तिची रुणूझुणू चाल---
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तिचा मोकळा वावर
तिचा मोकळा वावर
माझ्या अवती भवती
माझ्या रोमरोमातून
तिचे रोज येणे जाणे
माझ्या ह्रद्यी रहाणे
कशी जाइल ती दूर
तिचा मोकळा वावर
तिची रुणूझुणू चाल
पायी कळ्या होती फुलं
गंध फुलत्या फुलांचा
दाटे तिच्या सभोवार
तिचा मोकळा वावर
तिच्या जीवघेण्या अदा
सारे जग होइ फीदा
परि माझीच ती सदा
माझ्या डोळ्याची झालर
तिचा मोकळा वावर
तिचे बोलणारे डोळे
जणू चांदणे कोवळे
त्या डोळ्यांमध्ये खेळे
माझ्या प्रेमाची पाखंर
तिचा मोकळा वावर
तिचे माझे एक होणे
नभ धरती मिळणे
माझ्या मनातिल गाणे
येइ तिच्या ओठावर
तिचा मोकळा वावर
अशी तीची माझी साथ
किती युगांच हे नात
माझे ह्रद्य छेडते
तिच्या ह्रद्यी सतार
तिचा मोकळा वावर
वाचने
1247
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
छान प्रयत्न.
आवडली