(एका वृद्धाचे मनोगत)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
8 May 2009 - 7:48 pm

वृद्धांच्या समस्यांचे चित्रण करणारी 'एका वृद्धाचे मनोगत' ही जागु ह्यांची कविता वाचली आणि आमच्या डोळ्यासमोर काही बेरकी म्हातारे तरळले! म्हटलं ताणलेल्या मनाला जरा विसावा देऊयात! ;)

'साठी बुद्धी नाठी' व्रत घेतले आहे
कांगाव्याने आजाराच्या भंडावले आहे
जेवणापेक्षा चटकमटक पोट भरत आहे
सल्ले कुणाला देऊ? मन उसासत आहे

जेष्ठ नागरीक म्हणून उच्छाद मांडला आहे
टीका करत तरुणाईला पुरा कांडला आहे
सौभाग्यवती बोटं मोडून करवादते आहे
'हिरवट मेले, नजर कशी भिरभिरते आहे!'

योगापेक्षा भोग मोठे मन गर्जत आहे
मुंबई-पुणे प्रवासात वड्याचं कर्जत आहे!

मुलं-सुना कंटाळून पुरते आटले आहेत
'इस्टेटीत वाटा नको' म्हणत सुटले आहेत!
'मृत्युपत्र, करुन ठेवलंय' सारखा कण्हतो आहे
'जरा शांत बसाल का?' जो तो म्हणतो आहे!

माझा अनुभव, पिकले केस वाद घालीत आहे
सगळे गप्प म्हातार्‍याच्या हाती कोलीत आहे!

चतुरंग

कविताविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

8 May 2009 - 7:57 pm | अवलिया

हा हा हा
=))

योगापेक्षा भोग मोठे मन गर्जत आहे
असेच म्हणणारा एक म्हातारा आमच्या परिचयात आहे बर का ! ;)

--अवलिया

लिखाळ's picture

8 May 2009 - 8:00 pm | लिखाळ

मुलं-सुना कंटाळून पुरते आटले आहेत
'इस्टेटीत वाटा नको' म्हणत सुटले आहेत!

=))
कविता फारच वस्तूस्थिती दाखवणारी आहे.

'मृत्युपत्र, करुन ठेवलंय' सारखा कण्हतो आहे
'जरा शांत बसाल का?' जो तो म्हणतो आहे!
:)

जोरदार विडंबन.. लैच भारी... झकास !
-- लिखाळ.

'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

संदीप चित्रे's picture

8 May 2009 - 7:59 pm | संदीप चित्रे

>> योगापेक्षा भोग मोठे मन गर्जत आहे
मुंबई-पुणे प्रवासात वड्याचं कर्जत आहे!

असे काही नमुने पाहिले आहेत !

सहज's picture

8 May 2009 - 8:00 pm | सहज

अजुन विडंबन कसे आले नाही हाच विचार करत होतो.

मस्त!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2009 - 8:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझा अनुभव, पिकले केस वाद घालीत आहे
सगळे गप्प म्हातार्‍याच्या हाती कोलीत आहे!

मस्त ! :)

अविनाशकुलकर्णी's picture

8 May 2009 - 8:04 pm | अविनाशकुलकर्णी

यांचि शांत करा...हा म्हतारा मेल्यावर खविस होवुन घरच्यांना त्रास देणार..

प्राजु's picture

8 May 2009 - 8:12 pm | प्राजु

हाहाहा..
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

परिकथेतील राजकुमार's picture

8 May 2009 - 8:13 pm | परिकथेतील राजकुमार

सगळे गप्प म्हातार्‍याच्या हाती कोलीत आहे!
जबर्‍याच ! एकदम सणसणीत ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य