ही बातमी वाचून मन विषण्ण झाले.

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
7 Feb 2008 - 10:09 pm

ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशापायी आपल्या घर-संसाराची राख केली, त्यांच्या नशिबी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही बंदिवास यावा हे त्यांचं दुर्दैव नसून आपला करंटेपणा आहे! ह्याला माफी नाही!!

काँग्रेसचा बुळेपणा आणि 'निधर्मी' असणे म्हणजे नेमके काय ह्याबद्दलचा गोंधळ ६० वर्षांनंतरही कायम आहे असेच अजून दिसते.

www.esakal.com/esakal/02072008/National467F25B420.htm

इतिहाससमाजबातमी

प्रतिक्रिया

वरदा's picture

7 Feb 2008 - 10:26 pm | वरदा

खूप वाईट वाटंलं

विसोबा खेचर's picture

7 Feb 2008 - 11:05 pm | विसोबा खेचर

बातमी वाचून वाईट नाही वाटलं, उलट संतापच आला..

आमच्यासारखे करंटे आम्हीच, ज्यांना कोलू पिसण्यातले जीवघेणे कष्ट माहीत नाहीत..!

आपला,
(सावरकरभक्त) तात्या.

चतुरंग's picture

7 Feb 2008 - 11:22 pm | चतुरंग

अहो संतापाचा अतिरेक होऊन शेवटी विषण्ण्ता आली.

नुसताच कोलू पिसणे नाही, तर त्याच वेळी "कमला" हे खंडकाव्य निर्माण करुन तुरुंगाच्या भिंतीवर कोरणे, ते मुखोद्गत करणे - भयानक शारीरिक यातनांमधे हे सुचूच कसे शकते? केवळ योगीच हे करु जाणे!!

त्या महात्म्याचे जोडेही न होण्याची लायकी असलेले त्याला तुरुंगात टाकतात?? अरेरे किती वाईट, माझं दु:ख कमीच होत नाहीये!

चतुरंग

वरदा's picture

7 Feb 2008 - 11:21 pm | वरदा

मला म्हणायचं होतं सावरकरांसाठी वाईट वाटलं आणि ह्या नालायक लोकांचा संताप आला..

त्या महात्म्याच्या पायाची धूळ होण्याची लायकी नाही यांची.

खरंच, करंटेपणाच आहे हा...

तुजसाठी जनन ते मरण, तुजवीण जनन ते मरण....
त्या स्वातंत्र्यवीराला शतशः प्रणाम..!

- प्राजु.

विसोबा खेचर's picture

8 Feb 2008 - 12:42 am | विसोबा खेचर

प्राजू,

एक लहानशी सुधारणा..

तुजसाठी जनन ते मरण,

असे नव्हे!

तुजसाठी मरण ते जनन!

असे हवे..! :)

आपला,
(काव्यातले फारसे न कळणारा!) तात्या.

प्राजु's picture

8 Feb 2008 - 12:45 am | प्राजु

बरोबर आहे..
चुकलं माझं..

-प्राजु

"पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली भारत दौऱ्यावर येणार होते. त्या वेळी भारतातील वातावरण "निधर्मी' असल्याचे भासविण्याचा सरकारचा प्रयत्न होता. "....

"सावरकरांची कारागृहातून सुटका व्हावी, यासाठी त्यांचे चिरंजीव विश्‍वास यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज सादर केला; पण आगामी निवडणुकांमध्ये सहभागी न होण्याचे व घरीच विश्रांती घेण्याचे अभिवचन सावरकरांनी दिल्यानंतरच १३ जुलै रोजी त्यांची सुटका झाली. "....

आणि हे तर भारिच...निवडणुकांमध्ये सहभागी न होण्याचे व घरीच विश्रांती घेण्याचे अभिवचन घेतल्यावर सुटका...हि लोकशाही म्हणे...धन्य आपण लोक अन् आपली लोकशाही...

गिरवीकर

इनोबा म्हणे's picture

8 Feb 2008 - 1:22 am | इनोबा म्हणे

सावरकरच काय,खरेतर या देशातील प्रत्येक क्रांतीकार्‍याला काँग्रेसशी वैर घेणे महागात पडले आहे.
आज सावरकर हयात नसतानाही त्यांना ह्याची किंमत मोजावी लागतेय. काही वर्षापुर्वी मनिशंकर अय्यर या काँग्रेसी नेत्याने अंदमानात सावरकरांच्या स्मृतीकरिता लावलेली सावरकरांची वचने 'गांधीच्या खुन्याला इथे जागा नाही' म्हणत काढून टाकली.ज्यांनी या देशाकरिता स्वतःच्या घरादाराची,कुटूंबाची तमा बाळगली नाही त्यांच्या प्रती अशी भावना असणे हे देशद्रोहापेक्षा भयंकर पाप आहे.

ऋषिकेश's picture

8 Feb 2008 - 1:27 am | ऋषिकेश

ज्यांनी या देशाकरिता स्वतःच्या घरादाराची,कुटूंबाची तमा बाळगली नाही त्यांच्या प्रती अशी भावना असणे हे देशद्रोहापेक्षा भयंकर पाप आहे

सहमत

धमाल मुलगा's picture

8 Feb 2008 - 10:13 am | धमाल मुलगा

ह्या॑ना १० जोडे मारुन एक मोजला तरी कमीच पडेल.

मुळात तात्याराव हि॑दुत्ववादी, त्यातून मोहनदास गा॑धी॑च्या विचारसरणीला निव्वळ "अस्पृश्य". अन् जन्मापासून कॉ॑ग्रेस गा॑धी॑ची पित्तु...सरळ साधा अर्थ आहे हो, जो "अल्पस॑ख्या॑का॑चा" (जे आता जवळजवळ ४०% आहेत..तरी अल्पस॑ख्या॑कच) विरोधी तो आमचा विरोधी!

त्या प॑चेवाल्या "महात्म्याने" म॑दीरात कुराण वाचले, त्याच्या पित्तु॑नी हि॑दू चळवळी ष॑ढ करण्याचा प्रयत्न केला. त्या॑च॑ तरी काय चुकल॑? शेवटी गटारातले किडे गटारातच वळवळणार.

तात्यारावा॑च॑ नशीबच फुटक॑, कार्याप्रमाणे मानाची वागणुक फार क्वचितच मिळाली त्या॑ना.

अवा॑तरः ऑरकुटवर "स्वात॑त्र्यवीर सावरकर" कम्युनिटीमध्ये गेल्या काही महिन्या॑पुर्वी काही दाक्षिणात्य कुत्तरड्या॑नी वेड॑वाकड॑ लिहिलेल॑ स्मरत॑. म्हणजे तात्यारावा॑ची बदनामी किती अन् कुठवर केली गेली बघा.

आपला
- (जाज्वल्य हि॑दुत्ववादी, तात्याराव सावरकरा॑चा (त्या॑च्या जोड्याशीही बसायची लायकी नसली तरी) भक्त)
ध मा ल.

"अवा॑तरः ऑरकुटवर "स्वात॑त्र्यवीर सावरकर" कम्युनिटीमध्ये गेल्या काही महिन्या॑पुर्वी काही दाक्षिणात्य कुत्तरड्या॑नी वेड॑वाकड॑ लिहिलेल॑ स्मरत"
खरी आहे ही गोष्ट.
जास्त वाईट वाटून घेऊ नका, हे साले दाक्षिणात्य म्हणजे पक्के लाचार, पोटार्थी आणि वरून निर्लज्ज ....
त्यांना काय माहिती आहे त्याग, संस्कॄती, जाज्वल्य देशप्रेम वगैरे .....
त्यांचा आदर्श म्हणजे "एल टी टी ई चा प्रभाकरन , तो महामूर्ख करूणानिधी , ईत्यादी , ईत्यादी ............."

[ दक्षिण भारतात राहून त्यांना चांगलेच ओळखलेला ] छोटा डॉन .....

सर्वसाक्षी's picture

8 Feb 2008 - 12:42 pm | सर्वसाक्षी

अशा किती गोष्टींनी मनस्ताप करून घ्यायचा? उलट मला तर हल्ली अशी प्रत्येक घटना म्हणजे क्रांतिकारकांना मिळालेला नवा मानसन्मान भासतो.
ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्याची आणि घरादाराची राख रांगोळी केली ते आपल्या ध्येयाखातर आनंदाने हुतात्मे झाले. मात्र क्रांतिकारकरूपी सिंह आणि ईंग्रजरूपी श्वापद या जबर झुंजीत एक मरेल पण दुसराही जबर जखमी होईल आणि मग आपल्याला लचके तोडायला फावेल असा सूज्ञ विचार करत लांब, सुरक्षित अंतरावर शांतपणे वाट पाहत बसलेल्या गिधाडांचे मनसुबे फळले.

स्वातंत्र्य मिळाले - गोरे ईंग्रज गेले व काळे ईंग्रज राज्यकर्ते झाले. यापेक्षा पारतंत्र्य बरे होते असे वाटले तर नवल नाही कारण पारतंत्र्यात निदान स्वातंत्र्याच्या आशेची ज्योत आपल्या प्राणाचे ईंधन करून तेवत ठेवायला धगधगते क्रांतिकारक तरी होते. स्वातंत्र्यानंतर सगळे संपले. क्रांतिकारक अतिरेकी ठरले आणि पांढरे कावळे साधु संत ठरले.
निधर्मीपणा बद्दल काय बोलावे? मला रामदास फुटाणे यांचे शब्द आठवतातः
'निधर्मी राज्याचा देखिल एक मुखवटा असतो
इथे सावरकर प्रतिगामी ठरतात आणि
खोमेनीच्या मृत्युचा दुखवटा असतो'

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Feb 2008 - 1:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय बोलावे ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

8 Feb 2008 - 2:00 pm | धमाल मुलगा

मात्र क्रांतिकारकरूपी सिंह आणि ईंग्रजरूपी श्वापद या जबर झुंजीत एक मरेल पण दुसराही जबर जखमी होईल आणि मग आपल्याला लचके तोडायला फावेल असा सूज्ञ विचार करत लांब, सुरक्षित अंतरावर शांतपणे वाट पाहत बसलेल्या गिधाडांचे मनसुबे फळले.

खर॑च गिधाड॑ ही ! रणभूमीवर लढणार्‍या जवाना॑च्या हत्यारा॑त पैसे काढून त्या॑च्या मरणावरच॑ लोणी खाणारी जात..देश विकायलासुद्धा कमी नाही करायचे हे दलाल.

'निधर्मी राज्याचा देखिल एक मुखवटा असतो
इथे सावरकर प्रतिगामी ठरतात आणि
खोमेनीच्या मृत्युचा दुखवटा असतो'

कटू असल॑ तरी जळजळीत सत्य. आणखी काय?

निधर्मी / धर्मनिरपेक्षता म्हणजे देशाच॑ अस्तित्व दहशतवादाच्या चव्हाट्यावर लिलावात मा॑डणार्‍या॑च्या दाढ्या कुरवाळायच्या, त्या॑च्या पानाच्या पि॑का ओ॑जळीत झेलायच्या अन् देशाचे आपले असलेल्या॑ना सावत्रपणाची वागणुक द्यायची...ही एव्हढी दिव्यदृष्टी बिचार्‍या तात्यारावा॑कडे नव्हती, मग ते देशाचे शत्रू नव्हेत का?
मग, शत्रूला योग्य अशी वागणूक देणे हे आमच॑ इतिकर्तव्य नाही का. हा॑ आता तात्याराव होते ते॑व्हा आमच्या हाते सत्ता नव्हती अन् ती मिळाल्यावर वा॑झोट्या तुष्टीकरणातून अन् दिसेल त्या टाळूवरच॑ लोणी खाण्यातून वेळ मिळेल ते॑व्हा त्या॑च्यावर "योग्य" ती कारवाई केलीच की आम्ही.

पाकिस्तानी आमचे भाऊब॑द, त्या॑ना दुखावून चालणार नव्हत॑, सावरकर आमचे कोण? मग टाका तुरु॑गात. नाही का?

प्रकाश घाटपांडे's picture

8 Feb 2008 - 2:50 pm | प्रकाश घाटपांडे

सावरकरांचे हिंदुत्व हे वेगळे होते. आता हिंदुत्वाची फेरमांडणी होत आहे. त्याविषयी http://abhinavnirmaan.com/ येथे पहाता येईल. सावरकर एक अभिनव दर्शन येथे पहाता येईल.
प्रकाश घाटपांडे