<यज्ञधुनी>

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जे न देखे रवी...
29 May 2009 - 11:04 pm

कच्चा माल
ह. घ्या...

मध्यरात्रीच्या यज्ञधुनीतून
गांजाची वलये सोडतांना
जालिंदरबाबा गरजले
बम बम भोले
बम बम

धातुच्छादित वक्ष मिरवत
सूक्ष्माग्री शहारे देतांना
हसून मॅडोना म्हणाली
<टोचेल> <टोचेल>
<टोचेल>

प्रियेच्या झोपड्यामध्ये
साजणस्पर्शाचा भावुकदर्प
घेतांना सजणी म्हणाली
"अय्या, हे असं दिसतं?"
:''(

बालगीतविडंबन

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

29 May 2009 - 11:13 pm | भडकमकर मास्तर

ही धुनी पुन्हा फीनिक्स पक्ष्याप्रमाणे उगवली....
जालिन्दरबाबा, धुनी एकत्र..
बम बम भोले..

=))

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

मुक्तसुनीत's picture

29 May 2009 - 11:14 pm | मुक्तसुनीत

प्रियेच्या झोपड्यामध्ये
साजणस्पर्शाचा भावुकदर्प
घेतांना सजणी म्हणाली
"अय्या, हे असं दिसतं?"

हाहाहाहा....

**** म्हणजे **** म्हणजे **** असतं.
तुमचं आमचं सर्वांच अगदी "सेम" नसतं ! ;-)

$$$$ हे त्याचं दुसरं नेम असतं !

बिपिन कार्यकर्ते's picture

30 May 2009 - 2:51 am | बिपिन कार्यकर्ते

प्रियेच्या झोपड्यामध्ये
साजणस्पर्शाचा भावुकदर्प
घेतांना सजणी म्हणाली
"अय्या, हे असं दिसतं?"

पिडां..... १५ मिनिटं झाली ..... वेड्यासारखा हसतोय.... च्यायला काय डोकं म्हणायची की पिडा? ;)

=)) =)) =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

मुक्तसुनीत's picture

30 May 2009 - 3:04 am | मुक्तसुनीत

पिडां ची ही कविता वाचून मराठीतल्या एका प्रतिभावंताच्या प्रातिभ दर्शनाने पुनित अशा ओळी आठवल्या :

स्तोत्रांत इंद्रिये अवघीं
गुणगुणती दु:ख कुणाचे ?

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद पिडां दिगंबरा !

विसोबा खेचर's picture

30 May 2009 - 4:33 am | विसोबा खेचर



रा...! :)

(गांजाप्रेमी) तात्या.

अवलिया's picture

30 May 2009 - 6:05 am | अवलिया

प्रियेच्या झोपड्यामध्ये
साजणस्पर्शाचा भावुकदर्प
घेतांना सजणी म्हणाली
"अय्या, हे असं दिसतं?"

=))
=))

गुरुदेव ! चरणकमलांचे प्रकाशचित्र डकवा !!
रोज दर्शन घेईन :)

--अवलिया

विनायक प्रभू's picture

30 May 2009 - 6:47 am | विनायक प्रभू

पिडाच्या डोक्यातना काय उगवेल ते सांगता येत नाही.

श्रावण मोडक's picture

30 May 2009 - 8:49 am | श्रावण मोडक

आहात तुम्ही. साष्टांग (आलंच का इथंही अंग) दंडवत तुम्हाला.

शरदिनी's picture

30 May 2009 - 9:00 am | शरदिनी

मलाही ही कविता मज्जेशीर वाटली....
छान कल्पना आहेत...

अनंता's picture

30 May 2009 - 10:20 am | अनंता

कवितेतले निरागस (?)भाव आवडले.

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

दशानन's picture

30 May 2009 - 10:29 am | दशानन

=))

हिहिहिहिह्हिहिहिह्हिह्हिइह्हिह्हिहिह्हि !!!!!

लै भारी !

थोडेसं नवीन !

मध्यरात्रीच्या यज्ञधुनीतून
गांजाची वलये सोडतांना
जालिंदरबाबा गरजले
बम बम भोले
बम बम


अहो यज्ञधुनीत एवढा गांजा जाळला तर आजुबाजुच्या कुणालाच सुद राहणार नाय. त्यापेक्षा चिलमीतुन असा शब्द चालला असता. बाकी कविता लई निरागस(?) हाय.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

लिखाळ's picture

30 May 2009 - 1:28 pm | लिखाळ

हा हा हा हा...
ह ह पु वा :)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

परिकथेतील राजकुमार's picture

30 May 2009 - 1:35 pm | परिकथेतील राजकुमार

___/\___ महान आहात.

=)) =))

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य