
आता बरेच लोक म्हटले की या दिपाली ला फक्त गोड च पदार्थ येतात की काय? मला येतात सगळे प्रकार बनवता पण मी ऐकलं आहे की माझ्या पाकृ (उदा: खानदेशी शेव भाजी) कोणीतरी कुठल्यातरी पेपरात छापली होती तेही अगदी त्याच फोटो सोबत आणि तेही मला न विचारता.. आत्ता काय बोलावं , पकडला जात नाही तो काही चोर थोडीच असतो .जाऊ देत...
झणझणीत सुकं मटण.
साहीत्यः
२ पाउंड मटण , आमच्या इकडे अफगाणी हलाल दुकान आहे तिकडे छान मिळतं पण तो खडुस दुकानवाला (तसा म्हातारा ही आहे म्हणून आम्ही सोडुन देतो) काही २-३ पाऊंड च्या खाली देत नाही आणिक वरुन काहीतरी बरळत बसतो अफगाणी भाषेत. गेला उडत...त्याच्या बरळण्याने कावळा देखिल हलणार नाही मग आम्ही कसले हलतोय!! असो.
२ मध्यम कांदे
१/२ वाटी सुके खोबरे
लागेल तसे तेल -मी १/४ कप तेल घेते पण मटणा ला पण तेल सुटतं त्यानुसार वाटलेला मसाला परतवण्या योग्य तेल घ्यावे.
चवीनुसार मीठ
२-३ अमेरिकन लसुण पाकळ्या
१ इंच आले
२ टे. स्पु. मिरे
१ टी. स्पु. लवंगा
१ टे. स्पु. गरम मसाला
२ तमालपत्र
७-८ पाने पुदिना
बचकभर कोथिंबीर
लाल तिखट - तिखट जसे हवे तस्से घ्या मी २-३ टे.स्पु. घेते कमी झाल्यास अजुन टाकते.
मटण नीट स्वच्छ करुन धुऊन घ्यावे.

कृती:
१) प्रेशर कुकरात कांदा उभा चिरुन थोड्या तेलावर भाजुन घ्या.
२) खोबरे , मसाला पण भाजुन घ्या.
३) भाजलेला कांदा + खोबरे + मसाला + पुदिना + कोथिंबीर + लसुण + आलं यांना बारिक वाटून घ्यावे.
४) तापलेल्या तेलात वरिल मसाला + तिखट + गरम मसाला टाकावा.
५) मसाला तेल सुटेपर्यंत नीट भाजुन घ्यावा.
६) आता धुतलेले मटण टाकावे व नीट परतुन घ्यावे.
७) १- १/१/२ वाटी पाणी व मीठ टाकुन ३-४ शिट्ट्या माराव्या.
८) कोथिंबीर टाकुन वाढा.

टीपा:
१) पाणी जास्त टाकु नये. जास्त पाणी झाल्यास शीटी काढल्यावर मध्यम गॅसवर ठेवुन आटवावे.
अरे कोणी
In reply to अरे कोणी by विंजिनेर
विंजिनेरा
In reply to अरे कोणी by विंजिनेर
सहमत...
In reply to अरे कोणी by विंजिनेर
धन्यवाद
वा!!
खतरनाक
महत्वाचि
आय हाय हाय
जबरा...!!
जबरा
क्या बात है!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to क्या बात है! by नंदन
कॉपीराईट????
मस्त..
भन्नाट.........!!
पाकृ आणि
मस्तच दिपालीताई
मस्तच दिपालीताई
मस्त
आम्ही सामिष भोजनाचा अस्वाद घेणे कधीच सोडले आहे परंतु
दिपाली,
ज-ह-ब-ह-रा-हा
येथे
अग आई ग!!
याययायययय
सगळे च या
और भी आने दो !
अग दिपाली,
सुकं मटण आणि बकलावा
खलास....
हाल हाल केलेत
In reply to हाल हाल केलेत by आचारी
अब्रह्मण्यम!
In reply to अब्रह्मण्यम! by सुनील
उद्या आहे.
फोटोत तर
की-बोर्डवर लाळ गळू नये म्हणून
वा !
फार
मस्त! टोन्डाला पाणी सुटले!
दिपाली एकदम खतरा पाकृ.