मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झणझणीत सुकं मटण

दिपाली पाटिल · · पाककृती
आता बरेच लोक म्हटले की या दिपाली ला फक्त गोड च पदार्थ येतात की काय? मला येतात सगळे प्रकार बनवता पण मी ऐकलं आहे की माझ्या पाकृ (उदा: खानदेशी शेव भाजी) कोणीतरी कुठल्यातरी पेपरात छापली होती तेही अगदी त्याच फोटो सोबत आणि तेही मला न विचारता.. आत्ता काय बोलावं , पकडला जात नाही तो काही चोर थोडीच असतो .जाऊ देत... झणझणीत सुकं मटण. साहीत्यः २ पाउंड मटण , आमच्या इकडे अफगाणी हलाल दुकान आहे तिकडे छान मिळतं पण तो खडुस दुकानवाला (तसा म्हातारा ही आहे म्हणून आम्ही सोडुन देतो) काही २-३ पाऊंड च्या खाली देत नाही आणिक वरुन काहीतरी बरळत बसतो अफगाणी भाषेत. गेला उडत...त्याच्या बरळण्याने कावळा देखिल हलणार नाही मग आम्ही कसले हलतोय!! असो. २ मध्यम कांदे १/२ वाटी सुके खोबरे लागेल तसे तेल -मी १/४ कप तेल घेते पण मटणा ला पण तेल सुटतं त्यानुसार वाटलेला मसाला परतवण्या योग्य तेल घ्यावे. चवीनुसार मीठ २-३ अमेरिकन लसुण पाकळ्या १ इंच आले २ टे. स्पु. मिरे १ टी. स्पु. लवंगा १ टे. स्पु. गरम मसाला २ तमालपत्र ७-८ पाने पुदिना बचकभर कोथिंबीर लाल तिखट - तिखट जसे हवे तस्से घ्या मी २-३ टे.स्पु. घेते कमी झाल्यास अजुन टाकते. मटण नीट स्वच्छ करुन धुऊन घ्यावे. कृती: १) प्रेशर कुकरात कांदा उभा चिरुन थोड्या तेलावर भाजुन घ्या. २) खोबरे , मसाला पण भाजुन घ्या. ३) भाजलेला कांदा + खोबरे + मसाला + पुदिना + कोथिंबीर + लसुण + आलं यांना बारिक वाटून घ्यावे. ४) तापलेल्या तेलात वरिल मसाला + तिखट + गरम मसाला टाकावा. ५) मसाला तेल सुटेपर्यंत नीट भाजुन घ्यावा. ६) आता धुतलेले मटण टाकावे व नीट परतुन घ्यावे. ७) १- १/१/२ वाटी पाणी व मीठ टाकुन ३-४ शिट्ट्या माराव्या. ८) कोथिंबीर टाकुन वाढा. टीपा: १) पाणी जास्त टाकु नये. जास्त पाणी झाल्यास शीटी काढल्यावर मध्यम गॅसवर ठेवुन आटवावे.

वाचने 14642 वाचनखूण प्रतिक्रिया 38

विंजिनेर 29/06/2009 - 11:12
अरे कोणी आहे कारे तिकडे. ह्या पाटलीण बाईंना मिपावरून काढून अंधारकोठडीत टाका पाहू ८ दिवस. विना बकलावा-सुक्या मटणाचे राहुदे त्यांना :) लोकांचे एका दिवसात किती हाल करायचे ते फोटू टाकून त्याला काही सुमार? छ्या! (अफगाणी) विंजिनेर ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

महत्वाचि सुचना..सदर फोटो पहाताना लहान मुलांना गळ्यात घालतात तसे लाळे घालुन फोटो पहावेत...अन्यथा शर्ट खराब होइल

सहज 29/06/2009 - 12:27
दिपालीतै पाकृ देवे.. फोटोभी दिखावे ससुरा गेंदा फूल.... ओय होय होय ज ह ब ह र इ

विसोबा खेचर 29/06/2009 - 11:52
जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!! जबरा...!!

In reply to by नंदन

धमाल मुलगा 29/06/2009 - 14:25
अरे बाबा, दिपालीताईंच्या आख्ख्या पाककृत्या हायजॅक होताहेत आणि एका जहबहर्‍याचा कसला कॉपीराईट रे? :) दिपालीताई, आमचा आपल्या चरणी साष्टांग नमस्कार हो! तुमच्या पहिल्या वाढदिवसाला काय अन्नपुर्णेच्या हातात असते तशी कोणी हातात पळी वगैरे दिली होती का हो? :) बरं, एक सांगा, पा.कृ.शिकवण्याची फी किती घेता? आमच्या सौ.ला तुमच्याकडे शिकवणीसाठी पाठवावं म्हणतो :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

सुनील 29/06/2009 - 14:15
झक्कास पाकृ. रविवारी टाकायची सोडून सोमवारी का टाकली? आता आठवडाभर वाट पाहणे आले! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग 29/06/2009 - 16:46
ती भरलेली वाटी बघून जुन्या आठवणी चाळवल्या! धन्यवाद!! :) (निरामिष)चतुरंग सूचना - दिपालीताई, फोटू टाकताना त्यावर तुमच्या नावाचा वॉटरमार्क टाकावात म्हणजे पाकृ हायजॅक झालीच तरी निदान फोटू तरी हायजॅक होणार नाही.

स्वाती२ 29/06/2009 - 16:48
दिपाली, नको ग असा छळ करू. शुक्रवारी संध्याकाळी बेत करावा तर आषाढी. आता रविवार पर्यंत वाट पाहाणे आले. आणि त्या रेसिप्यांच्या फोटोवर नाव डकव तुझं म्हणजे चोर पकडला जाईल.

ऋषिकेश 29/06/2009 - 16:54
खरोखर ज-ह-ब-ह-रा-हा (प्रताधिकार - धमु) बरं झालं भरल्यापोटी बघितला फोटो नाहितर भुकेने पोटात अ‍ॅटॅक आला असता ना! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

तर्री 29/06/2009 - 17:35
येथे परदेशात बसून ही छायाचित्रे पाहाणे म्हणजे /पाक्रु वाचणे म्हणजे ब्रम्हाचार्या समोर बेबो चा नाच.

लवंगी 29/06/2009 - 19:39
कसला जबरा फोटो आहे ग!! मी येतेय तुझ्याकडे या विकांताला जेवायला..

टारझन 29/06/2009 - 19:45
याययाययययाअयाअयाय्ययाअ !! फिस्स्स्स्स !!१ भारतात कधी येताय ? सिरीयसली म्हणतोय !! खाण्यासाठी किडण्यापींग बहुदा पहिल्यांदाच होणार आता !! (किडण्यापर) टार्‍या हटेला

एकाच दिवशी ? अग बाई पदार्थ करण्याची तुझी नक्की रेंज किती आहे? =D> मटणाबरोबर गरम गरम भाकरी आणि कांद्याचा फोटो टाकला नाहीस ह्याचा निषेध करावा की 'निदान तेवढा त्रास कमी' असं म्हणावं ? :? --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

आचारी 26/09/2010 - 20:29
बाई साहेब आपण आमचे हाल हाल केले ..............शाकाहारी आहे मी पण तुम्ही मला अभक्श खायला लावणारच असे दिसते

In reply to by आचारी

सुनील 26/09/2010 - 20:48
शाकाहारी आहे मी पण तुम्ही मला अभक्श खायला लावणारच असे दिसते काय हे? काय हे? तेही संकष्टीच्या दिवशी? फोटू बाकी जीवघेणा बर्रका!

विलासराव 27/09/2010 - 09:04
झणझणीत दिसतय. पण खाल्ल्याशिवाय कळणार तरी कस? मग लक्षात आल की प्रतिसाद दिला की कदाचित आमंत्रन मिळेल. मग सविस्तर प्रतिसाद देता येईल.

नगरीनिरंजन 27/09/2010 - 09:24
की-बोर्डवर लाळ गळू नये म्हणून इतकावेळ प्रतिसाद द्यायचा थांबलो होतो. ;-) खल्लास पाकृ आहे ही आणि सोपीही वाटतेय. लवकरच करून आस्वाद घेतला जाईल असा मनोमन ठराव केव्हाच पास झालेला आहे! धन्यवाद दिपालीतै!

गणपा 27/09/2010 - 14:20
गरमा गरम भाकरीचा तुकडा त्या वाटीत बुडबुन भुरका मारण्याचा मोह आवरता येत नाही. :) नेमकं काल संकष्टीलाच हा धागा वर काढल्या बद्दल आचारी बुवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! कै च्या कै जळफळाट झाला राव.