दास

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
1 Apr 2009 - 8:21 pm

या मनास लागावा अनवरत ध्यास तुझा
आप, तेज, वायु, धरा, सार्‍यांतच भास तुझा

तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा
नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी वास तुझा

अवघड ही वाट तरी आसरा जिवास तुझा
कानी घुमे मुरलीचा नाद आसपास तुझा

नाना रूपांत दिसे आगळा विलास तुझा
मनमोहन, यदुनंदन, यमुनातटी रास तुझा

तारशील भवसागरी, मजसी विश्वास तुझा
देई विसावा चरणी, प्रभु मी रे दास तुझा

माझी ही कविता आमच्या मुंबईहून प्रसिद्ध होणा-या कार्यालयीन अंकात {संचारिका २००७=०८} मध्ये पूर्व प्रकाशित झाली आहे.

कविताप्रकटनसद्भावना

प्रतिक्रिया

प्राजु's picture

1 Apr 2009 - 10:09 pm | प्राजु

क्रांती...
हॅट्स ऑफ!!!
अप्रतिम लिहिले आहेस. कोणती ओळ जास्त आवडली हे सांगणं कठीण आहे... सगळ्याच ओळी..अप्रतिम आहेत.
जियो!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

1 Apr 2009 - 10:15 pm | शितल

सहमत.
तुमच्या कविता नेहमी खुप सुंदर असतात. :)

प्रमोद देव's picture

1 Apr 2009 - 10:14 pm | प्रमोद देव

:)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

अनामिक's picture

1 Apr 2009 - 10:50 pm | अनामिक

सुंदर कविता!

-अनामिक

मीनल's picture

2 Apr 2009 - 12:00 am | मीनल

शिर्षक वाचूनच देवभाव असलेली कविता आहे हे कळत. कारण `दास`हा शब्दच ते दर्शवतो.पुढे कवितेते तो भाव अधिक उलगडत जातो.
मनाला इतका ध्यास लागला आहे की कुठेही फक्त तू आणि तूच दिसतो आहेस.मन वेड झाल आहे तुझ्यासाठी.
केवळ मनच नाही तर हे संपूर्ण शरीर हे माझ राहिलेले नाही. ते`तू`च बनले आहे. तू या शरीराचा प्राण बनला आहेस.
आणि या मनात, मुखात तू सतत रहावास अशी इच्छा आहे.
या जिवनात येणा-या कठीण प्रसंगाच्या वेळी तूझाच आधार असतो.माझ्या जवळपास तूझ अस्तित्व सदा जाणवत राहते.हे मुरलीधरा, त्यावेळी तूझी विविध रूपे डोळ्यासमोर साकारतात.तूझी सारी शक्ती आठवते आणि असा विश्वास देते की आता तूच एक तारणारा आहेस.
हे देवा, मी तूझी/तूझा दास आहे. या दासाला तूझ्या चरणी जागा दे.

सर्व परीचित अर्थाची पण उत्तम शब्दात बांधलेली भावनापूर्ण अशी कविता आहे.

अष्टाक्षरीतल्या दुस-या आणि चवथ्या ओळीच्या शेवटी अक्षराचा यमक जुळलेला आहे.
`तुझा`या शब्दच्या पुनरावृती मुळे `त्याचे` म्हणजे देवाचे (इथे तो श्री कृष्ण आहे) महत्व दर्शवून जातो.यात आपुलकी दिसते.तिथे 'आपला', किंवा 'तुमचा' हा शब्द वापरला असता तर आदर जास्त दिसला असता.

या देवावर अतिशय श्रध्दा आहे,विश्वास आहे आणि वेळ प्रसंगी तोच राखण करेल अशी खात्री आहे.
`माझ्यावर प्रसंग कोसळला आहे म्हणून तूझा ध्यास आहे आणि म्हणून तूझा धावा करते आहे' अस वाटत नाही कारण ती भावना व्यक्त करणा-या ओळी कवितीच्या मध्यावर आल्या आहेत. त्या जर सुरवातीला आल्या असत्या तर तसे वाटल असत.

सुरवात होते ती मनाच्या स्थितीचे वर्णन करणारी -- 'तूझा न आवरता येणारा ध्यास, जळी-तळी `तूच तू` असण्याचा मनाला होणारा भास' या तून एक प्रकारचे पछाडले पण दिसते. आकर्षण दिसते.
काही साध्य केले की त्याचा ध्यास नसतो, त्याचे आकर्षण रहात नाही. ती मिळेपर्यंत मात्र त्याचा ध्यास लागतो.अगदी असाच ध्यास असतो तो.
'ध्यास' या शब्दा मुळे मनात काही तरी कमी आहे अस वाटत. म्हणजे`तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा` अस असल तरी ही तूझा ध्यास मनाला लागला आहे.
ही मनातली कमी पुढिल ओळी अधिक स्पष्ट करतात.
'नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी तुझा वास राहो' यात तूझा विसर होईल,कदाचित ही स्थिती कायम राहणार नाही,,
अशी भिती दिसते आणि म्हणून ते तस होऊ देऊ नकोस अशी विनंती आहे.
मग कवितेत दिसतो तो देवावर संपूर्ण विश्वास आणि कवितेचा शेवट होतो लीन आर्जवाने.

मनाला लागलेला देवाचा ध्यास,विनंती, श्रध्दा आणि आर्जव या टप्प्यात भावनापूर्ण कविता संपन्न झाली आहे.

मीनल.

प्राजु's picture

2 Apr 2009 - 12:20 am | प्राजु

मीनल.. सुरेख रसग्रहण केलं आहेस.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला's picture

2 Apr 2009 - 6:20 am | अनिल हटेला

उत्तम कविता आणी रसग्रहण !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

चंद्रशेखर महामुनी's picture

2 Apr 2009 - 12:14 am | चंद्रशेखर महामुनी

यावर काय बोलु हे मला सुचत नाहि..
अप्रतिम... !

क्रान्ति's picture

2 Apr 2009 - 6:05 am | क्रान्ति

मीनलताई, खूप सुरेख रसग्रहण केलंस. अगदी तंतोतंत!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

विशाल कुलकर्णी's picture

2 Apr 2009 - 11:15 am | विशाल कुलकर्णी

कविता तर सुरेखच आणि मीनलचे रसग्रहण म्हणजे दुधात साखर !

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

राघव's picture

2 Apr 2009 - 11:30 am | राघव

तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा
नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी वास तुझा

हे खास!

त्यात जर असे असेल तर? -
राहो मुखी नाम तुझे, ध्यानी मनी वास तुझा

राघव

जयवी's picture

2 Apr 2009 - 1:16 pm | जयवी

कविता आणि रसग्रहण.... दोन्ही छान :)

जागु's picture

2 Apr 2009 - 2:34 pm | जागु

खुप छान.

पल्लवी's picture

2 Apr 2009 - 6:15 pm | पल्लवी

कविता खूप आवडली :)

मनीषा's picture

2 Apr 2009 - 7:50 pm | मनीषा

आप, तेज, वायु, धरा, सार्‍यांतच भास तुझा ...

तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा
नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी वास तुझा .......खूपच छान !

चन्द्रशेखर गोखले's picture

2 Apr 2009 - 10:41 pm | चन्द्रशेखर गोखले

सुंदर भवार्थ दिपिका.. साधी सरळ सोज्वळ कविता.. अभिनंदन !!

इश्वर करो या सुंदर कवितेचे कोणी विडंबन न करो .

मदनबाण's picture

3 Apr 2009 - 4:38 am | मदनबाण

सुरेख कविता... :)

मदनबाण.....

मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
जालावरुन सभार...