बद्दल आमचेही अभिणंदण !!

हा सप्ताह "अभिणंदण सप्ताह" जाहिर करण्यात यावा अशी मी मागणी करतो ! कळावे !

- (अभिणंदक) टारझन

श्रावण मोडक's picture

12 Jul 2009 - 1:10 pm | श्रावण मोडक

+१

रेवती's picture

13 Jul 2009 - 1:04 am | रेवती

टारझनसाहेब,
आता बास! काहीतरी लिहायचं म्हणून हे जे असले प्रतिसाद देताहात ते पुरे झाले. का उगीच त्या कोदाच्या मागे लागलायत?

रेवती

टारझन's picture

13 Jul 2009 - 7:44 pm | टारझन

काय केलं बॉ मी ? मी कुठे कोणाच्या मागे लागलोय ? मी काही एक शब्द खोटं बोललो असेल तर प्रतिसाद मागे घेतो !!
"जो जे वांच्छिल तो ते लाहो" हे वाक्य माझ्या मनाला बालपणीपासून भिडले आहे .. ज्यांना जे हवं त्यांना ते मिळावं .. प्रसिद्धी हवी .. प्रसिद्धी मिळो .. मी उलट हातभारंच लावतोय ना ? की कुठे शिवीगाळ केलीये ? की अर्वाच्य भाषा वापरली आहे ? की आणखी काही ?
असो ..

अजुन कोणी असता तर स्पष्टीकरण देणे लागू होत नव्हतं .. पण आपल्याला दिलं .. का? विचारा !! कारण मी तुम्हाला ओळखतो ना ;)

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jul 2009 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार

बहुमताने सहमत.

सर्वांच अभिनंदन.
आणी हो मिसळपावच्या लेखावर प्रतिक्रीया छापुन आल्याबद्दल 'अचानक टारझन' यांचेही खास अभिनंदन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

विनायक प्रभू's picture

12 Jul 2009 - 9:28 am | विनायक प्रभू

लेख्निकेचे अभिनंदन
अवांतरः आमच्या घरी गराज सेल लागला तर मुख्य आकर्षण बहुदा मीच असेन.

रेवती's picture

13 Jul 2009 - 1:01 am | रेवती

बापरे!!
आमच्या घरी गराज सेल लागला तर मुख्य आकर्षण बहुदा मीच असेन.
कसले कसले जोक्स मारता हो तुम्ही. ह. ह. पु.वा.
रेवती

Nile's picture

13 Jul 2009 - 11:10 am | Nile

आकर्षण त्यांचे असते जी गोष्ट घ्यायला लोक जास्त उत्सुक असतात. त्यामुळे असहमत आहे. क्षमस्व. ;)

ऋषिकेश's picture

12 Jul 2009 - 10:53 am | ऋषिकेश

लेख कालच पेपरात वाचला होता.. मात्र लेखिका मिपावरच्या आहेत याची खात्री नव्हती.

अभिनंदन! :)

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

नितिन थत्ते's picture

12 Jul 2009 - 11:29 am | नितिन थत्ते

असेच म्हणतो. :)
अभिनंदन मीनलताईंचे.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2009 - 11:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिनल गद्रे यांचे अभिनंदन आणि माहिती दिल्याबद्दल सुवर्णमयी यांचे आभार !!!

-दिलीप बिरुटे

नीलकांत's picture

12 Jul 2009 - 11:15 am | नीलकांत

मिनलाताई ,

अभिनंदन !

-- नीलकांत

प्रमोद देव's picture

12 Jul 2009 - 11:26 am | प्रमोद देव

मीनलताईंचे अभिनंदन आणि ह्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल सुवर्णमयीचे मन:पूर्वक आभार.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

दशानन's picture

12 Jul 2009 - 1:13 pm | दशानन

हेच म्हणतो.

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

अवलिया's picture

12 Jul 2009 - 1:53 pm | अवलिया

सहमत आहे

--अवलिया
===============
बिपिन कार्यकर्ते स्युडो पुरोगामी असले तरी माझ्या ओळखीचे असुन माझे चांगले मित्र आहेत म्हणुन हा प्रतिसाद त्यांना अर्पण.
हायकोडताच्या निर्णयाशी याचा काहीही संबंध नाही.

लवंगी's picture

13 Jul 2009 - 3:38 am | लवंगी

आ़ईने सांगीतल या लेखाबद्दल काल फोनवर. तिला तीने इथे पाहिलेल्या गराजसेलची आठवण झाली. पण तेंव्हा हा मिपालेखिकेचा लेख हे माहित नव्हते.

प्राजु's picture

12 Jul 2009 - 7:50 pm | प्राजु

खूप खूप अभिनंदन!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

13 Jul 2009 - 1:12 am | रेवती

मिनलताई,
तुमचे अभिनंदन!
लेखात असलेले आपल्या सासूबाईंचे विचार पटले.
मी फक्त एकदाच अश्या सेलमध्ये मुलासाठी सँडबॉक्स खरेदी केली........ज्यावस्तूसाठी तो इतके दिवस हट्ट करत होता ती सँडबॉक्स त्याने एकदाही नंतर वापरली नाही. आम्ही ज्यांच्या सेलमध्ये ही वस्तू घेतली त्यांची परिस्थिती फार खालावलेली होती व जॉब नसल्याने अगदी उदास चेहर्‍याने त्यांचा तिथला वावर होता. त्यांची मुले विकल्या जाणार्‍या खेळण्यांकडे बघत होती त्यानेच मनात कालवाकालव झाली. आता पुन्हा मी अश्या सेल मध्ये जाईन की नाही शंका आहे.

रेवती

पाषाणभेद's picture

13 Jul 2009 - 8:12 am | पाषाणभेद

"आम्ही ज्यांच्या सेलमध्ये ही वस्तू घेतली त्यांची परिस्थिती फार खालावलेली होती व जॉब नसल्याने अगदी उदास चेहर्‍याने त्यांचा तिथला वावर होता. त्यांची मुले विकल्या जाणार्‍या खेळण्यांकडे बघत होती त्यानेच मनात कालवाकालव झाली. "

खरे आहे. माझ्याही मनात कालवाकालव झाली.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

हुप्प्या's picture

13 Jul 2009 - 3:25 am | हुप्प्या

एखादी वस्तू जुनी झाली तर गराज सेलमधे विकायला काढतात. जर विकली गेली नाही तर ती कचर्‍यात जाते. म्हणजे काय होते? लाखो टन कचरा जिथे टाकला जातो त्या खड्ड्यात ती वस्तू जाऊन पडते. वस्तू कसली बनली आहे त्यावर त्या वस्तूचे नष्ट होणे अवलंबून आहे. धातूची असेल तर तो धातू वितळवून पुन्हा वापरात येऊ शकेल. पण ह्या सगळ्या प्रकाराकरता बरीच ऊर्जा खर्च होते. प्लास्टिक वा अन्य काही पदार्थ शेकडो वर्षे विघटन न होता तसे रहातात. काही पदार्थ जसे शिसे, पारा, विषारी असतात आणि त्यांची विल्हेवाट लावणे ही एक डोकेदुखी असते. (सगळ्यांकरता कारण ह्याकरता नागरिकांकडून कर, शुल्क घेतले जाते).
उदाहरण म्हणजे एक काही वर्षे वापरलेली सायकल. गराजसेलमधे एखाद्याने ती विकत घेऊन अजून काही वर्षे वापरली तर त्या वस्तूचा पर्यावरणावरील बोजा कमी होईल. उलट ती सायकल कचर्‍यात टाकून दिली आणि ज्याला ती हवी होती त्याने महागड्या किंमतीत नवी सायकल घेतली तर पर्यावरणावरील बोजा दुप्पट होतो.
दुसर्‍याची जुनी वस्तू कशी वापरायची वगैरे भावनिक अडसर असतील पण हा फायदाही विचारात घेतला पाहिजे. कित्येकदा लोक उत्साहाने वस्तु घेतात पण ती नुसती पडून रहाते आणि मग कधी तरी गराजसेलमधे विकायला येते. व्यायामाची उपकरणे ह्या गटात मोठ्ठ्या प्रमाणात आढळतात. अशा वस्तूंकडे वापरलेली वगैरे म्हणून नाके मुरडण्यापेक्षा इच्छा असल्यास ती विकत घेणे खूप स्वस्त पडते.
मी अनेकदा अशा सेलमधे चांगल्या वस्तू मिळवून त्या अनेक वर्षे वापरलेल्या आहेत. तसेच वस्तू विकल्याही आहेत.

स्वाती२'s picture

14 Jul 2009 - 1:55 am | स्वाती२

अभिनंदन मिनल. मी बरेचदा गराजसेल मधून पुस्तक, मूळ किमतीचा स्टिकरही तसाच असलेले table cloth, napkins वगैरे गोष्टी घेतल्यात.
मला स्वत:ला freecycle हा प्रकार जास्त आवडतो. यात लोकं मी वापरलय/ मला उपयोग नाही, पण दुसर्‍याला उपयोगी पडेल म्हणून खुशीने वस्तू देतात.

सुधीर कांदळकर's picture

15 Jul 2009 - 4:07 pm | सुधीर कांदळकर

मी प्रथम चतुरंग वाचतों. नंतर इतर पानें. चतुरंगच्या पहिल्याच पानावर मीनलताईंचा लेख पाहून जाणवलें कीं या मिपावरच्या तर नव्हेत?

लेख आवडला. छान.

सुधीर कांदळकर.

सूहास's picture

15 Jul 2009 - 9:05 pm | सूहास (not verified)

खर तर लेख पेपरातच वाचला !!
धन्यवाद सुवर्णमयी .. =D>
अभिनंदन मिनल... =D>

सुहास

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jul 2009 - 12:14 am | बिपिन कार्यकर्ते

लेख आवडला...

बिपिन कार्यकर्ते