तिची रुणूझुणू चाल---

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
16 Feb 2009 - 6:05 pm

तिचा मोकळा वावर
तिचा मोकळा वावर
माझ्या अवती भवती
माझ्या रोमरोमातून

तिचे रोज येणे जाणे
माझ्या ह्रद्यी रहाणे
कशी जाइल ती दूर
तिचा मोकळा वावर

तिची रुणूझुणू चाल
पायी कळ्या होती फुलं
गंध फुलत्या फुलांचा
दाटे तिच्या सभोवार
तिचा मोकळा वावर

तिच्या जीवघेण्या अदा
सारे जग होइ फीदा
परि माझीच ती सदा
माझ्या डोळ्याची झालर
तिचा मोकळा वावर

तिचे बोलणारे डोळे
जणू चांदणे कोवळे
त्या डोळ्यांमध्ये खेळे
माझ्या प्रेमाची पाखंर
तिचा मोकळा वावर

तिचे माझे एक होणे
नभ धरती मिळणे
माझ्या मनातिल गाणे
येइ तिच्या ओठावर
तिचा मोकळा वावर

अशी तीची माझी साथ
किती युगांच हे नात
माझे ह्रद्य छेडते
तिच्या ह्रद्यी सतार
तिचा मोकळा वावर

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

राघव's picture

16 Feb 2009 - 6:16 pm | राघव

तिचे माझे एक होणे
नभ धरती मिळणे
माझ्या मनातिल गाणे
येइ तिच्या ओठावर

हे आवडले.
मुमुक्षु

मीनल's picture

16 Feb 2009 - 8:05 pm | मीनल

मस्त आहे कविता.
`तिचा मोकळा वावर ` पुन्हा पुन्हा येणे परिणाम कारक आहे.
कदाचित ते शिर्षक अधिक चांगले वाटले असते.
पण `तिची रुणूझुणू चाल`` हेही आकर्षक आहे .
म्हणजे --तिचा मोकळा वावर रुणूझुणू चालीतून आहे.
मस्त.
मीनल.