आता बरेच लोक म्हटले की या दिपाली ला फक्त गोड च पदार्थ येतात की काय? मला येतात सगळे प्रकार बनवता पण मी ऐकलं आहे की माझ्या पाकृ (उदा: खानदेशी शेव भाजी) कोणीतरी कुठल्यातरी पेपरात छापली होती तेही अगदी त्याच फोटो सोबत आणि तेही मला न विचारता.. आत्ता काय बोलावं , पकडला जात नाही तो काही चोर थोडीच असतो .जाऊ देत...
झणझणीत सुकं मटण.
साहीत्यः
२ पाउंड मटण , आमच्या इकडे अफगाणी हलाल दुकान आहे तिकडे छान मिळतं पण तो खडुस दुकानवाला (तसा म्हातारा ही आहे म्हणून आम्ही सोडुन देतो) काही २-३ पाऊंड च्या खाली देत नाही आणिक वरुन काहीतरी बरळत बसतो अफगाणी भाषेत. गेला उडत...त्याच्या बरळण्याने कावळा देखिल हलणार नाही मग आम्ही कसले हलतोय!! असो.
२ मध्यम कांदे
१/२ वाटी सुके खोबरे
लागेल तसे तेल -मी १/४ कप तेल घेते पण मटणा ला पण तेल सुटतं त्यानुसार वाटलेला मसाला परतवण्या योग्य तेल घ्यावे.
चवीनुसार मीठ
२-३ अमेरिकन लसुण पाकळ्या
१ इंच आले
२ टे. स्पु. मिरे
१ टी. स्पु. लवंगा
१ टे. स्पु. गरम मसाला
२ तमालपत्र
७-८ पाने पुदिना
बचकभर कोथिंबीर
लाल तिखट - तिखट जसे हवे तस्से घ्या मी २-३ टे.स्पु. घेते कमी झाल्यास अजुन टाकते.
मटण नीट स्वच्छ करुन धुऊन घ्यावे.
कृती:
१) प्रेशर कुकरात कांदा उभा चिरुन थोड्या तेलावर भाजुन घ्या.
२) खोबरे , मसाला पण भाजुन घ्या.
३) भाजलेला कांदा + खोबरे + मसाला + पुदिना + कोथिंबीर + लसुण + आलं यांना बारिक वाटून घ्यावे.
४) तापलेल्या तेलात वरिल मसाला + तिखट + गरम मसाला टाकावा.
५) मसाला तेल सुटेपर्यंत नीट भाजुन घ्यावा.
६) आता धुतलेले मटण टाकावे व नीट परतुन घ्यावे.
७) १- १/१/२ वाटी पाणी व मीठ टाकुन ३-४ शिट्ट्या माराव्या.
८) कोथिंबीर टाकुन वाढा.
टीपा:
१) पाणी जास्त टाकु नये. जास्त पाणी झाल्यास शीटी काढल्यावर मध्यम गॅसवर ठेवुन आटवावे.
प्रतिक्रिया
29 Jun 2009 - 11:12 am | विंजिनेर
अरे कोणी आहे कारे तिकडे.
ह्या पाटलीण बाईंना मिपावरून काढून अंधारकोठडीत टाका पाहू ८ दिवस. विना बकलावा-सुक्या मटणाचे राहुदे त्यांना :)
लोकांचे एका दिवसात किती हाल करायचे ते फोटू टाकून त्याला काही सुमार? छ्या!
(अफगाणी) विंजिनेर
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
29 Jun 2009 - 11:37 am | यशोधरा
विंजिनेरांशी एकदम सहमत! हालच आहेत खरोखर! @)
29 Jun 2009 - 12:15 pm | श्रावण मोडक
सहमत... जबर 'शिक्षा' झाली पाहिजे.
2 Jul 2009 - 11:20 am | मि.इंडिया
दिपालीताइ धन्यवाद. या पाकृचा फार दिवस शोध घेत होतो. येणारा रविवार सुखाचा जाणार.......
प्रदीप
29 Jun 2009 - 11:15 am | घाटावरचे भट
:)
29 Jun 2009 - 11:21 am | पक्या
खतरनाक फोटो, जबरा रेसिपी
29 Jun 2009 - 11:27 am | अविनाशकुलकर्णी
महत्वाचि सुचना..सदर फोटो पहाताना लहान मुलांना गळ्यात घालतात तसे लाळे घालुन फोटो पहावेत...अन्यथा शर्ट खराब होइल
29 Jun 2009 - 12:27 pm | सहज
दिपालीतै पाकृ देवे.. फोटोभी दिखावे
ससुरा गेंदा फूल....
ओय होय होय
ज ह ब ह र इ
29 Jun 2009 - 11:52 am | विसोबा खेचर
जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!!
29 Jun 2009 - 12:02 pm | अभिजीत मोटे
+१
............अभिजीत मोटे.
29 Jun 2009 - 1:39 pm | नंदन
पाकृ आणि फोटो अप्रतिम. ज-ह-ब-ह-रा-हा (कॉपीराईट - धमु) :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 Jun 2009 - 2:25 pm | धमाल मुलगा
अरे बाबा, दिपालीताईंच्या आख्ख्या पाककृत्या हायजॅक होताहेत आणि एका जहबहर्याचा कसला कॉपीराईट रे? :)
दिपालीताई,
आमचा आपल्या चरणी साष्टांग नमस्कार हो! तुमच्या पहिल्या वाढदिवसाला काय अन्नपुर्णेच्या हातात असते तशी कोणी हातात पळी वगैरे दिली होती का हो? :)
बरं, एक सांगा, पा.कृ.शिकवण्याची फी किती घेता? आमच्या सौ.ला तुमच्याकडे शिकवणीसाठी पाठवावं म्हणतो :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
29 Jun 2009 - 2:15 pm | सुनील
झक्कास पाकृ. रविवारी टाकायची सोडून सोमवारी का टाकली? आता आठवडाभर वाट पाहणे आले!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Jun 2009 - 3:14 pm | मसक्कली
तोन्डाला पाणी सोडा नुसत तुमि..........!! =P~
बोलवा तरि चव घ्ययला तुमच्या हतचि आमाला.......... ;)
29 Jun 2009 - 4:17 pm | अवलिया
पाकृ आणि फोटो अप्रतिम. ज-ह-ब-ह-रा-हा (कॉपीराईट - धमु)
--अवलिया
29 Jun 2009 - 4:24 pm | वेताळ
वा खुपच छान ,फोटो तर लाजवाब.............
दिल गार्डन गार्डन हो गया. :)
वेताळ
29 Jun 2009 - 4:24 pm | वेताळ
वा खुपच छान ,फोटो तर लाजवाब.............
दिल गार्डन गार्डन हो गया. :)
वेताळ
29 Jun 2009 - 4:32 pm | श्रीयुत संतोष जोशी
१ नं पाकृ आणि फोटो तर झकासच.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
29 Jun 2009 - 4:46 pm | चतुरंग
ती भरलेली वाटी बघून जुन्या आठवणी चाळवल्या! धन्यवाद!! :)
(निरामिष)चतुरंग
सूचना - दिपालीताई, फोटू टाकताना त्यावर तुमच्या नावाचा वॉटरमार्क टाकावात म्हणजे पाकृ हायजॅक झालीच तरी निदान फोटू तरी हायजॅक होणार नाही.
29 Jun 2009 - 4:48 pm | स्वाती२
दिपाली, नको ग असा छळ करू. शुक्रवारी संध्याकाळी बेत करावा तर आषाढी. आता रविवार पर्यंत वाट पाहाणे आले.
आणि त्या रेसिप्यांच्या फोटोवर नाव डकव तुझं म्हणजे चोर पकडला जाईल.
29 Jun 2009 - 4:54 pm | ऋषिकेश
खरोखर ज-ह-ब-ह-रा-हा (प्रताधिकार - धमु)
बरं झालं भरल्यापोटी बघितला फोटो नाहितर भुकेने पोटात अॅटॅक आला असता ना!
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
29 Jun 2009 - 5:35 pm | तर्री
येथे परदेशात बसून ही छायाचित्रे पाहाणे म्हणजे /पाक्रु वाचणे म्हणजे ब्रम्हाचार्या समोर बेबो चा नाच.
29 Jun 2009 - 7:39 pm | लवंगी
कसला जबरा फोटो आहे ग!! मी येतेय तुझ्याकडे या विकांताला जेवायला..
29 Jun 2009 - 7:45 pm | टारझन
याययाययययाअयाअयाय्ययाअ !! फिस्स्स्स्स !!१
भारतात कधी येताय ? सिरीयसली म्हणतोय !!
खाण्यासाठी किडण्यापींग बहुदा पहिल्यांदाच होणार आता !!
(किडण्यापर) टार्या हटेला
29 Jun 2009 - 8:50 pm | दिपाली पाटिल
सगळे च या जेवायला. मला तर आवडेल च...
दिपाली :)
29 Jun 2009 - 9:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लैच भारी आला फोटो.
पाकृती ऐतवारी ट्राय करुन पाहू ! :)
-दिलीप बिरुटे
30 Jun 2009 - 3:07 am | चित्रादेव
अग दिपाली, कुठले ग हे अफगाणि दुकान बे एरीयातले?
पाकृ मस्तच. :)
30 Jun 2009 - 7:39 am | संदीप चित्रे
एकाच दिवशी ?
अग बाई पदार्थ करण्याची तुझी नक्की रेंज किती आहे? =D>
मटणाबरोबर गरम गरम भाकरी आणि कांद्याचा फोटो टाकला नाहीस ह्याचा निषेध करावा की 'निदान तेवढा त्रास कमी' असं म्हणावं ? :?
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
2 Jul 2009 - 12:02 pm | बबलु
बाय द वे... अफगाणि दुकान कुठे आहे ?
....बबलु
26 Sep 2010 - 8:29 pm | आचारी
बाई साहेब आपण आमचे हाल हाल केले ..............शाकाहारी आहे मी पण तुम्ही मला अभक्श खायला लावणारच असे दिसते
26 Sep 2010 - 8:48 pm | सुनील
शाकाहारी आहे मी पण तुम्ही मला अभक्श खायला लावणारच असे दिसते
काय हे? काय हे? तेही संकष्टीच्या दिवशी?
फोटू बाकी जीवघेणा बर्रका!
26 Sep 2010 - 11:03 pm | चिंतामणी
पुण्यात संकष्टी उद्या आहे.
27 Sep 2010 - 9:04 am | विलासराव
झणझणीत दिसतय.
पण खाल्ल्याशिवाय कळणार तरी कस?
मग लक्षात आल की प्रतिसाद दिला की कदाचित आमंत्रन मिळेल.
मग सविस्तर प्रतिसाद देता येईल.
27 Sep 2010 - 9:24 am | नगरीनिरंजन
की-बोर्डवर लाळ गळू नये म्हणून इतकावेळ प्रतिसाद द्यायचा थांबलो होतो. ;-)
खल्लास पाकृ आहे ही आणि सोपीही वाटतेय. लवकरच करून आस्वाद घेतला जाईल असा मनोमन ठराव केव्हाच पास झालेला आहे!
धन्यवाद दिपालीतै!
27 Sep 2010 - 11:24 am | प्राजक्ता पवार
पाकृ आणी फोटो दोन्ही मस्त !
27 Sep 2010 - 12:08 pm | आंसमा शख्स
पाककृती आणी फोटो दोन्ही मस्त पण
फार छान. पाणी सुटले तोंडाला.
27 Sep 2010 - 1:53 pm | इंटरनेटस्नेही
मस्त! टोन्डाला पाणी सुटले!
27 Sep 2010 - 2:20 pm | गणपा
गरमा गरम भाकरीचा तुकडा त्या वाटीत बुडबुन भुरका मारण्याचा मोह आवरता येत नाही. :)
नेमकं काल संकष्टीलाच हा धागा वर काढल्या बद्दल आचारी बुवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
कै च्या कै जळफळाट झाला राव.