अदभुत

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
1 Jun 2009 - 3:23 pm

"प्रसाद?" कॅफेच्या बाहेरुन एक आजोबा विचारत होते.

"या ना, मीच प्रसाद" मी त्यांना आदराने आत बोलावत म्हणालो.

आजोबा आत येउन बसले, "मी शरद कारखानीस, नानांनी तुमच्याकडे पाठवले होते."

नानांचे नाव निघताच मी थोडा चमकलो. भुतकाळातील अनेक नको असलेल्या आठवणींची भुते माझ्याभोवती पिंगा घालु लागली. माझ्या अंगावर सरसरुन शहारा आला.

जास्ती नाही आठ एक महिने झाले असतील ह्या गोष्टीला, मी जयराज, वहिनी आणी त्यांची दोन गोजीरवाणी पाखरे जयराजच्या त्या कोकणातल्या जुन्या घरी ४ दिवसांच्या सुट्टीसाठी म्हणुन दाखल झालो होतो. खरेतर हे जयराजच्या आत्याचे घर , तिच्या मृत्युनंतर जयराज एकदाच काय तो इकडे येउन गेला होता. त्यानंतर घराची साफसफाई वगैरे सगळे कुळांच्या भरोशावरच होते.

आम्ही येणार म्हणुन घर कसे मस्त झाडुन, पुसुन सारवुन घेतलेले दिसत होते. रोहित आणी रसीका तर घराबाहेर येव्हडा मोठा मोकळ भाग बघुन बॅगा टाकल्यापासुनच हुंदडायला लागली होती. दुरवर नजर जाईल तोवर मोकळा माळ, काहि खुरटी आणी अध्ये मध्ये पोफळीची झाडे आणी नजरेच्या शेवटच्या टप्प्यात एकदम समुद्रम आणी त्याच्या लाटांचा तो धिरगंभीर आवाज. १०/१५ घरांचीच ती छोटीशी वाडी मला फार आवडुन गेली.

नाचणीची भाकरी, फणसाची भाजी, खर्डा असे भरभक्कम जेवण करुन मी आणी जय समुद्रावर एक चक्कर टाकुन आलो. येता येता दुसर्‍या दिवशीच्या 'बैठकीची' जागा पण ठरवुन झाली होती. वाडीवर विज नावापुरतीच आली होती, ती असायची कमी आणी नसायचीच जास्त. कंदीलाच्या टिमटिमत्या उजेडात वस्ती कशी एखाद्या चित्रासारखी दिसत होती.

आम्ही येइपर्यंत पोर झोपुनच गेली होती, दोन बाजा टाकुन मी आणी जयने पण बाहेर अंगणात ताणुन दिली. रात्रीचे साधारण किती वाजले असतील काहि अंदाज नाही पण अचानक मला जाग आली, कोणीतरी छातीवर बसल्यासारखा माझा श्वास गुदमरला होता. चारी बाजुंनी साकोळलेला काळोख आणी समुद्राचा गंभीर आवाज त्यात अजुनच भितीची भर घालत होता. मनाची कशीतरी समजुत घालत मी पुन्हा आडवा झालो, डोळे मात्र मिटायलाच तयार न्हवते. काहि वेळातच कोणीतरी घुसमटुन किंचाळल्यासारखा आवाज कानावर पडला, मी धडपडुन उठुन कंदीलाची वात मोठी केली. जय, हो जयच कण्हत होता आणी तो आपल्या शरीरापासुन कोणाला तरी दुर करण्याचा प्रयत्न करत होता. मी धावत त्याल हाका मारत त्याच्या दिशेने धावलो, ज्या वेगाने मी त्याच्याकडे धावलो त्याच्या दुप्पट वेगाने मी पुन्हा मागे फेकला गेलो. हे काहितरी विचीत्र आहे, अमानवी आहे हे माझ्या तेंव्हाच लक्षात आले. जयचे नशीब चांगले असावे कारण काही वेळातच त्याची धडपड थांबली व तो डोळे उघडुन आजुबाजुचा वेध घ्यायला लागला.

"जय यु ओके मॅन ?" मी कसाबसा ठेचकाळलेले अंग सावरत उठत म्हणालो.

जयची मान हळुहळु माझ्या दिशेला वळली आणी मी अंतर्बाह्य थरारुन उठलो. परमेश्वरा ! एखाद्या हिंस्त्र श्वापदा सारखी ती नजर माझा वेध घेत होती. मी पटकन दोन पावले मागे सरकलो. जयच्या तोंडातुन काहितरी गुरगुरल्यासारखे विचित्र ध्वनी निघत होते.
'धोका धोका' इथे थांबण्यात धोका आहे , माझे मन मला आतुन सावध करत होते. पण मी पळुन पळुन जाणार तरी कुठे होतो ? एकतर ह्या भागाची माहिती नाही, त्यात जय, वहिनी आणी त्या २ गोजीरवाण्या जिवांना असे संकटात टाकुन पळुन जाणे मला खचीतच जमले नसते. जे काय होईल त्याचा सामना करायचा असे मनाशी ठरवुन मी हळुहळु घराच्या दाराकडे सरकु लागलो. नेमके
त्याचवेळी....

अचानक ध्यानी मनी नसताना जयनी ती वेगवान हालचाल केली, घराच्या खिडकीतुन एखाद्या मांजरीने उडी मारुन आत शिरावे त्या सहजगत्या तो आत शिरला. आता मात्र वेळ घालवणे धोक्याचे होते, कसलाही विचार न करता मी त्याच्या मागोमाग आत शिरलो. आतला देखावा खरच भयानक होता, २ कंदिलांच्या उजेडात वहिनी दोन्ही गुडगे छातीशी दुमडुन त्या दोन लेकरांच्या मध्ये बसल्या होत्या आणी त्यांची नजर मात्र जयच्या डोळ्यात एकवटलेली होती.

"वहिनी वहिनी.. मी जोरात ओरडलो." दुसर्‍याच क्षणी सर्रकन वळुन जयनी माझ्या अंगावर झेप घेतली. एका क्षणात माझा गळा त्याच्या पंज्यात आवळला गेला आणी त्याची ती हिंस्त्र नजर माझ्या नजरेत सामावली गेली. काही क्षणासाठी मी काळ, वेळा सार्‍याचे भान विसरलो, मेंदुवर एक काळसर थर साचायला सुरुवात झाली, अचानक कुठुन प्रेरणा आली कळले नाही पण मी एका हातानी जयच्या नाकावर जोरदार ठोसा मारला, काही क्षण गडबडलेल्या जयच्या अवस्थेचा फादा करुन घेत मी त्याच्या दोन्ही पायात एक जोरदार लाथ मारत स्वत:ची सुटका करुन घेतली. मिणमीणत्या उजेडात जयचा तो रक्ताळलेला चेहरा भेसुर दिसत होता. पण एक तर नक्की झाले होते की त्या अमानवी शक्तीला कुठेतरी जयच्या शरीराची मर्यादा होती.

"बाबा" अचानक रसिकाच्या हाकेनी मी भानावर आलो. काहितरी केलेच पाहिजे होते नाहितर सुटका अशक्य होती. वहिनींनी दोन्ही मुलांना आपल्या कुशीत लपवुन तोंडानी मात्र 'अहो,अहो भानावर या' चा जाप लावला होता. आणी त्याचवेळी अचानक माझ्या कल्पना कीती बालीश होत्या याचे प्रत्यंतर देण्यासाठीच जणु जयनी आपला आकार हळुहळु बदलायला सुरुवात केली होती, विरळ विरळ होत जात त्याचे शरीर आता धुसर दिसायला लागले होते, एका झाडासारख्या आकारानी छतापर्यंतचा भाग व्यापला होता. हळुहळु तो विषारी आकार त्या घरभर पसरणार होता, काहि करता आले तर त्यातच, नाहितर सुटका अशक्य. वहिनी तर जवळ जवळ मुर्छीत अवस्थेतच पोचल्या होत्या.

मनाला येइल ते मंत्र, श्लोक, रामरक्षा यांचा जप चालुच होता, मी त्याच्या बरोबरीने घरभर काही मदतीसाठी उपयोगात येउ शकते का ते बघत होतो. पण त्या मोकळ्या, वापर नसलेल्या घरात असे होतेच काय ? नाही म्हणायला एक सरस्वती, गणपती आणी लक्ष्मीचा एकत्र फोटो खिळ्यावर लटकत होता. मी ताबडतोब त्या दिशेने धाव घेतली. लटपटत्या हातानी मे तो फोटु काढुन घेत असतानाच तो आकार ता तिघांवर झेपावला होता.

"सोड त्यांना" असे ओरडतच मी त्या धुक्यात प्रवेश केला, क्षणभर अक्षरश: मेंदुतल्या नसान नसा उलट्या पालट्या फिरल्याचा अनुभव आला. छातीशी तो फोटो गच्च पकडुन मी मनातल्या मनात देवाचा धवा चालु केला. शरीराची नुसती आग होत होती, मेंदुची नसन नस आक्रसली जात होती, आणी .. आणी त्याच क्षणी ते घडल, फोटोतुन बाहेर पडलेली एक तेजपुंज रेषा माझ्या शरीरात प्रवेशकर्ती झाली. काहि क्षणांसाठीच माझे शरीर अक्षरश: झगमगुन उठले, शरीर आणी मेंदुवरील बंधने तुटत असल्याची जाणीव होत असतानाचा मी शुद्ध हरपुन खाली कोसळलो.

जाग आली तेंव्हा जय, वहिनी आणी दोन्ही पाखर माझ्या आजुबाजुला बसलेली दिसली. मला डोळे उघडताना बघुन जयचा खुललेला चेहरा मला अजुन आठवतोय. खरच त्या रात्री काय 'जागले' होते अथवा 'जागवले' गेले होते ह्याची मला कल्पना नाही, पण जे घडले ते खरच अकल्पीत आणी भयंकर होते. त्या विषयाची जमेल तेव्हडी चर्चा टाळतच आम्ही कोकणाचा निरोप घेतला.

आयुष्यात आलेली एक काळरात्र येव्हडीच आपल्याला तिची आठवण राहिल आणी मग हळुहळु तीही धुरकट होत जाईल असे मला वाटत होते, पण दैवयोग काहि विचीत्रच होता. नियतीचे फासे काही वेगळेच पडले होते.

ह्या घटनेच्या साधारण २ महिन्यानंतर अचानक ध्यानी मानी नसताना ते घडले.....

शामराव, माझ्या काकांचे दोस्त.. अचानक रस्त्यात गाठ पडले. कुठेतरी घाइघाईत निघालेल्या शामरावांना मी हाक मारली.
खरेतर मी तसा माणुसघाणा माणुस, कोणाला हाक वगैरे मारुन गप्पा मारणे अशक्यच. पण काहितरी विचित्र घडत होते. "शामकाका, अती घाई संकटात जाई, वाट बघा.शेवटी कापुसच मदतीला धावणार. विश्वास ठेवा." माझ्या तोंडातुन अचानक शब्द बाहेर पडले. मी काय बोलतोय हे माझे मलाच कळेना, अरे ते शामराव थांबतात काय, मी वेड्यासारखे काही बरळतो काय ? मला कशाचा अर्थच लागेना.

दुसर्‍या दिवशी दुपारी शामराव माझ्या कॅफेत हजर झाले. मी काही बोलायच्या आतच त्यांनी माझ्या पायाला हात लावला, "लेकरा वाचवलेस रे संकटातुन." शामराव म्हणाले.
मला काही अर्थबोधच होईना. नंतर शामरावांच्या तोंडुन कळाले की कर्जाचे तिनही हप्ते थकलेले, ह्यावेळीही कापसाने हात दिला नाही, अशा अवस्थेत शामराव आत्महत्या करायला निघाले होते. मला भेटले तेंव्हा ते टिक-२० खरेदी करुनच निघाले होते. मला भेटले, मी अचानक काहितरी बरळलो आणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे का कोणास ठाउक माझ्या शब्दांवर त्यांचा इतका विश्वास बसला की त्यांनी खरेदी केलेली बाटली सुद्धा फेकुन दिली, आणी आज सकाळीच गुजरातचा व्यापारी येउन कापसासाठी सौदा करुन गेला होता.

मी सुन्नच झालो.....

क्रमश:

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

1 Jun 2009 - 3:29 pm | अभिज्ञ

लेखनशैली आवडली.
पुढचा भाग वाचण्यास उत्सुक.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

अनंता's picture

1 Jun 2009 - 3:58 pm | अनंता

सर्व भाग वाचूनच प्रतिक्रिया देईन म्हणतो.
आर्र तिच्या मन्दीच्या, प्रतिक्रिया दिली सुद्धा!!

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Jun 2009 - 3:35 pm | घाशीराम कोतवाल १.२

अरे परा एकदम धासु रे फुल रत्नाकर मतकरी स्टाईल
पण नानांच काय ते नाहि आल लक्षात रे
येउ दे पुढला भाग पटापट राजा
खल्लास
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

निखिल देशपांडे's picture

1 Jun 2009 - 3:35 pm | निखिल देशपांडे

मस्त जमलाय रे हा भाग..
क्रमशः अगदी योग्य जागी
पुढचा भाग लवकर येवु द्या
==निखिल

श्रावण मोडक's picture

1 Jun 2009 - 3:40 pm | श्रावण मोडक

वाट चुकली की काय? पण ठीके, पोरगं बऱ्या वाटेला लागलंय असं दिसतंय. कालच कोणाशी तरी बोलताना मराठीत हल्ली गूढ - रहस्यकथा फारशा चांगल्या होत नाहीत असा वैताग ऐकला होता. त्यांना आता पाठवतो इथं.
आता हे त्या 'शिकार'सारखं अर्धवट ठेवलंस तर याद राख... असशील तिथून मानगूट पकडून धरून आणीन आणि बडवायला बसवीन. संबंधितांनी योग्य तो बोध घ्यावा. :)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Jun 2009 - 3:48 pm | घाशीराम कोतवाल १.२

श्रावण मोडक साहेब शिकार कथा भाग १ आणि २ चे लेखक धमाल मुलगा आहे हो

**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

श्रावण मोडक's picture

1 Jun 2009 - 4:04 pm | श्रावण मोडक

हे तर आश्चर्यच...

धमाल मुलगा's picture

1 Jun 2009 - 3:40 pm | धमाल मुलगा

राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...
---
गप की लेका, दिवसाढवळ्या भ्या वाटाया लागलं!

मस्त जमलीए हो भट्टी!

अवांतरः काल काय नारायण धारप कोळून घेतलंत की काय कावेरीमध्ये?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

भडकमकर मास्तर's picture

1 Jun 2009 - 3:56 pm | भडकमकर मास्तर

अवांतरः काल काय नारायण धारप कोळून घेतलंत की काय कावेरीमध्ये?

हम्म्म.. धारपच वाट्टायत....
काय सगळ्या जॉन्रात लिवायचंच ठरवलंय काय?

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

डॉ.प्रसाद दाढे's picture

2 Jun 2009 - 5:22 am | डॉ.प्रसाद दाढे

बेस्ट.. कीप इट अप!

विजुभाऊ's picture

2 Jun 2009 - 10:21 am | विजुभाऊ

मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा
काय रे एकदम धारप्..........मस्तच रे.
शंका: "त्या "सदस्याच्या खरडवह्या भरमसाठ वाचल्याचा परीणाम कारे हा?

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

सहज's picture

1 Jun 2009 - 3:42 pm | सहज

परा, पहीला भाग तर मस्तच जमलाय.

लवकर येउ पुढचा भाग.

मिंटी's picture

1 Jun 2009 - 3:43 pm | मिंटी

परा मस्त जमलाय रे हा भाग....
अगदी योग्य जागी क्रमशः आलय ... पण आता त्या रसग्रहणासारखे ह्याची भाग लांबवु नकोस... ;)
लौकर येऊ देत पुढचा भाग :)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2009 - 3:50 pm | बिपिन कार्यकर्ते

पर्‍या... एकदम माझ्या एरियात घुसलास? आणि ते पण एवढा मस्त आणि भारी माल घेऊन? पाहून घेईन तुला... X(

अवांतर: श्रामोनी जे काही लिहिले आहे त्याची संबंधितांनी खरंच नोंद आणि दखल घ्यावी.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jun 2009 - 5:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बिका३ यांच्याशी सहमत. पर्‍या लै भारी लिहिलं आहेस रे!

इनोबा म्हणे's picture

1 Jun 2009 - 3:53 pm | इनोबा म्हणे

पहिला भाग छान जमलाय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

यशोधरा's picture

1 Jun 2009 - 3:53 pm | यशोधरा

अरे का रे क्रमशः? X(
लिही पाहू पुढचा भाग आत्ता..

शार्दुल's picture

1 Jun 2009 - 4:03 pm | शार्दुल

प. रा. मस्तच,,,,,,,,,,छान जमलाय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

छोटा डॉन's picture

1 Jun 2009 - 4:06 pm | छोटा डॉन

मस्त रे परा, छान सुरवात आहे.
लेखाचा तोल व्यवस्थित संभाळला आहेस, कुठेच अंदाज लावता येत नाही आणि लावला तर तो १०० % चुकतो आहे.

पुढच्या भागाची वाट पहात आहे ....
मात्र अपेक्षा वाढल्या आहेत हे वेगळे सांगायला नको ...

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अवलिया's picture

1 Jun 2009 - 4:11 pm | अवलिया

जबरा रे परा !
वा! मस्त !!
येवु दे पटापट पुढचा भाग !!
कधी ? टाकतोस सहावाजे पर्यंत ? की पाच वाजता टाकतोस?
पटकन टाक :)

--अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2009 - 5:36 pm | बिपिन कार्यकर्ते

नाना, एकदम मानगुटीवरच बसलात त्याच्या. ते भूत परवडलं म्हणेल तो. :)

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

1 Jun 2009 - 5:38 pm | अवलिया

ऐसा ही हुं मै ;)

--अवलिया

दिपक's picture

1 Jun 2009 - 4:14 pm | दिपक

भयानक, थरारक जबरी कथा. मस्त म्हणजे मस्तच जमलयं सगळं. येऊदेत पुढचा भाग लवकर.

अनामिक's picture

1 Jun 2009 - 5:06 pm | अनामिक

परा.. मस्तं जमलाय हा भाग. खूप दिवसांनी चांगली भयकथा वाचायला मिळाली... पुढचा भाग लवकर टाक आता.

-अनामिक

ऋषिकेश's picture

1 Jun 2009 - 5:10 pm | ऋषिकेश

बापरे! मग पुढे???????????

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

दशानन's picture

1 Jun 2009 - 5:35 pm | दशानन

ज ब रा !

लै भारी !

तुझ्या मदतीची जरा मला बी गरज आहे बे ;)

थोडेसं नवीन !

दशानन's picture

1 Jun 2009 - 5:35 pm | दशानन

ज ब रा !

लै भारी !

तुझ्या मदतीची जरा मला बी गरज आहे बे ;)

थोडेसं नवीन !

योगी९००'s picture

1 Jun 2009 - 5:42 pm | योगी९००

पुढचा भाग लवकर टाका साहेब...पहिल्यांदा वाटले की एखादे अनुभवकथन आहे.

खादाडमाऊ

बापु देवकर's picture

1 Jun 2009 - 5:49 pm | बापु देवकर

भट्टी जमलीया...आता उशीर नग...

अंगद's picture

1 Jun 2009 - 6:36 pm | अंगद

छान !!
आवडली कथा... उत्कंठा वाढवणारी आहे.

बाकरवडी's picture

1 Jun 2009 - 6:39 pm | बाकरवडी

मस्तच रे येउदेत पुढचे भाग लवकर !

:B :B :B बाकरवडी :B :B :B

रेवती's picture

1 Jun 2009 - 6:50 pm | रेवती

ए बाबा......घाबरवू नकोस रे!
आज अचानक साडेपाचला जाग आली........आधी उठून संगणकापाशी गेले तर ही गोष्टं....
भितीनं कापरंच भरलं....... देवा रे ..... वाचव मला. तेंव्हा प्रतिक्रिया दिली नाही.
आत्ता कशी सगळ्या दुनियेला जाग आलीये.....आता आम्ही प्रतिक्रिया द्यायला धीट झालोय.;)

रेवती

शाल्मली's picture

1 Jun 2009 - 7:06 pm | शाल्मली

परा,
सही आहे कथा!
लवकर टाक रे पुढचे भाग.
उत्सुकता वाढली आहे.

--शाल्मली.

मस्त कलंदर's picture

1 Jun 2009 - 7:54 pm | मस्त कलंदर

उत्कंठा वाढलिये.. आधी वाटलं सत्यकथा आहे की काय...
लवकर येऊ दे पुढचा भाग आता...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

क्रान्ति's picture

1 Jun 2009 - 8:37 pm | क्रान्ति

पुढे काय होणार आहे हो? आत्ता वाचलं तर भीतीनं झोप उडालीय!
खासच लिहिलंस रे! मस्त वातावरणनिर्मिती झालीय!
क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा

अनिल हटेला's picture

1 Jun 2009 - 8:53 pm | अनिल हटेला

आधी म्हटलं काही तरी हलकं-फुलकं परा स्टाइइलीष उलटे धंदे असणार...
पन मजा आली वाचुन ...

आंदे फटाकसे....

(अदभुत आणी अलौकीक)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

chipatakhdumdum's picture

1 Jun 2009 - 9:41 pm | chipatakhdumdum

सगळच हुत्तम हाये, गोष्ट आवाडली,
आता भाउ येकच सान्गा..........
सगळीकडे जय एकवचनी आहे...
तर..
जयनी हे केल, जयनी ते केल , असा अनेकवचनी उल्लेख बरोबर आहे का ?

परा कम्पूतला लाडका, त्याला कोण काय बोलणार ?

संदीप चित्रे's picture

1 Jun 2009 - 11:13 pm | संदीप चित्रे

सुरूवात तर एकदम चांगली झालीय... कापसाचा ट्विस्ट आवडला.
आता बाकीचा/चे भाग वाचूनच कॉमेंटतो.

Nile's picture

1 Jun 2009 - 11:21 pm | Nile

आवड्या! लवकर येवुद्या.

प्राजु's picture

1 Jun 2009 - 11:21 pm | प्राजु

पराभऊ वाट चुकलास काय रे??
एकदम गूढ कथा? कोणाच्या खरडवहीचा आधार घेतला आहेस??;)
असो.. कथा मात्र उ त्त म्म!!
मस्तच! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समिधा's picture

2 Jun 2009 - 12:15 am | समिधा

मस्तच जमलाय हा भाग..
पुढचा भाग लवकर टाक रे

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

नंदन's picture

2 Jun 2009 - 12:31 am | नंदन

पहिला भाग जमलाय मस्त, पुढचे येऊ दे लवकर.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मितालि's picture

2 Jun 2009 - 4:30 am | मितालि

भुताची कथा चांगली जमलीय.. पण कोकणात भुतं असतात असा समज पसरलाय अनेक कथा सिनेमामधुन..
मला नाही आवडल.. शहरात असतात खरी भुतं.. येऊन बघा एकदा कोकणात स्वर्ग आहे तिथे..

- रागावलेली कोंकणकन्या मितालि

चतुरंग's picture

2 Jun 2009 - 5:36 am | चतुरंग

मस्तच सुरुवात हो!
वाट बघतोय पुढच्या घाबरवण्याची! :O

(पिंगळा)चतुरंग

लवंगी's picture

2 Jun 2009 - 5:38 am | लवंगी

पटापट पुढचा भाग टाक

जृंभणश्वान's picture

2 Jun 2009 - 6:11 am | जृंभणश्वान

जबराट लिहिले आहे !

घाटावरचे भट's picture

2 Jun 2009 - 6:31 am | घाटावरचे भट

भारीये.... जामच आवडलं. लवकर लिहा.

विनायक प्रभू's picture

2 Jun 2009 - 6:53 am | विनायक प्रभू

सुरु करा परा.

सँडी's picture

2 Jun 2009 - 9:17 am | सँडी

जबरा!

मस्त लिहिलयं.

सुमीत's picture

2 Jun 2009 - 11:59 am | सुमीत

पर्‍या, अरे अगदी अदभुत च लिहिले आहेस. गावाचे वर्णन आणि मग तो सगळा भयंकर प्रसंग, एकदम अदभुत भय कथा, वळण पण अगदी वेगळेच दिले आहेस.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jun 2009 - 4:53 pm | परिकथेतील राजकुमार

प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे मनापासुन आभार __/\__

आभारी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jun 2009 - 6:06 pm | प्रकाश घाटपांडे

लेखन आवडले. पराद्भुद लेखन. चालु देत चालु देत
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.