कृष्णमयी..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
19 Mar 2009 - 10:46 pm

ऐन त्या दुपारी, कालिंदीच्या तिरी
खेळतो मुरारी, पाठशीव..

हसत खेळत, अल्लड गोपिका
अव्खळ राधिका, कान्हा पाही..

घट डोईवर, चाले भराभर
नदी तीरावर, पाण्यासाठी..

भरूनिया कुंभ, घेता डोईवर
खडा घटावर, ट्णकारला..

भिजुनिया चिंब, शहारे सर्वांग
निरखे श्रीरंग, राधिकेला..

चोरून ती उभी, अव्घड ओलेती
सावळ्याची मिठी, अंगभर..

मिटले नयन, सुटला पदर
थरारे अधर, चुंबताना..

म्हणा कृष्णसखी, अथवा सानिका
झाली ही राधिका, कृष्णमयी..

पावरीचा सूर, आज दूर दूर
प्रणयाचा पूर, गोकुळात..

- प्राजु
वि. सु. = अव्खळ , अव्घड हे मात्रा सांभाळण्यासाठी लिहिले आहे.

कविताप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

19 Mar 2009 - 10:54 pm | क्रान्ति

सुरेख कविता! "मोहे पनघट पे" मधली मधुबाला समोर आली!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

शितल's picture

19 Mar 2009 - 10:57 pm | शितल

प्राजु,
कृष्णमय काव्य आवडले. :)

टारझन's picture

20 Mar 2009 - 10:17 pm | टारझन

जबरी !! एक णंबर !! सर्व ओळी फ्लॉलेस आहेत .. चुकून आवडणार्‍या कवितांपैकी एक !!
और आणे दो बॉस

मानस's picture

19 Mar 2009 - 11:02 pm | मानस

मिटले नयन, सुटला पदर
थरारे अधर, चुंबताना..

क्या बात है!!

प्राजु, सांभाळ .... वारकरी संप्रदाय मागे लागतील ..... तुझ्या "संपादक" पदाच्या राजीनाम्याची !!

संदीप चित्रे's picture

20 Mar 2009 - 1:15 am | संदीप चित्रे

कविता मात्र सुरेख :)
अव्खळ पहिल्यांदा वाचलं तेव्हा वेगळेपणामुळे छान वाटलं.
अव्घडच्या जागी दुसरा शब्द बघ म्हणजे 'अव्खळ'चा इंपॅक्ट कमी होणार नाही.

बेसनलाडू's picture

19 Mar 2009 - 11:07 pm | बेसनलाडू

कविता आवडली.
(वाचक)बेसनलाडू

अवलिया's picture

19 Mar 2009 - 11:08 pm | अवलिया

वा ! मस्तच !!

--अवलिया

चंद्रशेखर महामुनी's picture

20 Mar 2009 - 12:18 am | चंद्रशेखर महामुनी

झकास ! प्राजु !

धनंजय's picture

20 Mar 2009 - 12:24 am | धनंजय

या छंदावर सुरेल प्रभुत्व मिळवले आहे!

श्रावण मोडक's picture

20 Mar 2009 - 12:38 am | श्रावण मोडक

हेच मनात आले होते.
अवांतर - हा कान्हा अंमळ 'तयार' दिसतो. निरखणे वगैरे गुण खास आहेत बाकी...

मीनल's picture

20 Mar 2009 - 12:24 am | मीनल

ओठून ताणून देवद्वार छंदात बसवलेली आह ते सुचने शिवायच कळत आहे ग.
पण समोर प्रसंग साकारणारी कविता आहे.
तूझ्या यापेक्षा कितीतरी सरस कविता वाचल्या आहेत.
त्यामुळे ही मामुली वाटली. म्हणजे माझ्यासारख्या नौशिक्याने केल्यासारखी वाटली.
मीनल.

विसोबा खेचर's picture

20 Mar 2009 - 12:48 am | विसोबा खेचर

प्राजूवैनींची नेहमीप्रमाणेच सुंदर कविता..!

तात्या.

शिवापा's picture

20 Mar 2009 - 1:52 am | शिवापा

सु-रे-ख-!

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Mar 2009 - 5:23 am | बिपिन कार्यकर्ते

स ह म त

बिपिन कार्यकर्ते

स्मिता श्रीपाद's picture

20 Mar 2009 - 10:33 am | स्मिता श्रीपाद

चोरून ती उभी, अव्घड ओलेती
सावळ्याची मिठी, अंगभर..

सुरेखच गं.....

भरूनिया कुंभ, घेता डोईवर
खडा घटावर, ट्णकारला..

ट्ण्कारला... हा शब्द भारीच :-)

खुप छान कविता...

काल दिवसभर "राधे रंग तुझा गोरा.." च्या धुन्दीत होते....आणि आता आज ही तुझी कविता...
आजचा दिवस पण छान जाणार ..:-)

-स्मिता

मृगनयनी's picture

20 Mar 2009 - 10:44 am | मृगनयनी

मस्त गं प्राजु!
:)

म्हणा कृष्णसखी, अथवा सानिका
झाली ही राधिका, कृष्णमयी..

हे सर्वांत आवडलं!

:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

अमोल खरे's picture

20 Mar 2009 - 1:26 pm | अमोल खरे

मस्त कविता प्राजुताई.

दत्ता काळे's picture

20 Mar 2009 - 1:38 pm | दत्ता काळे

मीही हेच म्हणतो.

सुधीर कांदळकर's picture

20 Mar 2009 - 1:45 pm | सुधीर कांदळकर

चरणातून अधिकाधिक बहरणारा प्रणय शेवटच्या दोन कडव्यांत सुरेख रीतीनें सूचक झाला आहे. कोठेहि संकेतांचें उल्लंघन न करतां. छान.

सुधीर कांदळकर.

अनामिक's picture

20 Mar 2009 - 6:44 pm | अनामिक

हेच म्हणतो. सुंदर कविता.

-अनामिक

स्वाती राजेश's picture

20 Mar 2009 - 5:48 pm | स्वाती राजेश

मस्त काव्य केले आहेस नेहमीप्रमाणे..:)

आनंदयात्री's picture

20 Mar 2009 - 6:50 pm | आनंदयात्री

वाह .. एकसे एक प्रणयकाव्ये !!

प्राजु's picture

20 Mar 2009 - 7:04 pm | प्राजु

कविता आवडलेल्या आणि न आवडलेल्या सर्वांचे मनापासून आभार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पुष्कराज's picture

20 Mar 2009 - 7:53 pm | पुष्कराज

प्राजु
वेगळ्या छंदातल काव्य छान आलय, सहज पुढे सरकणारी कविता आहे

शक्तिमान's picture

20 Mar 2009 - 7:59 pm | शक्तिमान

छंदातील काही कळत नाही.. पण कविता फारच भारी आहे...
अतिशय सुरेख!

शाल्मली's picture

20 Mar 2009 - 8:57 pm | शाल्मली

प्राजु,
कविता मस्त झाली आहे.
आवडली. :)

--शाल्मली.