मी

सायली पानसे's picture
सायली पानसे in जे न देखे रवी...
12 Mar 2009 - 4:18 pm

माझ्या एका मैत्रिणीची ही ईंग्रजी कविता काल वाचली...मनाला स्पर्शुन गेली.
तिच्या कवितेचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे... मुळ आशयाला धक्का न लावता मराठीत अनुवाद करताना काही बदल केले आहेत.....
काहि चुक असल्यास संभाळुन घ्यावे..( शुध्द्लेखनात चुका असल्यास प्लीज सांगा... मी थोडी कच्ची आहे त्यात.)
(मुळ कविता.. I am a Women ..by.Ms.T.Kumaran)

मी...

मी..
मुक्त विहंग
माझे पंख छाटु नकोस....

मी..
अवखळ पाणी
मला बांध घालु नकोस....

मी..
अमर्याद आकाश
मला मर्यादा घालू नकोस....

मी..
अचल पर्वत
मला उखडु नकोस....

मी..
भडकणारी ज्वाला
मला विझवु नकोस....

मी..
गुलाबाचे फुल
मला काट्यांची भिती घालु नकोस....

मी..
अथांग सागर
माझा तळ शोधु नकोस....

मी..
तुझे प्रेम
माझा द्वेष करु नकोस.....

मी..
एक स्त्री
माझ्यावर प्रेम करायचे असेल
तर माझे स्वातंत्र्य हिरावुन घेऊ नकोस!

(अनुवाद..सायली.)

कवितामुक्तकभाषांतर

प्रतिक्रिया

अवलिया's picture

12 Mar 2009 - 4:22 pm | अवलिया

मी
एक उनाड
माझा प्रतिसाद मागु नकोस

:)

--अवलिया

सायली पानसे's picture

12 Mar 2009 - 4:27 pm | सायली पानसे

मी
महा उनाड
धन्यवादाची अपेक्षा बाळगु नकोस.....:-)

(बाप रे... अवघड आहे...पण तरी मस्त ..धन्यवाद.)

लिखाळ's picture

12 Mar 2009 - 4:29 pm | लिखाळ

चांगले आहे.

मला स्विकार, माझ्या सोबत राहा पण माझ्या व्यक्तित्वाला धक्का लाऊ नकोस असे कवयित्रीला सांगायचे आहे असे वाटले.
वाहते पाणी वापर, पण वाहणे थांबवू नकोस या सारख्या कडव्यांतून ते स्पष्ट होते. पण, गुलाबाचे फुल आणि काटे टोचणे हे वरील तर्काला धरुन वाटले नाही. मी गुलाबाचे फुल, मला कुस्करु नकोस किंवा पाकळ्या तोडू नकोस असे काहे चालले असते. तसेच मी जर प्रेम असेन तर माझा कुणी द्वेश केला तर मी प्रेमच राहिन मी मूलतः कसा बदलेन? हे कडवे सुद्धा नीट समजले नाही.

पुलेशु.
-- लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2009 - 4:34 pm | बिपिन कार्यकर्ते

छान आहे. लिखाळाच्या १-२ मुद्द्यांशी सहमत. मूळ इंग्रजी कविता पण देता आली बरं होईल. नीट समजवून घेता येईल.

बिपिन कार्यकर्ते

दशानन's picture

12 Mar 2009 - 4:35 pm | दशानन

छान आहे प्रयत्न !

दुवा देता आला तर बरं होईल... येथेच नका चिटकवू प्लीज.

सायली पानसे's picture

12 Mar 2009 - 4:45 pm | सायली पानसे

अनुवाद करण्याचा मी पहिल्यांदाच प्रयत्न केला आहे कृपया काही चुकल्यास संभाळुन घ्यावे.
मुळ कवितेत तिला असा म्हणायचे आहे कि मी एक स्त्रि आहे पण मला मुक्त केल्याशिवाय माझ्यावर प्रेम नाहि करता येणार..मी शेवट थोडा वेगळा केला..
तिच्या ओळी विधानत्मक आहेत मी अनुवाद करताना थोडा..विंनतीवजा सुर लावला आहे..
ही एका प्रेमभंग झालेल्या उद्विग्न मुलीची भावना कवितेत मांडली आहे...त्यामुळे तिने विधान केले आहे की मी... प्रेम आहे... तू माझा तिरस्कार नाहि करु शकत्...मी प्रेमच राहिन..
गुलाबाच्या फुलाबद्दल ती म्हणते कि i am a rose...u cant throne me. कदाचीत अनुवाद तितकासा नीट जमला नाहि मला या ओळिंचा..
काढु का ह्या ओळी?

लिखाळ's picture

12 Mar 2009 - 4:49 pm | लिखाळ

अहो ओळी काढू वगैरे नका. मी प्रश्न विचारला इतकेच. टु थ्रोन म्हणजे काय माहित नाही. मी एक गुलाब आहे, मला काटेरी मुकुट घालू नकोस असा काही मूळ अर्थ असावा. म्हणजेच तुझ्या आपेक्शांचे काटे..असे काही तरी असावे..असो...
आपण केलेला अनुवाद चांगला आहे.
पुलेशु.
-- लिखाळ.

सायली पानसे's picture

12 Mar 2009 - 5:53 pm | सायली पानसे

मी टंकलेखन करताना गड्बड केली.. the word is thorn...
म्हणजे काटा असा अर्थ असावा.

सायली पानसे's picture

12 Mar 2009 - 5:09 pm | सायली पानसे

काही ओळी बदलल्या आहेत... पुनश्च विचार करता या जास्त योग्या वाटल्या....

प्राजु's picture

12 Mar 2009 - 9:32 pm | प्राजु

किप इट अप.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

12 Mar 2009 - 10:35 pm | क्रान्ति

विषय चांगला घेतलाय, प्रयत्नही चांगला आहे.
आणखी अशाच कवितांची अपेक्षा आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}