मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कृष्णमयी..

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
ऐन त्या दुपारी, कालिंदीच्या तिरी खेळतो मुरारी, पाठशीव.. हसत खेळत, अल्लड गोपिका अव्खळ राधिका, कान्हा पाही.. घट डोईवर, चाले भराभर नदी तीरावर, पाण्यासाठी.. भरूनिया कुंभ, घेता डोईवर खडा घटावर, ट्णकारला.. भिजुनिया चिंब, शहारे सर्वांग निरखे श्रीरंग, राधिकेला.. चोरून ती उभी, अव्घड ओलेती सावळ्याची मिठी, अंगभर.. मिटले नयन, सुटला पदर थरारे अधर, चुंबताना.. म्हणा कृष्णसखी, अथवा सानिका झाली ही राधिका, कृष्णमयी.. पावरीचा सूर, आज दूर दूर प्रणयाचा पूर, गोकुळात.. - प्राजु वि. सु. = अव्खळ , अव्घड हे मात्रा सांभाळण्यासाठी लिहिले आहे.

वाचने 4140 वाचनखूण प्रतिक्रिया 26

क्रान्ति 19/03/2009 - 22:54
सुरेख कविता! "मोहे पनघट पे" मधली मधुबाला समोर आली! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

शितल 19/03/2009 - 22:57
प्राजु, कृष्णमय काव्य आवडले. :)

In reply to by शितल

टारझन 20/03/2009 - 22:17
जबरी !! एक णंबर !! सर्व ओळी फ्लॉलेस आहेत .. चुकून आवडणार्‍या कवितांपैकी एक !! और आणे दो बॉस

मानस 19/03/2009 - 23:02
मिटले नयन, सुटला पदर थरारे अधर, चुंबताना.. क्या बात है!! प्राजु, सांभाळ .... वारकरी संप्रदाय मागे लागतील ..... तुझ्या "संपादक" पदाच्या राजीनाम्याची !!

In reply to by मानस

संदीप चित्रे 20/03/2009 - 01:15
कविता मात्र सुरेख :) अव्खळ पहिल्यांदा वाचलं तेव्हा वेगळेपणामुळे छान वाटलं. अव्घडच्या जागी दुसरा शब्द बघ म्हणजे 'अव्खळ'चा इंपॅक्ट कमी होणार नाही.

बेसनलाडू 19/03/2009 - 23:07
कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू

धनंजय 20/03/2009 - 00:24
या छंदावर सुरेल प्रभुत्व मिळवले आहे!

In reply to by धनंजय

श्रावण मोडक 20/03/2009 - 00:38
हेच मनात आले होते. अवांतर - हा कान्हा अंमळ 'तयार' दिसतो. निरखणे वगैरे गुण खास आहेत बाकी...

मीनल 20/03/2009 - 00:24
ओठून ताणून देवद्वार छंदात बसवलेली आह ते सुचने शिवायच कळत आहे ग. पण समोर प्रसंग साकारणारी कविता आहे. तूझ्या यापेक्षा कितीतरी सरस कविता वाचल्या आहेत. त्यामुळे ही मामुली वाटली. म्हणजे माझ्यासारख्या नौशिक्याने केल्यासारखी वाटली. मीनल.

विसोबा खेचर 20/03/2009 - 00:48
प्राजूवैनींची नेहमीप्रमाणेच सुंदर कविता..! तात्या.

शिवापा 20/03/2009 - 01:52
सु-रे-ख-!

In reply to by शिवापा

बिपिन कार्यकर्ते 20/03/2009 - 05:23
स ह म त बिपिन कार्यकर्ते

स्मिता श्रीपाद 20/03/2009 - 10:33
चोरून ती उभी, अव्घड ओलेती सावळ्याची मिठी, अंगभर.. सुरेखच गं..... भरूनिया कुंभ, घेता डोईवर खडा घटावर, ट्णकारला.. ट्ण्कारला... हा शब्द भारीच :-) खुप छान कविता... काल दिवसभर "राधे रंग तुझा गोरा.." च्या धुन्दीत होते....आणि आता आज ही तुझी कविता... आजचा दिवस पण छान जाणार ..:-) -स्मिता

मृगनयनी 20/03/2009 - 10:44
मस्त गं प्राजु! :) म्हणा कृष्णसखी, अथवा सानिका झाली ही राधिका, कृष्णमयी.. हे सर्वांत आवडलं! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

अमोल खरे 20/03/2009 - 13:26
मस्त कविता प्राजुताई.

सुधीर कांदळकर 20/03/2009 - 13:45
चरणातून अधिकाधिक बहरणारा प्रणय शेवटच्या दोन कडव्यांत सुरेख रीतीनें सूचक झाला आहे. कोठेहि संकेतांचें उल्लंघन न करतां. छान. सुधीर कांदळकर.

In reply to by सुधीर कांदळकर

अनामिक 20/03/2009 - 18:44
हेच म्हणतो. सुंदर कविता. -अनामिक

स्वाती राजेश 20/03/2009 - 17:48
मस्त काव्य केले आहेस नेहमीप्रमाणे..:)

आनंदयात्री 20/03/2009 - 18:50
वाह .. एकसे एक प्रणयकाव्ये !!

प्राजु 20/03/2009 - 19:04
कविता आवडलेल्या आणि न आवडलेल्या सर्वांचे मनापासून आभार. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पुष्कराज 20/03/2009 - 19:53
प्राजु वेगळ्या छंदातल काव्य छान आलय, सहज पुढे सरकणारी कविता आहे

शक्तिमान 20/03/2009 - 19:59
छंदातील काही कळत नाही.. पण कविता फारच भारी आहे... अतिशय सुरेख!

शाल्मली 20/03/2009 - 20:57
प्राजु, कविता मस्त झाली आहे. आवडली. :) --शाल्मली.