मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झणझणीत सुकं मटण

दिपाली पाटिल · · पाककृती
Image removed. आता बरेच लोक म्हटले की या दिपाली ला फक्त गोड च पदार्थ येतात की काय? मला येतात सगळे प्रकार बनवता पण मी ऐकलं आहे की माझ्या पाकृ (उदा: खानदेशी शेव भाजी) कोणीतरी कुठल्यातरी पेपरात छापली होती तेही अगदी त्याच फोटो सोबत आणि तेही मला न विचारता.. आत्ता काय बोलावं , पकडला जात नाही तो काही चोर थोडीच असतो .जाऊ देत... झणझणीत सुकं मटण. साहीत्यः २ पाउंड मटण , आमच्या इकडे अफगाणी हलाल दुकान आहे तिकडे छान मिळतं पण तो खडुस दुकानवाला (तसा म्हातारा ही आहे म्हणून आम्ही सोडुन देतो) काही २-३ पाऊंड च्या खाली देत नाही आणिक वरुन काहीतरी बरळत बसतो अफगाणी भाषेत. गेला उडत...त्याच्या बरळण्याने कावळा देखिल हलणार नाही मग आम्ही कसले हलतोय!! असो. २ मध्यम कांदे १/२ वाटी सुके खोबरे लागेल तसे तेल -मी १/४ कप तेल घेते पण मटणा ला पण तेल सुटतं त्यानुसार वाटलेला मसाला परतवण्या योग्य तेल घ्यावे. चवीनुसार मीठ २-३ अमेरिकन लसुण पाकळ्या १ इंच आले २ टे. स्पु. मिरे १ टी. स्पु. लवंगा १ टे. स्पु. गरम मसाला २ तमालपत्र ७-८ पाने पुदिना बचकभर कोथिंबीर लाल तिखट - तिखट जसे हवे तस्से घ्या मी २-३ टे.स्पु. घेते कमी झाल्यास अजुन टाकते. मटण नीट स्वच्छ करुन धुऊन घ्यावे. Image removed. कृती: १) प्रेशर कुकरात कांदा उभा चिरुन थोड्या तेलावर भाजुन घ्या. २) खोबरे , मसाला पण भाजुन घ्या. ३) भाजलेला कांदा + खोबरे + मसाला + पुदिना + कोथिंबीर + लसुण + आलं यांना बारिक वाटून घ्यावे. ४) तापलेल्या तेलात वरिल मसाला + तिखट + गरम मसाला टाकावा. ५) मसाला तेल सुटेपर्यंत नीट भाजुन घ्यावा. ६) आता धुतलेले मटण टाकावे व नीट परतुन घ्यावे. ७) १- १/१/२ वाटी पाणी व मीठ टाकुन ३-४ शिट्ट्या माराव्या. ८) कोथिंबीर टाकुन वाढा. Image removed. टीपा: १) पाणी जास्त टाकु नये. जास्त पाणी झाल्यास शीटी काढल्यावर मध्यम गॅसवर ठेवुन आटवावे.

वाचन 14642 प्रतिक्रिया 38